१. हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी घरी येईपर्यंत प्रिया एकदम गळून गेलेली असायची. अगदी खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागण्याइतपत. ऑफिसात कामात लक्ष एकाग्र करणं सुद्धा तिला खूप अवधड जायचं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण हल्ली तिची बरीच चिडचिडही व्हायची सारखी.. आणि कुणी काही बोललं की डोळ्यातनं आसवं गळायला सुरुवात.. अगदी जवळच्या व्यक्तींनापण प्रियाचं सारखं रडणं चांगलंच त्रासदायक झालेलं.
------
२. राहूलच्या घरातले सगळे त्याच्या आळशीपणामुळे वैतागलेले. कितीदा त्याला अभ्यासाला बस म्हणून सांगायचं - पण त्याचं लक्ष लागेल तर शपथ! आईनं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून नोकरीही सोडली - पण त्याचा राहूलच्या मार्कांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही (किंवा कदाचित आणखीनच वाईट परिणाम झाला). अगदी मागच्या वर्षीपर्यंत राहूलची गणना वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांमधे व्हायची - पण गेले काही दिवस तो इतका आळशी झालेला. सारखी झोप! बाबांचं मारून झालं - आईचं रडून झालं - सगळे उपाय करून झाले. परिणामतः राहूल आतल्या आत कुढत राहिला- आईबाबां चिंतेत.
------
३. सहावी सातवी पर्यंत हडकुळ्या असलेल्या मेधाचं वजन आठवीपासून एकदम चक्रवाढ व्याजानं वाढतच गेलं. लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा बरेच जण करतात तशी तिही जीमला जायला लागली - पण सातत्य हा तिचा प्रांत अगदी शाळेत असल्या पासून नव्हताच म्हणा. आधीच तिची उंची कमी. त्यात वजन जास्त - लग्न ठरता ठरेना. मेधाचं डिप्रेशन वाढतच गेलं - तिच्या फॅमिली फिजीशियननी तिला डिप्रेशनचं मेडिकेशन दिलं खरं- पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही तिच्यावर...
-------
४. 'कायद्याचं बोला' चित्रपटात निर्मिती सावंत कोर्टात सांगते - 'पहिल्या पासून अशी नव्हते मी.. पण मग थेरॉड झालं'.. आणि मग (स्वतःचाच) गळा पकडून दोनतीनदा म्हणते - 'थेरॉड थेरॉड'
(खत्री काम केलंय हो तिनं ह्या चित्रपटात.. too good - पण आत्ता विषयांतर नको!)
------------
५. काही वर्षांपूर्वी मला येणारी झोप बघून मला माझ्या एका मैत्रीणीनी सांगण्याचा प्रयत्न केलेला - की अग ही हायपो-थायरोईडिझम ची लक्षणं आहेत. पण कसं असतं बघा - कुठल्याही प्रोब्लेमसाठी आपण गृहीत धरतो- की हे जर वाईट असेल तर माझ्याबाबतीत घडणार नाही - मी तिच्या सांगण्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. पण कालांतरानं एका डॉक्टरनं माझ्या गळ्याकडे बघत "तुम्हाला कधीपासून थायरोईड डेफिशियन्सी आहे?" असं विचारलं आणि मैत्रीणीचं बोलणं केव्हाच सोईस्कर रित्या विसरून गेलेल्या मला जोरदार धक्का दिला. तपासणी केल्यावर माझ्यात थायरॉईडची कमतरता आहे हा शोध लागलाच शेवटी - आणि तसं म्हणायचं तर जरा उशिरानंच लागला - कारण तोपर्यंत वाढलेलं वजन - नैराश्य - अफाट झोप ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्याला चांगलाच नकारात्मक स्पर्श केलेला. अर्थातच माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या - जसं की माझ्या शिक्षणावर - नोकरीवर (आणि बहूतेक बुद्धीवरही
) काही दृष्य परिणाम झाला नाही (ह्या थायरॉईडनं घोटाळा केला - नाहीतर मी म्हणजे आईन्स्टाईनच व्हायचे हो!
) कॉलेजच्याच दिवसात मला माझा आयुष्याचा जोडीदार मिळला ज्यानं माझी चिडचिड-रडरड त्या period मधे अक्षरश: झेलली (हो, 'झेलणं' हा एकच शब्द असू शकतो त्या दिवसांतल्या माझ्या वागण्यासाठी). मेडिकेशन सुरु झाल्यावर माझ्या सगळ्याच त्रासांच जवळजवळ निराकरण झालं.
