विंडिजचा भारत दौरा - २०११

Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56

नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !

तर काय होणार.

१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?

तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.

(मला वाटतं आपण जिंकू)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सहजचा विचार - लॉईडच्या जगजेत्या वे. इंडीजच्या संघात जबरदस्त खेळाडू होते हे निर्विवाद; पण त्याचबरोबर लॉईडसच्या नेतृत्वाशिवाय तो संघ नुसताच बेफामपणे भरकटला असता, हेही सर्वमान्य आहे. धोनीचे नेतृत्वगुण नवीन व ज्येष्ठ खेळाडू मनापासून व खुलेपणाने मान्य करतात, हाच निकष कप्तान म्हणून सर्वात महत्वाचा नाही का ? केवळ त्याला चांगला संघ मिळाला म्हणूनच तो यशस्वी झाला किंवा त्याच्या नेतृत्वाची खरी कसोटी झालीच नाही, असं म्हणणं खरंच अन्यायकारक वाटतं.

सामना ५ दिवसांचा असला तरी तो ५ व्या दिवसापर्यंत रेटला पाहिजे असा काही नियम आहे का?

क्रिकेट या खेळाचा तसा काही नियम नसावा.

पण क्रिकेट या धंद्याचे काय नियम आहेत?

सामना जर पाच ऐवजी तीनच दिवस चालला तर ज्यांनी पाचहि दिवसाची तिकीटे काढली आहेत त्यांना दोन दिवसाचे पैसे परत द्यावे लागतात का? शिवाय भारतातले लोक, ते येतच रहातात पैसे देऊन क्रिकेट बघायला. बीसीसी आय जिंकत असेल तर नक्कीच. मग काय?

आता आज त्यांना खेळवा नि सामना पाचव्या दिवशीपर्यंत खेचा. पैसे मिळतील.

>> कपिल स्वत: आक्रमक होता, पण त्याला मिळालेल्या संघाच्या दर्जात व सुनीलला मिळालेल्या संघात फारसा फरक नव्हता.
पण कपिलने वर्ल्ड कप वे. इंडिज सारख्या अतिबलाढ्य संघाविरुद्ध जिंकला. सुनीलला ते जमलं नाही. इतकंच नाही तर त्याला स्वतःला देखील ते जमेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या उलट कपिलचं होतं. फायनलला वे. इंडिज विरुद्धच्या मॅच आधी त्यानं टीमला सांगितलं 'आपण त्यांना एकदा हरवलं आहे, परत हरवू शकतो' हे फार बोलकं आहे. संघ कसाही असला तरी त्यांच्यात जिद्द निर्माण करावी लागते. सुनीलने वर्ल्ड कप मधे पूर्ण ६० ओव्हरी खेळून किती धावा केल्या .... ते मास्तर सांगेलच. Proud

धोनीचे नेतृत्वगुण नवीन व ज्येष्ठ खेळाडू मनापासून व खुलेपणाने मान्य करतात, हाच निकष कप्तान म्हणून सर्वात महत्वाचा नाही का? <<< भाऊ सहमत.. Happy
गांगूलीने भारतीय क्रिकेटला स्वाभिमान शिकवला, पण त्याच्या फलंदाजीवर आलेले असंख्य विनोद आता विसरले जातील नाही का?
सचिन जगातला सर्वोत्कॄष्ट फलंदाज आहेच, पण आजही मुंबई इंडियनकडे बघितल्यावर मी असे का म्हणालो ते लक्षात येईल.
कुंबळे अजून काही काळ लाभायला हवा होता.

दादा आपल्याला नेहमी दिसला त्यापेक्षा कितीतरी चांगला फलंदाज होता. जेव्हा तो खुन्नसने खेळत असे तेव्हा त्याची तांत्रिक वैगुण्ये त्याच्या आड येत नसत. ब्रिस्बेन मधे २००३ ला ऑसीजविरूद्ध, २००१ मधे लंकेविरूद्ध मॅचविनिंग ९८ नॉट आउट, इंग्लंड विरूद्धच्या कित्येक इनिंग्स असे अधूनमधूनच बघायला मिळाला तो. २००२ मधला तो ३२६ चा चेस कैफमुळे लक्षात राहतो पण त्यांच्या पेस बोलिंग विरूद्ध ४३ बॉल्स मधे ६० ज्या मारल्या आहेत त्यालाही तोड नाही.

काही लोकांचा खेळ खुन्नसने जास्त चांगला होतो. हरभजन सिंग, स्टीव वॉ ई. याच पंक्तीत तो बसेल फलंदाज म्हणून.

