परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लानिंग प्रमाणे 'परतोनि' आलो. आल्या आल्याच एका ठिकाणी जॉइन देखिल झालो. गंम्मत म्हणजे जिथे जॉइन व्हायचे बर्यापैकी ठरले होते तेथे न होता दुसरीकडे जॉइन झालो. आता घरी राहुन रोज अप डाउन सुरु आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस.टी मधुन. जाण्या येण्यात बराच वेळ जातो पण सध्यातरी तो वेळ affordable आहे. सार्वजनिक वाहन व्यव स्थेचे महत्व बरेच पटले आहे.

कामाच्या बाबतीत मात्र एकदम मस्त वाटतेय. लवकरच डिटेल्स लिहतो.... Happy

आमची एक फॅमिली फ्रेंड इंडियात कायमचं परतायचा विचार करत आहेत. त्यांना एक दिड वर्षाची मुलगी आहे जिचा जन्म अमेरीकेतला आहे तर त्यांना इंडियात परत गेल्यावर मुलीसाठी काही लिगल किंवा Immigration च्या formality कराव्या लागतील का?

कुणाला माहीती असल्यास सांगा Happy

रचू भारतात आल्यावर तिच्या पालकांना पोलीस कमिशनरच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यासाठी काही कागदपत्रे लागतात त्यांची यादी तिथे गेल्यावरच मिळेल (काही कटकटीची कागदपत्रं नसतात) त्या कागदपत्रांचे ३ संच बनवून द्यावे लागतात. आणि हे काम लँड केल्यापाशून १५ दिवसात करायचे असते.

त्यांना एक दिड वर्षाची मुलगी आहे जिचा जन्म अमेरीकेतला आहे>>>>>
तिचे पीआयओ किंवा ओसीआय कार्ड बनवले आहे का? अमेरिकेतील भारतीय कॉन्सुलेट मधे चौकशी करायला सांगा.
ओसीआय कार्ड (आई किंवा वडील अमेरिकन नागरीक असेल तर मिळते).
पीआयओ कार्ड (आई/वडील दोघेही अमेरिकन नागरीक नसतील तर)
ओसीआय धारकाना भारतात पोलीस रजिस्ट्रेशन लागत नाही..इतराना लागते.

ओसीआय आणि पीआयओ मधे काय फरक आहे? भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व (दोन देशाचे नागरिकत्व) घेता येते असे मधे वाचले होते.

ओसीआय कार्ड मिळण्यासाठी किमान एक पालक अमेरिकन नागरीक असावा लागतो.
पीआयओ साठी ही अट नाही.
ओसीआय पर्मनंट असते , पीआयओ १५ वर्षाच्या मुदतीचे असते.

भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व घेता येत नाही. ओसीआय हे दुहेरी नागरिकत्व नसुन भारताचा लाईफलाँग विसा आहे. (दुहेरी नागरिकत्व पाकिस्तान, कॅनडा इ. देशातील नागरीकाना मिळते..भारतीय नागरिकाला नाही.)

धन्यवाद सगळ्यांना Happy

तिचे पीआयओ किंवा ओसीआय कार्ड बनवले आहे का? >>>> मनस्मी त्यांनी पीआयओ कार्ड करीता अप्लाय केलं आहे.