पण मला माहित नाही, कितीजण इतके नशीबवान असतील.
मी डॉक्टर नाही, त्यामुळे अर्थातच मी कारणांमध्ये खोल घुसत नाहिये - फक्त हा लेख वाचतील त्यांच्यामध्ये एक जाणीव यावी, कुणाला हा प्रोब्लेम असेल तर लवकर लक्षात येवून लवकर योग्य ती मदत मिळावी- किंवा ह्या काळात घरच्यांचा/जवळच्यांचा योग्य आधार मिळावा- एवढ्या एकाच हेतूनं मी हा लेख लिहितेय
(मी हायपोथायरोईड आहे हे निदान व्हायला कित्येक वर्ष जावी लागली - तसं कुणाचं होऊ नये इतकच!)
नक्की काय असतं बरं हे 'थायरॉईड' प्रकरण?
असं उदाहरण घ्या की तुम्हाला कार विकत घ्यायचीये. (ही कार काही डीलर कडे 'अशीच' तयार नाहीये- तुम्ही ऑर्डर दिलीत की मग मॅन्युफॅक्चरर कार तयार करणार )
मग ह्यात स्टेप्स काय आल्या? तुम्ही ऑर्डर देणे ही पहिली पायरी. मग कार तयार होणे ही दुसरी आणि मग ती कार डिलिव्हर होऊन तिचं काम सुरू करणार.
आता ह्या उदाहरणातले तुम्ही म्हणजे आपल्या मेंदूतली पिच्युटरी नावाची ग्रंथी. मॅन्युफक्चरर म्हणजे आपल्या गळ्यात असणारी फुलपाखराच्या आकाराची थायरोईड ग्रंथी.
ही पिच्युटरी ग्रंथी (म्हणजे आपल्या उदाहरणातले तुम्ही) थायरॉईड ग्रंथीला(मॅन्युफॅक्चररला) ऑर्डर देते की इतकं इतकं थायरॉईड (मला १५ कार हव्यात! :D) लागेल. ही ऑर्डर दिली जाते TSH ह्या हार्मोनच्या माध्यमातनं (पर्चेस ऑर्डरच म्हणा ना!) ह्यावर आपली मॅन्युफक्चरर (म्हणजे थायरॉईड ग्रंथी) दोन प्रकारचे हार्मोन तयार करते (आपली जय वीरूची जोडी). एकाला म्हणतात T3 (triiodothyronine) आणि दुसर्याला म्हणतात T4 (Thyroxine).
तयार झालेल्या ह्या हार्मोन्सच काम काय?
चयापचय (metabolism) राखणं हे ह्यांच काम - म्हणजे नक्की काय तर - शरीरात उर्जा तयार करणं, त्याचं विनिमय करून आपली कामं करायला इतर अवयवांना मदत करणं, शरीराचं उष्णतानियमन करणं- वगैरे.
---------
जेव्हा थायरॉईडचा प्रोब्लेम होतो तेव्हा नक्की काय होतं?
ह्यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे, थायरॉईडचे हार्मोन्स कमी पडणं - म्हणजेच हायपोथायरॉईडिझम आणि दुसरा म्हणजे ज्यात जास्त हार्मोन्स तयार होतात म्हणजेच हायपर थायरॉईडिझम (ह्याचे परिणाम हायपोच्या अगदी विरुद्ध! म्हणजे, माणूस हडकुळा होत जातो - डोळे बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात- झोप नीट लागत नाही.. माणूस restless होतो वगैरे)
BEHIND THE SCENE
हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा काय होतं?
ह्यात दोन गोष्टी असू शकतात
A. पिक्चुटरी ग्रंथीमध्ये काहीतरी गडबड असते.
म्हणजे वरच्या उदाहरणात - मॅन्युफॅक्चरर कार तयार करायला तयार असतो, पण तुम्ही ऑर्डरच द्यायची विसरता.
B. तुम्ही ऑर्डर देता पण मॅन्युफॅक्चरर ऑर्डरच्या प्रमाणात कार तयार करायला समर्थ नसतो.
म्हणजेच थायरोईड ग्रंथी गडबड करतात.
