Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, राहिलंच. आज सचिनला
हो, राहिलंच. आज सचिनला फलंदाजीची लय सांपडली हें नक्की. भात्यातले सर्व फटके आज त्याने घोटवून घेतले ! १००व्या शतकापेक्षाही हें आनंददायक !!
>>> १००व्या शतकापेक्षाही हें
>>> १००व्या शतकापेक्षाही हें आनंददायक !!
नक्कीच! शतक झाले असते तर अजून आनंद झाला असता. पण भारत जिंकतो आहे हे त्यापेक्षा जास्त आनंददायी आहे.
आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच
आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अश्विन सामनावीर होणार. त्याने भज्जीची परतीची वाट बंद केली आहे. परंतु आस्ट्रेलियाच्या दौर्यावर भज्जी हवाच. आणि आपला झहीर खान कोठे आहे? तो ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी संघात नसेल तर आपल्या गोलंदाजीची पुरती वाट लागेल.
जिंकलो ! अभिनंदन ! गरज
जिंकलो ! अभिनंदन !
गरज नसताना युवी आउट झाला. - असो जिंकलो हे महत्त्वाचे.
(बाफ योग्य वेळी, योग्य त्या घटिका पळे भरल्यावरच काढावा हे परत सिद्ध झाले.
)
अगदी आरामात जिंकलो! लक्ष्मणला
अगदी आरामात जिंकलो! लक्ष्मणला परत सूर गवसला हे फार चांगले झाले. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर तो सुद्धा हवाच.
एकदाचं गंगेत घोडं न्हायलं...
एकदाचं गंगेत घोडं न्हायलं...
(No subject)
<< आपल्या पदार्पणाच्या
<< आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अश्विन सामनावीर होणार. त्याने भज्जीची परतीची वाट बंद केली आहे >> अश्विनचं कौतुक आहेच पण ..... कोणत्याही फिरकी गोलंदाजाच्या केवळ कोटलाच्या ह्या खेळपट्टीवरच्या कामगिरीवरून असा निष्कर्ष काढणं घाईचं होईल, असं नाही वाटत ?
मास्तर - झहीर सध्या पुण्यात
मास्तर - झहीर सध्या पुण्यात आहे...योगाचार्य अय्यंगार यांच्याकडे फिटनेसचे धडे घेतोय.
काल सचिनचे शतक होईल म्हणून
काल सचिनचे शतक होईल म्हणून मॅच बघत बसलो. शतक झाले नाही पण मजा आली. सचिन आणि लक्ष्मण मस्त खेळले एकदम. सहज सुंदर फटके मारले दोघांनीही.
लक्ष्मण सचिनला स्ट्राईक द्यायचं काम पण एकदम चोख बजावत होता. होईल महाशतक. मॅच जिंकली काल ते भारीच !
Down Under जायच्या आधी ते शतक
Down Under जायच्या आधी ते शतक झाले म्हणजे मिळवली.
अश्विनला bounce आवडतो असे त्याचा कोच म्हणतोय, म्हणजे down under ला न्यायला हरकत नसावी. तसेही भज्जीला SCG बॉल सोडले तर बाकीच्यांची allergy आहे.
भाऊ चौथा कोण ? युवी ? आपले कोणी ऐकत नाहि कि एका मॅचमधे सचिन, द्रविड नि लक्ष्मण पैकी दोनच असावे. अशाने ते तिघे एकदम राम राम ठोकतील तेंव्हा कोणी तरी तयार झालेले असेल.
जिंकलो. सचिनला त्याच्या सहज
जिंकलो. सचिनला त्याच्या सहज पद्धतीने खेळताना बघून आनंद झाला. पण ७६??? अजून २४च हवे होते.
पण सचिनवर मीडीयाचं प्रेशर खूपच वाढत चाललय असं नाही वाटत?
पुढची मॅच मुंबई आहे का? तसं असेल तर मी देव पाण्यात बुडवून ठेवते.
कलकत्त्याला आहे. त्याच्या
कलकत्त्याला आहे. त्याच्या पुढची मुंबईत.
मुंबईतच त्याने दुसर्या डावात
मुंबईतच त्याने दुसर्या डावात शतक करून सामना जिंकून द्यावा. अंबानीच्या बंगल्यापेक्षा मोठ्ठा बंगला सरकार त्याला बांधून देईल!
