निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी. नेहेमी मी निसार्गाच्या गप्पा फक्त वाचत असते. पण बटाट्याच्या वासामुळे मौन सोडायला भाग पाडलंय. असा उकदलेल्या बटाट्यासारखा वास मला पुण्यातही खूप वेळा अनुभवायला मिळालाय. तिथे भूछत्र नाहीत, वेलही दिसला नाही. झुडुप म्हणता येईल एवढ्या आकाराच्या कुठल्या झाडाला असा वास येतो का?

गौरी, आता परत मौनात जायचे नाही बरं का !
आता तूम्ही दोघींनीच हे गूढ उकलायचे आहे. ज्या परिसरात असा वास येतो, तिथे आजूबाजूला काय आहे, कुठले झुडुप आहे ते बघून इथे अवश्य लिहा.

तसा निगडी / निर्गुडी / दगडी च्या झुडुपाजवळ पण वास येतो पण तो वेगळा असतो.

गौरी, माझ्या सारखा अनुभव अजुन कोणाला तरी आलाय हे वाचुन खुप आनंद झाला. मी पण सध्या पुण्यातच असते आणि दोन्ही कडे सारखाच अनुभव आला म्हणुन सगळ्यांबरोबर Share करावासा वाटला.

निर्गुडीचा वास खुप वेगळा असतो.

गौरी मी पण तेच म्हणत होते मौनात कशाला रहायच ? दिनेशदा त्या खारफुटीला येतो का असा वास ?

छान गप्पा चालल्या असल्या म्हणजे नुसतं ऐकायला सुद्धा मजा येते ना, तसं चाललं होतं माझं Happy पुन्हा त्या बाजूला गेले की फोटो काढते तिथल्या झाडाचे.

या बटाटासदृश वासामुळे बरीच मंडळी कामाला लागणार आता. किती प्रकाराने - भातशेती, गवत, तापलेले गवत, भूछत्र, झाडे, वेली, पाने, फुले, फळे, किटक हा वास येउ शकतो हे वाचून तर मंडळी आता शेरलॉक होम्स नाही झाली म्हणजे मिळवलं - पण वेगवेगळ्या निरीक्षणानेच हे कळू शकेल - जरा कष्ट पडतील पण हा वास कुठुन येतो हे जेव्हा कळेल तेव्हा या कष्टाचे चीज झाले असेच नक्की वाटेल... सर्वांना वाससंशोधनाकरता - ऑल द बेस्ट.....

मला मुंबई सेंट्रलहुन गाडी (लोकल) काही फुटांवर गेल्यावर(विरार कडे) इलायची सारखा सुगंध यायचा...गाडीत कितीही गर्दी असली तरी.

पहील्यांदा या सुगंधाची जाणीव दिवळीच्याच दिवसांत झाली....त्यावेळी वाटायचं कुणीतरी फराळ बनवत असावा किंवा आसपास मिठाईचे दुकान असावे...
तिथुन पास होताना दिवाळी आणी फराळच आठवतो मला वर्षभर...:स्मित:

पण अगदी दोन वर्षांपासुन तो सुंगंध तसाच दरवळतोय (अजुनही असावा)....काही दिवसांनी लक्षात आले तेवढ्या भागात डाव्याबाजुला मोठमोठी निलगिरी सदृश झाडे आहेत आणि पुढे थोडे जंगल.....

त्या झाडांचाच सुगंध असावा...?

कुणाला आला आहे का असा अनुभव...?

चातक, तसा सुगंध तिथे एखादी केमिकल फॅक्टरी असेल तर येऊ शकतो.
तसे मुंबईतील सुगंधी स्टेशन्स बरीच आहेत.. हिंग (मस्जिद) सु़के मासे (डॉकयार्ड रोड) हातभट्टी (पुर्वी - चुनाभट्टी), कूजलेले शेंगदाणे (रे रोड), वांद्राच्या खाडीचा वास (माहीम), कूजलेले दूध (टिळक नगर), खाडीचा वास (मानखुर्द ते वाशी) मीठाचा वास (मिरा रोड), बिस्किटे (पार्ले)...

पण रस्त्याने जाताना सुगंध येणारी माझ्या आठवणीतली दोन ठिकाणे म्हणजे ओमानमधला कुरुम बीच रोड (बकुळीचा वास) आणि सुलतान काबूस रोड (बूचाची झाडे.. मदिनात काबूस जवळ)

अजुन एक निरीक्षण, असा वास वर्षभर येत नाही, पावसाळा संपता संपता येतो. मी आधी म्हटल तस नवरात्रापासुन पुढे काही दिवस. नंतर कधीतरी बंद होतो.

