निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सि अरे आमच्या कंपनीच्या टाउनशिपमध्ये सप्तपर्णीची खुप झाडे आहेत. ही सगळी एकदाच फुलतात आणि इतका उग्र वास पसरतो सगळीकडे की मी कधी गेले तिकडे तर मला कसतरिच होत. एखादेच झाड असेल तर त्याचा वास तु म्हणतोस त्यापमाणे दालचिनीसारखा येतो. पण ही अनेक झाडे मिळून जो वास येतो तो नको वाटतो. मागे त्यासाठी टाउनशिपमधील रहिवाश्यांनी कंप्लेंट करुन काही झाडे तोडायलाही लावली होती. मी नेमकी आजच वाशीच्या सेंटरवनच्या बाजूला एका छोट्या सप्तपर्णीच्या झाडाला लागलेली फुले पाहीली.

दिनेशदा बापरे एवढे प्रकार आहेत खारफुटीत ? गुलाब छानच आहेत.

साधना आता तू येशील कदाचीत आणि मी तुझ्या गावाला जाईन Happy

रुणुझुणू मस्त फुगे आहेत.

हाय अश्विनी.

जागू, अनेकजणांना त्या वासाने श्वसनाचा त्रास होतो. अ‍ॅलर्जी पण येऊ शकते.

साधना, इथे जी व्यावसायिक तत्वावर गुलाबांची शेती होते त्यात बरीच रसायने वापरतात. ती फुले अगदी साच्यातून काढल्यासारखी, एका आकाराची, एका रंगाची असतात. पण वरच्या फोटोतल्या फुलांची झाडे हि अक्षरशः रस्त्याच्या कडेला आहेत. त्यांची कुणी निगा ठेवत असेल, याची शक्यताच नाही.

अशी केली साजरी मी दिवाळी.
खरंतर ४-५ वर्षांपूर्वीच ध्वनी/वायु प्रदुषणामुळे दिवाळीत फटाके फोडण्याचे सोडुन दिले होते. Happy यावर्षी फटाके खरेदीच्या पैशातुन स्वत:ला हि पुस्तके गिफ्ट दिली. उरलेल्या पैशातुन इमारतीतील सर्व लहान मुलांना छान छान गोष्टीची पुस्तके भेट दिली. अजुन काही पुस्तके (flowers of sahyadri, आसमंत (श्रीकांत इंगळहळ्ळीकर) स्टॉक नसल्याने घेता आली नाही. मॅजेस्टिकमध्ये हि पुस्तके दिवाळी नंतर येणार आहेत.)
स्वतः आकाशकंदिलही बनवला (तो पारंपारीक लाकडाच्या साच्यातला आकाशकंदिल बनवता येत नाही म्हणुन हा सोप्पा कंदिल बनवला ;-)). खुप आत्मिक समाधान लाभले. आता दरवर्षी दिवाळीला असंच काहितरी वेगळं करणार. Happy

हि सगळी छान छान पुस्तके सुचवल्याबद्दल नि.ग./सदस्यांचे मनापासुन आभार!!! Happy

व्हेरी गुड जिप्सी. पुस्तक वाटण्याची आयडीया आवडली. आकाशकंदीलही खुप छान दिसतोय.

प्रज्ञा अग १ तारखेपासून कोकण दौरा आहे. खर तर उद्या म्हणजे २९ लाच निघणार होतो. दरवर्षी आमच तस ठरलेल असत भाऊबीजेच्या दुसर्‍यादिवशी बाहेर निघायच. पण श्रावणीचा वाढदिवस ३१ ला आहे. मग तो घरीच करून जायचा आहे. म्हणून १ तारीख.

धन्स जागू Happy
आकाशकंदीलही खुप छान दिसतोय.>>>>>अर्ध्या तासात बनवला आहे. Happy

"वृक्षगान" वाचायला घेतलं आणि वाचून संपल्यावरच खाली ठेवलं. Happy या धाग्याच्या सुरूवातीला शशांकने म्हटल्याप्रमाणेच "निसर्गप्रेमींकरता" खरंच संग्राह्य आहे. Happy

हे पुस्तक वाचतानाच मनात त्या त्या झाडांची छबी दिसत होती. दिनेशदांमुळे बरीच झाडे आता ओळखु यायला लागली. सदर पुस्तकात त्या त्या वृक्षांची रेखाचित्रे होती, मनात विचार आला जर यात रंगीत फोटो असते तर आणि एक थीम सुचली.
डॉ. शरदिनी डहाणुकर यांच्या या पुस्तकातील एखादा परीच्छेद घेऊन त्या त्या वृक्षाचे फोटो टाकुन एक भन्नाट फोटो फिचर करता येईल (दिनेशदांमुळे यातील बर्‍याचे वृक्षांच्या फोटोंचे संग्रह जमा झाले आहेत :-)). पण यात कॉपीराईटचा प्रॉब्लेम येणार. साधनाशी बोलल्यावर तीने सांगितले कि प्रकाशकांना विचारून त्यांची परवानगी घेऊन हे करता येईल. श्रीविद्या प्रकाशनचे हे पुस्तक पुण्यात आहे. कुणाची ओळख आहे का?
आपण सगळे मिळुन हे करू शकतो. Happy