ह्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता. (आयोडीनयुक्त मीठाची जहिरात आठवली का?) ह्याचं कारण - आपली जी जय-वीरुची जोडी आहे ना (T3 आणि T4) तीच मुळी आयोडीनची बनलेली आहे.
ह्याची साधारण लक्षणं पुढील प्रमाणे -
१. थकवा
२. एनर्जी, उत्साहाचा अभाव
३. नैराश्य
४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ
५. कोरडी त्वचा
६. चेहरा सुजणे
७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे
८. स्नायू दुखणे, आखडणे
९. सांधेदुखी
१०. मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे)
११. नखं आणि केस ठिसूळ होणे.
१२. प्रचंड झोप येणे
१३. घट्ट शौच
अर्थात प्रत्येक माणसात सगळी लक्षणं दिसतीलच असं नाही. आणि वरची लक्षणं असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉईड असेलच असंही नाही. पण ह्यातली एक किंवा अनेक लक्षणं सातत्यानं दिसत असतील तर डॉक्टरशी consult केलेलं बरं!
आता वळूयात हायपरथायरॉईड कडे
ह्याची कारण अनेक (अगदी आयोडीन जास्त होण्यापासून व्हायरल इन्फेक्शन आणि इतर बरीच) - कारण अनेक पण परिणाम एक: जय-वीरुची जरुरीपेक्षा जास्त निर्मीती. आणि ह्या जास्त निर्मितीमुळे होतं काय? तर खालच्या पैकी एक किंवा अनेक लक्षणं दिसायला लागतातः
१. लक्ष केंद्रित न होणे
२. थकवा (पुन्हा तेच!)
३. मासिकपाळी संदर्भातील त्रास
४. शौचास जास्त वेळा जावे लागणे
५. जास्त घाम येणे
६. जास्त भूक लागणे
७. उष्णता सहन न होणे
८. वजन कमी होणे
९. Restlessness
१०. nervousness
११. थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे
१२. उडणारी नाडी (पल्स)
१३. हातांची थरथर होणे
१४. झोप नीट न लागणे
१५. खाज सुटणे
१६. डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे
१७. पुरुषांमध्ये स्तनांची वाढ
१८. अशक्तपणा
ह्यावर उपाय काय?
ह्यावर उपाय काय?
हायपरथायरॉईड लोकांकरता:
अ. अॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
ब. रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन
क. (गरजेनुसार) सर्जरी
(इतरही काही असू शकतात, पण माझ्या माहितीत इतकेच)
हायपोथायरॉईड लोकांकरता:
डॉक्टर रक्ताची तपासणी करून गरजेप्रमाणे कृत्रिम थायरॉईड खायला देतात.
साधारणतः ही गोळी सकाळी काहीही खायच्या आधी घ्यायची असते. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर थायरॉईड लेव्हल चेक करून डोस प्रमाणित करून घ्यावा लागतो. हायपोथायरॉईड स्त्री गर्भवती झाली की साधारणतः हा डोस वाढवावा लागतो (किती हे डॉक्टर रक्ततपासणी करून ठरवतात). बाळाच्या नीट वाढीकरता (आणि आईच्या आरोग्याकरताही) हे फार गरजेचं आहे.
भारतात कुणीही न सांगितलेली माहिती म्हणजे:
ह्या गोळ्या घेतल्यानंतर चार तासाच्या आत कॅल्शियम, लोह अथवा फायबर चं सेवन केल्यास खाल्लेल्या थायरॉईडचा नीट उपयोग होत नाही. म्हणून चार तासापर्यंत ह्या गोष्टी असलेल्या पदार्थांचं सेवन टाळा.
ह्या गोळ्या अनोशापोटी भरपूर पाण्याबरोबर घ्या.
ज्यांना हा त्रास असेल त्यांच्याकरता खास नोटः
मुख्य म्हणजे ह्याला औषध समजूच नका. तुमचं शरीर जे तयार करणार तेच तुम्ही बाहेरनं मिळवताय. म्हणजे आपण व्हिटॅमीनच्या गोळ्या खातो ना तसंच - असा विचार करा. आणि मुख्य म्हणजे "मीच का" असले कसलेही विचार मनात आणून देऊ नका. किवा ह्याचा बाऊ करून आजुबाजुच्यांचा गैरफायदा घेऊ नका (खूप असतं हो हे temptation -फायदा करून घेण्याचं
)
आजही एका आठवड्यात वजन वाढून - चांगले बसणारे कपडे अचानक न बसणं - मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.
