लेमन राईस (लिंबू भात)

Submitted by नीधप on 12 August, 2011 - 02:41
lemon rice
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

हि तयारी
lemonrice1.jpg

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

या फोडण्या
lemonrice2.jpg

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

lemonrice3.jpglemonrice4.jpg
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. Proud

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हो आणि बरोबर लोणचं काय ग? ते ही मस्त लागतं. का अशीच फोड्णी पण दहिभातावर द्यायची आणि मग लोणचं द्यायाचं बरोबर. नारळ णाय घालत अर्थात दहिभातात.

बासमती मंजे उगीच साउथ कॉटन च्या हाफ सारीत लाजत फिरणार्‍या विजयालक्ष्मीला एकदम भरजरी कंची सिल्क नेसायला लावल्यावाणी. बावरायची ती.

शिजवल्या शिजवल्या लगेच भांड्यातून काढून डावाने मोकळा करायचा. जरापण गार व्हायच्या आत.

म्हणजे मी तरी असंच करते.

तांदूळ 15 मिनीटे भिजवून त्यातलं पाणी पूर्ण निथळून तुपा/तेलातल्या फोडणीत एकदम हलके होईपर्यंत भाजायचे आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी (1 वाटी तांदुळाला 2 वाट्या पाणी) घेऊन उकळून तांदूळात घालायचं. झाकण ठेवून भात शिजवायचा. भातासाठी घेतलेलं भांडं नॉन स्टिक नसेल तर त्याच्या बुडाशी तवा ठेवायचा. मधे एकदा किंवा दोनदा भात हलवायचा. भात शिजल्यावर विस्तव बंद करून पहिली वाफ निवू द्यायची. मस्त मोकळा भात होतो.

नी, मस्त लागतो हा प्रकार! मी खाल्ला आहे पण केला नाहीए. आता करुन बघते!
आडो, डेझिकेटेड कोकोनट वापरणार असशील तर ते कोकोनट क्रीममध्ये थोडे पाणी घालुन त्यात काही वेळ ठेव. ंमी मोदकाचे सारण करताना असा प्रयोग करते. एकदम नारळाच्या सारणाची चव येते.

नी, तू कृतीत लिंबाच्या चकत्यांची चव झिरपत जाईल असं लिहिलंयस. समजा मी लिंबूरस वापरणार असेन तर काय बरं करावं?

आडो, लिंबाचा रस चवीपुरता फोडण्यांबरोबर मिक्स करायचाच आहे. पण चकत्यांना पर्याय नाही. चकत्यांमधून उतरणारा फ्लेवर नुसताच रस वाढवून मिळत नाही.

हां...म्हणजे मलाही वाटलं की चकत्यांमुळे भातात सालाचा कडवटपणा नाही येत का? पण अर्थात तू केलायस याचा अ४थ येत नाही असं मी समजून चालले. Happy

लेमन झेस्ट? म्हणजे लिंबाच्या आकाराच्या प्लॅस्टीक बाटलीतला रस?

बायांनो हे पर्याय कसे काय करतील हे मला सांगता येण्याइतकी सुगरण नाहीये मी. तुम्ही वापरून पहा आणि इथे लिहा. पण एकदा तरी चकत्या घालून करून पहा. म्हणजे दोन्हीत काय फरक ते तुम्हीच मला सांगू शकाल. Happy

ओके कळलं. वापरून बघ. सालाचा किंचित कडवट फ्लेवर एकदम सटली उतरतो त्याने गंमत येते. त्यामुळे हे पण चालायला हरकत नाही.
तू वापरलास की मला कळव.

करायला गेलो लेमन राईस... अन् झालाय लेमॅन राईस भात मऊ, दाणे नाहीत म्हणून आयत्या वेळी दाण्याचं कुट अन् काजू टाकले प्रयोग यशस्वी नाही पण ओके झालाय. फोटो टाकतो..

13082011021.jpg

छान

Pages