१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)
------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही ) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो! ) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.
पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.
मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)
नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)
BEHIND THE SCENE
हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!
आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा
ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.
ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं )
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.
इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!
विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मी मागे म्हणजे आठ
मी मागे म्हणजे आठ महिन्यापूर्वी लिहिल्याप्रमाणे टी३ ,टी४ ,टीएसेच करून घेतले व हायपर निघालेंइयो मर्कोझोल ची दिवसातून ३ दा गोळी सुरू केली डॉ नी.दर महिन्यात रक्त तपासणी करून तो डोज महिन्यात २४ दिवस रोज दोन गोळ्या असा नियमीत केला-५ महिने दर १ ता ला चेकिंग चालू ठेवून आता दर २ महिन्यावर आणले आहे व रिजल्टस नॉर्मल आहेत ही सातत्त्यता फार गरजेची आहे-नाही तर फार त्रास होतो-मी तो भोगलाय्-वजन घटणे-वाढणे-सकाळी धड धड्,चिड चिड्,सदा चिंता वाटणे इ.बरोबर योगासने (सर्वांगासन) चालू ठेवणे.
हा फार तापदायक प्रकार आहे पण स्वानुभवाप्रमाणे ताब्यात ठेवला जाऊ शकतो.:)
रेव्यु, प्लिज TSH किती आहे ते
रेव्यु, प्लिज TSH किती आहे ते लिहल का? म्हणजे पहिल्यांदा त्रास होत असत्ताना, नंतर गोळ्या सुरु असताना, थॉडे डिटेल शेअर कराल तर चांगली माहिती मिळेल. हायपो वाले खुप आहेत, हायपर वालेच कमी दिसतात.
नानबा खूप माहितीपूर्ण लेख
नानबा खूप माहितीपूर्ण लेख आहे. होमिओपथिच्या औषधाने खूप फरक पडतो
हे मी पाहिले आहे.
सुरेखा,होमिओपॅथीत कुठले औषध
सुरेखा,होमिओपॅथीत कुठले औषध आहे?
सुमेधा मला औषध माहित नाही पण
सुमेधा मला औषध माहित नाही पण होमिओपॅथीच्या डॉक्टराना विचारून सांगू शकते.
आमच्या शेजारीच रहातात.
नानबा खुप छान लिहिला आहेस हा
नानबा खुप छान लिहिला आहेस हा लेख.
खुप माहिती दिली आहेस. आणि खुप उपयोगी पण आहे.
पाटील साहेब नमस्कार, उत्तर
पाटील साहेब नमस्कार,
उत्तर पाठवायला उशीर झाला.क्षमस्व्.फाईल सापडत नवह्ती
रीडिंग्ज अशी
तारीख / फ्री टी ३ फ्री टी४ टीएसेच
किती हवे १.४५ ते ३.४८ ०.७१ ते १.८५ ०.४ ते ४.६७
२७-७-१० ३.५७ १.७७ ०.००
४-८-१० ३.५४ १.७६ ०.००६३
नीयो मर्कोझोल ५ दिवसातून ३ दा महिनाभर
४-९-१० २.४६ १.०४ ०.९२
४-१०-१० २.२६ १.०७ २.१६
३.११.१० २.२९ १.१३ ४.०५
शनिवार रविवार औषध बंद /गोळ्या दिवसातून् २ दा
१-१२-१० २.८९ १.१४ ३.१९
१.१.११ २.९७ १.२४ २.२१
आता चेकिंग फ्रीक्वेन्सी २ महिन्यात एकदा
१.३.११ ३.०० १.०० २.११
पुढील चेकिंग १-०५-११
आता कुठलही त्रास नाही
आणखी माहिती हवी असल्यास स्वागत
खुप धन्यवाद ... माहिती शेअर
खुप धन्यवाद ... माहिती शेअर केल्याबद्दल...
TSH ची आयडियल प्रमाण हे १.५
TSH ची आयडियल प्रमाण हे १.५ पर्यंत(स्त्रियांसाठी) असे असावे. जसे म्हटले आहे की "आदर्श" प्रमाण.
ते जरी २.५ गेले तरी ठिक मानले जाते. पण २.५ पेक्षा वर गेले तर लगेच चिन्ह दिसतात.
केस गळती आधी सुरु होते.(माझ्या बाबतीत तरी). मग वजन, हृदयाचे स्पंदन वाढणं.(हि हापो व हायपर दोन्हीत होतात).
तेव्हा नेहमी १.५ पर्यंत प्रयत्न उत्तम.
प्रॉबलेम हा असतो ना की, गोळ्या घेत असताना चेक केले नाही तर पुन्हा हायपर होवु शकतो माणूस. मग डोसेज जुळवून घ्यायला लागतात.
मी पुर्णपणे नॅचरोपॅथीचे उपाय करून बरी झाले. झाली काहि वर्षे पण टिकवून आहे अजुन तरी. थोडी कठिण असते पण जमते मग.