सचिन, द्रविड, अझर हे कप्तान झाल्यावर त्यांच्या बॅटिंग मधे जेवढा फरक पडला तेवढा फॅक्टर दादाच्या बॅटिंगला लावला तर अंदाज येइल. माझ्या मते तो सचिन, द्र्विड आणि लक्ष्मण यांच्या लीगमधला नक्कीच होता.

आपले मत धोनीला Happy
प्लस पॉइंट: टेंपरामेंट, डाउन टू अर्थ अ‍ॅटिट्युड आणि खेळाची समज!

>>सचिन जेव्हा जेव्हा कप्तान होता, तेव्हा तेव्हा त्याला अतिशय खराब संघ मिळाला होता
१००% अनुमोदन.... त्याच्या काळात चालणारी निवडसमितीची ढवळाढवळ केवळ अशक्य होती!
शिवाय त्याच्या कर्णधारपदाखाली अझरसारखे खेळाडू उघडउघड बेजबाबदारपणे खेळायचे Sad

>>राहुल बेदाडे
राहुल नाही अतुल बेदाडे

>>गांगुलीला जबरदस्त संघ मिळाला होता आणि तो त्यामुळे खूप यशस्वी झाला होता
त्यामुळे नव्हे त्यामुळेच Happy

>>स्वत: गांगुली अत्यंत आक्रमक कर्णधार होता.
आक्रमक आणि आक्रस्थाळी Proud

>>राहुल द्रविड कर्णधार असताना चॅपेल गुरूजींनी संघात दुफळी माजवून दिलेली होती. त्याचा त्याला फटका बसला.
२००७ च्या विश्वचषकाचा अपवाद वगळता द्रवीडची कारकीर्द उत्तम होती!

गांगुलीला जबरदस्त संघ मिळाला होता? त्यामुळेच खूप यशस्वी झाला होता???

गांगुली ने २००० च्या सुरूवातीला कप्तानपद स्वीकारले. २००० च्या मध्यावर फारशा गेम्स नव्हत्या. तेव्हा फिक्सिंग स्कॅण्डल जोरात होते.

नोव्हे. २००० ला सीझन चालू झाला तेव्हा गांगुलीला "मिळालेला" संघ पाहा. एकेक नग फार जगज्जेते होते गांगुलीला आपोआप यशस्वी करायला Happy शिब सुंदर दास, सडगोपन रमेश, साबा करीम, मुरली कार्तिक, सुनील जोशी, (तेव्हाचा) श्रीनाथ - तीन चार ओव्हर्सनंतर जीभ बाहेर काढून दम खाणे वगैरे आठवते? तसेच विजय दहिया, शरणदीप सिंग, विनोद कांबळी, सोधी, हेमांग बदानी, एस श्रीराम

बांगलादेश विरूद्ध नोव्हे २०००
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63898.html

नंतर त्याच वर्षी झिम्बाब्वे ला फॉलोऑन दिल्यावर आपल्याला दहा बोलर्स वापरायला लागले होते, तरी त्यांचा ऑल आउट झाला नाही. झिंबाब्वेचा, आणि भारतात!

येथून सुरूवात करून त्याने निवड समितीच्या सदस्यांना पुरून उरून स्वतःचा विश्वास्/इन्स्टिंक्ट असलेले खेळाडू आणले - सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, बालाजी, इरफान पठाण, धोनी - अजूनही असलेल्यांपैकी अर्धा अधिक संघ गांगुलीनेच आणलेला आहे. खुद्द धोनीसुद्धा.

नव्या दशकाचा संघ निवडताना तो निवड समितीला पुरून उरला. खुद्द जयवंत लेल्यांनीच म्हंटले आहे की तो निवड समितीच्या बैठकीला इतक्या तयारीत यायचा की कोणी त्याला क्रॉस करू शकायचे नाही. दालमियांचे बॅकिंग त्याला असेल पण अध्यक्षांचे बॅकिंग असलेला तो पहिलाच कप्तान नव्हता. १९९६ मधे गुंडाप्पा विश्वनाथ ने जवळजवळ सगळी कर्नाटकची/साउथची रणजी टीम भारताचा संघ म्हणून सचिनच्या बोकांडी बसवली (सुजीत सोमसुंदर, नोएल डेव्हिड, सुनील जोशी, श्रीनाथ, कुंबळे, प्रसाद, द्रविड, डेव्हिड जॉन्सन ई.ई.), पण सचिन त्यावर कुरघोडी करू शकला नाही. गांगुलीने तसे कधीच होऊ दिले नाही.

द्र्विड, कुंबळे आणि लक्ष्मण त्याआधी काही वर्षे खेळत होते, त्यांचे २००१ आधीचे व नंतरचे स्टॅट्स बघा, तुलना करा म्हणजे लक्षात येइल. यात कप्तानाचा काहीच हात नाही?

