चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे .. ते चित्रगंदा नाही, चित्रंगदा आहे... हो ती सॉरी भाई वालीच.

बिल्लू बार्बर बघितला. ठीक ठाक आहे.

चल चला चल आणी मेरे ख्वाबोमे जाये. हे दोन पिक्चर पाहिले. (रेकॉर्डमधली एंट्री) बाकी रीव्ह्युज लिहिण्ञात अर्थ नाही. Happy
--------------
नंदिनी
--------------

चित्रांगदा म्हणजे अर्जुनाच्या अनेक बायकांपैकी एक. मणसूर का मणिपूर मधली होती म्हणे ती.
चित्र + अंग + दा, अशी तिच्या नावाची फोड कुठेतरी वाचली होती. म्हणजे चित्रासाठी अंग देणारी.
म्हणजे आद्य मॉडेल असणार ती.

चल चला चल आणी मेरे ख्वाबोमे जाये. हे दोन पिक्चर पाहिले. >>>>>

येस्स....

नंदिनी....
मला वाटलं होतं चल चला चल पाहिलेला मी एकटाच की काय....
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!

कालच मुखवटे नावाचा नविन मराठी पिक्चर पाहिला... अशोक शिंदे, शर्वरी जमेनिस वैगेरे कलाकार आहेत..
पिक्चर कैच्याकै आहे...एकदम टुकार :(... त्यातल्या त्यात अशोक शिंदे ने बरे काम केले आहे...

०----------------------------------------------०
तळहाताच्या नाजुक रेषा, कुणी आखाव्या?, कुणी पुसाव्या?
तांबुस निर्मळ, नखांवरी अन् , शुभ्र चांदण्या कुणी रेखाव्या?

आणि मला वाट्लेलं की मेरे ख्वाबों में.. पहायच धाडस करणारी मी एकटिच काय?? Proud

रणदीप हुडाची यंट्री बघुनच कापरं भरलं मला Wink

मीही पाहिला मेरे ख्वाबोंमें.... हुडा (रणदीप) बद्दल पन्ना, तुला मोदक! Happy

दिल्ली ६ मधली ती सोनम कपूर मला बानी(प्राची देसाई) सारखीच वाटली. हिचा चेहरा जास्त एक्सप्रेसिव्ह आहे माहे मात्र. बानीला 'अ‍ॅक्टींग केलीस तर ठरल्यापेक्षा कमी पैसे देईन' असं सांगत असावा डायरेक्टर, त्यामुळे ती कायम माठच दिसते.

चित्र + अंग + दा, अशी तिच्या नावाची फोड कुठेतरी वाचली होती. म्हणजे चित्रासाठी अंग देणारी.

>>>
नाही दिनेश तसे नाही ते Happy
चित्रा आण गदा अशी फोड आहे ती. म्हणजे शेजार्‍याकडे बघतो जरा. चित्रा आण गदा असे पुन्हा पुन्हा म्हणून ती हाक आणि नन्तर नावच झाले....:फिदी:

चित्रपट परिक्षण आहे की आत्या निरीक्षण >>>

चित्रपट निरीक्षण आणि आत्या परिक्षण !! Proud

कालच Stone Man Murders हा पिक्चर पाहिला....पिक्चर दगडाने ठेचुन खून करण्यार्‍या मुंबैच्या रामन राघवन वर आधारित आहे...
मला पिक्चर चांगला वाटला...उगिच काही फालतू पणा, मसाला वैगेरे नाही...एकदम कथेला चिकटून रहातो...के के मेनन, अरबाझ खान, विक्रम गोखले यांची कामे झकास..

खरच एकदा बघावा असा पिक्चर आहे.... delhi 6, द्रोणा, दोस्ताना यांच्या पेक्षा हजार पटिने उत्तम!!

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

दिल्ली ६ आणि इथे हाइप झालेली 'ती काकु बाई पर्सनॅलिटी' अत्या बाई अत्यंत फडतुस Biggrin
(ट्यु शी सहमत, ग्रेसी सिंग ची जुळी बहिण वाटावी अशीच आहे ती बाई)..
बाकी अभिषेक , सोनम पण अतिसामान्य !
अतुल कुलकर्णी, ओम पुरी, पवन मल्होत्रा, तन्वी आझ्मी,वहिदा रेहमान अशा अनेक गुणी कलाकारांना वाया घालवून दाखवायची पैज मारली असणार राकेश ओमप्रकाश मेहरानी..
असो..आमिर खान नाही तर याच्या सो कॉल्ड डायरेक्शन ची वाट लागली( उगीच लोक म्हणतात आमिर लुडबुड करतो म्हणून.. पहा अशुतोश स्वदेस मधे, राकेश दिल्ली मधे पार आपटले आमिर विना)!
माझा कडून अर्धा स्टार( तो अर्धा स्टार ए.आर. रेहमान साठी.)

कालच झी टॉकीजवर 'एवढंस आभाळ' पाहीला. आजकाल कसले कसले मराठी चित्रपट येतात. Happy (कसले कसले म्हणजे वेगळ्या धाटणीचे 'कसलेही' नव्हे) या चित्रपटाचा शेवट मात्र bouncer गेला. कुणी मला समजावुन सांगु शकेल का ? चित्रपटाच्या पुर्वार्धात gardening ची आवड असणार बंटी football मध्ये रममाण झाल्यावर पायाखाली छोटि छोटी फुलांची रोपे तुडवताना दाखवलाय. याचा अर्थ काय ? शेवटी बंटी पप्पांना सोडुन परत मम्मीकडे येतो का ?
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

शेवटी बंटी पप्पांना सोडुन परत मम्मीकडे येतो का ?>>>

तो येत नाही....तो शेवट्पर्यन्त होस्टेल वरच रहातो..
सतिश ....मला पण पिक्चरचा पुर्वार्ध आवडला...शेवटी कदाचित त्याना बोर्डिंग स्कूल ला गेल्यावर त्यला जी लोक आपली वाटतात (उदा. त्याचे होस्टेल मधले मित्र वैगेरे) त्यांचेच त्याला बरोबर वाटू लागते आणी, त्याच्या मते आई आणी बाबा हे दोघेही आता त्याचे स्वताचे राहिलेले नसतात..

