निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अ‍ॅनिमेशन नक्कीच वाटत नाहिए. कसे करत असतील बरे याचे चित्रण?>>>>>>>>>>>मला पण हाच प्रश्न पडलाय. जिप्सीला माहिती असेल.किंवा दिनेशदांना...

साधना,
सकाळी ५ वाजता जाग आल्यावर गजर बंद करुन परत ७ पर्यंत झोपणे ह्या आजारावर काही औषध आहे का?
तुम्हाला औषध मिळाल की नक्की सांगा,ते माझ्यासारख्या खुप लोकांना उपयोगी पडेल...

जागु,
ही माहिती वाचुन खुप बरं वाटतं (:स्मित:)
(पण आपण नुसतं वाचणार्‍यांपैकी आहोत ना :राग:)

शशांकजी,
साने यांच्याबद्दल खुप विशेष माहिती मिळाली, त्यांच्या ज्ञानाला/अभ्यासाला/राहणीमानाला सलाम करायला हवा ..
Happy
शांकली,
तुम्ही वर दिलेल्या लिंकवर या अनेक फुलं उमलणारे चित्रण पाहुन खुप ग्रेट,धन्य वाटल..धन्यवाद !

मला तरी वाटत नाही अ‍ॅनिमेशन आहे म्हणुन. कळीवर फुलेपर्यंत कॅमेरा फिक्स करुन मग फिल्म फास्ट केलीय बहुतेक. कसे करायचे माहित नाही. मला सांगा कारण माझ्या एपिफिलमवर मला हा प्रयोग करायचाय. ती कळी २-३ तासात फुलते त्यामुळे प्रयोग करणे सोप्पे जाईल. फक्त मी घरात अस्ताना कळीने फुलायचे मनावर घेतले पाहिजे किंवा तिने मनावर घेतल्यावर मला झोप आली नाही पाहिजे.

अशा फिल्म्स कॅमेरा एका जागी ठेवून ठराविक काळाने तो क्लीक करतात. अटेंबरो साहेबांच्या टीमने वर्षभर असे कॅमेरे लावून ठेवले होते.
हरिशचंद्राची फॅक्टरी सिनेमात वाटाण्याची वेल अशीच चित्रित करताना दाखवलेय.

जास्वंद, गुलाब सारख्या फुलांच्या कळ्या, रात्री लोकरीच्या कापडाने अलगद गुंडाळून ठेवायच्या. सकाळी उन्हं आल्यावर ते कापड भरकन सोडवायचे, आपल्या डोळ्यासमोर कळी उमलताना दिसते.

(मी घरी जाऊन लिंक बघतो, आणि परत काही लिहिण्यासारखे असले तर लिहीतो.)

जास्वंद, गुलाब सारख्या फुलांच्या कळ्या, रात्री लोकरीच्या कापडाने अलगद गुंडाळून ठेवायच्या. सकाळी उन्हं आल्यावर ते कापड भरकन सोडवायचे, आपल्या डोळ्यासमोर कळी उमलताना दिसते.

कळ्या न तोडता गुंडाळायच्या ना??

शांकली, लिंक मस्त आहे. अ‍ॅनिमेशन वाटत नाही. दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे हरिश्चंद्राची फॅ. मधे हे चित्रण कसे करतात हे दाखवलं होतं.

मी वरची लिंक बघितली.
याला बहुतेक टाईम लॅप्स व्हीडिओ म्हणतात. यात दोन प्रकार असतात एकात दहा दहा मिनिटांनी शॉट घेतात तर एकात सेकंदाला अनेक शॉट्स घेतात. बीबीसी चा व्हॉट युअर आईज कांट सी, नावाचा एक जूना व्हीडीओ आहे.

सचिन चा ससा कधी झाला ते कळलेच नाही ... Happy

आयड्या सतत बदलल्या की कळत नाही कोण कुठला ते.. सचिनने खुप टोप्या बदलल्यात Happy

मलापण माझी आयडी आता बदलावी लागणार. पुढचा आठवडा कॉप्युटरसमोर नसणार, मोबाईलवरुन मराठी टायपता येत नाही आणि काही नविन बघितले की निग वर शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे देवनागरीचा तात्पुरता त्याग करुन रोमन लिपीचा आधार घेतलेला बरा. फोटो मात्र फेसबुकवरच अपलोड करता येतील. माबोवर नाही जमणार Happy

मागे कोणीतरी केशरांच्या शेताच्या फोटोंची एक मेल पाठवलेली. जमिनीवर उगवलेली फुले, मग ती फुले तोडणारी माणसे (पेहरावावरुन मुस्लिम प्रांतातली वाटली, जुन्या अफगाणिस्तानातल्यासारखे लोक), मग घरात बसुन फुलातले केशर काढणारा मुली नी बाया असे वेगवेगळे फोटो होते.>>
कदाचित कश्मिर मधलेच असतिल ते फोटो. गेल्यावर्षी कश्मीरला गेलेलो. तेव्हा खुप ठिकाणी हे द्रुष्य दिसत होत. माझ्या नवर्‍याने बरिच खरेदि केली तेव्हा केशरची.

शेवटचा फोटो केशर काढल्यावर उरलेल्या त्या सुंदर फुलांना शांतपणे खाणा-या एका गाढवाचा होता.
म्हटले नशिब बघा गाढवाचे, साक्षात केशराची फुले खातोय.>>
हे मी पण पाहिलेले. याबद्दल विक्रेत्याला विचारल तेव्हा तो म्हणाला की सगळ्या केशरच्या बागांमध्ये तो केशरचा पुंकेसर असतोच अस नाही. नापीक जमिनीमध्ये पण मह्ण्जे रानावर अशी केशरची बरीच रोपटी येतात. पण त्याचा उपयोग असा कहि नसतो. मग आपल्याकडे गुर रान चरतात. तसेच तिथे घोडे - गाढव हे चरत असतात.

केशरांचे जे फोटो पाहिले त्यात सगळीकडे खडबडीत जमिनीवरच फुले आलेली आणि तीही भुईचाफ्यासारखी थेट वर- आधी खोड मग फांद्या, पाने व.व. सरंजाम न वागवता आलेली पाहिलीत.
(भुईचाफ्याचे फुल आता मी विसरत चाललेय. गोव्याला शोधायलाच हवे)

रोमन साधना कोणीतरी आधीच ढापलेय Angry

आता मी परत येईपर्यंत देवनागरी साधनाही कोणी ढापले नाही म्हणजे मिळवले.

चौथा भाग सुरू झाल्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचं अभिनंदन. Happy

शशांक, मोत्यांची शेती सहीच !

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
diwali greeting.jpg

सर्व निसर्गप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
शांकली मस्त आहे गं लिंक!

Pages