लॉईडच्या जगजेत्या वे. इंडीजच्या संघात जबरदस्त खेळाडू होते हे निर्विवाद; पण त्याचबरोबर लॉईडसच्या नेतृत्वाशिवाय तो संघ नुसताच बेफामपणे भरकटला असता, हेही सर्वमान्य आहे. धोनीचे नेतृत्वगुण नवीन व ज्येष्ठ खेळाडू मनापासून व खुलेपणाने मान्य करतात, हाच निकष कप्तान म्हणून सर्वात महत्वाचा नाही का ? केवळ त्याला चांगला संघ मिळाला म्हणूनच तो यशस्वी झाला किंवा त्याच्या नेतृत्वाची खरी कसोटी झालीच नाही, असं म्हणणं खरंच अन्यायकारक वाटतं.

संघाच्या यशात कप्तानापेक्षा संघातल्या खेळाडूंचा खूपच जास्त वाटा असतो. १९९९ ते २००७ या काळात स्टीव्ह वॉ आणि पाँटिंगच्या काळात ऑस्ट्रेलियाचा संघ जगज्जेता होता. पण २००७ ते २००९ या काळात वॉर्न, हेडन, गिलख्रिस्ट, मॅक्ग्रा, सायमंडस्, ब्रेट ली (कसोटीतून निवृत्त) असे रथी महारथी निवृत्त झाल्यावर पाँटिंग कर्णधार असून सुद्धा कांगारूंना उतरती कळा लागली. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या यशात पाँटिंगच्या नेतृत्वापेक्षा खेळाडूंचाच सिंहाचा वाटा होता.

धोनीचेही बरेचसे तसेच आहे. त्याच्या नेतृत्वाची खरी कसोटी यावर्षी इंग्लंडमधल्या दौर्‍यात लागली व त्यात तो फारसा यशस्वी झाला नाही. कर्णधार तोच असून सुद्धा संघातले सुपरस्टार नसल्यामुळे भारताची तिथे दारूण अवस्था झाली. म्हणजे भारताचे यश हे कर्णधारावर फारसे अवलंबून नाही व काही ठराविक खेळाडूंवर अवलंबून आहे. धोनीच्या आक्रमकतेविषयी मी जरा साशंक आहे. यावर्षी आफ्रिकेविरूद्ध तिसर्‍या कसोटीत व विंडीजविरूद्ध तिसर्‍या कसोटीत जिंकण्याची शक्यता असूनसुद्धा त्याने संघाला सामना जिंकण्याचा प्रयत्न न करता अनिर्णीत ठेवण्याची सूचना केली होती. विंडीजसारख्या दुबळ्या संघाविरूद्ध तर हे अक्षम्यच होते. या सामन्यात सुद्धा ६३१ पर्यंत डाव लांबविणे हे बचावात्मक मानसिकतेचे लक्षण आहे.

>>> पण कपिलने वर्ल्ड कप वे. इंडिज सारख्या अतिबलाढ्य संघाविरुद्ध जिंकला. सुनीलला ते जमलं नाही. इतकंच नाही तर त्याला स्वतःला देखील ते जमेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या उलट कपिलचं होतं.

कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला. पण कपिलला त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. १९८३ नंतर अगदी १९८७ पर्यंत (जोपर्यंत रिचर्डस्, रिची रिचर्डसन, मार्शल इ. होते तोपर्यंत) भारताला विंडीजला हरवणे फारसे जमले नव्हते. या काळात भारताला विंडीजने भारतात तसेच शारजामध्ये अनेकवेळा हरवले होते.

गावसकर आक्रमक नव्हताच. त्याच्या कारकीर्दीत सामना अनिर्णित ठेवणे हीच मोठी कामगिरी मानली जायची. त्यामुळे त्याची व कपिलची तुलना करणे योग्य नाही.

निवडसमितीने दिलेला संघ घेवून त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेणारा व आपल्याला हवा तो संघच
आक्रमकपणे [ चांगल्या अर्थाने ] मिळवणारा यात कप्तान म्हणून क्रिकेटच्या गुणवत्तेत श्रेष्ठ कोण ? कप्तान म्हणून 'ऑफ द फिल्ड' व 'ऑन द फिल्ड' गुणवत्ता यात अधिक महत्व ' ऑन द फिल्ड'ला नको द्यायला ?
गांगुलीच 'ऑन द फिल्ड' एक कप्तान म्हणून कसब व 'अ‍ॅटीट्यूड' खरंच 'ऑऊटस्टँडींग' होते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या मतें तो एक चांगलाच शैलीदार फलंदाज व बर्‍यापैकी कप्तान होता. पूर्णविराम.

ढोणी, गांगुली हे आपले चांगले कप्तान! त्यांची इतरांशी तुलना का करायची?

