निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव पणत्या मस्तच आहेत.
साधना, मलापण आता हि औषधे घ्यावी लागणार आहेत !!
शशांक, त्यांना भेटायचे आहेच.
तो शैवालाचा फोटो आहे ना त्यांनी आम्ही शाळेत लढाई खेळायचो (गुलमोहरांच्या पुंकेसरानीपण) एकमेकात ते "डोके" अडकवून ओढायचे. ज्याचे "डोके" तूटेल तो मेला, समजायचे !!!

काल ऑर्किडचे प्रदर्शन बघून डोळे निवले अगदी. पण ते प्रदर्शन एका हॉलमधे असल्याने नैसर्गिक प्रकाश नव्हता. अपुर्‍या प्रकाशात काढलेले फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत. तरीपण बघतो, जे दाखवण्याजोगे असतील ते टाकतोच इथे.

सानेबाईंना भेटायला सगळे एकत्रच जाऊ. ज्यांना त्या विषयातले कळते ते लोक बोलतील, आम्ही आपले श्रवणभक्ती करु...

सानेबाईंना भेटायला सगळे एकत्रच जाऊ. ज्यांना त्या विषयातले कळते ते लोक बोलतील, आम्ही आपले श्रवणभक्ती करु...>>>>>>>>साधनाला १००० मोदक (हवे असल्यास काजू कतली Happy )

श्री नीलेश गोरे यांच्या ब्लॉगवरुन साभार..

Botanical Life (Dr. Hema Sane)
——————————————————

It was 2002, Jogeshwari temple, ABC Pune. Along with my friend I was in the queue to pray the goddess with some unknown flowers in my hand. I asked my friend about the flowers, he was unaware about it too but he said, “it might be hybrid or processed with some artificial ways”. After a little pause I heard a voice of lady, I looked back and she told everything about those flowers, I was just forgot to breath. She invited to us to visit her home, I took the address, and asked for the name n number, she said,” I don’t have telephone and my name is “HEMA”. I thought she is a poor lady but with rich knowledge.

I was curious to meet her, so on very next day I reached the address given by her, I was just amazed coz I seen the place many times before and thought no one lives here.

I opened the broken gate, entered and I found myself in totally different world. World of plants, grass, trees and flowers, and was shocked to see the hut (wooden roofed).

When I entered, she was making tea. I looked around n saw books n album like things everywhere. She gave me a cup of tea with totally different n unforgettable taste.

while chatting I was looking for switch board to light the tube, she understood my intention n said, “I don’t need electricity so I don’t have any bulbs or thing that needs electricity, I am not against electricity - I do understand that electricity is essential for several things, especially in the work of science, but I feels that it is redundant in my daily life.”

I was speechless on her such a intent thought n way of living in the era where everyone is focused on the “standards of living”

on 5th visit to her in 2003: I was more curious and thought there might be some things in the past that made her to live like this so I decided to ask her.

While chatting I asked her to tell about her past and she replied,” dear!!! ask me about the PLANTS not about the PAST.”

She is always busy with students (Indians n foreigners), curious kids like me and visitors who know or heard about her distinctive quality work.

Once I asked her, “why don’t you work professionally apart from your job” and she replied, “then I will loose the innocence of helping to the students and to the nature.”

One of the interesting thing about her is that she don’t remember faces n names most of the times… in my 5 visits, I introduced myself thrice, she remembers everything after then.

I asked her, “what must I do so that you will remember me all the time.” she replied, “just grow some rare plants on your head, I can remember plants n things attached with then and I can’t remember names n faces……. that is my weakness.

She is one who dedicated her life for the “green gold” , a women who is always away from the expectations, temptation and attachment of material world designed by humans.

She is not poor, nor having lack of money, she was Dr. HEMA SANE worked in Dept. of Botany in University of Pune. A former head of the department of botany at the Abasaheb Garware College, pune. She is a Author and co-author of several botany books.

Dr. Hema sane has dedicated her life for the SCIENCE and the Botanical research, Botany is in her blood. She is the one who lives the natural life naturally.

You can visit: Dr. Hema Sane - 121, Budhwar Peth, Jogeshwari Temple Road, pune.

जरा मोठ्ठाच लेख आहे......पण....काय करु.......? आणि हो....ही एक झलकच...... बरं का...

शशांक. काय बोलु? I am totally speechless.
जर कोणी जाणार असेल यांना भेटायला तर इथे नक्की लिहा. मला जायचंच आहे यांना भेटायला.

बापरे केवढ्या गप्पा झाल्या ?
मामी १९ ला होता ग वाढदिवस.