त्याच्या रेस्टॉरंटमधे त्याने सर्व गरीबांना फुकट पोटभर खायला घालावे.
मग तर शिवाजी पार्कवर त्याचा भला मोठा पुतळा उभारतील.
सचिन पन्नासपर्यंत शांतपणे
सचिन पन्नासपर्यंत शांतपणे खेळत होता. पण नंतर त्याला शतकाला आवश्यक असलेले रन्स आणि भारताला जिंकायला आवश्यक असलेले रन्स याचे प्रमाण असे होते गेले की त्याला रिस्क घेऊन रन्स काढणे आवश्यक झाले. त्यामुळे तोपर्यंत स्लो आणि बाउन्स नसलेल्या पिच ला तो व्यवस्थित अॅडजस्ट झाला होता, तरीही त्याने अॅक्रॉस खेळणे वगैरे चालू केले. दुसरा पर्याय नसावा. लक्ष्मण ने सुरूवातीला थोडे फोर्स मारले पण नंतर तो त्याला सिंगल काढून स्ट्राईक देऊ लागला होता. सचिन नंतर अॅक्रॉस खेळतानाच आउट झाला.
काल त्याने व्ही मधे एकही शॉट मारला नाही. पिचमुळेच असेल.
झहीरने काल ब्रेबॉर्नवर
झहीरने काल ब्रेबॉर्नवर मुंबईच्या संघासोबत सराव केला.मुंबईकडून तो कर्नाटकविरुद्धचा रणजी स्पर्धेतला सामना खेळेल.
<< सचिन नंतर अॅक्रॉस
<< सचिन नंतर अॅक्रॉस खेळतानाच आउट झाला. >> खरंय. पण मुख्य म्हणजे त्याने गुगली अचूक ओळखला होता व म्हणूनच तो स्केअर लेगला फटका खेचत होता. केवळ चेंडू खूपच खाली राहिल्याने तो पायचित झाला. थोडक्यात, एकाग्रता भंगल्यामुळे किंवा गोलंदाजाने चकवल्यामुळे तो बाद झाला नाही, हे आशादायक आहे.
मुख्य म्हणजे त्याने गुगली
मुख्य म्हणजे त्याने गुगली अचूक ओळखला >>> भाऊ मुख्य म्हणजेनी घोळ होतोय. अहो सचिन गुगलीही ओळखू शकणार नाही का?
(अर्थात सचिन आहे म्हणून आउट होणार नाही असे मी म्हणत नाहीये)
परवा सचिन खूप चाचपडत खेळला असे मला राहून राहून वाटले. इथे फक्त लिहिले नाही, पण चौथ्या दिवशी मात्र खरा सचिन पाहायला मिळाला. कदाचित बर्याच दिवसांनतंर पुनरागम व पहिल्या इनिंग मध्ये काहीच धावा केल्या नव्हत्या, शिवाय चौथ्यावेळेख खेळून २७६ काढायच्या असे म्हणून असले तरी मला बघवत नव्हते. बिशूचे अनेक चेंडू जे सेहवाग सहज टोलवत होता, त्यालाच सचिन बचावात्मक खेळत होता. (परत जितके जास्त बॉल थांबू तितका आत्मविश्वास वाढेल वगैरे आहेच.) पण सचिन साठी?
<< त्यालाच सचिन बचावात्मक
<< त्यालाच सचिन बचावात्मक खेळत होता. >> याची दुसरी बाजू अशीही असूं शकते - अ] वेळेचं कांहीही बंधन नव्हतं व ब] अशा खेळपट्टीवर फिरकी आत्मविश्वासानं बचावात्मक खेळणं फक्त कसलेल्या फलंदाजालाच पेलणारं आव्हान असतं.
केदार चौथ्या दिवशीबद्दल सहमत
केदार चौथ्या दिवशीबद्दल सहमत पण आधीचा खेळ बघता तो पिच जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रिस्क घेत नव्हता असे वाटले. रन्स करायला चिकार वेळ होताच. आणि गेली काही वर्षे सचिन स्पिनविरूद्ध फार आक्रमक खेळताना पाहिला नाही - जेवढा तो स्टेन, अॅण्डरसन, ट्रेमलेट, मि. जॉन्सन, ब्रेट ली वगैरेंविरूद्ध पाहिला.
