चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'Knowing....' पाहिला.... काहीही नाहीये या पिक्चरमध्ये......काही म्हणजे काहीच नाही.....थ्रिलिंग्..हॉरर...अ‍ॅक्शन..सायफाय....फँटसी.....यापैकी कुठल्याच सदरात मोडत नाही.

'टेकन' बरा आहे....वेग छान आहे...आणि अ‍ॅक्शन पण....स्टोरी काही नवी नाही.

कॉमिक बुक्स आणि कॉस्च्यूम हिरो प्रेमींना 'वॉचमेन' आवडेल.....त्या बुकमधल्या 'रोशॅक' आवडणार्‍यांनी नक्की बघावा. ट्रीटमेंट थोडी 'सिन सिटी' सारखीच..आहे...

चिन्मय, फिराक कोणतीही बाजू (हिंदु, मुस्लिम) घेत नाही असे रिव्यू मधे वाचले ते खरे आहे का?

हो, हा चित्रपट फक्त दंगलीचे परिणाम दाखवतो. अर्थात, 'त्यांनी' 'आमचे' इतके मारले, त्यावर चित्रपट का नाही?, असं विचारणारे महाभाग आहेतच.. Sad

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

अर्थात, 'त्यांनी' 'आमचे' इतके मारले, त्यावर चित्रपट का नाही?, असं विचारणारे महाभाग आहेतच..
बरोबर आहे.जोपर्यंत एकच बाजु दाखवणारे आणि तीला उचलुन धरणारे 'दिडशहाणे' आहेत तोपर्यंत दुसर्‍या बाजुने 'महाभाग'ही होणारच्.तुम्ही दोन्हीपैकी कुठे जाणार् हे ठरवायचे.एकतर तुम्ही हिंदु कम्युनल असता किंवा मायनॉरीटी कम्युनल असता.भारतात सेक्युलर कुणी नाही.(मी चित्रपट पाहीलेला नाही.फक्त 'महाभाग' वर कॉमेंट करायची होती)
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

फिराक कितीही चांगला असला तरी आता कंटाळा आला असे हिंदू मुस्लीम दंग्याचे पिकचर पाहून.
हाताळणी,कलाकार वगैरे सगळं ठीक असले तरी मूळ मुद्दा तोच ना.

little zizou>> too good!!
पारशी लोक्नन्चे कोउतुक केले पहिजे.अशी हिन्दु किन्वा मुस्लिम धर्माची (त्यतल्या दाम्भिकतेची)रेवडी उडवनारा सिनेमा आला असता तर दन्गे केले असते लोकानी .
काल मात्र थेटर मधे माझ्या दोन्ही बाजुला पारशी कुटुम्बे बसली होती. हसुन दाद देत होती प्रत्येक सीनला.

little zizou एकदम मस्त पिक्चर आहे.

आ देखे जरा.. का पाहिला मी हा पिक्चर यावर एक ललित लिहू शकेन.

काहीसुद्धा नाहिये पिक्चर मधे. बिपाशा बासू आणि नीलचा मूर्खपणा सोडल्यास.
--------------
नंदिनी
--------------

'एक' नावाचा गचाळ सिनेमा पाहिला. तेच 'पुत्तर', तीच 'लस्सी', तेच लग्नांत नाचणं. अति झालंय ते पंजाबीकरण. ते बोअर होईल असं वाटून की काय, म्हणून बॉबीभाऊच्या सनी देओल स्टाईलीत मारामार्‍या. स्वतःच्या डोक्याची शंका येते, असलं बघून.

त्यापेक्षा 'आलू चाट' अन '१३बी' बरे म्हणावेतसे.

विनय पाठकचा 'स्ट्रेट' अन नासिरचा 'बारह आना' राहून जातो आहे.

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

आ देखे जरा बघीतला Happy

पहिला भाग उत्कंठावर्धक Happy
दूसरा भाग पीत्त वर्धक Sad

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अर्रर्र. पित्तवर्धक म्हणल्यावर आता कसा पाहणार मी?
हाफ तिकिट काढावे का? Proud

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

पहिला भाग उत्कंठावर्धक
>>> ती बिपाशा बासू मूर्खासारखी उड्या का मारते ते समजले नाही.

