Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतिक, कोक्यु >>>>मामी,
प्रतिक,
कोक्यु >>>>मामी,
मामी....मी देखील ते गाणे
मामी....मी देखील ते गाणे आत्ता या क्षणी यू ट्युबवर ऐकत्/पाहात आहे, पण तुम्ही म्हणता तसे "गैर के घर सारी रात जगायी" असे ऐकू येत नाही. मात्र 'करी रात' असे असावे असेही वाटत नाही.
कुमकुमचा त्या ओळीवरचा नृत्य अभिनय असे दर्शवितो की तिला "कई रात जगाई" असे अभिप्रेत असावे.....तरीही "कई राते" होऊ शकेल की नाही याबद्दल साशंक आहेच....रात चे तिथे एकवचनी रूप असल्याने.....अन्यथा मग "कई राते" तरी असावे.
"करी रात" पासून काही अर्थबोध होत नाही, हेही खरेच.
गैर के घर कहीं रात जगायी असं
गैर के घर कहीं रात जगायी असं असणार.जालावर जिथे जिथे शब्द मिळाले तिथे असंच आहे.
क अगदी स्पष्ट ऐकू येतो.
जिप्सी नाही
जिप्सी नाही
जिप्सी नाही>>>>> कोडं १४४
जिप्सी नाही>>>>>
कोडं १४४ क्लु - कोड्याचे उत्तर गायिकेच्या आवाजातील आहे.
(गाणं ड्युएट आहे पण सुरूवातीचा आवाज गायिकेचा आहे नंतर गायक.
).
कोडं १४५...क्लू - गाणं
कोडं १४५...क्लू - गाणं लग्नातलं आहे. आता सोपं होईल
मामी, मला तरी तो शब्द करी
मामी, मला तरी तो शब्द करी असाच ऐकू येतो (परत ऐकायला पाहिजे) रातजगाई हा एक शब्द वाटायचा.
प्रतीक, छोटो छोटी बाते सिनेमा पण मला बोअर झाला होता. मोतीलाल आणि नादिरा होते. मोतीलाल तर त्यावेळी बरेच वृद्ध होते. हे गाणे होडीत चित्रीत झालेय. (आता या वयात बघितला तर आवडेल कदाचित !!)
भरत, रिमझिम बरसे पानी मधे होणारे ह चे अस्पष्ट उच्चार किती मजा आणतात. (रिहमझिम बरसेहे पानीही... ) पण दादा कोंडकेंच्या चित्रपटातले तसे उच्चार मला कधीच आवडले नाहीत.
जिप्सी...Sachin Mayekar
जिप्सी...Sachin Mayekar म्हणजे SAMA..कदाचित "समा" हा शब्द असलेलं गाणं असेल असा माझा कयास आहे.
भरत.... गोंधळ वाढत्योय... परत
भरत....
गोंधळ वाढत्योय... परत एकदा गाणे ऐकले. "कही" चा भास होतच नाही. पुढच्या ओळीतील "मोसे कहे तेरे बिना निंद ना आयी..." यातील 'ह' चा उच्चार जसा प्रखर आहे, तसा 'कही रात' मध्ये उतरलेला नाही.
तरीही "कही रात" चाही अर्थबोध होत नाही...तितकासा.
(No subject)
गैर के घर करी रातजगाई ... असे
गैर के घर करी रातजगाई ... असे आहेत शब्द.
जिप्सी. ते SAMAY असेल तर
जिप्सी. ते SAMAY असेल तर "समय, तू धीरे धीरे चल" हे तर नव्हे?
स्वप्ना....तुझे "मुंडे"
स्वप्ना....तुझे "मुंडे" कोडे...
"माई ने माई मुँडेर पे तेरे बोल रहा है कागा
जोगन हो गयी तेरी दुलारी मन जोगी संग लागा ...
गाण्यात "जोगी" आहे....आणि अजित जोगीच्या नादी मुंडे लागले या अर्थाने.
