..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली फारच मनाला लावून घेतल्यामुळे हे कवितारूपी कोड घालतोय ट ला फ असला तरी गोड मानून घ्या. चांगल वाटल तर हा धागा गाजवणा-यांना समर्पित

१३८
कुठे स्वप्नाच ते रोज धारावाहीक हसवणं
कुठे प्रतिक मांडतोय सा-यांसाठी गा-हाण
कुठे दिनेशदा वाढतोय जगण्यासाठी खाण
कुठे आठव मग येते त्या आठवणींसाठी गाण
एक एक क्षण बनवी नात्यांची ही घट्ट वीण

हुश्य!!!!!!!!!!!

कोडे १३९

भरतच्या काना मात्रेवरुन प्रेरणा घेऊन.

मराठीने केला हिंदी भरतार अशी गत होती. माहेरच्यांशी मराठी आणि सासरच्यांशी हिंदी बोलावे लागायचे. पण घरी एकदा शुभकार्य निघाले. माहेरची, सासरची सगळी माणसे जमली. आपली नायिका तशी बर्‍यापैकी गायिका पण होती. तिला गाणे म्हणायचा खुप आग्रह झाला. कामात आहे, अशी सबब सांगून झाली. पण फारच आग्रह झाला, तेव्हा तिने दोन ओळी म्हणून दाखवल्या. पण ती इतकी चतूर कि, माहेरच्यांना वाटले ते मराठी गाणे आणि सासरच्यांना वाटले हिंदी गाणे. तर तिने कुठले गाणे गायले ?

|| सुप्रभात लोक्स ||

कोडे १४०:

गरीब कुटुंबातील मजहर आणि दिलनवाजचे एकमेकांवर प्रेम आणि हुस्नाचे मजहरवर एकतर्फी प्रेम. दिलनवाजच्या आयुष्यात एक श्रीमंत मुलगा येतो आणि ती मजहरला फसवून त्याच्याबरोबर पळुन जाते. तो खुप दु:खी होतो. त्याचवेळेस हुस्ना त्याला मदतीचा हात देते, त्याच्याबद्दल आपुलकी दाखवते. हळुहळु तो ही तिच्या प्रेमात पडतो. अशावेळी मजहर हुस्नाला बघुन कोणंत गाणं म्हणेल???

गुगुचं गाणं काही मला यायचं नाही. दिनेशदा आणि जिप्सी क्लु प्लीज.
१४१ : शोले सगळ्यांनीच बघितला असेल. त्यातला जया भादुरी व्हरांड्यातला एकेक दिवा विझवत चाललीय आणि अमिताभ तिच्याकडे बघतोय हे दृश्य आठवा. जयाला त्याक्षणी कोणतं गाणं म्हणावसं वाटत असेल?

१४१ : शोले सगळ्यांनीच बघितला असेल. त्यातला जया भादुरी व्हरांड्यातला एकेक दिवा विझवत चाललीय आणि अमिताभ तिच्याकडे बघतोय हे दृश्य आठवा. जयाला त्याक्षणी कोणतं गाणं म्हणावसं वाटत असेल?<<<<
रात अकेली है, बुझ गये दिये... Proud (मूळ सिच्युएशनला कायच्या काय विसंगत गाणं आहे पण..)

भरत त्या शॉटच्या वेळी ती गरोदर होती, त्याच्याशी संबंध आहे कि काय ?
गूणेश चे कोडे मात्र कोड्यात टाकतेय.

बरं सांगून टाकतो.
१४१ : शोले सगळ्यांनीच बघितला असेल. त्यातला जया भादुरी व्हरांड्यातला एकेक दिवा विझवत चाललीय आणि अमिताभ तिच्याकडे बघतोय हे दृश्य आठवा. जयाला त्याक्षणी कोणतं गाणं म्हणावसं वाटत असेल?
उत्तर : बुझा दिए हैं खुद अपने हाथों मोहब्बतों के दिये जलाके
मेरी वफा ने उजाड दी है उम्मीद की बस्तियां बसाके
तुझे भुला देंगे अपने दिल से ये फैसला तो कियाहै लेकिन
न दिल को मालूम है न हमको जियेंगे कैसे तुझे भुला के
कभी मिलेंगे जो रास्ते में तो मूंह फिरा के पलट पडेंगे
कहीं सुनेंगे जो नाम तेरा तो चुप रहेंगे नजर झुकाके
न सोचने पर भी सोचते हैं के जिंदगानी में क्या रहेगा
तेरा तमन्ना को दफ्न करके तेरे खयालों से दूर जाके
चित्रपट :शगुन स्वर : सुमन कल्याणपूर, संगीत खय्याम गीत : साहिर, पडद्यावर वहिदा

भरत, हेच्च गाणं आठवत होतो Happy नेमके शब्दच आठवत नव्हते. Sad

मी "धरती कहे पुकार के" चित्रपटातील आणि या गाण्यात कंफ्युज झालो होतो Sad

रच्याकने, दिनेशदा तुम्ही सांगितलेलं रागा वरचे सुमन कल्याणपूरची गाणी ऐकली. बहुतेक गाणी माझ्याकडे नव्हती :(. धन्स दिनेशदा Happy

जिप्सी....