मग काय - डॉक्टर कडून डोस अड्जस्ट करून घेते. रडरडीकडून पुन्हा एकदा आनंदीपणाकडे येते आणि एका आठवड्यात कमावलेलं वजन गमावण्याकरता शक्य असेल तेवढी जिम मारते. मधे आधे आवडते कपडे बसत नाहीत ह्याचं दु:ख होतं खरं - पण हे सोडता मी अगदी नॉर्मल जीवन जगतेय! आणि तसेही आपल्या बरोबर आहेतच की दशलक्ष अमेरिकन्स आणि न मोजलेले जगातले कितीतरी लोक!
लढण्यासारखी व्याधी नाहीचे हिला - हिला गुपचूप सोडून द्यायचं आणि आपलं कर्म (गोळ्या घेणे - योग्य वेळी तपासणी करणं, व्यायाम वगैरे) करत रहायचं झालं.
इतर कुठल्याही मायबोलीकरांना - फक्त मायबोलीकरांनाच नव्हे तर- कुणालाच हा त्रास होऊ नये हीच सदिच्छा!
विशेष सूचना : ही सर्वसाधारण माहीती आहे. कुठलंही निदान आणि औषधोपचारांसाठी certified medical practitioner चा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मला चार वर्षा पूर्वी हायपो
मला चार वर्षा पूर्वी हायपो डिटेक्ट झ्हले होते.
तीन वर्षे अल्टॉसिन एक एम जी वरून डोस कमी करत व प्राणायाम व आसाना मुळे वैद्यानी आता पूर्ण सोडवली.
वजन पण कंट्रॉल झाले आहे.
दर सहा महिन्यानी T3 T4 TSH Check karoon gheto.
आधी आयुष्य भर गोळी घावी लागेल असे होते.
शिल्पा, बाळाचे जन्मतः चेक
शिल्पा, बाळाचे जन्मतः चेक केले असेल ना. तुला शंका असेल तर लव्करात लवकर चेक केलेले बरे.
अग ज्ञाती, बाळ जन्मलं तेव्हा
अग ज्ञाती, बाळ जन्मलं तेव्हा त्यालाही नव्हत आणि मलाही पण आता माझी मलाच जरा शंका येतेय, बरिचशी लक्षणंही मॅच होतायत म्हणुन तपासणी करायची आहे. कारण गेले काही दिवस माझ बाळ्ही माझ्यासारख भरपुर झोपतय, जरा जाड ही होत चाललाय (जर हे सुदृढपणामुळे असेल तर चांगलच आहे), पण सुस्तीमुळे असेल तर माझ्यासारख, माझही वजनाने अचानक वेग धरलाय. इतरही लक्षणं आहेतच म्हणुन विचारले त्याला एवढ्यापासुन त्रास सुरु झाला तर माझ्यामुळे........?? अस होऊ शकतं का? Breastfeedingमुळे होऊ शकत का? कृपया अनुभवी नी ज्ञानी लोकांनी मार्गदर्शन करावे ही विनंती?
शिल्पा, चांगल्या डॉक्टरांना
शिल्पा, चांगल्या डॉक्टरांना विचारणं चांगलं..
मी तरी असं आज पर्यंत कुठेच वाचलं नाहिये की दुधामुळे बाळाला होतो.. पण डॉचं मत घेणंच बेस्ट!
तुला कळलं की आम्हालाही कळव नक्की!
रेव्यु, कुठली आसनं करता सांगा ना!
मी विपरीत करणी आणि कपालभाती ऐकलेलं - ते करते. पण फारसा काही फरक नाही जाणवला
(मी हे व्यायाम खूप नियमीत नाही करत अर्थात)
लिंबूटिंबू, लिंबिटिंबीना बेस्ट लक सांगा!
मी विपरीत करणी आणि कपालभाती
मी विपरीत करणी आणि कपालभाती ऐकलेलं - ते करते. >>> कुठलं ' कुजबुज' मधलं का ?
शिल्पा, काही वेबसाईटस
शिल्पा,
काही वेबसाईटस पाहिल्या.त्या सांगतात की आईच्या दुधातून बाळाला होऊ शकतो. पण डॉ. ना विचारून उपचार घेतलेले उत्तम.