आता मला हसणार आहेत सगळे!
पण वय कितीही वाढलं तरी लहापणी ऐकलेल्या विचित्र गोष्टी विसरत नाहीत.
उकडलेल्या बटाट्याचा वास जिथे येतो तिथे काही तरी अमानवी असतं असं घरातल्या मोठ्या माणसांकडून ऐकलेलं आहे.
लहानपणी आम्ही सकाळी नदीवर पोहायला जात होतो. तेव्हा सकाळी हा वास तिथे कधीही आला नाही पण काही कारणाने जर संध्याकाळी जर नदीवर जायची वेळ आली तर ठराविक ठिकाणी(जिथून सकाळी आम्ही जात असू तिथेच) हा बटाटे उकडल्याचा वास हमखास यायचा. आणि जरा भीतीच वाटायची. आणि संध्याकाळ चढत जाईल तसा हा वास तीव्र व्हायचा.
आणखीही काही ठिकाणं अशी होती जिथे हा वास यायचा(फक्त संध्याकाळी!!!!)
"फक्त संध्याकाळी!!!!!!" हे एखाद्या सस्पेन्स सीरियलसाठी नाव कसं वाटतं?

मानुषी, माझ्या आजीलाही असे वास यायचे.. ती अगदी वर्णन करायची..
शेकशेगडी केल्याचा, लोणी कढवल्याचा, उडदाची डाळ भाजल्याचा.. त्याला ती अमानवीयच मानायची.
पण आपण नैसर्गिक गंध जे अगदी ओळखू शकतो त्यापैकी काही..रातराणी, प्राजक्त, अनंत, निशिगंध, बूच, हिरवा चाफा, खुरचाफा वगैरे...मोहाच्या फुलांचा वासही प्रचंड अस्वस्थ करतो.

आणि खास बात म्हणजे हि सगळी फुले रात्री उमलणारी आणि शुभ्र रंगांची आहेत.

फळापैकी, अननस, फणस, आंबा, काजूची फळे, संत्री... हि तर जाहिरातच करत असतात.

तसे मुंबईतील सुगंधी स्टेशन्स बरीच आहेत.. हिंग (मस्जिद) सु़के मासे (डॉकयार्ड रोड) हातभट्टी (पुर्वी - चुनाभट्टी), कूजलेले शेंगदाणे (रे रोड), वांद्राच्या खाडीचा वास (माहीम), कूजलेले दूध (टिळक नगर), खाडीचा वास (मानखुर्द ते वाशी) मीठाचा वास (मिरा रोड), बिस्किटे (पार्ले)...>>>>> Lol

जागू, फोटो नेहेमीप्रमाणे अप्रतिम!

मलासुद्धा बर्‍याचदा झाडांना पाणी घालायला लागल्यावर कापराचा वास येतो. किंवा क्वचित कधी कधी बागेत गेल्यावर असा वास येतो. पण बहुधा तो कुठल्याशा बुरशीचा असावा.

नि.ग. आज वासाळलाय Lol

दिनेशदा खारफुटीची फुले फुलली की सुंगंधी वास येतो जवळून गेल्यावर. तसेच आमच्या ऑफिसच्या तिथे सुबाभूळीची भरपूर झाडे आहेत ती जेंव्हा फुलतात तेंव्हा मस्त सुगंध येतो. ती वेडी बाभुळ नाही ह चिंचेसारख्या पानांची सुबाभुळ.

जागू, खारफुटीत बर्‍याच प्रकारची झाडे आहेत. मी एकदोन झाडांबद्दल लिहिले होते. पण तूमच्याकडची वेगळी असणार.
त्यापैकी एका झाडाचे नाव ब्लाइंडींग ट्री असे आहे, त्याच्या चीक डोळ्यात गेला तर वाईट असतो. दुसरे एक असते त्याला शेवग्याच्या शेंगासारख्या शेंगा लागतात, त्याच बिया. त्याच उभ्या रुजतात.
दूसर्‍या एका झाडाला गुलाबी मण्यांसारखी फळे लागतात.. पण हि तिकडे दिसली नाहीत.

