Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत / दिनेशदा, यातली, 'तेरे
भरत / दिनेशदा,
यातली, 'तेरे तीर को हमने प्यार से दिल में रख लिया', अभी तो मैं जवां हूं आणि 'मचलती आरजू खडी बाहे पसारे' ही गाणी मला माहीत आहेत.
भाची मुंबईत पहिली आलेय. आताच
भाची मुंबईत पहिली आलेय. आताच ती शाळेतून आली तर कळलं. इंटरव्हू वगैरे देऊनच आलेय. मस्त ना?
होय भरत...."जेम" खर्या
होय भरत...."जेम" खर्या अर्थाने आहेत ती सारी गाणी.
तुम्ही दिलेल्या 'तेरे तीर को हमने प्यार से दिल में रख लिया' या गाण्यावरूनच 'अर्धांगिनी' पर्यंत पोचलो होतो. तुमच्या गाण्यात पडद्यावर ती 'निशी' आहे ना...'लुटेरा' मधील..? खात्री नाही.
जमाल सेनचे 'सपना बन साजन..' तर वेडच लावेल....कितीही वेळा ऐका.
श्यामसुंदरचे 'लाहोर' मधील "बहारें फिर भी आयेंगी मगर हम तुम जुदा होंगे" हे त्यात नसेल...पण ते त्या गटात निश्चित बसेल....
(आत्ता या क्षणी "एक थी लडकी" मधील विनोदचे "लारा लप्पा.." ऐकतोय....मीना शौरी पडद्यावर...हेही गाणे एक सदाबहार धमालच आहे, लताचे.
असा अपघात जिप्स्याने केला
असा अपघात जिप्स्याने केला होता. पण त्या वेळी तो बेरकी नव्हता.
म्हणजे जिप्सी बाईच्या वेषात नाचलेला का किरणकुमार बनून नाचलेला !!!???
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!
दिनेशदा आणखी पण आहेत त्यात.
दिनेशदा आणखी पण आहेत त्यात. या दोन्हीचे संगीतकार रेअर नाहीत म्हणुन नाही दिली. रंग रंगीला सांवराचे संगीत खय्याम . खय्यामनी संगीत दिलेलं फास्ट बीटचं दुसरं गाणं मी तरी ऐकलेलं नाही.
तरी, मुझे ना बुला : आदि नारायण राव : स्वर्ण सुंदरी हे लिहायचं राहिलं.
जिप्सी ..... बेड्या घालणारा
जिप्सी ..... बेड्या घालणारा तो निर्दयी इन्स्पेक्टर "ठोकळा" गट सदस्य आहे का?
हिंटव थोडेसे....सिच्युएशन नजरेसमोर येत आहे.
बेड्या घालणारा तो निर्दयी
बेड्या घालणारा तो निर्दयी इन्स्पेक्टर "ठोकळा" गट सदस्य आहे का?>>>>नाही, प्रतीक
खुपच ओळखीचं गाणं आहे
मामी, भाचीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!
प्रतीक बहारे फिर आएगी ची
प्रतीक बहारे फिर आएगी ची दुसरी ओळ काय आहे? अडकलो मी तिथे.
मामी, भाचीसाठी काय आणू ते
मामी, भाचीसाठी काय आणू ते सांग ! खरंच कौतूक आहे. प्रचंड मेहनत घेतली असणार. आता तिच्या आवडत्या क्षेत्रात तिला उच्च शिक्षण घ्यायची संधी मिळो, या शुभेच्छा !
आणि आहात कुठे ? हि १००० वी पोस्ट !!!!!!!!!!!!!!!!
१०८ एक महिला समुपदेशनासाठी
१०८ एक महिला समुपदेशनासाठी councelling मानसोपचारतज्ञाकडे जाते. पण तिची बडबड ऐकून तो सायकिअॅट्रिस्टच रडायला लागतो. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
प्रतीक बहारे फिरभी आएगी च्या जोडीची ओळ काय आहे? मी अडकून बसलोय आता तिथे.