छानच आहे कंदिल.
डॉ. डहाणुकरांनी पहिल्यांदा महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहिले होते. त्यावेळी
प्रत्येक लेखासोबत माझ्या वहीनीची मैत्रिण मृदुला नाडगौडा, हिने काढलेले
सुंदर फोटो असत.
पुढे त्याचे पुस्तक निघाल्यावर मात्र ते फोटो, किंमत वाढेल म्हणून वगळले.
तरी मला वाटतं, फुलवा पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत ते होतेच.
(हे सर्व त्यांनी स्वत: मला सांगितले होते.) आज त्या असत्या तर आपल्याबरोबर
फिरायलाही आल्या असत्या.
त्यातल्या बहुतेक झाडांबद्दल मी मायबोलीवर लिहिले आहेच. पण त्या काळात
लिंक द्यायची सोय नव्हती. तो मजकूर आणि तू काढलेले फोटो असे करुन
तू एखादा ब्लॊग पण करु शकतोस.

जिप्सी,आकाशकंदील छानच.
पुस्तके वाटण्याची कल्पना पण एकदम मस्त !

जिप्सी - वर दिलेल्या या सर्व पुस्तकसान्निध्यात दिवाळी फारच अभिनव पद्धतीने साजरी केलेली दिसतेस. या सर्व अप्रतिम पुस्तकांची मुखपृष्ठे पाहूनही धन्य धन्य वाटले - कार्व्हरसाहेबांचे विचार कायम मननीय व आचरणीयच. आकाशकंदील उत्तमच -आपणच बनवलेल्या गोष्टींचा आनंद औरच.
वृक्षगानची तुला सुचलेली थीम फारच अप्रतिम - "श्रीविद्या प्रकाशनाचे साभार" असे म्हणून फोटो व झाडाविषयी माहिती असे नाही का चालणार - ही परवानगी वगैरे करत बसलो तर फार वेळ जाईल असे वाटते - अर्थात पुढे त्यावरुन वाद -गुंतागुंत झाले तर आपणच अडचणीत येउ हे खरेच.......
पण ही कल्पना फार म्हणजे फारच सुंदर - सोने पे सुहागा..

जिप्सी, मी सुचवल्याप्रमाणे ब्लॉग करच. माझा मजकूर वापरायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. (माझ्याही) फक्त एक करावे लागेल, मी फोटो काढताना केवळ फुलांचेच फोटो काढले होते. त्यावरून फुले नसताना झाड ओळखणे कठीण आहे. त्यामूळे पूर्ण झाडाचा, पानांचा, फळांचाही फोटो देता आला तर छान.

maayboli admin will not allow without publisher's permission. i will speak with shreevidya prakashan. ofcourse on independant blog one can do without permission but that is not legally & moraly correct. atleast we shouldnot do such things with people\literature that we love.

धन्यवाद लोक्स Happy

ofcourse on independant blog one can do without permission but that is not legally & moraly correct. atleast we shouldnot do such things with people\literature that we love>>>>>साधना, दिनेशदा त्यांनी मायबोलीवर लिहिलेल्या वृक्षसंपदा मजकुराबद्दल ब्लॉग करण्यास सांगत आहेत. त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही असे लिहिले आहेत. वृक्षगान या पुस्तकातील बहुतेक सर्वच झाडांबद्दल त्यांनी सचित्र लिहिले आहे (जुन्या मायबोलीवर) ते सगळे एकत्र करून ब्लॉग तयार करावा असं त्यांच म्हणणं आहे. Happy
दिनेशदा, Please correct me if i am wrong Happy

punha ekada he pustak gheun vachayachi icchaa aahe,
Jipsi, tuza sangrah chhan vadhat chaalala ahe !
:smit:

झाडांची ओळख पटणे महत्वाचे आणि त्याचे महत्व किती ते पण ठसले पाहिजे.
तो काळ माझ्यासाठी भारावलेला काळ होता. काही झाडे सहज सापडली, तर
काहींचा शोध घ्यावा लागला.
पण मी वर लिहिल्याप्रमाणे पूर्ण झाडाचा फोटो, पानांचा फोटो असे मिळाले
तरच ओळख पटते.
आपण चौपाटीवर भेटलो होतो त्यावेळी मलबार हिलवरचे चंदनाचे झाड तूम्हा
सर्वांना दाखवायची खूप ईच्छा होती, पण मी तर फक्त फुलाचाच फोटो काढला
होता, बहरात नसतानाही झाड ओळखता आले पाहिजे, त्यासाठी तर हे करायचे.
आणि परत ज्यावेळी आपण फोटो काढू त्यावेळी आणखीनच वेगळे अनुभव
येतील. तेही लिहूच की.

बहरात नसतानाही झाड ओळखता आले पाहिजे,>>>>>>>>>>>> अगदी माझ्या मनातले बोललात दिनेशदा! पानांवरून झाड ओळखता यावं असं मला नेहेमी वाटतं. कारण फुलं नेहेमी नसतात, पानं नेहेमी असतात, पानगळ ही थोड्या काळासाठी असते.
अर्थात फुलांचं महत्व वादातीतच आहे.

जिप्सी, तुला लागेल ती मदत मी आणि अहो - (शशांक) करू. केव्हाही कळव. अगदी टायपिंग जरी करायचे ठरले तरी मला सांग. मी करीन.

Pages