परदेसाई, >>पण त्याच्या फलंदाजीवर आलेले असंख्य विनोद आता विसरले जातील नाही का?>>

हे विनोद म्हणजे जोक की असंख्य विनोद (कांबळी एक Proud )

दादा आपल्याला नेहमी दिसला त्यापेक्षा कितीतरी चांगला फलंदाज होता. जेव्हा तो खुन्नसने खेळत असे तेव्हा त्याची तांत्रिक वैगुण्ये त्याच्या आड येत नसत>>तो चांगला फलंदाज होता ह्यात शंकाच नाहि पण त्याच्या खुन्नसने खेळण्यापेक्षाही त्याच्या फलंदाजीच्या शैलीचा भाग त्याच्या यशात अधिक होता. मूळात दादा हा timing वर खेळणारा फलंदाज असल्यामूळे जोवर eyesight नि reflexes काम करत होते तोवर त्याचे टायमिंग अफलातून जमत असे नि रन्स निघत होते. त्याची तांत्रिक वैगुण्ये आड न येण्याचे मुख्य कारण हे होते. खुन्नसने खेळणे ही नाही. तो नेहमीच up yours attitude ने खेळत आला आहे.

द्र्विड, कुंबळे आणि लक्ष्मण त्याआधी काही वर्षे खेळत होते, त्यांचे २००१ आधीचे व नंतरचे स्टॅट्स बघा, तुलना करा म्हणजे लक्षात येइल. यात कप्तानाचा काहीच हात नाही?>> द्रविड ९६ मधे खेळायला लागला. सुरूवातीची २-३ वर्षे he was trying to figure out his exact role. दादाने त्याला हात दिला ह्यात शंकाच नाहि पण मला नाहि वाटत दादा नसता तर तो राहिल नसता.
लक्ष्मणला सचिन कप्तान असताना open करायला सांगत असत. (सचिन सांगतोय असे नाहि, तर middle order भरलेली होती म्हणे) २००० मधे सिडनेला १६७ टाकल्यावर त्याने मी ओपन करणार नाहि" सांगितले. middle order मधे आल्यावर त्याचा खरा इंगा कळून आला. ह्यात दादाचे श्रेय आहे कि नाहि ह्याचे उत्तर मला देता येणार नाहि.
कुंबळेला दादाच काय सचिनचीही गरज नव्हती राव.

गांगूलीने भारतीय क्रिकेटला स्वाभिमान शिकवला ह्यात शंकाच नसावी. त्याची खडूस attitude इतरांवर परीणाम करत असे ह्याबाबातही दुमत नसावे. पण as a strategic captain म्हणून तो फारसा उपयोगी नव्हता. त्या बाबतीमधे धोनी त्याच्यापेक्षा काकणभर तरी नक्कीच उजवा आहे. (ह्यात वाडेकर नि गावसकरला पर्याय नाही.)

केवळ त्याला चांगला संघ मिळाला म्हणूनच तो यशस्वी झाला किंवा त्याच्या नेतृत्वाची खरी कसोटी झालीच नाही, असं म्हणणं खरंच अन्यायकारक वाटतं. >> अनुमोदन. २००७ च्या World Cup नंतर धोनी ह्या परिस्थितीमधे कप्तान झाला ती नि सचिनने २०००-०१ मधे दादाच्या हातात सूत्रे दिली ती ह्या दोन्ही परिस्थिती तितक्याच challenging होत्या. त्यात डावे उजवे असे करताय देव जाणे ?

सुनीलने वर्ल्ड कप मधे पूर्ण ६० ओव्हरी खेळून किती धावा केल्या .... ते मास्तर सांगेलच. >> ७५च्या हिशेब आठवतो तुला नि ८७ मधे काढलेले शतक नाहि आठवत रे ?

प्लस पॉइंट: टेंपरामेंट, डाउन टू अर्थ अ‍ॅटिट्युड आणि खेळाची समज!>> +१. टेंपरामेंट "Its just cricket match" attitude तो ज्या सहजतेने वागवतो त्याचा जवाब नाही.

तेवढा फरक मला कळतोय. वेस्ट इंडिजसारख्या लिंबूटिंबूविरूद्ध धावांचा एवढा डोंगर निर्माण करण्याची गरज नव्हती. सामना ५ दिवसांचा असला तरी तो ५ व्या दिवसापर्यंत रेटला पाहिजे असा काही नियम आहे का? जो संघ तिसर्‍या दिवशीच पराभूत होऊ शकतो (पहिल्या डावात फक्त १५३ धावा करून हे विंडीजने सिद्ध केलेच आहे), त्या संघाला हरवायला ४ थ्या किंवा ५ व्या दिवसाची का वाट बघायची? स्वत:चे शतक पूर्ण झाल्यावर आणि तब्बल ५५० धावा झाल्यावर एका दुबळ्या संघाविरूद्ध ६३१ पर्यंत डाव रेटणे हे अति बचावात्मक विचारसरणीचे लक्षण आहे.
>> ते तीन दिवसांमधे दोनदा बाद होतील ह्याचे स्वप्न पडले होते का धोनीला ? (ते दोनदा बाद झालेले नाहित ह्याची नोंद घ्यावी.) आपण बॅटींग करत असताना पिच dead pitch आहे हे उघड होते तेंव्हा कप्तानाला सोयीस्कर वाटेल अशा margin मधे त्याने declare केला. माझ्या मते तरी त्यात अचावात्मक असे काहि नाही. तुम्ही जर सरसकट आजचे सगळे कप्तान बघाल तर this is prevailing trend.

