..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं ११४:
"कोण आहेस तू?" खुर्चीत बसलेल्या माणसाने एकदम दचकून उठून विचारलं.
"ओळखलं नाहीस मला? मला वाटलं ह्या रेड्याला बघून ओळखलं असशील"
"रेडा? ओह....तू....तू....इथे काय करतोय्स?"
"काय करतोय म्हणजे काय? न्यायला आलोय तुला. चल"
"अरे असं काय करतोस? अजून मला खूप गोष्टी करायच्या आहेत. एव्हढ्यात कसा येऊ?"
"ते मला काही माहित् नाही. तुला यावंच लागेल"
"थांब, थांब, मला आजच्या रात्रीची तरी मुदत दे. माझं सगळं काम पुरं करतो आणि पहाट फुटायला लागली की येतो तुझ्याबरोबर.देवाशपथ!"
"बरं, देतो तुला मुदत. पहाटे पहाटे मात्र निघायलाच हवं. मला उद्याचा कोटा पण पूर्ण करायला लागणार आहे"
रात्री कामं पुर्ण करता करता तो माणूस काय गाणं म्हणेल?

दोन दिवस इथे कोणी फिरकलं नाही. असं पहिल्यांदाच झालय.>>>>>मामे, शनिवारी कर्नाळा ट्रेकिंगला गेलो होतो आणि रविवारी पूर्ण दिवस बाहेर भटकत होतो. म्हणुन दोन दिवस गैरहजर. इतर गैरहजर विद्यार्थ्यांनी कारणं सांगा नाहीतर पालकांच्या चिठ्ठ्या घेऊन या. Happy

११४: आज कि रात मेरे दिल कि सलामी ले ले, कल तेरी बज्म से दिवाना चला जायेगा ???

११३ साठी महत्त्वाचा शब्द इटालिक मध्ये दिलाय.
११२ सोपं आहे की. तुझ्याच स्टाइलचं आहे. ५० वर्षे जुनं तरीही तितकंच ताजं असं.

स्वप्ना,
सवेरे वाली से चले जायेंगे
कुछ लेके जायेंगे, कुछ देके जायेंगे
मेहमान कब रुके है, कैसे रोके जायेंगे..

हे नसणार. पण उगीचच..

जिप्स्या, त्या वरच्या रागा लिंन्क वर सुमन कल्याणपूर चा एक अल्बम नव्याने आला आहे. बहुतेक तूझ्याकडे असतील, पण एक नजर टाक. चांगले कंपायलेशन आहे.

जिप्सी, तुला मुगाच्या डाळीची गरमागरम खिचडी,पोह्याचा तळलेला पापड आणि तुपाची धार Happy

कोडं ११४:
"कोण आहेस तू?" खुर्चीत बसलेल्या माणसाने एकदम दचकून उठून विचारलं.
"ओळखलं नाहीस मला? मला वाटलं ह्या रेड्याला बघून ओळखलं असशील"
"रेडा? ओह....तू....तू....इथे काय करतोय्स?"
"काय करतोय म्हणजे काय? न्यायला आलोय तुला. चल"
"अरे असं काय करतोस? अजून मला खूप गोष्टी करायच्या आहेत. एव्हढ्यात कसा येऊ?"
"ते मला काही माहित् नाही. तुला यावंच लागेल"
"थांब, थांब, मला आजच्या रात्रीची तरी मुदत दे. माझं सगळं काम पुरं करतो आणि पहाट फुटायला लागली की येतो तुझ्याबरोबर.देवाशपथ!"
"बरं, देतो तुला मुदत. पहाटे पहाटे मात्र निघायलाच हवं. मला उद्याचा कोटा पण पूर्ण करायला लागणार आहे"
रात्री कामं पुर्ण करता करता तो माणूस काय गाणं म्हणेल?

उत्तरः यम्मा यम्मा ये खुबसुरत समा, बस आज कि रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा

हुर्रे!!!!!

जिप्सी, मुगाची गरमागरम खिचडी आणि तुपाची धार >>>>>सोबत पोह्याचा तळलेला पापडपण प्लीज Happy

११३ : रामला एसेसीच्या निकालाचं प्रचंड टेन्शन आलं होतं. पण सगळ्या गाणंवेड्यांच्या सांगण्यावरून त्याने आपला हा धागा वाचण्यात खंड येऊ दिला नाही. आणि त्याचं टेन्शन थोडं कमी झालं. तर या धाग्याला धन्यवाद देताना तो कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर : मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया
शुक्रिया शुक्रिया

११२ संसद भवनाच्या आवारात शत्रुघ्न सिन्हा कुणाला तरी शोधत असतात. बाकीचे खासदार विचारतात, काय तुमची गाडी आली नाही वाटतं अजून?
आणखी एक विचारतो की अमिताभ-गोविंदा नाहीतर राजेश खन्नाला शोधताय का ?
उत्तरार्थ बिहारी शॉटगन बाबू काय उत्तर देतील?

उत्तर : ना तो ‘कार’वां की तलाश है नाही हमसफ़र की तलाश है

सांगा बरं हम आणि सफ़र या चित्रपटांत कोण होतं?