अनिल तुम्ही मला भाषण करताना समोर दिसलात. Happy

शशांक दवबिंदू मस्तच.

जर कोणी जाणार असेल यांना भेटायला तर इथे नक्की लिहा. मला जायचंच आहे यांना भेटायला.>>>>>मलाही आवडेल भेटायला Happy

काल कंपनीच्या आवारात तणनाशक फवारताना हे साहेब सापडले. खुप भेदरलेले होते, थोड्यावेळाने त्यांची बिनशर्त सुटका केली गेली.

From Scrapbook Photos

From Scrapbook Photos

जर कोणी जाणार असेल यांना भेटायला तर इथे नक्की लिहा. मला जायचंच आहे यांना भेटायला.>>>>>मलाही आवडेल भेटायला>>> + १ मी पण.

गोड आहे. बर झाल सोडून दिलत ते.

माझ्याघरी डबलचे सोनकुसुम फुललेय.

उरणच्या गटगला तुम्ही जे कमळांचे डबके पाहीले होते त्यात वॉटरलिली फुलल्या आहेत.

गिरिश, रानससा असून फार पळत नव्हता हे आश्चर्यच.... ससे फारच घाबरट असतात, हे तर केवढे भेदरलेले दिसतंय...
आम्हाला कंपनीत ससे / उंदीर / गिनी पिग - हाताळावे लागतात - पण सगळे पिंजर्‍यातले - लॅब अ‍ॅनिमल्स - बाहेर सोडले तर पळूही शकत नाहीत.... बिचारे...

जागू - सोनकुसुम व वॉटरलिलिजचे फोटो मस्तच... जालरंगवरचे - सुगरणीचे सर्व फोटोही अप्रतिम.... ते खोप्यावर बसलेल्या पक्षाचे फोटो कसे मिळवलेस... तपःश्चर्याच करावी लागली असेल ना ....? धन्य तुझ्या पेशन्सची....

ते झाड माझ्या ऑफिसच्या वाटेत आहे. मी जेंव्हा रानफुलांचे फोटो काढायला गेले होते तेंव्हाच त्यांचे फोटो काढले. तेंव्हा सगळे हजर होते माझ्या नशिबाने की मला पाहून Happy

सानेबाईंचा शिष्य व्हायला पाहिजे.

शशांक, जागूला कुठलाच पक्षी, प्राणी, किटक, साप... भित नाही.

गिरिकंद, ससा हाती सापडणे कठीण असते..

दिनेशदा, शशांक, कंपनीच्या आवारात तणनाशक फवारणी करताना त्या स्प्रेअरच्या मोठ्या आवाजामुळे हे पिल्लु बहुतेक तिथेच गवतात लपुन बसले होते, मग Housekeeping च्या मुलांनी त्याला उचलुन आणले. आणी त्याचे थरथरणे कमी झाल्यावर त्याला परत सोडुन दिले.

दिनेशदा, शशांक Lol
माझ्या विहीरीतले नाही घाबरत. सकाळी मस्त वर आलेले असतात दोन मासे.

या सश्याबाबत एक सुंदर क्लीप मी बघितली होती. बर्फाळ प्रदेशात पण हे तग धरून राहतात. एकदा त्याच्यामागे वाघ लागतो. ससा पुढे पळत असतो, काही वेळ पाठलाग केल्यावर वाघ त्याचा नाद सोदून देतो.
त्यावेळी निवेदनात असे सांगितले होते कि वाघ विचार करतो, याला खाऊन मला जी शक्ती मिळेल, ती शक्ती पाठलाग करण्यात जाणार्‍या शक्तीपेक्षा कमीच असणार.. मग का खा ?

माझ्या विहीरीतले नाही घाबरत. सकाळी मस्त वर आलेले असतात दोन मासे.>> कश्याला - ते पाण्यात सारखं सारखं राहून फार थंड पडलोत, त्यामुळे केव्हा एकदा तुमच्याकडील तव्यावर (फ्राय पॅन गं) गरम गरम शेकून घेतो असं झालंय... म्हणत ?

ससे पळताना - उतारावर त्यांना जोरात पळता येत नाही - मागील पाय लांब असल्यामुळे - त्यामुळे ते चांगलेच होलपटतात - त्यावरुन तो शब्द आलाय.. "ससेहोलपट"....

अस्वलाला पण उतारावर पळता येत नाही, कारण त्याचे केस त्याच्या डोळ्यावर येतात. मग तो कशालातरी धडकतो (आधीच नजर अधू) आणि वाटेत येईल त्याला धरायचे, हि त्याची खासियत ..(चितमपल्ली)

Pages