सध्या "सप्तपर्णी" बहरतेय (संध्याकाळच्या वेळेसच). त्याचा तर वास नाही ना????? अर्थात सप्तपर्णीचा वास/सुवास प्रत्येकाला वेगवेगळा जाणवतो Happy (कुठेतरी वाचंल होतं Happy )

सप्तपर्णीची माहिती साधनाने येथे दिली आहे.

२. सप्तपर्णी (Alstonia scholaris) - हे एक अतिशय सुंदर दिसणारे सदाहरीत झाड आहे. होलसेलमध्ये पानगळ करताना मी तरी पाहिले नाही. याच्या शेंगा फार सुंदर दिसतात. अगदी बारीक हिरवे दोरे लटकलेले दिसतात. पाने आणि फांद्या दोघेही एक बिंदु धरुन त्यापासुन फुटतात. त्यामुळे झाड अगदी नीटनेटके दिसते. ठाण्याला बरीच सप्तपर्णी पाहिलीय मी. नेरुळला फारशी झाडे नाहीत याची. जी आहेत ती अजुन लहान आहेत. ठाण्याची झाडे मात्र सध्या खुपच सुंदर दिसताहेत. पांढरी बारीक फुले आणि त्यातच मधुन मधुन लटकणा-या हिरव्या माळा. याचा वास ब-याच जणांना आवडत नाही, पण मला आवडतो. थोडा उग्र आहे खरा पण दुरवर वास येतो याचा. मला तो दालचिनी+जायफळाचा वास एकत्रीत केल्यासारखा वाटला. हे झाड व फुले थोडी विषारी आहेत. याला devils tree असेही म्हणतात. याचे लाकुड हलके असल्याने पेट्या, फळे इ. बनवण्यासाठी वापरतात. साल औषधी आहे.

याची पाने, कळ्या, फुले आणि शेंगा... कळ्यांमध्येही रचना पाहा कशी अगदी भुमितीय आहे.

गुलाबाची अनेक झाडे माझ्या नेहमीच्या वाटेवर आहेत. शनिवारी त्यावरच्या कळ्या मी हेरुन ठेवतो आणि रविवारी सकाळी फोटो काढतो.
मलातरी प्रत्येक फुल वेगळे दिसते.

दिनेशदा, पहिलं फूल फारच आवडलं.
Baloon tree.JPG
हे एक गंमत झाड. आम्ही त्याला ' फुग्यांचं झाड ' असं नाव ठेवलंय.:)
श्रीलंकेत दिसलं होतं. अगदी फुगे असल्यासारखी फुले ( की फळे ?) होती. हात लावला तर फुगा फुटला आणि पांढरा द्राव बाहेर आला. उगीच अ‍ॅलर्जी वगैरे येईल्,म्हणून आम्ही फार संशोधन न करता तिथून पळालो.
खरं नाव माहीत आहे का कोणाला ?

किती प्रकाराने - भातशेती, गवत, तापलेले गवत, भूछत्र, झाडे, वेली, पाने, फुले, फळे, किटक हा वास येउ शकतो हे वाचून तर मंडळी आता शेरलॉक होम्स नाही झाली म्हणजे मिळवलं >>>> Lol

नि.ग. वरच्या सर्व वासू लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा.

रुणू, हे झाड काही वेगळंच आहे गं.

आमच्याकडे पण हि फुग्याची झाडे आहेत. सुकल्यावरही असाच राहतो हा फुगा. ड्राय फ्लॉवर्स अरेंजमेंट मधे वापरतात. (विषारी नसावा).

i m missing ni.ga.

vasavarun athavale, jhad todat asatana tyacha vegalaach olasar asaa vaas yeto. junglatun jaataanaa durvarhi koni jhad todat asel kinva todun gheun gele asel tari todatanachaa to vegalaa olasar vaas malaa yeto. vaasaala rang nasato pan malaa yaa vaasaabarobar hirva rang najaresamor yeto

साधना, तू इंग्रजीतून का येतेयस? फोनवरुन टाईपतेयस का?

ओल्या गवताचा, तसेच आजूबाजूला गवती चहा उगवला असेल तरी तो वास कळतो.

dinesh bhagawe ful mast ahe. khup avadle. u r really lucky tumchya ithe rastyanvar asali fule fultaat. ithe hawa ashi ahe ki deenrat mehenat keli tari asale gendedaar gulaab fulnaar naahit.

Pages