कुंबळेला दादाच काय सचिनचीही गरज नव्हती राव.>>> कुंबळेच्या शेवटच्या काही वर्षांतील परफॉर्मन्स वरून आख्खे करीयर तो तसा होता असा समज निर्माण केला जातो. साधारण २००२ पर्यंत त्याची "बाहेर" कामगिरी काहीच विशेष नव्हती. जवळजवळ सगळे यश नंतरचे आहे. भारतात तो नेहमीच जबरी होता पण बाहेर सामने जिंकायला त्याचा जास्त हातभार नंतर लागला. तो मेहनती वगैरे होता यात काहीच वाद नाही.

मी खुन्नसने अशासाठी म्हणालो की जेव्हा त्याचा फोकस्/खुन्नस नसायची तेव्हा हाच दादा अगदी क्लूलेस वाटायचा. एरव्ही त्याच्या कौशल्यांचा, आयसाईटचा त्याला विसर पडल्यासारखा वाटायचा. त्यात काही विशेष नाही. जवळजवळ सर्वच कप्तानांच्या बॅटिंग वर परीणाम होतो. वॉ वगैरे अपवाद.

>>एकेक नग फार जगज्जेते होते
तसे नग सगळ्यांनाच मिळाले होते.... तेंडूलकरला तर फारच!.... वेस्ट इंडिजच्या दौर्यावर जेंव्हा सचिनने स्पिनरची मागणी केली होती तेन्व्हा त्याचा गळ्यात नोएल डेव्हिड मारला होता!
पण गांगुलीला त्याचबरोबर द्रवीड, सचिन, कुंबळे असे हिरेही लाभले होते त्याच्या संघात Happy

>>अजूनही असलेल्यांपैकी अर्धा अधिक संघ गांगुलीनेच आणलेला आहे
आणला? कुठुन? आणि म्हणून तो चांगला कॅप्टन? मग सचिनला आणला म्हणून श्रीकांतला सर्वश्रेष्ठ कॅप्टन म्हण्ट्ल पाहिजेल Wink

>>दादाने त्याला हात दिला ह्यात शंकाच नाहि
फारच विनोदी वाक्य! आज दादा रिटायर होउन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाउन बसलाय आणि द्रवीड अजुनही मैदान गाजवतोय यातच सगळे आले.... द्रवीडला ओपनिंगपासून सहाव्या नंबरपर्यंत वाट्टेल त्या नंबरवर खेळवून वेळेला विकेटकीपर म्हणून वापरण्याला जर हात देणे म्हणत असतील तर मग आपले काही म्हणणे नाही Proud

तसे नग सगळ्यांनाच मिळाले होते.... तेंडूलकरला तर फारच!..>>> एक्झॅक्टली! म्हणजे गांगुलीला मिळालेला संघच भारी होता हे बरोबर नाही. सचिनकडेही द्रविड, कुंबळे, अझर, गांगुली, लक्ष्मण होतेच की. संघ चांगला म्हणून कप्तान यशस्वी हे आर्ग्युमेंट सर्वच चांगल्या कप्तानांबाबत केले जाते. जर चांगले खेळाडू सर्वच कप्तानांकडे कधी ना कधी होते तर गांगुलीच इतका यशस्वी कसा?

ते खरे असते तर २००६ पासून पाक संघ इतका गाळात गेला नसता. मोहम्मद आसिफ, उमर गुल, शोएब आणी मोहम्मद आमिर हे चार बोलर्स अतिशय सरस आहेत, स्पिन मधे आफ्रिदी आणि सईद अजमल, बॅटिंग मधे उमर अकमल, युनिस खान, कमरान अकमल, मोहम्मद युसूफ ई. आणि अब्दुल रझाक सारखा ऑलराउंडर असूनही सध्या त्यांची काय हालत आहे बघा.

चांगला संघ उभा करणे हे ही कप्तानाचे एक मुख्य काम आहे. गांगुलीने बॅकिंग दिले नसते तर युवराज, हरभजन, लक्ष्मण सारखे अनेक लोक आज संघात इतके दिवस दिसले नसते.

