..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, अगदी अगदी.. उत्तर पोस्ट केल्यावर वेळ पाहिली तेव्हा मेरेकोबी गंमतच वाटी यकदम! Happy आज वीकेंडाचा बक्षीस मेनू काये?

कोडं: १०१ :
एकदा लतादिदि आणि ह्रदयनाथ यांच्यात जोरदार भांडण होतं. ह्रदयनाथ त्यांना खूप बोलतात, ते त्यांच्या जिव्हारी लागतं आणि त्या दु:खी होतात. हे सगळं आईला कसं सांगायच्या या विचारात असताना त्या स्वतःच कोणतं गाणं म्हणतील?

१०२ एक तरुणी प्रेमात पडते, पण तिचा प्रियकर इतका शब्दबंबाळ असतो की तिचं डोकंच फिरतं आणि ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मझा खून झालाय अशी तक्रार नोंदवते.
प्रियकराने आधी काय म्हटले? प्रेयसीने पोलिस स्टेशनात काय गाणं म्हटलं?

भरतला, दिनेशदांच्या ईमेजवानीतील कोणतीही एक(च) डिश Happy

कोडं: १०१ :
एकदा लतादिदि आणि ह्रदयनाथ यांच्यात जोरदार भांडण होतं. ह्रदयनाथ त्यांना खूप बोलतात, ते त्यांच्या जिव्हारी लागतं आणि त्या दु:खी होतात. हे सगळं आईला कसं सांगायच्या या विचारात असताना त्या स्वतःच कोणतं गाणं म्हणतील?

उत्तर:
माई री मैं कासे कहू पीर अपने जिया की

ओस नयन कि उनके मेरी लगी को बुझाये ना
तन-मन भीगो दे आके ऐसी घटा कोई छाये ना
मोहे बहा ले जाये ऐसी लहर कोइ आये ना
ओस नयन कि उनके मेरी लगी को बुझाये ना
पडी नदिया के किनारे मै प्यासी
माई री......

पी कि डगर मे बैठा मैल हुवा री मेरा आचरा
मुखडा है फिका फिका, नैनो मे सोहे नही काजरा
कोइ जो देखे मैया, प्रीत का वासे कहु माजरा
लट मे पडी कैसी बिरहा कि माटी
माई री......

आखो मे चलते फ़िरते, रोज मिले पिया बावरे
बैया कि छैया आके मिलते नही कभी सावरे
दुख ये मिलन का लेकर का कारू, कहा जाउ रे
पा कर भी, नही उन को मै पाती
माई री......

हे गाणं मदनमोहनच्या आवाजात ऐकलंय का?>>>>>येस्स्स भरत Happy दोन्ही आवाजातील हि गाणी अत्यंत आवडती. Happy
(न राहवून पूर्ण गाणं टायपतोय. :-))

किती वेदना - पीर आहे नाही या गाण्यात.
पडी नदिया के किनारे मैं प्यासी.

चित्रपट पण सुंदर आहे. संजीवकुमार रेहाना सुल्तान?
बैंया ना धरो पण सुंदर.

किती वेदना - पीर आहे नाही या गाण्यात.
पडी नदिया के किनारे मैं प्यासी.>>>>अगदी अगदी.

चित्रपट पण सुंदर आहे. संजीवकुमार रेहाना सुल्तान?>>>>>>येस्स्स. "दस्तक" चित्रपट.
पण या गाण्याचे चित्रिकरण नाही आवडलं Sad

"हम है मताए कुचाओ बाजार कि तरह, उठती है हर निगाह खरीदार कि तरह.." पण यातलचं ना?

हो हम है मताए पण.
रफीचं पण एक आहे.
मला वाटतं `मैं का से कहूं पीर' हे गाणं त्या प्रसंगाला अगदी अ‍ॅप्रोप्रिएट आहे.आणि चित्रणही. नुसतं गाणं न बघता चित्रपट बघताना तरी मला असं वाटलं.

आणि चित्रणही. नुसतं गाणं न बघता चित्रपट बघताना तरी मला असं वाटलं.>>>>>असं असेल, मी फक्त गाणं पाहिलंय. पूर्ण चित्रपट नाही पाहिलाय.

तूमसे कहु इक बात परोंसी, हलकी हलकी...>>>>>येस्स्स, दिनेशदा हेच गाणं आठवत होतो. Happy

कोडं: १०२ :

"कुठे आहेस तू ?" तीने फोनवरून त्याला विचारले.
"सध्या मुंबईला आलोय, कामानिमित्त", तो उत्तरला.
"मग, सुरतला कधी येतोय?" — ती
"एक दोन दिवसात नक्कीच" — तो
"मला माहित आहे या कामाच्या/मिटिंगच्या नादात तु परत विसरणार. मागेही दोनदा-तीनदा येण्याचे नक्की केलेस आणि विसरलास"— ती
"या वेळेस मात्र पक्का" — तो

या सिच्युएशनवर "ती" कोणतं गाणं म्हणेल?