गहू, तांदूळ, ब्रेड-बिस्किटं , मैदा वगैरे बंद. तूप,तळणी,गोड,मटण,चहा,कॉफी पदार्थ एकदम बंद केले सहा महिने.२१ व्या वर्षीच इतके तप करावे लागले. दिवाळीत गेले भारतात तर एकही पदार्थ खावू शकले नाही.
फक्त भाज्या व सूप खावून दिवस काढलेत.
तोंडाच्या आतमध्ये कोरडेपणा
तोंडाच्या आतमध्ये कोरडेपणा जाणवणे हे थायरॉईड्चे लक्षण असू शकते का?
पुण्यामध्ये Thyrocare
पुण्यामध्ये Thyrocare Laboratory ची शाखा आहे का ? कुठे आहे ?
>>>तोंडाच्या आतमध्ये कोरडेपणा
>>>तोंडाच्या आतमध्ये कोरडेपणा जाणवणे हे थायरॉईड्चे लक्षण असू शकते का?
हो कधी कधी जाणवतो.
घशाच्या मागे सुद्धा जाणवतो.
जियो नानबा ! काय सुंदर लेख
जियो नानबा ! काय सुंदर लेख लिहिला आहेस. अगदी सोप्प्या भाषेत.
मस्तच.
मी येथे नविन आहे.प्रथमच लिहित
मी येथे नविन आहे.प्रथमच लिहित आहे. नानबा खुप माहिति मिळालि. धन्यवाद.
मला पण hypothyroid आहे.TSH 85. खुप निराश आहे. नुसति चिडचिड होत आहे.नऊ महिन्याचि गोड मुलगि आहे.
मानसिक थकवा खुप जाणवतो.स्वता(?)चि काळजि घेण जिवावर येत आहे. काय करावे???????????????
आज TSH 98.5 .... homeopathy
आज TSH 98.5 ....
homeopathy suru asunsudha..
देवकु ९८.५ ही खूप गंभीर बाब
देवकु ९८.५ ही खूप गंभीर बाब आहे. तुम्ही Endocrinologist ला दाखवलय कां??
खरचं माहितीपुर्ण लेख
खरचं माहितीपुर्ण लेख
देवकु, लवकरात लवकर, खरंतर
देवकु, लवकरात लवकर, खरंतर ताबडतोब, एखाद्या एण्डोक्राय्नॉलॉजिस्टकडे जाऊन उपाय सुरु करा. त्रास वाढता उपयोगी नाही. आणि उपाय सुरु केल्यावर ते सांगतील ती सगळी पथ्य पाळा. त्यात कसलीही हयगय करू नका.
स्वतःची काळजी घेणे जिवावर येत आहे असं म्हणून चालायचं नाही. जितक्या लवकर ती काळजी घ्याल तितक्या लवकर रिकव्हर व्हाल. आणि खाण्यावर थोडीशी बंधनं आणि रोजचा वेळ न चुकवता केलेला व्यायाम, रोजचं जे काही असेल ते औषध या गोष्टींसाठी वेळ द्यायलाच हवा.
थोडं स्प्ष्ट लिहिलंय म्हणून गैरसमज नसावा. थायरॉईडबद्द्ल इथली माहिती वाचून जे महत्त्वाचं वाटलं ते सांगितलं. लवकर बरं वाटूदे तुम्हाला.
अजुन नाही भ्रमर... धन्यवाद
अजुन नाही भ्रमर...
धन्यवाद Pradhnya.....
Medicine khup varshe ghyavi lagnar aahet mhanun homeopathy suru keli aahe.
thoda aaram aahe .. बघु Dr. नि परत बोलावले आहे लगेच ..परत टेस्ट करुन पहाते.
कुणाला होमेओपथी च अनुभव आहे का?
खरच, धन्यवाद. या उपयूक्त
खरच, धन्यवाद. या उपयूक्त लेखाबद्दल.
मला पण त्रास आहे. TSH १७.१५. होमेओपथी सुरु आहे. पण त्याबरोबरच Endocrinologist ला पण दाखवणार आहे. पर्वाची appt. घेतली आहे.
गेल्या ८ माहिन्यात वजन ६ किलो कमी, चिडचीड, नैराश्य, भूक न लागणे, लागली तरी खाण्याची इच्छा नसणे, वर दाद ने लिहिल्याप्रमाणेच, बरिचशी लक्षणे दिसत आहेत. आज पासुनच, उजव्या पायाची पोटरीची शिर दुखत आहे. हा माझा प्रकार कोणता आहे (hypo/hyper?)
खरच, धन्यवाद. या उपयूक्त लेखाबद्दल.
खुप माहितीपीपुर्ण लेख.
खुप माहितीपीपुर्ण लेख.
मला वर्ष्आपूर्वी हायपो
मला वर्ष्आपूर्वी हायपो डिटेक्ट झाला.पण काहि लक्श्णे हायपरची होती,जसे की वजन न वाढणे,कमी झोप, हातांची थरथर ,अशक्तपणा.
tsh -- 10.4 होते.२५ mcg डोस सुरु आहे.6 महिन्यांनी परत टेस्ट
केल्यावर tsh-- 4.3 झाले. पण डॉ. नी २५ mcg डोस चालुच ठेवला. आतापर्यत सर्व ठिक होते.पण परत
चिडचिड होत आहे.
