Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे वाचलं का? सुरांचा ताटवा -
हे वाचलं का? सुरांचा ताटवा - किशोरकुमार
कणेकर कधी कधी सेन्सिबल
कणेकर कधी कधी सेन्सिबल लिहितात. त्यापैकी एक लेख आहे हा.
कणेकरान खरच चांगल लिहीलाय
कणेकरान खरच चांगल लिहीलाय उद्या पुढचा भाग येइल
बर ह्या कोड्याच काय करू कराताय का प्रयत्न एखाद्या सिरीयलच टायटल साँग असू शकत.
बास हा शेवटचा क्लु
१३८
कुठे स्वप्नाच ते रोज धारावाहीक हसवणं
कुठे प्रतिक मांडतोय सा-यांसाठी गा-हाण
कुठे दिनेशदा वाढतोय जगण्यासाठी खाण
कुठे आठव मग येते त्या आठवणींसाठी गाण
एक एक क्षण बनवी नात्यांची ही घट्ट वीण
सुंदर नि अतिशय संग्रहणीय असा
सुंदर नि अतिशय संग्रहणीय असा लेख दिनेशदा!
प्लिज!!!! संग्रहणीय वगैरे अति
प्लिज!!!! संग्रहणीय वगैरे अति होतय.
बाकि दिनेशदा प्रतिक भरत ज्या गाण्यांचा उल्लेख करतात ती इतर कुठे नाही तरी कणेकरांच्या लेखात सापडतत
१३८: बुनियाद? गुगु मला तरी
१३८: बुनियाद?
गुगु मला तरी संग्रह करावाच लागणार आहे म्हणुन म्हटलं!
सही!!!!!! आर्या भरपुर डार्क
सही!!!!!! आर्या भरपुर डार्क चॉकलेट्स
१३८कुठे स्वप्नाच ते रोज धारावाहीक हसवणं - कहीं तो है सपना
कुठे प्रतिक मांडतोय सा-यांसाठी गा-हाण - कहीं फरयाद
कुठे दिनेशदा वाढतोय जगण्यासाठी खाण - कहीं तो है जीवन
कुठे आठव मग येते त्या आठवणींसाठी गाण - कहीं पर याद
एक एक क्षण बनवी नात्यांची ही घट्ट वीण - पलछिन पलछिन तेरे मेरे जीवन की यही बुनीयाद
हुर्रे... आज किती दिवसातुन!
हुर्रे... आज किती दिवसातुन!
गुणेश, सिरियल्स म्हणजे
गुणेश, सिरियल्स म्हणजे स्वनाचे फिल्ड ना !
मला तर एकच शीर्षक गीत आठवतय..
ही काळी आई, धनधान्य देई
जोडते मनाची नाती
आमची माती, आमची माणसं ....
हसायचं नाही, माझा खूप आवडता कार्यक्रम होता तो.
हो मलाही आठवतायत त्यातल्या
हो मलाही आठवतायत त्यातल्या गप्पा गोष्टी
जयंत साने, रवी पटवर्धन आणि माया गुर्जर चे उखाणे वगैरे
गेले ते दिन गेले
सुनील बर्वेचे पदार्पण
सुनील बर्वेचे पदार्पण गप्पगोष्टींत झाले होते असे मला वाटते.
१४२ सुधा एक सर्वसाधारण मुलगी. महेश तिच्या कॉलेजात, तिच्याच वर्गातला. स्मार्ट, स्कॉलर. अभ्यासाइतकाच खेळ, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतही बक्षीसे घेणारा. सुधाचा त्याच्यावर जीव जडला. पण ती त्याच्या खिजगणतीतही नव्हती. खरं तर त्याच्या इतक्या सगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये गर्लफ्रेंड करायला त्याला वेळच नव्हता.
सुधानेही त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला नाही.
कॉलेज संपल्यावर काही वर्षांनी एका समारंभात सुधाला महेश दिसला. आनंदाने ती त्याच्याशी बोलायला गेली, पण महेशला ती नीटशी आठवत नव्हती. पाच वर्षे एकाच वर्गात एकत्र असल्याने असलेली किंचितशी तोंडओळख तेवढीच.
अत्यंत दु:खी मनाने सुधाने कोणतं गाणं म्हटलं असेल?
तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक
तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक है तुमको
मेरी बात और है मैने तो मोहोब्बत की है
भरत....गुगुने वर दिलेले गाणे
भरत....गुगुने वर दिलेले गाणे हे तुमचे उत्तर असो वा नसो, पण ते गाणे मन हेलावून सोडते.....शुभा खोटे यांची आठवण ठेवायचीच असेल कुणा संगीतप्रेमीला, तर ती केवळ याच एका गाण्यासाठी....तीच गोष्ट सुधा मल्होत्रा यांच्यासाठी. सुधाताई कोणत्याही प्रसंगी या गाण्याचा समावेश आपल्या कार्यक्रमात आवर्जून करतात...मूळ गाणे जरी द्वंद्वगीत असले तरी त्या त्याचे रूपांतर 'सोल' मध्ये करतात (किंवा करत असत असे म्हणू या...)
असेच, याच पठडीतील, दुसरे गाणे म्हणजे "कभी तनहाईयो मे...." मुबारक बेगम...."हमारी याद आयेगी".
गॉश्श.....एखाद्याला पागलच व्हायचे असेल आणि जर त्याच्या केसपेपरमध्ये या गाण्याने पागल झालो असे असेल तर त्या व्यक्तीला हर्षभराने जाऊन मिठी मारावी इतकी ओढ या गाण्यात आहे.
प्रतिक गंमत म्हणजे मला हे गाण
प्रतिक
गंमत म्हणजे मला हे गाण जाणवल तेव्हा डोळ्यासमोर तनुजा येत होती आणि वाटल काहीतरी चुकतय.
तू कधी तनहाईयों मे सांगितलस आणि लिंक लागली...
काही 'छायागीतं' हुरहुर लावून जात बर हे अस का होतय हे कळायचही वय नव्हत तेव्हा.
याच पठडीतले.. कुछ और जमाना
याच पठडीतले..
कुछ और जमाना कहता था,
कुछ और थी जिद मेरे मन की
मै बात जमाने कि मानू,
या बात सुनू अपने दिल की..
नादिरा, छोटी छोटी बाते.
अरे अरे काय वेग हा. जर्रा
अरे अरे काय वेग हा. जर्रा मेलं दोन्दिवस नाही आले तर इथवर येऊन पोच्लात होय?
गुगु, गोड शिरा कम्स टु मी, बरं!
'झु'... मस्त होतं.
गुगु बरोबर १४२ सुधा एक
गुगु बरोबर
१४२ सुधा एक सर्वसाधारण मुलगी. महेश तिच्या कॉलेजात, तिच्याच वर्गातला. स्मार्ट, स्कॉलर. अभ्यासाइतकाच खेळ, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतही बक्षीसे घेणारा. सुधाचा त्याच्यावर जीव जडला. पण ती त्याच्या खिजगणतीतही नव्हती. खरं तर त्याच्या इतक्या सगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये गर्लफ्रेंड करायला त्याला वेळच नव्हता.
सुधानेही त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला नाही.
कॉलेज संपल्यावर काही वर्षांनी एका समारंभात सुधाला महेश दिसला. आनंदाने ती त्याच्याशी बोलायला गेली, पण महेशला ती नीटशी आठवत नव्हती. पाच वर्षे एकाच वर्गात एकत्र असल्याने असलेली किंचितशी तोंडओळख तेवढीच.
अत्यंत दु:खी मनाने सुधाने कोणतं गाणं म्हटलं असेल?
उत्तर : तुम मुझे भूल भी जाओ तो यह हक है तुमको
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है
मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है
मैंने क्यों प्यार किया तुमने न क्यों प्यार किया
इन परेशान सवालात की कीमत क्या है
तुम जो यह भी न बताओ तो यह हक है तुमको
मेरी बात और है....
(मुकेश)"जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ्-ओ-रुख्सार की जन्नत ही नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आंख चुराओ तो यह हक है तुमको
मैंने तुमसेही नहीं सबसे मोहब्बत की है"
तुम्हें दुनिया के गम्-ओ-दर्द से फुरसत ना सही
सबसे उल्फत ही सही मुझसेही मोहब्बत ना सही
मैं तुम्हारी हूं यहीं मेरे लिए क्या कम है
तुम मेरे होके रहो यह मेरी किस्मत ना सही
और भी दिल को जलाओ तो यह हक है तुमको
मेरी बात और है....
संगीतही सुधा मल्होत्रा यांनीच दिलंय.शब्द साहिर.