जंपिंग जॅक आणि मुस्लिम नाव...ह्या क्लूजवरून ::

"जो गुजर रही है मुझ पर उसे कैसे मैं बताऊँ
वो खुशी मिली है मुझको मैं ख़ुशी से मर न जाऊँ..."

हे "मेरे हुजुर" मधील बसेल का ?

उडत्या चालीचे आणि "हुस्ना" यावरून मग हेच असणार...

"तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैने करनी थी
मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया..."

दिनेशदा स्वप्ना भरत स्निग्धा जिप्सी
अरे इतक काही अवघड नाही. साधारण जिप्सी टाईपचे गिमिक्स आहेत.

बर एक क्लु : पुन्हा नॉस्टेलजिक व्हाल

प्रतीकला १० पैकी १० स्वीस चॉकलेट्स Happy

कोडे १४०:

गरीब कुटुंबातील मजहर आणि दिलनवाजचे एकमेकांवर प्रेम आणि हुस्नाचे मजहरवर एकतर्फी प्रेम. दिलनवाजच्या आयुष्यात एक श्रीमंत मुलगा येतो आणि ती मजहरला फसवून त्याच्याबरोबर पळुन जाते. तो खुप दु:खी होतो. त्याचवेळेस हुस्ना त्याला मदतीचा हात देते, त्याच्याबद्दल आपुलकी दाखवते. हळुहळु तो ही तिच्या प्रेमात पडतो. अशावेळी मजहर हुस्नाला बघुन कोणंत गाणं म्हणेल???

उत्तर :
तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैने करनी थी
मगर मेरे दिलने मुझे धोखा दे दिया Happy

भरत, या कोड्याला मात्र सगळीच गाणी फिट्ट होती हं ! शनुन म्हटंल कि काहि मोजकीच जाणी आठवतात (गोरी सज गयी शनुनावाली, परबतोंके पेडोंपर, तूम अपना रंजो गम )

जिप्सी, त्यातले तिला न शोभणारे, इमा हमरा क्या कसूर है, ऐकलेस ना ?

कोडे १३९

मराठीने केला हिंदी भरतार अशी गत होती. माहेरच्यांशी मराठी आणि सासरच्यांशी हिंदी बोलावे लागायचे. पण घरी एकदा शुभकार्य निघाले. माहेरची, सासरची सगळी माणसे जमली. आपली नायिका तशी बर्‍यापैकी गायिका पण होती. तिला गाणे म्हणायचा खुप आग्रह झाला. कामात आहे, अशी सबब सांगून झाली. पण फारच आग्रह झाला, तेव्हा तिने दोन ओळी म्हणून दाखवल्या. पण ती इतकी चतूर कि, माहेरच्यांना वाटले ते मराठी गाणे आणि सासरच्यांना वाटले हिंदी गाणे. तर तिने कुठले गाणे गायले ?

उत्तर :
हिंदी व्हर्जन :
तूम ही हो माता, पिता तूम ही हो
तूम ही हो बंधू, सखा तूम ही हो

मराठी व्हर्जन :
तूम्ही हो माता, पिता तूम्ही हो
तूम्ही हो बंधू, सखा तूम्ही हो

त्यातले तिला न शोभणारे, इमा हमरा क्या कसूर है, ऐकलेस ना ?>>>>>>नाही, दिनेशदा सगळी गाणी अजुन नाही ऐकली. असंच अजुन एक गाणं न शोभणारे (नॉन फिल्मी) आहे "रिमझिम बरसे सावन....." (अशा काहीशा ओळी आहेत) या गाण्याची चाल "कम सप्टेंबर"ची आहे. Happy
मी घरी गेल्यावर पाठवतो तुम्हाला ते गाणं. Happy

प्रतीक, Happy

__/\___ दिनेशदा!! Happy
छॅ...गाणं म्हणतांना वाटायचं की हे मराठी हिंदी दोन्ही वाटतय पण ऐन वेळेला... Sad

मागे क्षिप्रा ने चुकीची ऐकलेल्या गाण्यात एक गाणे लिहिले होते.

कोई हमदम नर हा
कोई सहारा नर हा
हम किसीके नर हे
कोई हमारा नर हा

तिने हे लिहिल्यावर, मला हे गाणे असेक ऐकू येते.

Pages