आणि ते बॅकॉक मधले गाणे पण अचाट आहे.
--------------
नंदिनी
--------------

अग नंदिनी ते दूसर्‍या भागात आहे ना अचाट गाण Happy

आजकाल हीरो बिपाशा च्या बाजूला गच्चीवर उभे रहायला बघत नाहीत. मेली लगेच खालती ढकलून देते
(उदा : सैफ अली खान (रेस) नील नितीन मुकेश (आ देखे जरा ) )

साजीर्‍या Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

मेली लगेच खालती ढकलून देते

>> अरे, ती क्लायमॅक्ससाठी रीहर्सल करून घेते नीलकडून.
--------------
नंदिनी
--------------

चिन्या ला अनुमोदन !!!
मी अगदी हेच लिहिणार होतो..

'आदाब हैद्राबाद' नावाचा चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला.

असल्या नावाच्या चित्रपटाबद्दल काही सांगायला हवे का? कॉमेडी म्हणुन खपवणार्‍या ग्रोसरी स्टोअर च्या माणसासोबत (तो पण हैद्राबादीच) भांडण्याचा प्लॅन आहे.

एक : द पॉवर ऑफ वन....

तुमको ना भूल पाएंगे नामक सलमान चा एक सिनेमा होता त्याचाच मेन प्लॉट उचलला... थोडा फेरफार केला आणि नवीन सिनेमा म्हणून दाखवला....
त्यात सलमान, यात बॉबी... (निर्मात्याला बॉबी ला घेतल्यानी शर्टांचा खर्च करावा लागला... सलमान च्या केस मधे तो वाचला होता...)
त्यात दोन दोन हीरॉईन्स, यात एकच पण तिलाही धड फुटेज नाही... (तसा तिघींचाही अभिनयाशी दूरचाही संबंध नाही...)
पण या दोन्ही सिनेमात फरक म्हणजे-
एक मधली एकमेव एक नंबर गोष्ट म्हणजे प्रचंड भाव खाऊन जाणारा नाना पाटेकर...
केवळ त्याच्यामुळे सिनेमा बघवतो...
त्यामुळे जर नानाचे पंखे असाल तर आणि तरंच बघा...
आणि जर बघितलातच तर अगदी शेवटच्या दृश्यात तो जे काही डँबीस हसतो ते चुकवू नका...

माझ्याकडून एक : द पॉवर ऑफ वन ला पाचातला एक तारा...

चला सव्वा घ्या... (कुणाला काही देताना वाढतं द्यावं असं आई सांगते... त्यामुळे नानाच्या त्या शेवटच्या डँबीस हास्यासाठी जास्तीचा पाव तारा.... तसा पहिला एक पण त्याच्यामुळेच आहे...)

पाच पैकी सव्वा...
_______
लक्ष्य तो हर हाल में पाना है !!!

आ देखे जरा: अतीशय टूकार चित्रपट. एक तर तो कायच्या काय पांढरा पंडू( नील नितिन मुकेश) मला बघवला नाही. *(एकच स्टार).

त्यात दोन दोन हीरॉईन्स, यात एकच पण तिलाही धड फुटेज नाही... (तसा तिघींचाही अभिनयाशी दूरचाही संबंध नाही...) >> अंक्या सुश्मिताचा पण अभिनयाशी संबंध नाही? "समय" बघितला नाही का अजुन? अगदी दिया मिर्झा आणि बिपाशाच्या लायनीत नाहीये रे ती.

तुमको ना भूल पाएंगे मधे कुठे होता सुश्मिता चा अभिनय....

इतर सिनेमे कन्सिडर नाही केले मी...
बाकी समय खरंच छान होता...
_______
लक्ष्य तो हर हाल में पाना है !!!

तुमको ना भूल पायेंगे मला आवडलेला Happy

कुठल्याश्या इंग्रजी सीनेमाची कॉपी आहे म्हणे ती Uhoh
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

तुमको ना भूल पाय्येगे.... या विषयावर शिरवळ्करांची एक काद्.म्बरी आहे.... कुणाचे तरी एक नोवेल ही आहे.... सेम कथानक...