स्वप्नाला १० पैकी १० Tobler
स्वप्नाला १० पैकी १० Tobler चॉकलेट्स आणि माझा __/\__
आजचे माझे कैच्याकै कोडं क्रं: १४४
Viraj Kulkarni आणि Sachin Mayekar हे दोघेही उत्तम धावपटु. त्यातल्या त्यात Sachin Mayekar हा Viraj Kulkarni पेक्षा जरा जास्तच चपळ. शर्यतीत तो नेहमीच पहिला यायचा. एकदा जागतिक पातळीवर धावण्याची स्पर्धा भरवली जाते. शेवटच्या पाचमध्ये या दोघांचा नंबर लागतो. सगळ्यांना खात्री असते कि ते दोघेच जिंकणार. त्यात Sachin Mayekar पहिला आणि Viraj Kulkarni दुसरा येणारच याचीही सगळ्यांना खात्री असते. Viraj Kulkarni ला काही वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत पहिलं यायच असत, पण Sachin Mayekar मुळे ते शक्य नसल्याने तो त्याला गाण्यातुन कसं सांगेल?
उत्तर :
समय (SAchin MAYekar) तू धीरे धीरे चल
सारी दुनिया छोड के पीछे आगे जाऊ निकल
मै तो आगे जाऊ निकल
पल पल ओ पल पल (पळ पळ ओ पळ पळ :फिदी:)
नाही प्रतीक....
नाही प्रतीक....
स्वप्ना, ये कुडीया नशे दि
स्वप्ना, ये कुडीया नशे दि पुडीया, ये मुंडे गली दे गुंडे.........??
स्निग्धा, बरोब्बर बॉस तुला
स्निग्धा, बरोब्बर बॉस
तुला गरमागरम जलेबी अने फाफडा!
कोडं १४५:
तळ्यात की मळ्यात ह्या दुग्ध्यात असताना मुंडेंना गडकरींच्या घरातल्या एका कार्याचं आमंत्रण मिळतं. हितचिंतकांचा श्रध्दा आणि सबुरीचा सल्ला ध्यानी धरून ते जायचं ठरवतात. त्यांचं चांगलं स्वागत केलं जातं. समोर फराळाचं ताट ठेवलं जातं. ते त्याचा आस्वाद घेत असताना नाचगाण्याचा कार्यक्रम चालू होतो. मुंडेही दिलखुलासपणे दाद देत असतात. एव्हढयात एक गाणं सुरु होतं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ते रागारागाने तिथून निघून जातात. गाणं ओळखा बघू.
क्लू - गाणं लग्नातलं आहे
उत्तर:ये कुडीया नशे दि पुडीया, ये मुंडे गली दे गुंडे
(दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधल्या "मेहंदी लगाके रखना" ह्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी.)
जिप्सी
धन्यवाद!
आता एक सोप्पं कोडं. कोडं
आता एक सोप्पं कोडं.
कोडं १४६:
ब्रॅड पिट आपल्या कुटुंबासोबत लपाछपीचा खेळ खेळताना काय गाणं म्हणेल?
Thanks Swapna.
Thanks Swapna.
१४६: आ मेरे हम जोली आ..
१४६: आ मेरे हम जोली आ..
मी_आर्या तुला काय हवं?
मी_आर्या
तुला काय हवं? गाजराचा हलवा आवडेल?
कोडं १४६:
ब्रॅड पिट आपल्या कुटुंबासोबत लपाछपीचा खेळ खेळताना काय गाणं म्हणेल?
उत्तरः आ मेरे हम जोली आ, खेले आंखमिचौली आ
.....
.....
येस्स... खुप दिवसातुन देतीयेस
येस्स... खुप दिवसातुन देतीयेस गं! भरपुर नि हो मला एकटीलाच पायजेल!
बरं....पातेलं भरून साय आणि
बरं....पातेलं भरून साय आणि खवा घातलेला साजूक तुपातला गाजराचा हलवा. व्हॅनिला आईसक्रीम हवं असेल सोबत तर ते पण
स्वप्ना... बहौत नाइन्साफी है
स्वप्ना... बहौत नाइन्साफी है ये... इतना बढीया हलवा और सिर्फ एक प्लेट???

