निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नि. ग. वेड्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

सर्व निसर्ग प्रेमिंना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष हिरवेगार, पाना-फुला-फळांनी बहरलेले पाहण्यात जावो ही शुभेच्छा.

आर्च सहीच ग.

सर्व निसर्गप्रेमींना त्यांच्या कुटुंबियांबरोबर, सग्यासोयर्‍यांबरोबर निसर्ग-भटकंती करायला मिळो.

दिनेश दां ना विचारायचे आहे कि वरील सर्व औशधांचा उपयोग वय लहान असेल तरच होतो का ? का सर्व

वयाच्या लोकांना होतो ?

प्रिति, लहान वयातच होईल फायदा. मग वय वाढले कि असलेली स्मरणशकी टिकवण्याचेच
प्रयास करावे लागतात. साधनाला पण गरज नाही, ती स्वत:च मस्करी करत असते.

आर्च - ते "घरचे हॅलॅपीनो पेपर्स" - फोटो मस्त आहेत - पण जरा सविस्तर लिहिणार का त्याबद्दल...... कुंडीत लावले का जमिनीत - हे अमेरिकेतील टिपिकल वाण आहे का - कितपत तिखट असतात, वगैरे...

नमस्कार मंडळी,
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

प्रशांत सध्या नेट अ‍ॅक्सेस बंद झालाय काही काळासाठी

सर्व निसर्गप्रेमींना दिवाळिच्या शुभेच्छा Happy

दिवाळी जमेल तितकी शांत साजरी करा. प्राण्या पक्षांचा झाडाखेतांचा विचार करा Happy

अरे पण शुभेच्छांबरोबर निसर्गाबद्दलही बोला काही स्मित>> जागूला जोरदार अनुमोदन..

निसर्ग... एक जादूगार....
कसा ताबा घेतो आपला.... कळतही नाही....
अनिमिष नेत्रांनी नव्हे सगळ्या इंद्रियांनी आपण आनंद घेतो या जादूचा.....
सहजतेने एकरुप होउन जातो त्याच्याशी...
अकारण आनंदाने भरुन जाते हृदय...... स्वच्छ होउ लागते आपले मन, आपली दृष्टी....
किती किती देशील रे सख्या....
माझी झोळी अपुरीच की.....

सर्वाना दीपावली निसर्गप्रेमाने भारलेली जावो....

अंजू (शांकली) व माझ्यातर्फे सर्व निसर्गप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

x7196.jpgदिवाळीच्या निमित्ताने सर्वांना जास्तीत जास्त निसर्गसान्निध्य लाभो...

मला बरेच दिवसांपासुन एक सांगायच आहे, पण वेळेअभावी जमत नव्हत. असो.. तर.. रोज संध्याकाळी घरी जाताना एका विशिष्ट जागी 'बटाटे उकडल्यावर येतो तसा वास येतो'. त्या जागी आसपास एकही घर नाही किंवा असं काहीच नाही की तिथे कोणी बटाटे उकडत असेल. मला असं वाटतं की तो कुठल्या तरी झाडाचा वास असावा. आणि माझ अस निरीक्षण आहे की दिवसा तो वास येत नाही, संध्याकाळ पासुन यायला सुरवात होतो. कारण असा वास वसईला आम्ही जेव्हा नवरात्रात रात्री गरब्याला / उभ्या महालक्ष्मीला (रात्री ९.००-९.३० च्या सुमारास) जायचो तेव्हा सुध्दा अनुभवला आहे. सुरवातीला आम्हाला गंमत वाटायची की इतक्या रात्री कोण बटाटे उकडतयं. पण नंतर हे लक्षात आलं की हा कुठल्या तरी झाडाचा वास आहे. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी.

स्निग्धा अशी काही विशिष्ट वासाची झाडे असतात. पण त्याबद्दल दिनेशदांनाच जास्त माहीत असेल.

वा जागू मन अगदी हिरवंगार झालं हा फोटो बघून.... मस्तच...
स्निग्धा - आसपास साधारण कुठल्या कुठल्या प्रकारची झाडे होती हे काही सांगू शकशील का - त्यावरुन काही क्लू मिळाला तर बघू - पण फार गंमतीशीर आहे हं हा प्रकार - मलाही प्रचंड उत्सुकता लागलीये.... भूछत्रे होती का तिथे आसपास - असंच हळुहळू आठवत रहा - अजून तिथे गेलं तरीही हा वास येतो का - निरिक्षण करीत रहा...

स्निग्धा, भाताच्या शेतीच्या आजूबाजूला, (दूरवर जरी भाताचे शेत असले तरी वार्‍याने असा वास येऊ शकतो.) करांद्याच्या वेलीच्या आजूबाजूला असा वास येतो. मोठे आळूचे बन असेल तर तिथेही असा वास येतो. शशांकने लिहिल्याप्रमाणे भूछत्रांचाही असा वास येतो.
अजूनही काही झाडे असतील अशी.
हे वास कदाचित काही किटक, वटवाघळे यांच्यासाठी पण असू शकतील.
कधी कधी घुशी बिळे करत असताना, आतली ओली माती बाहेर टाकतात, त्याचाही असा वास येऊ शकतो.

भूछत्रे होती का तिथे आसपास - >>>>> पाहिल्याच आठवत नाही, आता मुद्दाम थांबुन पाहीन.
अजून तिथे गेलं तरीही हा वास येतो का >>>>>>> हो रोज येतो. सकाळी तिथुन येतांना वास येत नाही. संध्याकाळ झाली की सुरवात होते. आणि माझ असही निरीक्षण आहे की जस जशी संध्याकाळ गडद होत जाते तस तसा वास ही गडद (strong) होत जातो.

भाताच्या शेतीच्या आजूबाजूला>>>>> दिनेशदा, माझं वसईचं घर भात शेतीत आहे. म्हणजे माझ घर मधे आणि चारी बाजूला भाताची खाचरं, पण तिथे येणारा वास आणि मी म्हणते तो वास वेगळा वेगळा असतो. भात निसवल्यावर भात शिजतांना येतो तसा वास येतो. त्याच माझं खुप लहानपणापासुनचं नातं आहे.
करांद्याच्या वेली >>>> या मात्र कशा असतात ते मला माहीत नाही.

मग कुठलीतरी फुले फुलून त्याचा वास येत असावा किंवा एखादे विशिष्ट गवत तापल्यामुळेही येत असावा. पावसातही येतो का असा वास ?

करांद्याच्या वेलीचा फोटो जागूने दिला होता इथेच.
काही किटकही असा वास सोडू शकतात.
वसईला माझी आत्या रहात असे (तामतलावला) केळीची बने, भाताची खाचरे, रस्त्याच्या शेजारचे पिवळे खेकडे, हिरव्या देठाचे अळू, चिंचांची झाडे, रेड्याचे रहाट.. सगळे आठवणीत आहे.

Pages