स्ट्रेट बघितला. विनय पाठकसाठी.
सही एकदम. गुल पनागचा प्रसन्न वावरही सुखावणारा.:)
प्युअरली मल्टिप्लेक्स फिल्म आहे ही. एकपडदावाले लावणार नाहीत. लावला तरी लोकांना झेपणार नाही.

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

8 X 10 बघितला... नागेश कुकनूर आणि अक्षय कुमार हे कॉबिनेशन कस वाटेल ह्याचं जरा टेंशनच होतं... एकूणात मुख्य संकल्पना, क्लायमॅक्स आणि सस्पेन्स हे सगळं खूपच अ आणि अ आहे.. !
मुख्य म्हणजे नागेश कुक्नूर फिल्म आहे असं वाटतच नाही.. त्याने एकदम वेगळी वाट निवडलिये ह्या वेळी... म्हणजे पिक्चर मधून विचारप्रवर्तक, समाज प्रबोधक वगैरे वगैरे काहीच नाहिये शेवटी.... !
कथा बर्‍यापैकी वेगवान आहे.. मधे कुठे बोर होतं नाही.. अक्षय कुमार, शर्मिला टागोर, गिरिश कर्नाड, आयेशा ताकिया सगळ्यांची अ‍ॅक्टींग ठिकठाक..
जावेद जाफरीची अ‍ॅक्टिंग चांगली आहे.. पण त्य रोल ला साजेशी वाटत नाही... आयेशा ताकिया जरा जाड दिसलिये... सोचा ना था चा innocence राहिला नाही आता.. Sad

एकूणात एकदा बघायला बराय..

स्ट्रेटची गाणी पण चांगली वाटली मला.

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" खुप सुन्दर आहे. चित्रपट पहा.
**********
मी या जगाचा नागरिक आहे.

एक : द पॉवर ऑफ वन.... मला फार आवडला. बॉबी चे पिक्चर (गुप्त, सोल्जर) जसे असतात तसाच आहे. अॅक्शन एकदम त्याला साजेसी आहे. इन ऑल मला आवडतात त्याचे असे पिक्चर. नानाची अ‍ॅक्टींग छान आहे पण काही उगीच चावट वीनोद टकलेयत गरज नसताना.

स्ट्रेट एकदम धमाल मुव्ही आहे. गुल पनागचा लुक आवडला. शेवट होई पर्यंत राहवत नव्हत की हा वीनय पठक गुल ला सोडुन मित्राच्या पाठी जातोय की काय म्हणुन पण गुल ने ऐनवेळी सावरल त्याला. वीनयची मजा आहे. Happy

13/B ठीक आहे. सुरुवातीला खुप घाबरवलय पण शेवटी एकदम बालीश होत गेलाय मुव्ही.

८ बाय १० तस्वीर....

वरचा अडम चा रिव्ह्यू कॉपी-पेस्ट

माझ्याकडून ५ पैकी २ तारे...
काहीही अपेक्षा न ठेवता बघा... बोअर होणार नाही...

_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" पाहिला
मराठीत अजून १ हिट होईल अशी अपेक्षा. २-४ टिपिकल फिल्मी सीन सोडले तर बाकी चांगला आहे.
नेहमीप्रमाणे मकरंद अनासपुरे चे अफलातून डायलॉग
महेश मांजरेकर म्हातारा दिसतोय पण चालायचेच

Idiocracy बद्दल बहुधा माणूस ने पूर्वी लिहीले होते. तो पाहिला. मलाही आवडला. पण एवढी भन्नाट कल्पना, तिच्या सादरीकरणातील काही चुका, एक दोन ठिकाणी मानसिक व्यंगाबद्दलच्या कॉमेंट्स आणि बरेच ओंगळ शॉट्स/संवाद नसते केले तर महान पिक्चर झाला असता असे वाटते. पण तरीही नक्कीच हसवतो.

Zack and Miri make a porno: एकदम डबडा. फक्त एक दोन ठिकाणी हसू येते.

Idiocracy >> फारेन्डा, सहमत! कन्सेप्ट सही आहे एकदम Happy तो जेल मधून सुटायचा सीन सही आहे!:)
गचाळ इनोद मात्र भरपूर, बहुतेक ठराविक आड्यन्स् साठी आवश्यक असावेत ते!

Pages