भरत : "बहारें फिर भी आयेंगी
भरत :
"बहारें फिर भी आयेंगी मगर हम तुम जुदा होंगे
घटाएं फिर भी छायेंगी मगर हम तुम जुदा होंगे..."
अशा त्या मुखड्याच्या ओळी आहेत. नर्गीस आणि करण दिवाण होते.
अरे वाह!!!!!!!! इथेही १०००
अरे वाह!!!!!!!!
इथेही १००० झाले
दिनेशदा कधी येतोयस म्हणजे तस मामीला पार्टीची तयारी करायला हवी.
मामी.....हर्षभराने तुमची
मामी.....हर्षभराने तुमची अवस्था आता "आजकल पाँव जमीं पर नही पडते मेरे..." अशीच अवस्था असणार ... भाचीच्या पराक्रमाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.
या धाग्याच्या सर्व सदस्यांकडून तिचे खास अभिनंदन करा.....!
भरत, जो हमने दास्ता अपनी
भरत, जो हमने दास्ता अपनी सुनायी आप क्यो रोये?
प्रतीक, धन्यवाद. त्या
प्रतीक, धन्यवाद. त्या गाण्यावरून
हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे
बहारें हमको ढूंढेंगी न जाने हम कहां होंगे (मदन मोहन - मजरूह- बागी)
हे आठवलं.
मामी, डब्बल पार्टी हवीय. एक
मामी, डब्बल पार्टी हवीय. एक भाची मुंबईतून पहिली आल्याची आणि दुसरी धाग्याने १००० पार केल्याची
ह्या 'करण दिवाण' चा आमच्या घरी जोकच झालेला एक. कुठला तरी पिक्चर लागलेला टीव्हीवर. हिरो ओळखीचा दिसेना म्हणून मातापित्यांकडे विचारलं. बाबा म्हणाले 'अरे, हा तर करण दिवाण'.मी ऐकलं 'करंडीवान'. म्हटलं असेल बुवा आडनाव. मग बाबांना विचारलं 'पण त्याचं पहिलं नाव काय?". बाबा म्हणाले "करण"
स्वप्ना बरोबर. १०८ एक महिला
स्वप्ना बरोबर.
१०८ एक महिला समुपदेशनासाठी councelling मानसोपचारतज्ञाकडे जाते. पण तिची बडबड ऐकून तो सायकिअॅट्रिस्टच रडायला लागतो. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए
तबाही तो हमारे दिल पे आयी आप क्यों रोए
आता, माझं कोडं ओळखा.
आता, माझं कोडं ओळखा.
** 'बहोत दिनोके बात माके
** 'बहोत दिनोके बात माके हाथका खाना खाया' च्या चालीवर ** बहोत दिनोके बाद एक जवाब सही आया
किती कोडी पेंडींग आहेत अजून? उत्तरं विकांताला पोस्ट करून टाका. सोमवारपासून नवी कोडी.
स्वप्ना चला मी उत्तर सांगुनच
स्वप्ना

चला मी उत्तर सांगुनच टाकतो
दिनेशदांसारखंच मीही थेट चित्रपटातील एक प्रसंग सांगतो, तुम्ही गाणं ओळखा.
कोडं १०७
चित्रपटातील अविवाहित नायिका, नायक तिच्या घरी येण्याची वाट बघतेय. त्याच्या येण्याच्या जाणीवेने ती मनोमन खुष होते पण तो नक्की येणार का? असा विचारही ती गाण्यातुन करतेयं. गाणं संपल्यावर तो येतो आणि नायिकेच्या वडिलांच्या हातात बेड्या ठोकतो.
ते गाणं ओळखा.
उत्तर :
किस लिए मैने प्यार किया, दिल को युंही बेकरार किया
शाम सवेरे तेरी राह देखी, रात दिन इंतजार किया
(चित्रपट : दि ट्रेन)
जिप्सी मस्त गाणं आहे ते. अगदी
जिप्सी मस्त गाणं आहे ते. अगदी तरल. पण चित्रपट काही लक्षात नाही.