भारतातील फायनांस च्या क्षेत्रात नोकरीत किती पगार मीलतो .... फारच इंटेरेस्टिंग लिहिले आहे सगल्यान्नी.
मी स्वतः सी. ए आहे आणि कॉर्पोरेट मध्ये १५ वर्ष काढली आहेत. भारतात पगार मिलतात पण ते एक विशिष्ट साच्यात तुम्ही असाल तर मिळतात. उदा. तुम्ही जर फायनांस मध्ये एम्.बी.ए. , सी ए असाल आणि बैंकिंग किंवा resource फयनान्सिंग मध्ये असाल, तर मजबूत पैसा आहे. अगदी एक किंवा दिड कोटि सुध्धा. पण जर तुम्ही नॉन-glamorous जॉब मध्ये असाल उदा. औडिट, टैक्स, accounts तर मात्र अति जास्त पैसे मिळत नाहित. त्यातही तुम्ही जर रँक होल्डर किंवा आईआईएम सारख्या कैलिबर चे असाल तरीही खुप पैसा आहे. माझ्या अनुभवा प्रमाणे, साधारण जॉब मधल्या व्यक्तीला ह्या सेक्टर मधे जर ७-८ वर्ष झाली असतील तर साधारणतः १५ ते १८ लाख वर्षाला मिळतात. तेच जर तुम्ही बैंकिंग किंवा NBFC मध्ये असाल तर त्याच व्यक्ति ला २५ तो ३५ पर्यंत पगार असू शकतो. इथे सगळे उद्योग contact वर चालतात. साधारण फायनांस मध्ये कोणी industry पटकन बदलत नाही. त्या मूले, पहिली नोकरी घेतानाच विचार करावा. परदेशात तुन एम्.बी.ए. केलेल्या माणसा ला इथे भरपूर भाव आहे. मागील दोन वर्षात ही आयात खुप झाली. मी ज्या industry मध्ये आहे ( construction ) तिथे आम्हाला आमच्या ग्राहकां मध्ये ही वाढ झालेली जाणवली. फायनांस मध्ये मुख्यतः पंजाबी/north आणि गुजराथी लोकांचे प्रमाण खुपच आहे. बैंकिंग मधल्या महत्वाच्या जागी हीच मंडळी प्रामुख्याने दिसतात. मराठी लोक त्या मानाने फारच कमी. आपण मुख्यतः इंजीनियरिंग ,डॉक्टर, आईटी, ह्या ठिकाणी जास्त मुशाफिरी करतो.

हे सगळे आर्थातच माझ्या वैयक्तिक अनुभवा चे बोल आहेत. कोणाला उपयोगी पडले तर आनंदच आहे.

>>फायनांस मध्ये मुख्यतः पंजाबी/north आणि गुजराथी लोकांचे प्रमाण खुपच आहे. बैंकिंग मधल्या महत्वाच्या जागी हीच मंडळी प्रामुख्याने दिसतात. मराठी लोक त्या मानाने फारच कमी. आपण मुख्यतः इंजीनियरिंग ,डॉक्टर, आईटी, ह्या ठिकाणी जास्त मुशाफिरी करतो.

तुमचं निरीक्षण बरोबर आहे किंबहुना "प्रातिनिधीक" आहे असे म्हणावे लागेल. यात बहुदा "रक्तातील गूण" बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. कुणाच्याही कौश्ल्य, शिक्षण, संस्कृती याला न दुखावता निव्वळ स्वभावधर्मानुसार, तुमच्या वरील विधानाचे हे कारण असू शकते:
१. ऊत्तरेकडचे, पंजाबी वगैरे हे बोलबच्चन, खुशमस्करी मध्ये पुढे असतात त्यामूळे वरच्या पदावर अधिक असतात.. किंबहुना मेंदू बाजूला ठेवून "हांजी" करणारे असेच अशा जागी टिकतात, मराठी माणसाला ते जमत नाही!
२. गुजराथी माणूस २४x7 फक्त धंदा या विषयीच विचार करत असतो त्यामूळे फायनांस मधे पुढे असतात
३. दक्षिणात्य बरेचसे बँकींग मध्ये वरच्या पदांवर बघितले आहे याचे बहुतेक कारण त्यांचा तात्विक कडवटपणा असावा, जे बँकेच्या व्यवहारात फायद्याचे ठरते.
४. मराठी माणूस शक्यतो हुषारी (बहुतांशी पुस्तकी) अन आपल्या बुध्दीचा गर्व याच्या जोडीला समाजसेवा ग्लॅमर असं विचित्र समीकरण असल्याने आयटी, ईंजीनीयरींग, तत्ववेत्ते, ई. मध्ये पुढे असतो.
५. बाकी ऊरलेल्या स्वभावधर्मांची तितकीशी जवळून ओळख नाही.. तरी बंगाली बाबू बहुदा शिक्षण व्यवस्था, शास्त्रज्ञ, कला यात पुढे असतात.

मराठी माणसला मराठी बॉस आवडत नाही.. दुसरे कुणीही चालते, मग भले ती दुसरी व्यक्ती त्याला त्रास का देईना. असो. अशीच काही गमतीशीर निरीक्षणे आहेत.
आणि बाकी गोर्‍या कातडीची गुलामी करण्यात अजून आपण पुढेच असतो. अजूनही कितीतरी खाजगी, व्यावसायिक ठिकाणि अगदी काडीचीहि अक्कल नसलेल्या गोर्‍याने फोडा व राज्य करा धोरण वापरून अशाच अनेक देशी बांधवांना आपल्या अधिपत्याखाली नाचवलेले अनेक वेळा पाहिलेले आहे. (याचा काँ शी काही संबंध नाही हे लक्षात घ्यावे!)
त.टी. खेरीज गेल्या दशकातील अनेक आदर्श घोटाळे बघता वरील सर्वाला अपवाद आहेत हे नक्की Happy

तेव्हा परतोनी पाहे ही एक भेळेची पुडी म्हणावी लागेल. पसंद अपनी अपनी!

