चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राझ २ पाहिला. त्यातले राझ अगदीच पुचाट आहे. या पेक्षा १९२० जास्त घाबरवणारा वाटला होता. मुख्य म्हणजे त्यातली नायिका भुताच्या रोलसाठी फिट अशा चेहर्‍याची होती Happy

त्यातली नायिका भुताच्या रोलसाठी फिट अशा चेहर्‍याची होती >>>>:)
एकदम बरोबर आहे अमि७९....ती कंगना राणावत आहे...
ती gangster movieमधे पण होती..आणि मला तर तिच खरी gangster वाटली Wink

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

काल शौर्य पाहिला... अतिशय सुंदर चित्रपट वाटला मला. सम्द्यानी पहाण्यासारखा.

मी काल उत्तरायण पाहीला. छान वाटला. स्टोरी काही खूप नवीन वगैरे अशी नाही पण सरळ ,साधी आहे. मला आवडल्या सर्वांच्या acting.

उत्तरायण मधलं "धुंद होती शब्द सारे..." हे गाणं खुप छान आहे.

चल चला चल

गेलं दीड वर्ष रिलीज होण्यासाठी अडकलेला...
साधारण सिनेमा.. एक साधी गोष्ट सांगणारा...
त्यात उतार चढाव फारसे नसलेला...

साधारण दिग्दर्शन, साधारण ऍक्टिंग....
गोविंदाचे काही आणि राजपालचे काही पंचेस झकास... बाकी विशेष काही नाही...

टीव्ही वरंच बघा...

५ पैकी १.५ तारा...
_______
सपनोंसे भरे नैना... तो नींद है ना चैना !

'He is just not that into you' - अगदी पहिल्या दिवशी ७-८ मैत्रिणींनी जाऊन पाहिला!(दुर्लभ योगः) )
एकदम टिपिकल 'चिक फ्लिक' कॅटेगरी, kinda 'Dating /relationship Dos and Donts ' टाइप्स थीम आहे. . मी तरी खूप एन्जॉय केला! !

तो सुबोध भावे. जुनाच आहे. ट्विस्ट बोअर वाटला. एकतर आई व्हायचे व सांगायचेही नाही हा कहर वाटला. लग्न जमायच्या आधी नक्कीच घरी (बहिनीला) सांगायला पाहीजे होते. Happy सुरुवातीचा अर्धा खूप मस्त आहे तो पिक्चर. नंतर बोअर होतो.

केदार जोशी, कोणत्या चित्रपटाबद्दल लिहीताय तेही सांगा की... Happy
-योगेश

देव डी...........
देवदास नवीन युगात. मस्त चित्रपट. चंदा आवडली. यातला देव फार जवळचा वाटतो. आपल्यातला. आपल्याच कंपु मधला प्रेमभंग झालेल आपल मित्र. शेवट मात्र आवडला. पारो पण एकदम फिट. बाकि माझ्या कडुन ५ तारे. अभय देओल चा अजुन एक चागंला चित्रपट. माही गिल(पारो) अगदि शोभुन दिसते . टिपिकल पंजाबी.

देव-डी अजब आहे.. माझ्याकडून ४ तारे.. १ कमी कारण अनुराग कश्यपसुद्धा काहीकाही प्रसंगात 'फिल्मी' होतो.. देवदाससारख्या फुकट हळव्या कथेला जमिनीवर आणुन आदळले आहे.. चंदा आणि पारोचे काम मस्त.. देवला फारसे काम नाहिये..
आवडलेले प्रसंग अनेक (माबो 'कौटुंबिक' संकेतस्थळ असल्याने एकही आवडलेला प्रसंग इथे वर्णन करु
शकत नाही)

अर्थात, अभय देओलने आजवर सगळेच चित्रपट वेगळे निवडले आहेत.. देव-डी ची संकल्पनाच मुळात अभयची होती..

ट्ण्या माझापूढेपण तोच पेच आहे. लिहायच खुप आहे पण...... Wink

'मेरे ख्वाबों मे जो आये' बघीतला , भयंकर बोर आहे. अन तो रणदीप हूडा अजूनच वैताग आणतो.
-----------------------------------------
सह्हीच !

काल च मी स्टार स्क्रीन awards बघत होतो ओनलाइन्...त्यामधे 'Made In China', या मराठी पिक्चर ला,
(होय... हा एक मराठी पिक्चर आहे..हे मला त्या दिवशी समजले)...सर्वोत्तम मराठी चित्रपट २००८ असा पुरस्कार मिळाला...

तर कोणी पाहिला आहे का तो पिक्चर??..कसा आहे??