दिनेशदा कुछ और जमाना कहता है पण मला अत्यंत आवडतं, आणि त्याच्यावर पण कोडं रचलं होतं. शगुनमधल्या 'तुम अपना रंज-ओ-गम्'च्या आधी प्रेमात पडलो, मग कळलं की 'बुझा दिए हैं' हे पण त्यातलंच. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या गीतांमधलं हे माझं सगळ्यात आवडतं.
१४३ : नलिनीला दाट संशय होता
१४३ : नलिनीला दाट संशय होता की तिचा नवर्याचे, रोहितचे विबासं चालू आहेत. ऑफिसातुन रोजच उशिरा येणं, कधी शर्टावर लाम्ब केस, कधी लिपस्टिकचा डाग. एकदा तर तो चक्क ऑफिसची टूर आहे असं सांगून दोन दिवस गायब झाला. नलिनीने थोडी सीआयडीगिरी करुन खात्री करुन घेतली, की ऑफिसची टूर वगैरे काही नाही. रोहित परत आला की त्याला घरातच घ्यायचे नाही, असा तिने निश्चय केला. जेव्हा तो परत आला तेव्हा तिने कोणते गाणे म्हटले असेल?
कोक्र. १५३ नलिनी हे गाणं
कोक्र. १५३
नलिनी हे गाणं म्हणतील ???
"जा जा रे जा, बालमवा
सौतन के संग रात बिताई
काहे करत अब झूटी बतियाँ
जा जा रे जा, बालमवा..."
~ तसं पाहिलं तर हे काहीसे खट्याळ आणि पतीचे मन रिझविणारेच गाणे आहे, पण फिर भी लेलो फॉर द सेक ऑफ कोडे.
प्रतीक लगेच ओळखलंत. तुम्हाला
प्रतीक लगेच ओळखलंत.
तुम्हाला इंदूरची आकाशची सोनपापडी.
व्वा...व्वा....सकाळी सकाळी
व्वा...व्वा....सकाळी सकाळी इंदूरची सोनपापडी !!!!
रंगा खुश हुवा !!
"बसंत बहार" च्या या गाण्यातीलच
"काँधे लगा लायी बिन्दिया किसीकी
जानूँ मैं चुरायी तूने निन्दिया किसीकी..."
~ ह्या कडव्यातील खेळकर भाव किती मोहक आहे !!
शर्टावर एक बिंदी आहे हे दिसत असूनही त्याबाबत न चिडता, नायिका म्हणते "जरूर तू आणखीन कुणाची तरी झोप घालविली आहेस..."
सुंदरच !
गैरके घर करी रात जगायी, मोसे
गैरके घर करी रात जगायी,
मोसे कहे तेरे बिना नींद न आयी...
अशा ओळी आहेत ना पुढे ?
दिनेशदा....त्या ओळी प्रथम
दिनेशदा....त्या ओळी प्रथम येतात...
पूर्ण गाणे :
"....जा जा रे जा, बालमवा
सौतन के संग रात बिताई
काहे करत अब झूटी बतियाँ
जा जा रे जा, बालमवा
गैर के घर करी रात जगाई
मोसे कहे तेरे बिना नींद न आयी
कैसो हरजाई दैय्या
जा जा रे, जा बालमवा ...
काँधे लगा लायी बिन्दिया किसीकी
जानूँ मैं चुरायी तूने निन्दिया किसीकी
लाज न आयी तोहे
जा रे जा, जा रे जा, जा रे जा, बालमवा ..."
......काय आवाज लागला आहे, लतादिदींचा
~~ मीना कपूरच्या "त्या" गाण्याबद्दलही आता इथेच धन्यवाद देतो तुम्हाला. खरे सांगायचं झाल्यास ते गाणे 'नादिरा' वर चित्रीत आहे हे कळाल्यावर थोडा हिरमुसलोच होतो आणि यू ट्युबवर ते उपलब्ध असूनही पाहिले नाही....पण काही वेळा ऑडिओवर जरूर ऐकले होते.
उतारवयातील मीना कपूरना श्री.अनिल विश्वास यांच्यावर निघालेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये पाहिले होते. अर्थात त्या त्यांच्या पत्नीच असल्याने घरी गॅलरीत आरामखुर्च्या टाकून दोघे गाणी ऐकत बसल्याचे चित्रीकरण होते त्यात. मला त्यावेळी त्या गायिका म्हणूनही ओळखल्या जात होत्या याची माहितीही नव्हती.
पण पारूल घोष, मुबारक बेगम, सुधा मल्होत्रा यांच्या पंक्तीतच मीना कपूर यांचीही संगीत साधना अल्पकाळात संपुष्टात आली असणार यात शंका नाही.