त.टी. खेरीज गेल्या दशकातील अनेक आदर्श घोटाळे बघता वरील सर्वाला अपवाद आहेत हे नक्की
>>>>>>>>>
योग

आपण सामान्य मराठी माणसे...राजकारणी लोक महान असतात. त्यांना कुठलाच स्वभाव नसतो आणि प्रान्तिक संस्कृति पण नसते. त्यांना फ़क्त एकाच भाषा, प्रान्त आणि संस्कृति कलते...ती म्हणजे सत्ता आणि पैसा.

त्यामुले ती जमात काहीही करू शकते.

माझ्या मते आजकालच्या जगात महाराष्ट्रिय, गुजराती अशी लेबले वापरण्या ऐवजी राजकारणी, पैसेवाले, अतिरेकी, समाजसेवक अशी लेबले करावीत. महाराष्ट्रिय, पंजाबी असे म्हंटले तर अपवाद खूप सापडतील. पण राजकारणी कुठल्याहि देशात, कुठल्याहि धर्माचे, स्त्री, पुरुष कसेहि असले तरी पैसा व सत्ता यांच्या मागे धावायचे सोडणार नाहीत, अपवाद थोडे. ते अपवाद राजकारणात टिकतच नाहीत.

खरे तर महाराष्ट्रिय, पंजाबी अशी लेबले लावण्या ऐवजी त्या माणसाने, बाईने काही केले, तर त्याबद्दल लिहीताना, एक जाता, जाता, फुटकळ माहिती म्हणून तो पंजाबी आहे किंवा बंगाली आहे असे म्हणावे. पण मुख्यतः राजकारणी आहे की समाजसेवक आहे वगैरे जास्त महत्वाचे व बरोबर होईल.

>>समाजसेवा ग्लॅमर आणि आयटी, इंजीनीयरींग यांचा संबंध कळला नाही

तसा थेट काहीच नाही... स्वभाव विशेषण ईतकच, मध्ये स्वल्पविराम राहिला Happy
जाता जाता: माधुरीताईंनी हा बाफ वाचला असण्याची शक्यता आहे काय? Happy असल्यास या बाफ चा हेतू सफल झाला. आम्हालाही परत यायला एक नविन मोटिवेशन मिळाले हे नक्की! Happy

माधुरीताईंनी हा बाफ वाचला असण्याची शक्यता आहे काय?>>>>>
फार कमी.
त्यानी त्याना मिळणारे भारतातील मानधन (उदा. उद्घाटनासाठी ३ करोड, अ‍ॅड साठी १.५ करोड इ.इ.) आणि डॉ नेन्यांची वर्षाची आवक (अमेरिकेतील) यांचे तुलनात्मक गणित मांडले असण्याची शक्यता जास्त आहे Wink

मी गेले ३ महिने जर्मनी मध्ये काढले एक जाणवलय कि भारतासारखे सामाजिक आयुश्य कुथेहि नाहि. मित्र एथेहि मिळाले पण शाळेतल्या मित्राने दिलेल्या एखाद्या भारि उपमाची (शिवी) सर कशाला नाहि. सण ऊत्सव ज्याला २८ वर्षे पुण्याचा गणपती उत्सव बघायची सवय आहे त्याला एथले सण कधिच मजा आणनार नाहि. हे सर्व ह्या वर्शिचा पुण्याचा गणपती उत्सव मिस्स केल्याने जे वाटले ते मान्डत आहे. सावरकर म्हणाले तसे बर्याचदा म्हणावे वाटते. सागरा प्राण तळ्मळला...

आम्ही मे २०१३ मध्ये भारतात परतन्याच्या विचारात आहोत, मुलगी १ लीत जाईल. पुण्यात CBSE and ICSE चा चागल्या शाळा कुणी सागू शकेल का प्लिज? औन्ध, बाणेर, कोथरुढ, वाकड परिसरात.
ब्लु रिज चा current rate माहित आहे का कुणाला?