चित्रपटातील सिच्युएशनवर एक कोडं
कोडं ११५:

चित्रपटाची (सह?)नायिका आणि तिच्या वडिलांचा ऑर्केस्ट्रा असतो. एका हॉटेल मालकाला ते सांगतात कि तुझ्या हॉटेलमध्ये आमचा कार्यक्रम ठेव, पण असा कार्यक्रम कधीच ठेवला नसल्याने हॉटेल मालक तयार होत नसतो. तेंव्हा (सह?)नायिका त्यांना सांगते कि फक्त एकच कार्यक्रम ठेवा जर तो लोकांना नाही आवडला तर आम्ही परत निघुन जाऊ. मालक त्यांना तशी परवानगी देतो. हॉटेलमधील त्यांचा कार्यक्रम लोकांना आवडतो आणि ते कायमस्वरूपी त्या हॉटेलात गाण्याचा कार्यक्रम करू लागतात. तेथे चित्रपटाचा नायक आपल्या पहिल्या "प्रेमभंगाचा गम, रम मध्ये डुबवायला" येत असतो. त्यालाही गाणे आणि गाणारी दोन्ही आवडतात व ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नाच्या आधी नायिका हॉटेलमध्ये शेवटचे गाणे म्हणते.

त्या हॉटेलातील तिचे पहिले आणि शेवटचे, अशी दोन्ही गाणी ओळखा. Happy

यम्मा यमम / कारवाँ, मस्तच.
जिप्स्या मला गाणे नाही आठवत पण यात अमिशा पटेल, अक्षय खन्ना आणि बॉबी देओल होते ना ?

नाही दिनेशदा जिप्सीचं गाणं त्या सिनेमाचं नाहिये. त्यात नायिका आणि तिच्या मित्राचा ग्रूप असतो!

कोडं ११५ उत्तर

लिखने वाले ने लिख डाले, मिलन के साथ बिछोडे
असा हुन तूर जाना दिन रह गये थोडे"

जितेन्द्र, परवीन बाबी, सिनेमा अर्पण

जिप्सी , पहिलं गाणं म्हणजे

तौबा कैसे है नादान घुंघरू पायल के?

अता तरी १०/१० आंबावडी मला एकटीलाच ना?

येस्स अक्षरी, १० पैकी १० आंबावडी तुलाच Happy

चित्रपटातील सिच्युएशनवर एक कोडं
कोडं ११५:

चित्रपटाची (सह?)नायिका आणि तिच्या वडिलांचा ऑर्केस्ट्रा असतो. एका हॉटेल मालकाला ते सांगतात कि तुझ्या हॉटेलमध्ये आमचा कार्यक्रम ठेव, पण असा कार्यक्रम कधीच ठेवला नसल्याने हॉटेल मालक तयार होत नसतो. तेंव्हा (सह?)नायिका त्यांना सांगते कि फक्त एकच कार्यक्रम ठेवा जर तो लोकांना नाही आवडला तर आम्ही परत निघुन जाऊ. मालक त्यांना तशी परवानगी देतो. हॉटेलमधील त्यांचा कार्यक्रम लोकांना आवडतो आणि ते कायमस्वरूपी त्या हॉटेलात गाण्याचा कार्यक्रम करू लागतात. तेथे चित्रपटाचा नायक आपल्या पहिल्या "प्रेमभंगाचा गम, रम मध्ये डुबवायला" येत असतो. त्यालाही गाणे आणि गाणारी दोन्ही आवडतात व ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नाच्या आधी नायिका हॉटेलमध्ये शेवटचे गाणे म्हणते.

त्या हॉटेलातील तिचे पहिले आणि शेवटचे, अशी दोन्ही गाणी ओळखा.>>>>>

उत्तर:
पहिले गाणे:
तौबा कैसे है नादान घुंगरू पायल के
इक दिन लेंगे मेरी जान घुंगरू पायल के

शेवटचे गाणे:
लिखने वाले ने लिख डाले, मिलन के साथ बिछोडे
असा हुन तूर जाना दिन रह गये थोडे

चित्रपट: अर्पण
कलाकार : जितेंद्र, परवीन बाबी, रीना रॉय

अजुन एक सोप्प Happy
कोडं ११६:

सुनो, ..... ये जो फूलोंकी बेले नजर आती है ना, दरसल ये बेले नही अरबीमें आयते लिखी है. इसे दिन के वक्त देखना चाहिए. दिन के वक्त ये सारा पानी से भरा रहता है. दिन के वक्त जब ये फुहारे...... . कहां आ पाऊंगी मै दिनमें. ये जो चांद है ना इसे रात के वक्त हि देखना ये दिन में नही निकलता. ये तो रोज निकलता होंगा ना. हां ..... मगर बीचमें अमावस आ जाती है. वैसे तो अमावस पंद्रह दिनो कि होती है. लेकिन इस बार बहोत लंबी थी. नौ बरस लंबी थी ना........

गाणं ओळखा Happy

Pages