मला एक प्रश्न आहे. भारतात हायपोसाठी कोणत्या स्पेशलिस्ट कडे जातात? मला इथे internal medicine doctor कडे जावे लागले. देशात काय परिस्थिती आहे?
सुंदर लेख नानबा.
सुंदर लेख नानबा.
शिल्पा तु बाळाला त्याच्या
शिल्पा तु बाळाला त्याच्या पेडि. कडे नेऊन तुझी शन्का सांग. बघ चेक करुन काही कळले तर.
खादाडमावशी, देशात फिजिशियन कडे जाऊ शकता.
नानबा सर्वान्गासन, नियमित
नानबा
सर्वान्गासन,
नियमित केल्याने थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होतो व ती पूर्ववत काम करू लगते असे वैद्य म्हणाले व माझा अनुभव तोच आहे.
http://www.yogalearningcenter
http://www.yogalearningcenter.com/asanas/ShoulderStand.cfm
Shoulder Stand Pose (Sarvangasana) [Shar - van - gahs - anna]
An all-encompassing infusion of health to all systems in the BodyMind - but go here carefully and gradually increase your stay at the peak of the pose. Remember that "going into" it, "being in" it and "coming out" of it is a controlled, balanced meditative movement.
Place a folded blanket so the upper back and shoulders can rest upon it for support. Lie on your back and ensure that your head and spine are aligned. Legs are straight and feet together.
Arms rest along the sides, palms down. Relax your entire BodyMind.
Press lower spine gently into the ground, contract the tummy muscles and raise the legs to the sky. Pressing down with arms and palms, smoothly lift the buttocks and roll the spine up and away from the mat.
Bend elbows and use your hands to support the backs of your rib cage.
Use each and every finger and the palms of each hand to make that connection of warmth and stability. The higher up you place your hands, the straighter your pose will be.
Notice how each vertebra feels as each slowly ascends. As the torso raises upward, notice the subtle movement of the cervical spine (back of the neck) Be aware of all sensations your experience.
Gently tuck chin into chest. Keep your chest expansive.
In the final phase, your legs are vertical, together, and in a straight line with the trunk of your body. Your shoulders, nape of neck and back of the head supports your body. The arms provide support. Your feet are completely relaxed. Your breath is slow, deep and rhythmic.
To return, bring straightened legs forward until your feet are above your head. Slowly release your hands and press the arms and palms into the mat for support. Contract the abdomen and gracefully descend, vertebra by vertebra. Lower the buttocks. Press lower spine into the mat as you lower your legs. Keep those knees straight. Retain the breath until you land.*
Rest. Let your heartbeat and breath quiet before proceeding. Notice all sensations running through your body.
Benefits:
The energy center (chakra) in the throat is particularly vitalized
Enriched blood flows to the brain and tranquilizes the mind
Thyroid and thymus glands are stimulated
Flexibility of the cervical spine is improved and the nerves running from the neck to the brain are toned.
Overall circulation of oxygen and blood is increased diminishing stagnant blood and fluids.
Cautionary Notes/Modifications
Advised not to practice this pose if you have an enlarged thyroid, liver or spleen; arthritis of the neck, slipped disc, heart ailment or advanced stages of pregnancy.
रेव्यु, माहितीकरता धन्यवाद...
रेव्यु, माहितीकरता धन्यवाद... तुम्हाला अनुभव आहे ही सगळ्यात बेस्ट गोष्ट (आता मी नक्की करेन म्हणजे.. इतके दिवस ऐकलेलं ते अनुभव नसलेल्या लोकांकडून, त्यामुळे चालढकल व्हायची)
ज्ञाती, शिल्पा, खादाडमावशी
भारतात एन्डोक्रायनोलॉजिस्ट बघतो/ते हे.. तो/ती असल्याच सगळ्या प्रकारात स्पेशॅलिस्ट असतो/ते.
(त्यालाच इथे इन्टर्नल मेडिसिन नाही म्हणत ना? मेडिकलच्या शाखांविषयी फारसं ज्ञान नाहिये, म्हणून शंका)
Endocrinologist is the best
Endocrinologist is the best person to consult for thyroid problems.
इथे अमेरिकेत पन
इथे अमेरिकेत पन एन्डो़क्रिनोलोगिस्ट असतात.
