२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी
फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग
हि तयारी
ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.
अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.
फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.
फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.
या फोडण्या
शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.
आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात.
वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.
यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.
खल्लास धारा...
खल्लास धारा...
आज मीच खूप दिवसांनी केला लेमन
आज मीच खूप दिवसांनी केला लेमन राईस. स्टेप बाय स्टेप फोटु काढलेत.
लगेच जेवायला बसायचं होतं म्हणून मी चकत्या जास्त घेतल्या. चकत्या जास्त लावल्यात आणि खायला वेळ असेल/भात उरला तर चकत्या काढून टाका लगेच.
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात.
असा हा लेमन राईस..
हाईला! लिंबाच्या चकत्या किती
हाईला! लिंबाच्या चकत्या किती मस्त कापल्यात.... सहीच!!
नी तुझा लिंभा पाहिल्यावर
नी तुझा लिंभा पाहिल्यावर वाटते. मी बासमती वापरुन चुक केली होती. कोरडा झाला होता भात.
प्रचि छानच
हो मी आंबेमोहोर वापरला.
हो मी आंबेमोहोर वापरला.
मंजूडी मला खरोखर जादूची सुरी मिळालेली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मस्त धार असलेली सुरी मिळालीये.
वा वा . लिहून कधीचा घेतलाय,
वा वा . लिहून कधीचा घेतलाय, जल्दी करना पडेंगा. एकदम तोंपासू कृती व फोटो.
नीधप, धन्यवाद! पॉट्लक
नीधप, धन्यवाद! पॉट्लक पार्टीसाठी सोपासा भात म्हणून करून नेला होता. सगळ्यांना ( अमेरिकन्ससह) खूप आवडला.
सुरी कुठे मिळाली ?
सुरी कुठे मिळाली ?
माझा महिन्यातून (कमीत कमी)
माझा महिन्यातून (कमीत कमी) एकदा तरी होतोच हा भात. ऑस्सम टेस्ट आहे. एकदम आवडता झालाय, बरोबर रस्सम.
फक्त अगदी प्रॉमिनंट दिसण्यासारखा असा काही रंग येत नाही (निदान माझा तरी) त्यामुळे मी कधी फोटो काढायचा खटाटोप नाही केलाय.
ही कृती इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद नी.
बाकी रेसिपी एकदम इंटरेस्टींग
बाकी रेसिपी एकदम इंटरेस्टींग आहे, १५ ऑगस्ट ला हा भात, ३ वेगवेगळ्या रंगाच्या फोडण्या (भारताच्या झेंड्यासारख्या) करून व खाऊन साजरा करू शकतो >>
चांगली आहे रेसिपी..
करुन बघेन लवकरच. फोडण्या जबरी
करुन बघेन लवकरच. फोडण्या जबरी दिसतायत.
आंबेमोहोर तर इथे मिळायचा नाही, मग बासमतीला काय पर्याय?
Pages