करी रात म्हणजे काय? मला तो
करी रात म्हणजे काय? मला तो उच्चार करी आणि कडी याच्यामधला ऐकू येतो.
|| सुप्रभात लोक्स || प्रतीक,
|| सुप्रभात लोक्स ||
प्रतीक, इंदुरची सोनपापडी मला पण पाहिजे. :हट्ट करणारा बाहुला:
आजचे माझे कैच्याकै कोडं क्रं: १४४
Viraj Kulkarni आणि Sachin Mayekar हे दोघेही उत्तम धावपटु. त्यातल्या त्यात Sachin Mayekar हा Viraj Kulkarni पेक्षा जरा जास्तच चपळ. शर्यतीत तो नेहमीच पहिला यायचा. एकदा जागतिक पातळीवर धावण्याची स्पर्धा भरवली जाते. शेवटच्या पाचमध्ये या दोघांचा नंबर लागतो. सगळ्यांना खात्री असते कि ते दोघेच जिंकणार. त्यात Sachin Mayekar पहिला आणि Viraj Kulkarni दुसरा येणारच याचीही सगळ्यांना खात्री असते. Viraj Kulkarni ला काही वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत पहिलं यायच असत, पण Sachin Mayekar मुळे ते शक्य नसल्याने तो त्याला गाण्यातुन कसं सांगेल?
कोडं १४५: तळ्यात की मळ्यात
कोडं १४५:
तळ्यात की मळ्यात ह्या दुग्ध्यात असताना मुंडेंना गडकरींच्या घरातल्या एका कार्याचं आमंत्रण मिळतं. हितचिंतकांचा श्रध्दा आणि सबुरीचा सल्ला ध्यानी धरून ते जायचं ठरवतात. त्यांचं चांगलं स्वागत केलं जातं. समोर फराळाचं ताट ठेवलं जातं. ते त्याचा आस्वाद घेत असताना नाचगाण्याचा कार्यक्रम चालू होतो. मुंडेही दिलखुलासपणे दाद देत असतात. एव्हढयात एक गाणं सुरु होतं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ते रागारागाने तिथून निघून जातात. गाणं ओळखा बघू.
गाणं गोल्डन इरातलं नाही. जिप्सी, कोड्याचा नंबर १४४ आहे ना?
मीना कपूरची परदेसी या
मीना कपूरची परदेसी या चित्रपटातली 'रिमझिम बरसे पानी आज मोरे अंगना' आणि 'रसिया रे मन बसिया रे तोरे बिना जिया मोरा लागे ना'
ही दोन गाणी ऐकलीत.
सुधा मल्होत्रांची संगीत कारकीर्द अल्प नसावी. त्या नंतर गझलगायनही करू लागल्या होत्या. मला तर त्या बरसातची गाणी गाण्याइतक्या जुन्या आहेत, हे कळल्यावर नवल वाटले होते; इतक्या त्या तरुण दिसत होत्या.
बाबर मधल्या सलामे हसरत कुबूल कर लो बद्दल आधी लिहिलं होतं इथेही शुभा खोटेच आहेत.
स्वप्ना, कोडं १४५: इधर चला
स्वप्ना,
कोडं १४५:
इधर चला मैं उधर चला, जाने कहा मै किधर चला ????
(कोई मिल गया)
जिप्सी..... अरे गेला आठवडाभर
जिप्सी.....
अरे गेला आठवडाभर तू एकटाच चमचमीत डिशेस हाणत होतास की...!!!! आज बडे दिनो के बाद मला काहीतरी खायाला मिळाले आहे, तर त्यातही तुझी वाटणी ?? तीव्र निषेध. आता दिवसभर स्वप्ना एका पाठोपाठ एक अशा प्लेटा तुझ्यासाठी आणेलच ना ??
ओके....तुझ्या कैच्या कै कोड्यात मुद्दाम इंग्रजी ती दोन नावे टंकण्याचा हेतू पडताळून पाहत्योय...तिथेच कदाचित श्री.ग्यानबा यांची मेख असणार.
करी रात म्हणजे काय? मला तो
करी रात म्हणजे काय? मला तो उच्चार करी आणि कडी याच्यामधला ऐकू येतो.
>>> ते "गैर के घर सारी रात जगायी" असं आहे.
जिप्स्या, तुझा कोक्यु भन्नाट वाढलाय रे.
Pages