मला थायरॉईड चा प्रॉबलेम
मला थायरॉईड चा प्रॉबलेम गेल्या ५ वर्षांपासुन आहे. अपघातानेच तो कळला. ६व्या महीन्यात मिसकॅरेज झालं अचानक तेव्हा डॉ. नी चेक करायला सांगीतलं. नानबांमुळ एक नवीन द्रुष्टीकोन मीळाला. मला तर खुप राग यायचा, वाईट वाटायचं, सगळंच... कारण मी दोन जुळी मुलं गमावली आणि एवढ्च नाही तर अनेक संकटांना तोंड देत एका मुलीला २.५ वर्षांपुर्वी जन्म दीला. पण उलट मला हा प्रोब्लेम आहे म्हणुन माझ्या सासुबाईं ना वाट्लं की मुलीला पण असणारच कारण डॉ. टेस्ट करुन घ्या म्हणाले. आणी त्यासाठी खुप काही सुनावलं गेलं मला. पण सुदैवाने मुलीला नाहीये प्रॉब्लेम आत्तातरी. आज बरं वाट्लं लेख वाचुन, आता प्रिंट काढुन सासुला दाखवते. त्यांचा लेखांवर, टी.व्ही वर खुप विश्वास आहे.
२ वेळा माझं TSH 42 आणी ५८ वरं गेलं होतं.
सोयाबद्दलची काही धक्कादायक
सोयाबद्दलची काही धक्कादायक माहिती सापडली.>>>
नानबा सोयाबीन चा नक्की असर होतो थायरॉईड वर असं माझ्या बाजूला बसणर्या मैत्रिणीकडून कळलं तिला थायरॉईड कॅन्सर आहे.. तिला सोया चं काहीही ट्रीटमेंट च्या ३ तास आधी किंवा नंतर खायला नाही सांगितलय आणि शक्यतो नाही खाल्लं तर बरं असं सांगितलय.
ह्म्म.. वरदा शक्य असेल तर ही
ह्म्म..
वरदा शक्य असेल तर ही माहिती सोयाबीनच्या बाफवर पण टाक ना..
तो बाफ कुठे सापडेल?
तो बाफ कुठे सापडेल?
नानबा! खरंच फार छान लिहितेस
नानबा! खरंच फार छान लिहितेस हं तू! फारच माहितीपूर्ण पण मनोरंजक पद्धतीने लिहिलायस लेख! कारचं उदाहरण तर लै भारी
वरदा, तो बाफ बहुदा http://www.maayboli.com/node/13623 हा असावा.
मला हायपो थायरॉइडिझम आहे...
मला हायपो थायरॉइडिझम आहे... गेली तीनेक वर्षं थायरॅक्सिन घेतेय. आता परत पूर्वीची हायपोचीच लक्षणं दिसायला लागलीत. व्यायाम, खाणं-पिणं ह्यात बदल नाही. सगळ्यात कहर म्हणजे, ब्लड-टेस्ट्स मधे "हायपर" आलं आहे.
असा कुणाचा अनुभव आहे का? इथले डॉक्टर्स चक्रावलेत.
फार पुढे जाऊन भलभलत्या टेस्ट करण्यापूर्वी म्हटलं मायबोलीकरांना विचारून बघुया.
प्लीज मला सांगाल का?
हायपोथायरॉइड वर जी
हायपोथायरॉइड वर जी ट्रीट्मेण्ट असते तिचे काही साइड एफेक्ट्स अहेत का? मला अशी माहिती मिळाली आहे, की अल्ट्रॉक्सिन किंवा तत्सम औषधमुळे ह्रुदयाची धड्धड वाढणे वगैरे त्रास होतो. एखाद्या दिवशी गोळी घ्यायची राहिली तर जास्त बरं वाटतं....
क्रुपया मार्गदर्शन करा.
छान उपयुक्त अशी माहिती आहे !
छान उपयुक्त अशी माहिती आहे !
सगळे हायपो बद्दल
सगळे हायपो बद्दल लिहितायेत्..कुणी हायपर बद्दल पण लिहा की!
मीच लिहितो.
मला हायपर थायरॉडिजमचा त्रास डिटेक्ट झाला आहे. (म्हणूनच तर माहितीसाठी खास हा बाफ शोधून काढला ना!)
