निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहित होतं दिनेशदा...तुम्हालाच माहीत असणार...आणि अपेक्षित माहीती मिळाली.. Happy

खरे केशर फार चिवट असते. ते सहसा ओढून तूटत नाही. ते पाण्यात,
दूधात किंवा लिंबाच्या रसात घालून खलावेच लागते. >>>

तीन पूकेसर >> धन्स Happy

शोभा अग मी तेंव्हा अगदी लहान होते तेंव्हा केलेल. आता त्याच नामोनिशाण नाही.

चातक धन्यवाद.

अरे ती पुस्तकांची यादी कंटिन्यु करुया. मग बरीच झाली की मेन पेजवर ठेऊ म्हणजे लगेच सापडेल.

] आपले वृक्ष देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] श्री. मारुती चितमपल्लींची सर्व पुस्तके
११] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
१२] गोईण - डॉ. राणी बंग
१३] कदंब - दुर्गा भागवत
१४] रानवाटा - मारूती चित्तमपल्ली
१५] केशराचा पाऊस - मारुती चित्तमपल्ली
१६] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर

दिनेश, स्वतःची विपू बघण्याकरता काही औषध असल्यास ते पण घाला त्या यादीत Happy

जागू तुझ्याकडे 'कदंब' आहे दुर्गाबाईंचं?

दिनेश जुलैमधे तरी आयडिअलकडे फ्लॉवर्स ओफ सह्याद्री नव्हते. आता जाऊन बघतो दिवाळीनंतर.

साधनासाठी खास औषधे..आजच्या वेबदुनिया.कॉम मधून..

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरण शक्तीत वाढ होते.>>>>साधना Proud Wink Happy

चातका, स्मायली मस्तच रे.
दिनेशदा, यातील काही मलाही स्मरणशक्तीसाठी उपयोगी पडतील. Happy

खास पुण्यातील निसर्गप्रेमींसाठी (अर्थात इतर मंडळीही हा लाभ घेऊ शकतातच) -
डॉ. हेमा साने - पत्ता - नू. म. वि. प्रशाला (मुलांची), बुधवार पेठ, पुणे ३० - शाळेच्या पिछाडीस जी गल्ली आहे तिथे रस्तात एक झाड आहे त्या मागील वाड्यात - तिथे कोणीही सांगेल त्यांचे घर. एका वाक्यात सानेबाईंचे वर्णन - "चालती बोलती बॉटनी" - राहत्या जागेचे वैशिष्ठ्य - नो इलेक्ट्रिसिटी, नो फोन - हो या २०११ सालातही. वृद्ध असूनही कान, डोळे, स्मरणशक्ति अति तीव्र. कुठलेही पान, फूल, फळ (स्पेसिमेन) घेउन गेल्यास लगेच त्याची संपूर्ण कुंडली (जात, कुळ, वैशिष्ट्य, इ.) सांगतात. माझी कॉलर का ताठ आहे हे सांगताना माहितीए.....- एकेकाळी बॉटनी त्यांच्याकडून शिकायचे भाग्य लाभलेय मला (किती शिकलो हे सांगणे कठीणच!). वर केलेले वर्णन हे हिमनगाचे टोकच आहे फक्त - प्रत्यक्ष भेटल्यावर कळेलच. बॉटनी ज्ञानाचा महासागर..... जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा...ज्या कोणाला पानाफुलांविषयी प्रेम आहे अशा कुठल्याही व्यक्तिला कितीही माहिती द्यायला कायम तत्पर... फोन नसल्यामुळे त्यांना भेटायला जाणार्‍यांची जरा पंचाईत होईल, एवढेच.

माझी कॉलर का ताठ आहे हे सांगताना माहितीए.....- एकेकाळी बॉटनी त्यांच्याकडून शिकायचे भाग्य लाभलेय मला (किती शिकलो हे सांगणे कठीणच!). >>>अनुमोदन. गरवारे महाविद्यालयातले दिवस आठवले. Happy

(किती शिकलो हे सांगणे कठीणच!) अगदी अगदी. (कुठल्याही अर्थाने म्हणले तरीपण Wink )

ही औषधे अपेक्षित परिणाम होईपर्यंत घेणे लक्षात ठेवण्यासाठी काही औषधे आहेत का???

सकाळी ५ वाजता जाग आल्यावर गजर बंद करुन परत ७ पर्यंत झोपणे ह्या आजारावर काही औषध आहे का?

'आज नको, उद्यापासुन मात्र नक्की करणार' हा मंत्र डोक्यातुन घालवण्यासाठी काही औषध आहे का?

