निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्तांनो तुम्हाप्रत कल्याण असो. .... Happy
आणि ज्याला जे आवडते ते ते त्याला लाभो.

मी खरेच वाट पाहतेय मला कधी कायमचे तिकडे जायला मिळतेय याची.

मी खरेच वाट पाहतेय मला कधी कायमचे तिकडे जायला मिळतेय याची.>>>साधने मला जरा आधी सांग ग. म्हणजे मी पण तयारी करेन. Lol

साधना, मोठा निर्णय आहे हा, गरजा अत्यंत कमी कराव्या लागतील पण काहितरी विधायक कार्यदेखील हाती घ्यावे लागेल.
ईकोटूअर्स साठी आजूबाजूचे भाग बघावे लागतील, नेचर रीसॉर्ट केला तर नेहमीचीच पिय्यकड लोकांची गर्दी होईल. स्थानिक बायकांना रोजगार मिळवून देणारा पण उद्योग काढता येईल. आणि त्या वस्तूंचे मार्केटींग मोठ्या शहरात करता येईल.
शुभेच्छा आहेतच. शक्य ती मदत कधीही....

दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे काही ऊद्योग वगैरे काढायचा विचार असेल तर माझा पहिला नबर लाव. मी ईकडे राजीनामा देऊन तडक आंबोलीला येते, म्हणजे प्रोमोशनच्या वेळी मी सिनिअर होईन Proud

साधना, मोठा निर्णय आहे हा, गरजा अत्यंत कमी कराव्या लागतील पण काहितरी विधायक कार्यदेखील हाती घ्यावे लागेल.

खरे आहे. विधायक कार्ये काय करावीत याचा विचार करत असतेच. नुसते गावी जाऊन राहण्यापेक्षा गावाला आपला काहितरी उपयोग होईल हे पाहणे महत्वाचे वाटते मला. इथे राहुन मिळालेले ज्ञान, अनुभव का फुकट घालवायचे?

आणि मी आताच गरजा शक्य तितक्या कमी केल्यायेत. शहरी सवयी मुळातच जडवुन घेतलेल्या नाहीत. मला बरेच जण सांगतात की खेड्यात जाऊन राहते म्हणणे सोपे आहे पण करणे कठिण, कारण इथल्या फास्ट लाईफची सवय झाल्यावर, रोज मॉल्समध्ये फिरायची सवय झाल्यावर जिथे हे काहीच नाही तिथे जाऊन राहणे जमणार नाही. माझे यावर उत्तर एकच आहे, आपल्या प्रायॉरिटीज काय आहेत हे एकदा मनाशी पक्के झाले की सवय, गरज इत्यादी गोष्टींमुळे काही फरक पडत नाही.

साधना,
आमच्या सारख्या भक्तांना/कार्यकर्त्यांना आपल्या अनमोल अशा संदेशाचा नक्कीच लाभ होईल .
दिनेशदा,
गावाकडच्या लोकांना शहरी जीवनाच आकर्षण आणि शहरी लोकांना गावाच ...याच उत्तर/कारण शोधायला गेलो कि माझ्या मनात खुप गोंधळ होतो

आंबोलिला रेशमाच्या बागा पण आहेत ना?

रेशिम किड्यांच्या पैदाशीचे केंद्र आधी आंबोली गावठाण भागात होते. आम्ही लहानपणी ते किडे पाहायला मुद्दाम जायचो. मोठ्ठ्या चप्पट टोपल्यांमध्ये त्यांना ठेवायचे आणि वर तुतीचा पाला घालत बसायचे. भारी खादाड जात आहे रेशिमकिड्यांची (रेशिम किडे तुतीची पाने खातात). आता गावठाणात फक्त तुतीच्या झाडांची शेती होते आणि केंद्र पुढच्या एका वाडीत हलवलेय.

आंबोली हे १२ वाड्या असलेले एक मोठे गाव आहे. वाड्यांची नावे वेगवेगळी आहेत जसे बाजारवाडी, जकात्वाडी, मुळगुंदवाडी, फौजदारवाडी, फणसवाडी इ.इ. मला आता आठवत नाही Happy माझे मुळ घर गावठाणवाडीत आहे, जे आंबोलीचे प्रमुख ठाणे आहे आणि आताचे नविन घर बाजारवाडीत आहे.

साधनाजी,
आमच्या सारख्या भक्तांना/कार्यकर्त्यांना आपल्या अनमोल अशा संदेशाचा नक्कीच लाभ होईल .
पण तिकडे ७-८ तास भारनियमन आहे, हे मात्र लक्षात असु द्या.