TSH लेव्हल काय्यच्या काय हो.... ०.०१
वजन ६ महिन्यांत १०३ वरुन एकदम ५८ वर.. (शेजारी पाजारी पण ओळखत नाहित मला आता!) १च महिना झालाय गोळ्या (Thyrocab) चालू करुन्..हळू हळू फरक जाणवतोय. वजन वाढायला सुरुवात झाली नसली तरी कमी होणं मात्र थांबलंय. कालच डॉ. नी डोस ४० mg वरुन ६० mg केलाय .. बघूया काय होतंय ते..
कधी कधी आरशात स्वतःकडे पहातानाच गम्मत वाटते.. वजन १०३ असताना मला सडपातळ झाल्याची स्वप्ने पडायची.. या व्याधीमूळे का होईना ते प्रत्यक्षात ऊतरलेय.. पण का कोण जाणे, मनापासून आनंद मात्र होत नाही..कधी एकदा ती पुर्वीची इंप्रेसीव्ह पर्सनॅलिटी परत मिळवतोय असं झालंय.
चिडचिड मात्र माझ्या स्वभावामूळे मी कशीबशी कंट्रोल केलीय... आणि झाली तरी बर्याचदा ती मनातच ठेवायचा प्रयत्न करतो. मधे तर मायबोलीवर बाफ पण उघडला होता '..तेव्हा माझी चिडचिड होते' या नावानं. तेव्हा काय माहित हो की शरिरात हे असलं काहितरी चाललंय!
तर दोस्तहो! वजन एकदम वाढायला/कमी व्हायला लागलं की तपासणी करुन घेणं हेच उत्तम!
मी आधी हायपो होतो.औषधान्नी
मी आधी हायपो होतो.औषधान्नी नॉर्मल टी३,टी४,टी एस एच झाले. ही २००६ ची गोष्ट्.मग एकापाठोपाठच्या सहा माही परिक्षणात नॉर्मल होते .मग डॉक्टरानी गोळ्या कमी कमी करत बंद केल्या.२००८ व २००९ आणि एप्रिल २०१० पर्यन्त बन्द होत्या.२००६ ते आत्ता पर्यन्त सर्वान्गासन व इतर काही योगाभ्यास चालू होता.एप्रिल २०१० च्या तपासणीत टी एस एच ०.००६ आले .दरम्यानच्या/ आधिच्या काळात माझे वजन ९५ वरून ८८ व मग ८३ कि. ला आले होते.मे पासून आता हायपर ते नॉर्मल साठी गोळ्या (निओ मेर्काझोल ५ एम जी १-१-१-व सिप्लॉक्स एल ए २० एम जी १-०-० चालू केल्या.कालच्या तपासात टी एस एच २.१ म्हणजे नॉर्मल असून वजन घटण्याचे थांबले आहे.
आता गोळ्या कमी करून टी एस एच स्टेबल करण्याचा उपक्रम डॉक्टर करीत आहेत.
सर्वांगासनाने व इतर योगाभ्यासाने उपयोग होतो विशेषतः: मानसिक त्रास कमी होतो.
अविकुमार जी
काळजी करू नका.मी नदीच्या दोन्ही तीरावरून हिंडून आलो आहे. नक्की नॉर्मल व्हाल.:)
दाद मी हायपो ते हायपर चा
दाद
मी हायपो ते हायपर चा प्रवास वर लिहिलेला आहे.
तुमची केस तत्सम वाटते आहे
अविकुमार.... हायपर च्या वेळी
अविकुमार.... हायपर च्या वेळी थकवा येत नाही, झोप कमी होणं, खुप एनर्जीटीक वगैरे वाटणं होतं का? प्लिज तुमचे अनुभव शेअर कराल का? नक्की काय मनस्थिती असते? हायपरचा मुख्य त्रास काय असतो? समजा कोणी हायपर साठी ट्रिटमेंट घेतलीच नाही तर काय होउ शकते? (तुमची डॉ. बरोबर बरीच चर्चा झाली असणार म्हणुन विचारत आहे....)
मानसिक त्रास(रडरड) असल्या
मानसिक त्रास(रडरड) असल्या गोष्टी मी गोळ्या रेग्युलरली घेऊनही मधेआधे अनुभवते.>>>
अगदी अगदी... मलापण असा होत मधून मधून...