सचिनला श्रीकांत ने "आणला"? सचिन (जरा संझगिरी मोड होतोय, सॉरी Happy ) दार ब्लास्ट करून आत घुसला. त्याला घेतले नसते तर श्रीकांतच बाहेर गेला असता. झहीर, युवराज, सेहवाग, हरभजन, धोनी यांची काही ओळख ते संघात येईपर्यंत मला तरी नव्हती. त्या दृष्टीने त्याने संघ "आणला". असे स्वतःच्या इंन्स्टिंक्ट वर खेळाडू निवडणे इम्रानबाबतही बोलले जाते. वॉने तर ते केलेच.

त्यामुळे गांगुली यशस्वी तर आहेच. पण त्याच्या कप्तानपदाखाली जिंकलेल्या सामन्यांची संख्या पाहा.

द्रविड कदाचित तेवढाच यशस्वी ठरलाही असता, जर त्याला तेवढा चान्स मिळाला असता कॅप्टन म्हणून. पण त्याच आर्ग्युमेंटने गांगुलीही फलंदाज म्हणून इतरांइतकाच यशस्वी ठरला असता जर कॅप्टन नसला असता तर.

यात धोनी बद्दल कप्तान म्हणून काही विरोधच नाही. तो जबरी आहेच. खेळाडू कितीही भारी असले तरी कप्तानाचा हात असतोच. मॅच हरली तर कॅप्टनची चूक आणि जिंकली तर खेळाडूच भारी होते हे बरोबर नाही.

आज दादा रिटायर होउन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाउन बसलाय आणि द्रवीड अजुनही मैदान गाजवतोय यातच सगळे आले....>>पूर्ण वाक्य वाचायचे कष्ट घ्या राव. "द्रविड ९६ मधे खेळायला लागला. सुरूवातीची २-३ वर्षे he was trying to figure out his exact role. दादाने त्याला हात दिला ह्यात शंकाच नाहि पण मला नाहि वाटत दादा नसता तर तो राहिल नसता." द्रवीड च्या पहिया २-३ वर्षांमधे त्याचा रोल define नव्ह्ता. one day मधे खेळून त्याच्या एकंदर खेळावर परीणाम होत होता. दादा कप्तान झाल्यावर त्याचा रोल निश्चित झाला हे तर नाकारू शकत नाहि ? त्याचे बॅटींग ऑर्डरमधे वर खाली होणे हे २००५ नंतर सुरु झाले. त्यात दादाचा हात होता किती हे मला माहित नाहि पण त्याच्या आधी त्याचे contribution द्रविड स्वतःच मान्य करतो.

झहीर, युवराज, सेहवाग, हरभजन, धोनी यांची काही ओळख ते संघात येईपर्यंत मला तरी नव्हती. त्या दृष्टीने त्याने संघ "आणला". >> युवराज Under 17/19 च्या विजेत्या संघात होता तेंव्हा तो येणार हे नक्कि होते. दादाने पुढे आणले का हे माहित नाहि पण त्याला बॅकिंग दिले ह्यात वाद नसावा. तुझे जे विधान आहे ते भज्जीच्या बाबतीमधे १००% अचूक आहे. भज्जी आधी खेळला असला तरी ball throwing च्या controversy मधे अडकला होता. दादाने त्याला २००१ मधे उचलला.

अमोल कुंबळेबद्दल तुझ्या विधानांमधे "तो २०० पर्यंत बाहेर मॅच विनर नव्ह्ता" ह्या वगळता तथ्य नाहि. तो नेहमीच आपला front line spinner होता. आपण सामना जिंकण्यासाठी त्याच्यावर अवलंबून होतो. देशात तो सहज जिंकून देत असे नि बाहेर काही अंशी. पण तरीही He was always front line baller. अगदी २००१ मधे भज्जीने २१ बळी घेउनही कुंबळे फिट होताच आत आला. भज्जी नि कुंबळे ह्यात नेहमी कुंबळेला पसण्ती मिळत असे. दादा कप्तान असता-नसता तरीही त्यात बदल झाला नसता. म्हणून मी तसे म्हटले होते.

द्रविड आणि कुंबळे हे संघात राहिलेच असते कोणीही कप्तान असता तरी. पण २००२ नंतर दोघेही मॅच विनिंग परफॉर्मन्स देऊ लागले (कुंबळेच्या बाबतीत परदेशात, जे जास्त महत्त्वाचे होते). यात थोडे श्रेय दादाचे आहे एवढेच माझे म्हणणे आहे.