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

'बिल्लू (बार्बर)' पाहू नका. चित्रपट अतिशय संथ आहे. अडीच तास कधी संपतात असं होतं. किमान अर्धा तास कापायला हवा होता तो सिनेमा. तिन्ही आयटेम साँग्जचं काहीच प्रयोजन नाही, करीनाच्या तर अजिबातच नाही.
इरफान आणि लाराची कामं मात्र झकास. शेवटचा भाग लोकांच्या भावनांना हात घालणारा वगैरे. गावाचं, तिथल्या लोकांचं चित्रीकरण वास्तववादी. पण सिनेमाचा पूर्वार्ध अतिसंथ. शाहरूख बरा आहे. फिल्मी फ्रॅटर्निटीचं बरंच समर्थन केलंय त्याने.
अतुल परचुरे, रसिका जोशी, अमेय वाघ या मराठी कलाकारांना भरपूर वाव दिलाय. अतुल धमाल करतो.
एकूण २/५ Sad
-----------------------------------
क्या कोई नयी बात नजर आती है मुझमें
आईना मुझे देखके हैरानसा क्यूँ है..

मला बिल्लू बार्बर खूप आवडला.old world charm आहे.इर्फान चे काम खूप छान आहे.feel good cinema आहे.मी ४/५ देयीन.

देव डी पाहिला.
आणि थेटरातून बाहेर पडताना मी हा चित्रपट का पाहिला असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो. पैसे वाया गेल्याचं दु:ख वेगळंच. त्यातल्याच एका गाण्याप्रमाणे, हा चित्रपट म्हणजे निव्वळ इमोशनल अत्याचार आहे. Sad Uhoh
-योगेश

मि_योगी, तुम्ही 'रब ने बना दी जोडी' नाही का पाहिला अजुन?

मलाही देव डी नाही आवडला
अभय डी मस्त आहे, पण सिनेमा नाही...

बिल्लू ठीकठाक....

_______
आँखोंमे सपने लिये,
घर से हम चल तो दिये,
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ....

टण्या,
नको त्रास करून घेऊस.. Happy
शाहरुख आणि कं.चंही पोट भरायला नको का?
आणि विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी यांचे चित्रपट चालत नाहीत हेच बरं. सतत उत्तम चित्रपट त्यामुळे ते देऊ शकतात.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

बिल्लु बार्बर
वेळ असेल तर DVD वर एकदा प।हाण्यास हरकत नाहि. खास अस काहि नाहि. मोबाईल, फिल्मि दुनियेतला झकपकाट या सोबत गाव, चुल, विहिर अश्या दोन भिन्न भारतिय समाजांचा एकत्र आनंद. Happy

२००१ चा स्टाईल बघितला... अ. आ पणाचा महा कळस. Happy

आता चित्रपट बाफचाही व्ही ऍन्ड सी होऊ घातला आहे का?

जोशीसाहेब, व्ही अँड सी करायला नेहेमीचे यशस्वी कलाकार कुठल्याही बाफवर तयार असतात.. ह्यावेळी नांदी तुम्ही देणार का सांगा.. Happy

व्ही अँड सी नको.. तो शाहरूख बिचारा ऑपरेशन मधून सावरावा म्हणून प्रार्थना करा.. पाठ, गुडघा आणि आता खांद्यात रॉड घातलेत त्याच्या.. 'मी आता आयर्न मॅन होणारे' असं ऑपरेशनच्या काही वेळापूर्वी म्हणत होता.. काही म्हणा, कितीही पकावू असला, तरी अफाट मेहेनत घेतो तो नेहेमीच.. असो. Happy
-----------------------------------
क्या कोई नयी बात नजर आती है मुझमें
आईना मुझे देखके हैरानसा क्यूँ है..

'मी आता आयर्न मॅन होणारे' असं ऑपरेशनच्या काही वेळापूर्वी म्हणत होता.. >>>>
उगाच नाय पोराच नाव आर्यन ठेवल त्याने Proud

रणदीप हूडा अजूनच वैताग आणतो.

>>>>>>>

इथे 'हूडा' बद्दल काही बोलणं चालू आहे का?

हूSSSSडा कुठे गायब होता ?

ओये लक्की, लक्की ओये... एकदम मस्त आहे. दिल्लीचे वातावरण मस्त घेतले आहे. अभय देओल, ती नीतू चंद्रा, परेश रावळ सर्व मस्त. मलाही आधी कॅच मी इफ यू कॅन आणि बंटी और बबली ची आठवण झाली, एकदा ब्लफ मास्टर ची सुद्धा (अभिषेक वाला). आवडला.

पण तो 'एवढा भारी' का आहे ते कळले नाही. कदाचित आणखी काही असेल जे पहिल्यांदा बघताना जाणवत नाही म्हणून काही रिव्यू वाचले पण त्यातूनही काही नवीन माहिती मिळत नाही. रीडिफ वाल्याने तर चित्रपट नीट बघितला तरी का हा प्रश्न तो रिव्ह्यू वाचून येतो. Passion for cinema ब्लॉग्स मधे आणखी माहिती मिळेल असे वाटले होते, पण तेथे ही फार काही दिसत नाही.

मला तरी दोन्ही मधे बंटी और बबली जास्त आवडला. पण त्याचे कारण दोन्ही बच्चन आणि गाणीही असतील Happy

बिल्लु बार्बर बघितला. बोर वाटला. शहरूखने स्वताची बरीच मार्केटींग केलीय. बाकी मसाला एकदम बोर.
लारा दत्ता वेस्ट एकदम. जेमतेम १ ४५ मिनीटात आटपेल अशी स्टोरी २.५ तासात ओढतात चक्क.

Pages