एकूणच सचिनचा आक्रमकपणा हा कसोटी मधे "जास्त कॉमन/ओल्ड स्कूल" आहे, सेहवागचे खेळणेच कसोटीच्या मानाने वेगळे आहे.
अशा खेळपट्टीवर फिरकी आत्मविश्वासानं बचावात्मक खेळणं फक्त कसलेल्या फलंदाजालाच पेलणारं आव्हान असतं.>>> एकदम सहमत.
पहिल्या दिवसअखेर भारत ५ बाद
पहिल्या दिवसअखेर भारत ५ बाद ३४६. हा सामना भारत ३ र्या किंवा जास्तीत जास्त ४ थ्या दिवशी डावाने जिंकणार.
मास्तुरे.. जसे आपले लोक
मास्तुरे.. जसे आपले लोक निवांत खेळत आहेत तसाच चंदर पण निवांतच खेळू शकतो.. तेव्हा इतक्यात काहीच बोलायला नको...
रच्याक सचिन अगदीच टपरी बॉलला आऊट झाला.. द्रवीड परत एकदा जबरीच.. बाद झाला तेव्हा फारच चिदचिड झाली त्याची... नेहमी प्रमाणेच सेहवाग सुरुवातीलाच धोपटा धोपटी करुन बाद... गंभीर पण छान खेळला..
चला, अत्यंत दुबळ्या
चला, अत्यंत दुबळ्या संघाविरुद्ध का होईना पण एकदाच्या ३०० च्या वर धावा करण्यास आमच्या फलंदाजांना महान यश!
३०० नी काय झालंय, अजून
३०० नी काय झालंय, अजून युवराज, धोनि, नि आश्विन सुद्धा आहेत. दुसरा दिवस संपण्यापूर्वी ५५० करून ठेवतील, नि त्यांचे एक दोन फलंदाज पण बाद करतील. मग शांतपणे, तिसर्या, चौथ्या, अगदी पाचव्या दिवशी पर्यंत सुद्धा त्यांना एका डावाने हरवतील.
घरके गलीमे है वो!
<< रच्याक सचिन अगदीच टपरी
<< रच्याक सचिन अगदीच टपरी बॉलला आऊट झाला >> मला अगदी तसंच वाटलं. म्हणूनच, टीव्हीवर 'एक्स्ट्रॉ कव्हर'मधे बॉलची 'ग्रीप' वगैरे दाखवून बिशूच्या त्या बॉलचं तज्ञ मंडळीत जे काय विश्लेषण चाललं होतं तें हास्यास्पद वाटलं.
भाऊ, गावस्करची कॉमेंट्री तर
भाऊ, गावस्करची कॉमेंट्री तर त्याहूनही भारी होती... आधीचे सगळे बॉल बर्यापैकी सरळ होते.. आणि नेमका हाच बॉल थोडा जास्त वळला... आणि तो खेळताना सचिन द्विधा मनःस्थितीत होता आणि त्यामुळे बॉल बॅटच्या बर्यापैकी खालच्या बाजूला लागला आणि कॅच गेला... इत्यादी इत्यादी..
द्रवीडला डबल ट्रीपल सेंच्युरीचा जबरी चान्स होता पण उद्या... अगदीच शेवटी बाद झाला बिचारा.. लक्ष्मण नीट खेळला आणि त्याला कोणी साथ दिली तर तो उद्या शेवटा पर्यंत डबल मारु शकेल कदाचित..
>> तो उद्या शेवटा पर्यंत डबल
>> तो उद्या शेवटा पर्यंत डबल मारु शकेल कदाचित
आयला! मला वाटलं फक्त कंडक्टरांनाच 'डबल' मारण्याचा हक्क आहे!
चिमण...
चिमण...
गंगूच्या कोलकत्त्यात द्रवीड
गंगूच्या कोलकत्त्यात द्रवीड फॅन क्लबचा बॅनर बघून लै भारी वाटल
द्रवीडचं गेल्या ६ कसोटीतलं हे
द्रवीडचं गेल्या ६ कसोटीतलं हे ४ थे शतक. जानेवारी २०१२ मध्ये त्याला ३९ पूर्ण होतील. जसं त्याचं वय वाढतंय, तशी त्याची शतकं पण वाढत चालली आहेत.
Pages