क्लु : थोडंस कैच्याकै. "वादा" वगैरे अपेक्षित नाही. Happy

मित्रमैत्रीणीनो..
माझ्या चिरंजीवांचे मार्क्स कळाले.. ९१ टक्के पडले.. अपेक्षे पेक्षा थोडे कमी पडले पण हे ही नसे थोडके.. Happy

pullareddysweets.jpg

मस्तच!!!!!! Happy
दोघांचेही मनापासुन अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!

९१/९९ टक्के!!!!!! माझे पहिली ते दहावी पर्यंतचे सगळे मार्क एकत्र केल्यावरसुद्धा इतके नसतील Proud

चला या आनंदात मी माझ्या कोड्याचे उत्तर सांगतो Happy
कोडं: १०२ :
"कुठे आहेस तू ?" तीने फोनवरून त्याला विचारले.
"सध्या मुंबईला आलोय, कामानिमित्त", तो उत्तरला.
"मग, सुरतला कधी येतोय?" — ती
"एक दोन दिवसात नक्कीच" — तो
"मला माहित आहे या कामाच्या/मिटिंगच्या नादात तु परत विसरणार. मागेही दोनदा-तीनदा येण्याचे नक्की केलेस आणि विसरलास"— ती
"या वेळेस मात्र पक्का" — तो
या सिच्युएशनवर "ती" कोणतं गाणं म्हणेल?

क्लु : थोडंस कैच्याकै. "वादा" वगैरे अपेक्षित नाही.

उत्तर:
हमी करे कोई सुरत उन्हे बुलाने कि
सुना है उनको तो आदत है भूल जाने कि Happy

(एक नजर:लता मंगेशकर:जया भादुरी)

मामी, राम अभिनंदन! Happy मामी, तुमचे पेढे कुठे आहेत? जिप्सी, ** शोलेमधल्या अमिताभच्या स्टाईलमध्ये ** पहली बार सुना है ये गाना Happy ऑफ कोर्स द फॉल्ट इज ऑल माईन!

आणखी एक सेलेब्रेशन - आज सकाळी आपल्या धाग्याने १०० कोड्यांचा माईलस्टोन पार केला. आणि पोस्टस ९५१ झाल्यात. थ्री चिअर्स फॉर एव्हरीवन! Happy

राम पार्टी पाहीजे!!!!!!!!!!!!!!!

कस काय मुल एव्हढे मार्क मिळवतात? जिप्सी मनातल बोललास

सह्ह्ही Happy
(माझ्यासहित ;-)) सगळ्यांचे अभिनंदन!!!!!!!!

पहली बार सुना है ये गाना>>>>स्वप्ना, नक्की ऐक गाण. खुप सुंदर आहेत या चित्रपटातील सगळीच गाणी. Happy

बेस्ट ऑफ फाईव मध्ये ८७.८ % मिळाले लेकीला Happy

बिचारी गणिताच्या बाबतीत आईवर गेलीय, नाहीतर अजुन मिळाले असते Happy

हुश्श....देवा रे देवा....तुझी लीला (चिटणीस नव्हे) अगाध आहे !!!!

दोन्ही बहिणी आपापल्या अपत्याबाबत भलत्याच टेन्शनमध्ये असल्याने मला खास त्या दोघांवर देखरेख करण्यासाठी बोलविण्यात आले होते...मीही 'पन्हाळगड' स्टाईल त्यांच्याभोवती वेढा घालून बसलो होतो....सलग तीन दिवस...त्यामुळेच इथे येऊ शकलो नाही....पण आता सुटका झाली...त्या दोघांची आणि पर्यायाने माझीही.

भाचीला ९३.९१ (बेस्ट ऑफ फाईव्ह तत्वानुसार) पडले
तर भाचा माझा नादिष्ट असल्याने त्याला ८०.९१% पडले...पण अडकला नाही गडी, हेही नसे थोडके...!!

(रामच्या थाळीतील मिठाई खावा....सर्वांनी)

झकास्स्स्स्स्स्स्स फीलिंग !

साधना तुला आणि लेकीला कॉंग्रॅटस! प्रतीक आणि त्याचे भाचा-भाची यांचेही अभिनंदन!! मस्त मार्क सगळ्यांचे.

पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.

Pages