मला परत टेस्ट करायची आहे. मी बंगलोरमधे आहे. नानबा तुम्हि म्हणालात की बंगलोर व पुण्याच्या टेस्टमधे फरक येतो. please तुम्हि सुचवाल का कुठे टेस्ट करायची ते?
कृपया पॅनिक होवू नका.मी टि एस
कृपया पॅनिक होवू नका.मी टि एस एच १७५ वरून २.५ पर्यंत प्रवास १४ महिन्यात केला आहे.औषधांनी शक्य आहे.स्वतःच्या डॉक्टरांवर विश्वास् अन आशा ठेवा. नक्की गुण मिळेल. मला अजूनही औषध चालू आहे.मिनिमम डोज आहे.
जयु, मी बँगलोरला असताना सागर
जयु, मी बँगलोरला असताना सागर अपोलो मधे जायचे..
तिथे एक म्हातारे एन्डोक्रायनॉलॉजिस्ट होते.. चांगले होते ते..
नाव आठवत नाही.. जुने रेकॉर्ड्स सापडले तर सांगते..
पण सागर अपोलो प्रचंड महाग होतं..
पुण्यात मी डॉ वैशाली देशमुखांकडे जायचे.. पण लास्ट दोन तीन वेळा मला त्यांचा वेळ पाळण्याबाबतीत वाईट अनुभव आला फार.. (एकदा अपाँईटमेंट देऊन गावाला गेल्या.. रिसेप्शनिस्टही नव्हती.. २ तास घालवल्यावर कळलं की त्या नाहीयेत)
आता भारतात असल्यावर मी डॉ अभ्यंकर आहेत वाईचे त्यांच्याकडे जाते.. ते एन्डो नाहियेत.. पण ओव्हरऑल त्यांना चांगली नस आहे...
मिरज ला पटवर्धन म्हणुन चांगले
मिरज ला पटवर्धन म्हणुन चांगले डॉ. आहेत. खुप लांबुन लोक त्यांच्याकडे जातात अस ऐकल आहे.
नान्या - मस्त
नान्या - मस्त लिहीलयस......
माझा एक्ष्स्पीरीयन्स -
२००९ च्या मे मधे माला दीवस गेले - घरी प्रेग टेस्ट केली तर ती फेण्ट पोझीटीव्ह, काही कळेना मग डाक्टरणी कडे गेले. ती म्हणाली प्रेगनन्सी हारमोनेस खूप कमी आहेत - obgyn कडे जा. ओबी ने पुर्ण ब्लड वर्क केलं, आणि हायपो डिटेक्ट झाला. त्या वेळी नतंर मिसक्यारेज झालं. मी माझ्याकडुन मिस्क्यारेज चं कारण हायपो वर टाकलं (डोक्टरीण जरी तसं नक्की सांगता येणार नाही म्हणाली तरी) ....मग गोळ्या तपासणी, परत प्रेगनन्सी, डीलेव्हरी सर्व हायपो च्या गोळ्या खाउनच केलं. त्या नन्तर ६ वीक्स पोस्ट पारट्म चेक ला - हाय्पो गायब...येय.... काही कळत नाही - आता परत एकदा चेक कणार आहे तेव्हा काय होइल ते पाहु. एकुण काय तर फार वीचित्र प्रकरण आहे हे. ज्या मुली प्रेगनन्सी साठी प्रयत्न करत आहेत त्यांनी एकदा ब्लड वर्क जरुर करावे. its better to be proactive about this one.
खुप छान माहीती नानबा, दाद,
खुप छान माहीती नानबा, दाद, रेव्यु !
धन्यवाद
या महितिबद्द्ल नानबा आणी
या महितिबद्द्ल नानबा आणी इतराचे आभार ( अनुस्वार कसा द्यायचा)
मला नुकतेच प्रेग्नन्सी मध्ये हायपो डीटेकट झाला. खुप काळ्जी घेउनही डीलीव्हरी आट्व्या महीन्यात झालि. मला दादर किवा साऊथ मुम्बईत कुणी चान्ग्ला endocrinologist सुचवु शकेल का?
प्लीज..
उपयुकत माहीती
उपयुकत माहीती
नेटवर सर्च करताना मला एक
नेटवर सर्च करताना मला एक वेबसाईट मिळाली.कलकत्याच्या प्रसिद्ध बॅनर्जी होमिओपॅथी डॉक्टर फॅमिलीची साईट आहे.त्यात ते हायपोथायरॉईडवर यशस्वी उपचार करतात असे लिहिले आहे.ती वेबसाईट आहे www.banerjiprotocol.com . कुणाला आणखी माहीती हवी असेल तर ही साईट जरूर बघावी.त्यात त्यांनी कोणत्या औषधाने ते उपचार करतात तेही दिलेले आहे.
Pages