पण त्यासाठी तो आपले छंद वगैरे बदलतो हे मात्र काही पटत नाही...

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

अरे हे बोल्ड टॅग बंद केले नाही का हूडाने Sad
-----------------------------------------
सह्हीच !

केदार, रामन राघवन हा माझ्या लहानपणी आम्हा सगळ्यांचा बागुलबोवा होता. आम्ही रहात असलेल्या मालाड भागात त्याने धुमाकूळ घातला होता. सगळ्यांची रात्रीची झोप उडवली होती त्याने. पूढे ज्या चेंबूरच्या शाळेत शिकलो, त्या परिसरातही त्याने खून केले होते.
पुढे त्याला अटक झाली तरी शिक्षा झाली नाही. त्याला मनोरुग्ण ठरवण्यात आले होते.

माझी माहिती नीट असेल तर वंदना गुप्तेच्या पतिने त्याचे वकिलपत्र घेतले होते.

डीजे...

दिल्ली ६ ची एक असिस्टंट डिरेक्टर 'किरण राव' आहे...
Rofl
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!

दिनेशजी, होय आपण म्हणता त्याचप्रमाणे मी रामन राघवन बाबत आई-बाबांकडुन ऐकले होते असेच् काहिसे...आणी हे ही ऐकले होते कि त्याचा I.Q. (बुध्यांक)खूप जास्त होता..पण मनोरुग्ण असल्यामुळे त्याला फाशी झाली नाही.

पिक्चर ची मुख्य कल्पना तिच आहे..फक्त थोडा वेगळा घेतलाय्...वेळ मिळाल्यास जरुर पहा.. Happy

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

दिल्ली ६ आणि इथे हाइप झालेली 'ती काकु बाई पर्सनॅलिटी' अत्या बाई अत्यंत फडतुस
अपमान्.....अपमान्....घोर अपमान्!!!!!!आम्ही शालेय जीवनापासुन आजपर्यंत विनाथांबा करत असलेल्या तपश्चर्येचा हा घोर अपमान आहे!!!!!!
आदिती राव आगे (हमारी तरफ) बढो....हम आपकी वाट पहा रहे है!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

आदिती राव आगे (हमारी तरफ) बढो....हम आपकी वाट पहा रहे है!!!
>>>>
Rofl
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

बिल्लु बार्बर काही अपेक्षा न ठेवता पाहिल्याने कळला नाही काय चालु होते , पण त्यात अतुल परचुरे (नाव बहुतेक बरोबर आहे) चा ३-४ मिनिटाचा एक सीन आहे तो बेश्ट बेश्ट बेश्ट !!!!! त्या सीन ला मला इतके हसु आले की श्वासच कोंडला , हसणे शब्दशः घशात अडकले.. आणि गंमत म्हणजे त्या वेळेस कॅमेरा जास्तीत जास्त वेळ शाहरुख वर असतो , ह्याचे नुसते संवाद ऐकु येतात.. ह्याला म्हणायचे गुणी अभिनेता.

शाहरुख खानने आता काम करणे सोडावे. थकलेला आणि पकलेला दिसतो अगदी.

दिल्ली ६ ची एक असिस्टंट डिरेक्टर 'किरण राव' आहे...
<<<हाहाहा.. आमिर ची लुडबुड बाहेर चालते , घरी नाही..किरण बाईंच्या कामात आमिर ची लुडबुड झाली नाही म्हणून बिघडला सिनेमा Biggrin

आदिती राव आगे (हमारी तरफ) बढो....हम आपकी वाट पहा रहे है!!! Lol
चिन्या१९८५! Lol

कोणी कलयूग पाहीला आहे का? इमरान हश्मीचा? ते एक गाणे मला खूप आवडते म्हणून बघायचा विचार करत होते. अब तो आदत सि है मुझको... ऐसे जीने मे.
चांगला आहे का मूवी?

मनुस्विनी, अब तो आदत सि है मुझको... ऐसे जीने मे, आणि जिया धडक धडक जाये... हे गाणी सोडली तर त्यात विशेष असे काही नाही...same old story...तसा एकदा पहण्यासारखा आहे पण गाणी जेवढी श्रवणीय तेवढा पिक्चर देखण्यालायक नाही.....जास्त अपेक्षा ठेवू नका..

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

मनु, चित्रपट अज्जिब्बात पाहू नकोस, फक्त गाणी बघ.. बाकी सिनेमा अत्यंत फालतू, टुकार, भिक्कार आहे.

मागच्या आठवड्यात मी ३ सिनेमे पाहीले मिर्च मसाला, अपना आसमान, आणि बचना ए हसिनो....

कालच मी नविन पिक्चर...१३B पाहिला....आर.माधवन, सचिन खेडेकर, पूनम धिल्लौ....आर.माधवन चे काम छान झालेले आहे..
पिक्चर एकदम झक्कास्!!....एकदा पाहण्यासारखा आहे..कुठेही भरकटत नाही..मस्त खिळवुन ठेवतो..
जरुर पहा... Happy

दक्षिणा..नुसती नावे नको सांगु...पिक्चर कसे वाटले ते पण सांग ना.. Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

Pages