रैना ह्या धाग्यासाठी खूप धन्यवाद...ज्यांनी लिहिले आहे त्यांना पण . आर टू आय फोरम ची पण लिंक दिली होती इथे त्याचा खूप उपयोग होतो आहे..
आता फायनल परतीचा प्रवास सुरु करतोय.. मुलांची शाळा प्रकरण बघून वैतागलो .. जी आरामात सहज अडमिशन देईल आणि घराजवळ असेल अशा ठिकाणी घायची ठरवलं.. एका आय सी एस इ बोर्डात (विब्ग्योर हाय ) घेतली शेवटी .. सध्या नवर्याचा जॉब शोधतो आहे.. आत्ताही भारतात प्रोफेशनलीझम आलेला नाहीये बघून खूप राग राग होतो.. सिनियर पोस्ट असल्यामुळे फार वाट बघावी लागते आहे..

तेव्हा परतोनी पाहे ही एक भेळेची पुडी म्हणावी लागेल. पसंद अपनी अपनी!>>>:) हे खूपच मस्तय... भेळ खूप आवडते त्यामुळे (सगळं माहिती असून सुद्धा) जातोच आहे.. बघू या पचवता येते का.. योग मस्त निरीक्षण.. ..

प्रित, भारतात बंगळुरु मधे येणार असाल आणि जास्त एनआरआय असलेल्या भागात रहाणार असाल तर बर्‍यापैकी प्रोफेशनल दुकानदार्/व्यावसायिक/एजंट्स भेटतील. अपवाद असतातच, पण नवीन डेवलप झालेल्या भागांमधे प्रोफेशनॅलिझम लेवल जास्त असते असे माझे निरीक्षण आहे.

ऋषिबेला, जरा धीर धरा. भारतात २८ वर्षे राहिला असाल नि जर्मनीत ३ च महिने तर 'सगरा प्राण तळमळला' वाटणे साहाजिकच आहे. विशेषतः तुम्ही स्वतःच्या मर्जीविरुद्ध, कंपनीने पाठवले, म्हणून जर्मनीत गेला असाल तर तसे वाटणे सहज समजण्यासारखे आहे.
आम्ही बरेच वर्षे परदेशात राहिलो. शिवाय स्वतः मोठ्या उत्साहाने, कष्ट करायची तयारी ठेवून आलेलो असल्याने आमचे सामाजिक जीवन आमचे आम्ही हवे तसे बनवले, भारताशी तुलना करणे सोडले. जाणून बुजून आल्यावर मग उगाच कशाला रडायचे?

पण नवीन डेवलप झालेल्या भागांमधे प्रोफेशनॅलिझम लेवल जास्त असते असे माझे निरीक्षण आहे.

कदाचित 'प्रोफेशनॅलिझम' च्या कल्पना भारतात वेगळ्या असतील. इथे, जिथे प्रोफेशनॅलिझम असेल असे वाटते तिथेहि कंपनीतले अत्यंत घाणेरडे राजकारण अनुभवल्यावर प्रोफेशनॅलिझम वरचा विश्वास उडतो.

बरेच कळीचे प्रश्न या एका धाग्यामुळे समोर आणल्याबद्द्ल धन्यवाद रैना यांचे....
माझे दोन पैसे....:)

तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
आठ वर्षे अमेरिकेत वास्तव्य..परतायला वाटण्याचं कारण आई-बाबा आणि तेही त्यांना माझी गरज आहे असं नाही तर मला त्यांच्या या वयात त्यांच्याबरोबर असायला हवंय असं वाटतं म्हणून....नवर्‍याला हाच मुद्दा महत्वाचा आहे असं काही नाही..त्याला भारतातली मुख्यतः शाळा अ‍ॅडमिशनपासून डोनेशनरूपी लाचेने सुरू करायचं नाहीये म्हणून सध्या परतायच्या विचाराचं प्लानिंग करायचं आहे...बरं परतायचं तर मुंबईतच त्यामुळे आणखी एक गोची होते ती म्हणजे प्रशस्त घर घेणं...आता इथे कुणी तुम्ही काय बाबा डॉलरवाले असं म्हणण्यात काहीही तथ्य नाही..परदेशात राहून फ़ार कंजुसगिरीने राहिलं तरंच सेव्हिंग होते ज्यात मग माहित नाही तुम्ही साउथ मुंबईत घर घेऊ शकता नाहीतर मग सबर्ब ....असो..

- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
इथे काही मुद्द्यामध्ये कुणीतरी अमेरिकेत स्थावर मालमत्ता करून ठेवावी म्हणजे पुन्हा यायला लागलं (आणि सिटीझनशीप नसेल तर) बरं पडतं असं लिहिलंय त्यावर सविस्तर विचार मांडले तर फ़ायदा होईल. कारण इथलं रियल इस्टेट पाहता मला वाटतं की त्यापेक्षा सगळं विकून आलं तरंच बरं कारण नाहीतर वार्षिक कर यांव त्यांव मध्ये हा पांढरा हत्ती रू. पगारात पोसायचा म्हणजे कठीण.....

मुलांचं ओसीआय अर्थातच काढून घ्यावं...

आणखी मला वाटतं मूल लहान असेल तर कार-सीट, खेळणी (लेड लेव्हल चेक केलेली असल्याकारणामुळे) आणि घट्ट बांधणीची पुस्तकं आणली तर काही वर्ष त्यांना वापरता येतील..बाकी माझ्या स्वतःच्या किचनमधली काही लाडकी उपकरणी मला न्यायला नक्की आवडेल कारण क्वॉलिटी आणि व्यक्तिगत आवड. इलेक्ट्रिकचं तसंही काही नेता येणार नाहीये पण काही वस्तू जसं काही लोकांना बागकामाची आवड असते ते ती साधनं नेताना मी पाहिली आहेत. शिवाय जी लोकं थंडी असणार्‍या जागांमध्ये जातात ती काही थंडीचे कपडेही आवर्जून नेतात. मुंबईवाल्यांनी जमल्यास थोडी थंडीच बांधुन नेऊन पुरवून पुरवून वापरावी....

- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
देशाटन केल्याने ज्या काही जागा फ़िरू शकलो नसतो ते फ़िरू शकलो....ते सहलींमधून दाखवतात फ़क्त त्याबद्दल नाही तर अनेक छोटी छोटी पर्यटन स्थळ आहेत जी फ़ार फ़ेमस नसतात पण पाहाणं एक वेगळा अनुभव ठरू शकतो...विशेष करून जागोजागचे सिनिक ड्राइव्ह ...त्यावरून सांगायचं म्हणजे आम्ही इथे आल्यामुळे आमच्या दोघांकडच्या बर्‍याच लोकांना थोडंफ़ार अमेरीका दर्शन करवू शकलो याचं समाधान.....
आणखी एक म्हणजे थोडं फ़ार इथल्या सोशल सर्कलमध्ये फ़िरल्यामुळे इथला सामान्य माणूस कसा जगतो हेही पाहातेय...बरेचसे डोनेशनचे कार्यक्रम करून कम्युनिटी हेल्प म्हणता येईल असे कार्यक्रम, फ़ंडरेझिंग करून सामान्य माणसांना मदत केली जाते....आणि हा पाया इथल्या सामान्य माणसाला माझ्या मते एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडतो..