द्रविड २००१ पर्यंत "गुणी खेळाडू", "नेहमी चांगला खेळतो" हे सर्व होता पण बाकीचे कोसळत आणि हरलेल्या मॅच मधे फक्त एक द्रविड खेळला अशी त्याची ओळख होती. २००२ - लीड्स पासून त्याच्या मेहनतीचे चीज होऊ लागले, आणि त्याचे एकूणच रेप्युटेशन एकदम वाढले. त्याच वेळेस वन डे मधला त्याचा परफॉर्मन्स कमालीचा सुधारला - तो पुढची २-३ वर्षे एक चांगला "फिनिशर" झाला होता ५-६ नं ला खेळून.

या दोघांचे हे transformation दादाने सूत्रे हाती घेतल्यावर साधारण एक दोन वर्षात झाले, म्हणून त्यात दादाचे श्रेय.

>>जर चांगले खेळाडू सर्वच कप्तानांकडे कधी ना कधी होते तर गांगुलीच इतका यशस्वी कसा
कारण त्याच्या संघात चांगले खेळाडू तुलनेने जास्त होते आणि जे होते ते सर्वस्व पणाला लावून खेळणारे होते... अझरसारखे नव्हते!

पाकिस्तानी संघ गाळात जायला त्यांच्यात भिनत गेलेली बेशिस्त, आपापसातले हेवेदावे, हतबल पीसीबी बॉर्ड आणि अपार गरीबीतुन वर आलेल्या तरुण खेळाडूंना अचानक गवसलेला प्रचंड पैसा ही कारणे जास्त जबाबदार असावीत!
आफ्रिदी किंवा शोएब फार बेक्कार कर्णधार नव्हते आणि चांगला संघ मिळाला असता तर तेही कर्णधार म्हणून चमकले असते कदाचित....

युवराज, हरभजन ठीक आहे पण लक्ष्मणला गांगुलीने बॅकींग वगैरे कधीच दिले नाही उलट अनेकवेळा गांगुली केवळ कर्णधार असल्याने त्याच्यापेक्षाही जास्त डिझर्व्हिंग असलेल्या लक्ष्मणला कसोटीत बाहेर बसावे लागलेय!

'आणला' चे लॉजिक तुझेच वापरलेय..... सचिनने जसे रणजीतुन स्वताला सिद्ध केले होते तसेच या युवा खेळाडूंनी देशांतर्गत आणि अंडर१९ मधुन चमक दाखवलीच होती.... उलट या खेळाडूंना संघात येण्याआधी
देशाबाहेर वगैरे खेळण्याचा आणि प्रेशरचा जास्त अनुभव होता.

मुळात द्रवीड, कुंबळे, लक्ष्मण वगैरे लोकांना चमकण्यासाठी कुठल्या कर्णधाराची गरज होती वगैरे मला नाही वाटत किंवा कुणी हात दिल्यामुळे ते जास्त मोठे झाले असेही नाही वाटत...
गांगुलीच्या कप्तानीमुळे हे लोक मोठे झाले नाहीत तर या लोकांच्या अप्रतिम खेळामुळे गांगुली कर्णधार म्हणून मोठा झाला Happy

आणि महत्वाचे म्हणजे युवी, सहवाग, भज्जी ह्या लोकांची जातकुळी ही द्रवीड, तेंडुलकर या 'जंट्लमन्स क्रिकेट स्कूल' च्या अनुयांयापेक्षा गांगुलीच्या च्या गुणवैशिष्ठांशी अधिक जुळणारी होती म्हणून कदाचित या लोकांकडून त्याला जास्तीचा आणि व्होकल पाठिंबा मिळाला!

सचिनने जसे रणजीतुन स्वताला सिद्ध केले होते तसेच या युवा खेळाडूंनी देशांतर्गत आणि अंडर१९ मधुन चमक दाखवलीच होती....>>> १९८९ साली सचिनने सगळे देशांतर्गत क्रिकेट गाजवून सोडले होते आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात तो आता कधी पदार्पण करणार, पहिले शतक कधी करणार एवढीच उत्सुकता होती, तेवढी अंडर-१९ मधे चमकणार्‍या सर्वांची होती काय? सेहवाग, युवराज, कैफ, भज्जी, झहीर, इरफान यांना संघात आणणे, काही अपयशांनतर त्यांना आणखी संधी देत राहणे आणि १९८९ साली सचिन ला आणणे हे सेमच आहे काय?

सर्वच अंडर-१९ खेळाडूंना देशाबाहेर खेळण्याचा अनुभव असतोच. सोधी, आगरकर आणि इतर असंख्य खेळाडू त्यातूनच आलेले. त्यातील काही संघात एक दोन संधी मिळून एखाद्या अपयशानंतर बाहेर गेले, ते पुन्हा कधीच दिसले नाहीत.