मला ३रीत असतांनाच झाला होतं.. पण योग्य ट्रीटमेंट मुळे... m normal
रोज २ गोळ्या खाते... पण त्रास असा काहीच नाही....
भुक लागणे वगैरे सध्या गोष्टी सोडल्या तर... कारण त्या गोळ्यांमुळे भुक लागते... आणि खायला नाय मिळाल तर... प्रचंड थकल्यासारखे वाटणे.. वगैरे... एकदाका पोटात पडल की मग २ मिनटात नॉर्मल... पण ज्यांना हायपो थायरॉईद असेल.. त्यांनी गोळ्या १ दिवसही चुकवू नये... रोजच्या रोज घ्याव्याच लागतात
रेव्यू, मला हाशिमोटोज आहे.
रेव्यू, मला हाशिमोटोज आहे. म्हणजे ओटोइम्यून थायरॉईडचा. माझ्या इम्यून सिस्टिमने एक दिवस ठरवलं की, हे थायरॉईड ग्रंथी वगैरे अवैध आहे... बंद करा ती थेरं

थोड़क्यात काय तर माझ्या ग्रंथी मजेत आहेत... माझं शरीरच त्यांना काम करू देत नाही. त्यामुळे मी "आपणहून" हायपो वरून हायपर जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच ग्रंथी काम करायच्या बंद होत्या आणि आता चालू झाल्यात असं होणं वैद्यकीयदृष्ट्या शक्यं नाही....
पण चमत्कार घडतात... माझ्या ह्या असल्या बाबतीत तर खूपच
असो... बघूया काय काय बघायला मिळतं ते. इथे काही लिहिण्यासारखं असल्यास जरूर लिहीन.
(ह्या नानबाची कुणीतरी दृष्टं काढा एकदा... छान जागा दिलीये आपल्यासारख्यांना)
ह्यावर मी निबंध लिहिन, तरी
ह्यावर मी निबंध लिहिन, तरी थोडक्यत लिहिते.
अशी माझी गोष्ट,
माझे वजन कसे मस्त रहाते अश्या विश्वासात रहायची, काहिहि खाल्ले तरी वाढत नाही व जिम देखिल मस्त करते असे कौतुक होते(व आश्चर्य वाटायचे आजूबाजूच्या वजन वाढणार्या बाया पाहून कि काहि करत नाहित ह्या).
मध्ये न्युमोनिया झाला व तो बरा होवूनही कायम थकवा.. चिडचिड, भूक न लागणे, केस गळणे सुरु झाले. हे सुद्धा न्युमोनियाचे प्रताप समजून जिम पुन्हा सूरु केला आजारानंतर.
एरवी १ तास मस्त धावायची ट्रेडमिलवर तर ५ मिनिटात पडणार कि काय वाटायला लागले. वाटले जरा वेळ लागेल शक्ति भरायला,थकवा येणारच. बरे जेवण कमी खावूनही अचानक १० किलो वाढले. आजारात १८ किलो कमी झालेले त्यामुळे १० किलो वाढल्याने जाड निश्चित दिसत न्हवते पण मग असे वाढतच गेले. त्याबरोबर कायम थकवा, जिमला जायचा आळस, नैराश्य आले अचानक. जॉब सोडलाच मग कारण थकवा खूप वाटायचा. मग चक्कर यायला सुरुवात झाली. दोन पावलं टाकली तरी गरगरतेय आजूबाजूला व्हायचे. त्यावेळी अमेरिकेत एकटी होते.. मग एकटीच आहेस ना म्हणून होतेय.. इथे ये करून भारतात आले.
तर बायांनो तुम्ही TSH बरोबर free T4, T3 ची टेस्ट करूनच घ्या वार्षिक.
आता मला गोळी नाही घ्यावी लागत पण योगासनं मुख्यतः प्राणायाम करून बरेच यशस्वी झालेय.
बाप रे, घाबरुन गेले आहे मी.
बाप रे, घाबरुन गेले आहे मी. मला सध्या खुप झोप येते. मला वाटलं उन्हाळा किंवा असंच आळशीपणा. या विकेंडला जाउन टेस्ट करावी म्हणते.
मुख्य म्हणजे, याची टेस्ट दर
मुख्य म्हणजे, याची टेस्ट दर सहा महीन्यांनी करावी. TSH, T4, T3 नेहेमी बदलू शकतो.
Pages