दिनेशदा,
ग्रामीण लोकांना शहरी जीवनाच आकर्षण आणि शहरी लोकांना गावांच ...अस का ? याच उत्तर/कारण शोधायला गेलो कि माझ्या मनात खुप गोंधळ होतो

अनिल, आपल्याकडे जे नाही त्याची ओढ असते ना.
शहरात नेमके काय अधिक मिळते, त्याचा विचार केला तर यादी फार मोठी नाही होत.
आणि आता वस्तूचे म्हणशील तर अगदी छोट्या गावात पण बहुतेक वस्तू मिळतातच.
रोजगाराच्या संधी मात्र शहरात जास्त दिसतात.
माझे आजोबा, संस्थानात कोठावळे होते. स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागल्यावर पंतप्रतिनिधींनी त्यांना काहितरी उद्योग सुरु करायचा सल्ला दिला, त्यानी जवळजवळ ६० वर्षांपुर्वी बेकरी काढली. त्याकाळी मैदा मिळतही नसे, कणीकच मैद्याच्या चाळणीने चाळून वापरत. यीस्ट पण घरीच तयार करत. पण त्यांनी नेटाने ती सुरु ठेवली. आजी, मामा, मावश्या सगळेच काम करत. आणि आता तर सगळे घरच त्याच्यावर चालते. आधुनिक मशीनरी आणली. आता फॅन्सी केक, ब्रेड पण बनवतात.

थोडीफार शेती होती ती कूळकायद्यात गेली, पण त्याने अजिबात फटका बसला नाही.

दिनेशदा,
तुमच म्हणणं नक्की पटतं..
६० वर्षापुर्वी किती अडचणी आल्या असतील, या त्यांच्या धाडसाला/कामाला मनापासुन दाद द्यावीशी वाटते
Happy

आता विषयच निघाला आहे म्हणून..
आजोबा हाताने मैदा मळत असत. एकावेळी ५० किलो वगैरे. मैदा मळणे म्हणजे काय काम असते ते आपल्याला माहित आहेच, पण पावाचा मैदा चांगला तिंबावा लागतो. त्यासाठी जवळजवळ बॉक्सींग सारखी अ‍ॅक्शन करावी लागते. असे ते रोज करत.. ते ९६ वर्षांपर्यंत जगले पण त्यांचे शरीर शेवटपर्यंत तसेच पिळदार होते.
मैदा मळने, तो प्रुव्ह करणे, मग त्याचे रोल करुन त्याच्या ठराविक आकाराच्या गोळ्या करणे ही सर्व कामे ते एकट्यानेच करत. मामा वगैरे ते पटापट ट्रे मधे लावत, पण तरीही त्यांच्या वेगाशी जूळवून घेणे जमत नसे.

पण तिकडे ७-८ तास भारनियमन आहे, हे मात्र लक्षात असु द्या.

आमच्या गावी फक्त सोमवारी अख्खा दिवस लाईट्स नसतात. बाकीचे स्गळे दिवस लाईट्स असतात.
वरची बोंडे काटेसावरीसारखी वाटताहेत.

जो_एस - साप-मुंगसाच्या फोटोत ती धामण आहे.
आणि त्या शेंगा 'कावळी' या वेलीच्या आहेत. ही वेल एखाद्या झाडाला अजगराप्रमाणे वेटोळी घालते आणि यथावकाश त्या झाडावर आक्रमण करते; पण ही वेल म्हणजे बांडगूळ नाही.
शिक्राचा फोटो अफलातून.....

<< योगयोगेश्वरी योगिनी साधनाजी ताई, रा. अंबोली यांचा जयजयकार असो.>> Proud
साधना, मस्त विचार. शुभेच्छा.
दिनेशदा, तुमच्या आजोबांना खरंच मानलं पाहिजे.
जो_एस, तो पानासारखा दिसणारा किडा कस्सला फसवा आहे !

साधना, शुभेच्छा!
मला गावात जाऊन राहावं म्हटलं, तर गाव कुठलं ते ठरवण्यापासून सुरुवात करावी लागेल ... माझ्या आणि नवर्‍याच्याही घरी कित्येक पिढ्या सगळे विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर घेऊन फिरताहेत Sad
जो_एस, फोटो मस्तच आहेत!
शशांक, कावळी वेलाच्या म्हातार्‍या शेवरीसारख्याच असतात ना? हा वेल मी लहानपणी प्रचंड वाढलेल्या विलायती चिंचेव॑र रेल्वे क्वार्टर्समध्ये बघितलाय.

माझ्या रोजच्या वाटेवर- (बोपोडीजवळ मुंबई-पुणे महामार्ग पासुन २-३ किमीवर.) वर याची ओळीने ५-६ झाडे आहेत,झाडे मोठी आणि सध्या या छान, लालभडक अशा फुलांनी भरलेली आहेत
रस्त्यावर गळुन पडलेली ही फुले रोज दिसतात (कि माझं स्वागत करतात ? :स्मित:)
आज येताना याची फुले ऑफीसमध्ये आणली आणि खुप दिवसांनी एक फोटो इथे दिला
हे फुल इथं पाहिलयं पण नाव आठवत नाही..

Flower2_0.pngFlower1.png

ओ भाऊ हे स्पॅथेडिया आहे. जिप्स्याने फोटू डकवलेले की.. इतक्या लौकर विसरलात??
यालाच आफ्रिकन ट्युलिप नी काय नी काय अशी बरीच नावे आहेत.
हे झाड इथले मुळ रहिवासी नाहीय पण बरीच घुसखोरी केलीय त्याने. गोव्याला जाताना लालभडक झालेली झाडे पाहिलीत याची.

बरोबर साधना - हे स्पॅथोडिया कॅम्पानुलाटा (Spathodea campanulata - family Bignoniaceae)आहे - आपल्याकडे पिचकारीचे झाड म्हणतात. हिरव्या पानात हे केशरी-लाल तुरे छान शोभतात.

Pages