मी परत कल्टी... संध्याकाळी सवडीने वाचेन ..
कधी नव्हे ते मी एक शेर रचायला
कधी नव्हे ते मी एक शेर रचायला घेतला.
म्हणजे मूळ शेर हा असा,
इस इष्कने इसे निकम्मा बना दिया,
वर्ना आदमी था बडा काम का
तर या चालीवर
इस कोडोंने इसे बेरकी बना दिया,
वर्ना आदमी था सीधासादा (कोडोंचा हिंदी अर्थ घेतला तर पंचाईत !!)
मग बदलून
इस बीबीने इसे बेरकी बना दिया
वर्ना आदमी था सीधासादा (बीबी म्हणजे बाफ... परत पंचाईत !!)
तर म्हटलं जाऊ दे !! मी काही लिहिलेच नाही असे समजा !!!!
दिनेशदा
दिनेशदा
कोडं १४७: जिप्सी आणि त्याचे
कोडं १४७:
जिप्सी आणि त्याचे मित्र कॅलिफोर्नियाला गेले होते.
"अरे, इथे ना एक अफलातून घर आहे" एका मित्राने जिप्सीला सांगितलं.
"काय वेगळं आहे रे त्यात?" जिप्सीने विचारलं.
"अरे, एखाद्या चक्रव्यूहासारखं आहे बघ. तिथे काही दरवाजे इतके छोटे आहेत की माणसाला त्यातून जाताच यायचं नाही. काही खिडक्या घरातच उघडतात. एखादा दरवाजा उघडला तर त्यामागे भिंत असते भिंत" मित्राने माहिती दिली.
"चला, जाऊन बघू यात की" असं म्हणून सगळेजण सॅरा विन्चेस्टरचं ते घर बघायला गेले.
अर्धा-एक तास फिरून झाल्यावर सगळ्यांनी एक जिना चढायला सुरुवात केली. पण गंमत म्हणजे तो जिना अर्ध्यावरच संपत होता. आता आली का पंचाईत!
"कुठून रे आलो होतो आपण?" एका मित्राने विचारलं.
"तिथून" दुसर्याने डावीकडे बोट दाखवलं.
"हट, तिथून आलो होतो" तिसर्याने उजवीकडे बोट दाखवलं.
झालं! आधीच सगळे थकले होते त्यात ही भर. सगळ्यांनी जिन्यावरच बसून घेतलं.
"ए जिप्सी, तू भटकतोस एव्हढा. तुला तरी आठवतंय का आपण नक्की कुठून आलो ते?"
उत्तरादाखल जिप्सीमहाशय गायला लागले "जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूट क्या?" मित्र टरकले. एखादं भूत-बित तर बसलं नाही ह्याच्या डोक्यावर? हे घर तसं हॉन्टेड म्हणूनच प्रसिध्द.
"ए वेड लागलं का काय तुला जिप्स्या? गातोस काय? ही काय Indian Idol चं Finale चाललीय काय?" एकाने आवाज चढवून विचारलं.
जिप्सीने उत्तर पुन्हा एका गाण्यातच दिलं. सांगा ते गाणं.
मीच कोड्यात पडलोय.
मीच कोड्यात पडलोय.
मला पण दिनेशदांचं गैर के घर
मला पण दिनेशदांचं गैर के घर करी रातजगायी हे पटतंय. रातजगायी म्हणजे रात्रीचं जागरण या अर्थी.
गैर के घर कहीं (कुठेतरी या अर्थी) रात जगायी म्हतलं तर गैर के घर हे तर स्पष्टच आहे.
कुमकुम बाई का त्या? पहिली भुवईची कमान ताणली त्यानंतरचं नृत्य आणि अभिनय अजिबात नाही आवडला. तो सवतीसोबत रात्र घालवून आलाय, तर लटका सुद्धा राग न दाखवता चेहर्यावर कौतुक ओसंडतंय.
Pages