बेबी नंदा का?
बेबी नंदा का?>>>येस्स. नंदा
बेबी नंदा का?>>>येस्स. नंदा आणि राजेश खन्ना.
राम, साधना हार्दिक अभिनंदन -
राम, साधना हार्दिक अभिनंदन - तुमचे आणि तुमच्या मुलांचे ! मामी जंगी पार्टी पाहिजे भाचीला एवढे मार्क, दुसरी शाल पण पूर्ण होत आली, कोड्याची पण शभरी पार झाली - खूप कारणे झाली ना पार्टीसाठी
१०९. आपली नायिका पण दहाविला बसली आहे. आज निकालाचा दिवस त्यामुळे मनात धडधड होतेय. म्हणून ती आपल्या 'खास' मित्राला बरोबर घेउन निघाली आहे रिझल्ट आणायला त्याचा हात घट्ट पकडून. ती पक्की निसर्गप्रेमी तर तो मात्र उगाच पाने फुले तोडणारा. आजही त्याचे ते चालूच आहे जाता जाता. आणि एवढ्या दबावाखाली असताना देखील ते तिला सहन होत नाही. ती त्याला म्हणते ..... ?
"करंडीवान"....!!! ग्रेट
"करंडीवान"....!!! ग्रेट स्वप्ना....हा देखील ठोकळा ग्रुप सदस्य होता म्हणे.
@ भरत : त्या "अर्धांगिनी" बाबत एक लिहायचे राहिलेच....त्याचे संगीतकार आपले वसंत देसाई होते. त्यांच्या संगीताचा एकूण प्रवास पाहता ते गाणे खरे तर पहिल्या पाचात येणे आवश्यक होते. पण शांतारामबापू आणि तो एकमेव 'गुंज उठी शहनाई' यांचाच सातत्याने त्यांच्याबाबतीत उल्लेख होतो....हे त्या गाण्यावर अन्याय केल्यासारखे आहे.
(विशेष म्हणजे मजरूह सुलतानपुरींचे शब्द होते त्या गाण्याचे)
अरे त्यातल्या हेलन (गुलाबी
अरे त्यातल्या हेलन (गुलाबी आँखे) आणि अरुणा इराणीला (मै का करु) कसे विसरता येईल ? तिघींना छान गाणी होती.
माधव, १०९ : पत्ता पत्ता बूटा
माधव,
१०९ : पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है ???
वसंत देसाईंचे 'ओ दिलदार बोलो
वसंत देसाईंचे 'ओ दिलदार बोलो एक बार क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे' हे गाणे ऐकलय का? स्कूलमास्टर चित्रपटातले आहे. लता आणि तलतचा रेशमी आवाज आणि पडद्यावर चक्क राजा गोसावी
नाही जिप्सी!
ऐकलंय. पडद्यावर कोणी विनोदी
ऐकलंय. पडद्यावर कोणी विनोदी जोडपं आहे का त्यात?
जिप्सी....गॉश्श....ट्रेन
जिप्सी....गॉश्श....ट्रेन माझ्या नजरेसमोर आला होता....पण राजेश खन्ना त्यात एकदाही 'इन्स्पेक्टर' च्या ड्रेसमध्ये दाखविला गेला नसल्याचे मला माहीत होते, म्हणून तो कटाप केला....मग जंपिंग जॅकचा फर्ज आला...त्यातल्या बबिताचा बापही गुन्हेगारच असतो, पण परत तेच...जितू इन्स्पेक्टर नसून जासूस असल्याने फर्जलाही दूर केले होते. शशी कपूरचा विचार करावा का असे म्हणत असताच इथे उत्तर झळकले.
असो...हाही कोड्याचा एक उपप्रकार चांगला आहे...पण तो इथेच येऊ दे.
जो तूम तोडो पिया, मै नाही
जो तूम तोडो पिया, मै नाही तोडूंगी ???
Pages