गांगुली कॅप्टन झाल्यावर १-२ वर्षांत अचानक भारताला एकदम चांगले खेळाडू मिळाले, जे मुळात चांगले होते ते ही काहीतरी एकदम साक्षात्कार झाल्यासारखे अचानक चमकू लागले, द्रविड, सचिन, कुंबळे, लक्ष्मण सगळे असताना त्या काळात २००१ पर्यंत एकही टेस्ट बाहेर न जिंकणारा भारत आपोआप बाहेर जिंकू लागला?

आफ्रिदी किंवा शोएब फार बेक्कार कर्णधार नव्हते आणि चांगला संघ मिळाला असता तर तेही कर्णधार म्हणून चमकले असते कदाचित...>>> पाकचे खेळाडू आत्ताही चांगले आहेत, त्यांना चांगले नेतृत्त्व नाही.

मुळात द्रवीड, कुंबळे, लक्ष्मण वगैरे लोकांना चमकण्यासाठी कुठल्या कर्णधाराची गरज होती वगैरे मला नाही वाटत. >>> माझे मत आहे की होती - कर्णधार, कोच, मानसशास्त्रज्ञ काहीही धरा पण कोणीतरी गाईड करण्याची, नाहीतर डिवचण्याची गरज होती. त्यातील काही टक्के वाटा तरी गांगुलीचा आहे.

आयला काय भांडताय राव.. विडींज दुसर्‍यांदा बॅटींग करताना आपली चड्डी सुटलीये.... फक्त ४च विकेट पडल्या आहेत आणि त्या सो कॉल्ड पेस बॉलर्सनी घेतल्यात.. स्पीनर्सचा स्पीन अजिबातच चालत नाहीये.... मॅच ड्रॉच्या दिशेने...

मी मजबूत कुडकुडी लावली विंडीजला माझ्या ह्या पोस्ट नंतर धपाधप विकेट्स गेल्या उरलेल्या... Happy

>> धोनीच्या आक्रमकतेविषयी मी जरा साशंक आहे. विंडीजसारख्या दुबळ्या संघाविरूद्ध तर हे अक्षम्यच होते. या सामन्यात सुद्धा ६३१ पर्यंत डाव लांबविणे हे बचावात्मक मानसिकतेचे लक्षण आहे.

मास्तरा, ईट युवर वर्डस! दुसर्‍या डावात दुबळ्या विंडिजने किती धावा केल्यात ते पेपरात वाच! प्रत्यक्ष मैदानावर असणार्‍या खेळाडूला जास्त समजतं, त्याला थोडी अक्कलही असू शकते इ. इ. विचार केलास तर तुझ्या प्रकृतीस्वास्थ्यास बरे पडेल! Proud

या डावात विंडीजने जरी ४६३ धावा केल्या असल्या तरी तो दुबळा संघ आहे. प्रत्येक डावात अशी कामगिरी करून दाखविणे त्यांना खूप अवघड आहे. धोनीने जर ५५० ला डाव घोषित केला असता तर, भारताला दुसर्‍या डावात जिंकण्यासाठी फार तर ६०-७० धावा कराव्या लागल्या असत्या. पण भारत कोणत्याही परिस्थितीत ४ थ्या दिवशी जिंकलाच असता.

असो. विजयाबद्दल भारताचे अभिनंदन!

अजून एक बातमी. दादा बंगालतर्फे मध्यप्रदेशविरूद्ध रणजी सामना खेळत आहे. त्याची गंमतच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन त्याला २ वर्षे होऊन गेली. नंतर आयपीएल खेळत होता. २०११ च्या आयपीएलमध्ये त्याला सुरवातीला कोणत्याही संघाने घेतले नव्हते म्हणून तो कॉमेंटरी करत होता. काही दिवसांनी त्याला पुणे वॉरियर्सने घेतल्यावर त्याने पुन्हा पॅड बांधले व २-३ सामने खेळला. नंतर तो इंग्लंडमध्ये कॉमेंटरी करत होता. आणि आज तो रणजी सामना खेळत आहे.

दादाचे आत्ता काय चालू आहे ते त्याचे त्यालाच माहीत :). बंगालकडून रणजी, ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी कॉमेंटेटर म्हणूनही आहे, त्यात क्रिकेट बोर्डाची जबाबदारी आहेच.

हिम्या - कुडकुडी शब्द बर्‍याच दिवसांनी ऐकला Happy

अमोलच्या सर्व पोस्टना अनुमोदन. Happy भारतीय संघाला डॉन बनविले ते दादाने. धोणीने नाही. धोणी कळस बांधतोय असे म्हणल्यास वावगे नाही. पण दादा, दादा था, रहेगा. Happy

गांगुलीने आता थांबावे Happy कॉमेंट्री बरी करतो तर ती करावी. उगाच टी२० मध्ये यायची खरच गरज नाही. तसेच रनजीतही.

Pages