काय गमावलं मध्ये माझी भाचरं जी मागच्या आठ वर्षात मोठी झालीत त्यांचं बालपण मी फ़क्त फ़ोन आणि चॅटवरुन हवं तसं नाही अनुभवू शकले हा सल नेहमी राहील...पण मुंबईतल्या नोकर्‍या पाहता मी तेव्हाही त्यांना नक्की किती वेळ देऊ शकले असं वाटून हलकं करते....आणखीही सल आहेत स्वतःला आवडणार्‍या नाटक पाहाणे, इ.इ. गोष्टींपासून बरेच दिवस अलिप्त राहाणे आणि मग मुंबई भेटीत त्याचा क्रॅश कोर्स करायचा प्रयत्न करणे हे थोडं पटत नव्हतं.....(इथे मला कुठल्याही मराठी मंडळामध्ये सादर केलेले कार्यक्रम हा मुद्दा आणायचा नाहीये....दुधाची तहान ताकावर भागवता येतेही पण अस्सल ते अस्सल हे माझं मत)
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
भारतात आयटीला सध्यातरी मरण नाहीये त्यामुळे कदाचित दोघंही तरून जाऊ पण आता पुन्हा प्रवास (मुंबईतला) आणि त्यामुळे घरी मिळणारा कमी वेळ हे एक मुख्य कारण आहे नवर्‍याला लगेच परत जायचा निर्णय न घेता यायचा...पुन्हा दुसरं काही येतही नाही जे स्वतः करू शकू चाकरीऐवजी......
बाकी तर परत आल्याशिवाय मत मांडणं चुकीचं आहे. दोन्हींकडे काम केलंय आणि अमेरिकन कंपन्यासाठी सुद्धा त्यामुळॆ ऑफ़िस पॉलिटिक्स हा सापेक्ष विषय आहे..इथे जास्त तिथे कमी असं काही नाही...पिळवटून काढणार्‍या कंपन्या दोन्हीकडे आहेत..तुम्ही परदेशात सुदैवाने चांगल्या कंपनीत असाल तर चांगलंय....पण सिक्युरिटी आणि तीही नोकरीतली हा कन्सेप्ट दोन्हीकडे आताशा कमीच आहे....माझ्या माहितीत निवृत्तीला सहा-सात वर्षे शिल्लक असलेल्या व्यक्तीलाही इतक्यात गुलाबी पत्र दिलंय....(आणि ती पण गोरी) सो....
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
माझा मुलगा आता चार वर्षाचा असल्याने इतक्यात गेलो तर त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो मराठी उत्तम बोलतो खरं म्हणजे कदाचित मुंबईत राहणारा माझा भाचाही त्याच्यापेक्षा जास्त इंग्रजी शब्द वापरतो असं मला वाटतं...आणि जेव्हा त्याच्या पाळणाघरात इंग्रजीत बोलायचं असतं तिथे तो अ‍ॅक्सेंटेड बोलतो....घरी कधी कधी मोह होतो त्याला इंग्रजी बोलायला लावायचा..पण मजा म्हणजे तो आमच्याशी नेहमीच मराठी बोलतो...सांगायचा मुद्दा तो नीट राहील..
राहिला प्रश्न शाळांचा..मी स्वत: संपुर्ण मराठी माध्यमात शिकून जर परदेशी नोकरी करायला संधी मिळवायला मला कष्ट पडले नाहीत. तर त्यालाही पडायला नको..मेहनत आम्हाला घ्यावी लागेल कारण काळ बदलला आहे हे मान्य पण तिथे शिक्षणाच्या संधी वगैरे मला उगाच काढलेले मुद्दे वाटतात..वाईट शाळांचं प्रमाण अमेरीकेतही आहे....एका बर्‍यापैकी वस्ती असलेल्या शाळेत मैत्रीण काम करते तर तिथेही वाचन न य़ेणारी पोरं अगदी चौथीपर्यंतही आहेत असं ऐकुन आहे....म्हणजे उडदामाजी..त्यातून उच्च शिक्षणासाठी मुलांना जायचं असेल तर आमची ना नाही....(आणि स्वतःच कर्ज काढून गेले तर अजूनच नाही म्हणजे ते टेंशन आम्हाला नको Proud :-P)

- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
या मुद्द्यावर इतक्यात काही बोलणं चुकीचं ठरेल..पण अगदी एकत्र राहाणं मला जमणार नाही कारण तितकी मोठी जागाच आम्हाला म्हमईत परवडणार नाहीये..शिवाय त्यांचे ते व्यवस्थित राहताहेत..आसपास राहाणं महत्वाचं

- समाजाचे देणे
हा एक मुद्दा जो मी अमेरीकेत वर उल्लेखल्याप्रमाणे अमेरीकेत पाहतेय, शिकतेय तसं काही थोडंफ़ार प्रमाणात करायला नक्की आवडेल पण अजून परत गेलो नाही आहोत त्यामुळे जास्त सविस्तर लिहिता येणार नाही..

- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
दोहोंचा अनुभव घेतल्यावर स्वतःसाठी तरी स्वदेशातच जायचा मानस आहे.....:)

अ‍ॅडमिशनपासून डोनेशनरूपी लाचेने

सारखे लाच, लाच का लिहीता? फी म्हणा, राजकीय लोक जे खातात त्याला लॉबी म्हणा. म्हणजे मग मानसिक त्रास होणार नाही. शिवाय जर सर्वांनाच तसे पैसे भरावे लागत असतील, तर, जसे अमेरिकेत असंख्य प्रकारचे टॅक्स नि फिया असतात तसे समजा!

भारतात नोकरी असली तर टॅक्स भरावा लागतो का?
>>
हो. दोन्ही देशात रिटर्न भरावा लागतो. दुसर्‍या देशात भारतातील उत्पन्न दाखवून कर भरला हे ही दाखवावे लागते.

Pages