आणि वरील औषधे साधारण किती वयापर्यंत लागु पडतील? नाहीतर उगीच मी जिवाचा आटापिटा करुन औषधे घेईन आणि मग कळेल म्हातारपणात यातले एकही औषध लागु पडत नाही म्हणुन Proud

साधना Lol

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरण शक्तीत वाढ होते

अगस्त्यच्या बीया, गाईचे धारोष्ण दुध ह्या सगळ्या गोष्टी आजच्या जमान्यात कुठे मिळतात???? एकवेळ अगस्त्यच्या बीया मिळतील पण धारोष्ण दुधासाठी मात्र दारातच गाय बांधावी लागेल. Happy

वा रैना - सुंदरच लिंक दिलीस की.... अशीच यादी वाढत जाउन वेगवेगळी पुस्तके माहिती होतील, वाचली जातील....

चातक, crocus sativus च्या इमेजेस गुगलवर शोधा म्हणजे मस्त फुले पाहता येतील.

मागे कोणीतरी केशरांच्या शेताच्या फोटोंची एक मेल पाठवलेली. जमिनीवर उगवलेली फुले, मग ती फुले तोडणारी माणसे (पेहरावावरुन मुस्लिम प्रांतातली वाटली, जुन्या अफगाणिस्तानातल्यासारखे लोक), मग घरात बसुन फुलातले केशर काढणारा मुली नी बाया असे वेगवेगळे फोटो होते.

शेवटचा फोटो केशर काढल्यावर उरलेल्या त्या सुंदर फुलांना शांतपणे खाणा-या एका गाढवाचा होता. Happy
म्हटले नशिब बघा गाढवाचे, साक्षात केशराची फुले खातोय.

दिनेश तुम्ही दिलेले केशर मी प्रचंड काटकसरीने वापरतेय... Happy आत्ता कोजागिरीला वापरले.

दिनेशदा मी पण. उठ्-सुट सगळ्यात नाही घालत. अगदी खास पदार्थांतच घालते.

साधना ती मेल मिळाली तर फॉरवर्ड कर प्लिज.

जागू, माझ्याकडे एक खुप जुने वनौषधींवरचे पुस्तक आहे मी तुला म्हणाले होते, ते मी स्कॅन करुन त्याची पिडीएफ फाईल बनवून पाठवेन.. थोडे वेळ खाऊ काम आहे, पण करेनच..

माझं हे छोटसं भाषण ...
आजच्या या दिवशी, निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालु होत आहे, हे होत असताना सगळ्यांचा अभिमान वाटतो,यातले काही लोकांच योगदान,सहकार्य खुप आहे, त्यांच मनापासुन आभार आणि
सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन!
Happy

जागू कधी झाला वाढदिवस? उशिराने वादिहाशु!

सर्व निसर्गप्रेमींचं चौथ्या भागाबद्दल अभिनंदन!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! (आधीच देऊन ठेवते. Happy )

या श्रावणात पुरंदर किल्ल्यावर जाण्याचा योग आला. गडावर पूर्ण ढगांचे राज्य होते, पण पाऊस मात्र नव्हता - फारच आल्हाददायक वातावरण......गडावर जायच्या वाटेवर या जलबिंदूंनी अशी मोहिनी घातली की किती फोटो काढू असे झाले अगदी....

dav1.jpgdav2.jpgdav3.jpgdav4.jpg

मस्त आहे ही मोत्यांची शेती.

माधव मस्त आहे ग्रिटींग. दुस-यावर वारली पेंटींग आहे??

शशांक.......साने बाई.........नो इलेक्ट्रिसिटी, नो फोन? फोनचं एक वेळ ठीके पण त्यांच्या घरात दिवे नाहीत?

शशांक.......साने बाई.........नो इलेक्ट्रिसिटी, नो फोन? फोनचं एक वेळ ठीके पण त्यांच्या घरात दिवे नाहीत?>>
हे नसूनही इंटरनेट किंवा लेटेस्ट सर्व गोष्टी माहित आहेत - अजून आयुर्वेद, वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, व्याख्याने देणे असे अनेक उपक्रम चालूच असतात. अजून ७० -८० जणांसमोर बोलताना (व्याख्यान देताना) माईकची गरज भासत नाही - एवढा खणखणीत आवाज - फळ्यावर सर्व आकृत्या अशा काढतात की पुस्तकातल्याच कोणी एन्लार्ज करुन समोर ठेवल्यात - मुख्य म्हणजे अगदी निगर्वी, साध्या आहेत - त्यांच्याशी बोलताना आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही... काय काय वर्णन करणार - त्या एकदम "ग्रेट" आहेत...... बस्स...

Pages