Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मारुती चितमपल्लींची सर्वच
मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.
मारुती चितमपल्लींची सर्वच
मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.
मारुती चितमपल्लींची सर्वच
मारुती चितमपल्लींची सर्वच पुस्तके छान आहेत.
आनंद यादव यांच झोंबी अप्रतिम
झाडाझड्ती, काचवेल , नांगरणी पण मस्त आहेत.
किरण बेदी च its always possible आयुष्यात एकदा तरि वाचाव असं आहे.
बराक ओबामा यांच dreams of my father हि छान आहे.
Connect the dots - Rushmi Bansal
अजून बरीच आहेत लिहीन परत कधितरी.
आशिष बुक सेन्टरचं पुस्तक
आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन चर्चगेटला सुंदरबाई हॉलमध्ये भरलंय २ मेपर्यंत, ९:३०-८:३०
Dave Barry's Money
Dave Barry's Money Secrets
ज्यांनी असली फायनान्स गुरु वाली पुस्तके वाचली असतील त्यांना लय लय आवडण्यासारखे.
वाचलेय का कुणी? मस्त पुस्तक आहे! पर्सनल फायनान्स, मनी मॅनेजमेन्ट अॅडव्हाइस वगैरे वर टिपिकल पुस्तके असतात, त्यांचे विडंबन असा एकूण फॉर्मॅट !! कुठलेही पान उघडून वाचावं आणि हसावं
सुरुवातीलाच एक क्विझ पहा:
Not counting your mortgage, how much money do you currently owe?
1. Less than $............
2. More than $.............
3. Men are threatening to cut off my thumbs.
How would you describe your portfolio?

तो येतो, काहीतरी "Ambiguous remark" टाकून जातो अन लोक त्याचा अर्थ लावत बसतात... "Greenspan is crafty in his choice of words, for example, .... years ago he made a remark in his speech ' what has one foot each side and one in the middle' this remark sent shock waves all over the world economy. Investors lost $14 trillion, several hundred corporations went bankrupt and loss of millions of jobs , and it was'nt until a month later that economists figured out that answer to his question was simply 'a yardstick' 

1. Conservative, mainly bonds and blue-chip equities.
2. Aggressive, mainly options and speculative stocks.
3. My what?
एकेक चॅप्टर्स अन टिप्स म्हणजे उदा "Why good colleges cost so much, and how to make sure your child does not get into one"
"An absolutely foolproof system for making money in the stock market, requiring only a little effort (and access to time travel)"
अॅलन ग्रीनस्पॅन ,सुझी ऑर्मन यांचे तर जबरी पाय खेचलेत !! विशेषतः ग्रीनस्पॅन. त्याची तुलना "पन्क्स्वटानी फिल'" या "प्रोफेशनल ग्राउंडहॉगशी" केली आहे
एकूण मजा आली वाचताना
अजून थोडे डीटेल्स इथे वाचता येतील>> http://www.randomhouse.com/book/9117/dave-barrys-money-secrets-by-dave-b...
जबरी दिसते पुस्तक मैत्रेयी,
जबरी दिसते पुस्तक मैत्रेयी, वाचायलाच पाहिजे
लोल, मस्त दिसते पुस्तक, मी पण
लोल, मस्त दिसते पुस्तक, मी पण वाचेन. पण फायनान्स गुरु टाईप पुस्तक वाचावितच कशाला.
सध्या राल्फ इलिसनचे इन्वीजिबल मॅन वाचतोय. अफाट आहे. मस्ट रिड.
विदुर महाजन यांचे 'मैत्र
विदुर महाजन यांचे 'मैत्र जीवाचे' वाचलं. अतिशय उत्तम मनोगत आहे. दु:खद घटनेनंतर आलेल्या मनातील भावना आहे तश्या मांडल्यात आणि त्या सच्च्या असल्याने भावतात. अक्षरवार्ता मध्ये चिनूक्सने याचा समावेश केलाय याबद्दल त्याचे आभार.
'आहे कॉर्पोरेट तरी' वाचलं , संजय जोशी यांचा कॉर्पोरेटमधील नवखा ते अकाली (??) निवृत्तीच्या निर्णयापर्यंत झालेला प्रवास यात मांडलाय, त्यांच्या निवृत्तीचा निर्णय घेतानाच्या कालावधीतील क्रुती आणि विचार जास्त आवडलं.
'पुणे ते पंतप्रधान कार्यालय' हे श्री. पी. बी. देशमुख, माजी सनदी आधिकारी, यांनी लिहिलेलं पुस्तक मस्त आहे. IAS झाल्यानंतर पुणे ते पंतप्रधान कार्यालयापर्यंतचा प्रवास अतिशय संयम्पूर्वक सांगितलाय. देशमुख यांनी १९५५ ते १९९३ पर्यंत सरकारी सेवेत काम केल्यामुळे तत्कालीन राजकाराणाचे ते साक्षीदार ठरले व त्या सार्या घडामोडी त्यांनी या पुस्तकात दिल्यात. सचिव, मंत्रालयातील कर्मचारी, आयुक्त या पदांवरच्या माणसांचे कर्तव्य हे नागरिकशास्त्रात वाचलेले होते, पण प्रत्यक्षात केवढा मोठा आवाक असतो हे या पुस्तकामुळे जास्त कळालं. भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल उस्तुकता असेल आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदारीकरणापर्यंतचा भारताचा प्रवास कसा झाला हे एका प्रशासकीय आधिकार्याच्या नजरेतून, अनुभवातून आलेले लिखाण नक्की वाचायाला हरकत नाही.
पॅट्रिक सस्किंडचे
पॅट्रिक सस्किंडचे 'परफ्यूम-स्टोरी ऑफ अ मर्डरर' वाचले. अफलातून आहे. अमानवीय गंधक्षमता असलेला एक अनाथ, जगातील सर्वात प्रभावी सुगंध बनवायचे त्याचे वेड आणि त्यातून झालेला भयानक गुन्हा...
एखादी जागा, व्यक्ती वा प्रसंग यांचे वर्णन केवळ त्याच्या गंधाच्या परिभाषेतून वाचणे हा एक खास अनुभव आहे. शैलीतला प्रचंड फरक सोडल्यास या लेखकाच्या मनोवॄत्तीचे जी.एं.शी फार साधर्म्य आहे. दैवशरणता, निहिलिझम, मानवी प्रवृत्तीची एकाचवेळी असलेली दया आणि तिरस्कार....
इतकेच काय पण सस्किंडबद्दलच्या विकिपिडीआ पानावरील पहिलेच वाक्य जीएंशी असलेले साम्य दाखवते
' The public knows little about Patrick Süskind. He has withdrawn from the literary scene in Germany and never grants interviews or allows photos.'
परफ्यूम-स्टोरी ऑफ अ मर्डरर>>>
परफ्यूम-स्टोरी ऑफ अ मर्डरर>>> आय गेस ह्यावर सेम नावाने पिक्चर पण आलेला आहे. बघितलायस का रे?
भयंकर आहे परफ्युम... अंगावर
भयंकर आहे परफ्युम... अंगावर येतं, किळसही येते मधे मधे पण तरी पुस्तक हातून सोडवत नाही...
सेम गोज विथ द फिल्म!
सिनेमा नाही पाहिला पण तो
सिनेमा नाही पाहिला पण तो तितका प्रभावी नाही असे कळते.
नी, अनुमोदन! बीभत्स 'रस' का असू शकतो ते कळतेच!
सिनेमा नाही पाहिला पण तो
सिनेमा नाही पाहिला पण तो तितका प्रभावी नाही असे कळते.>>>
मी पाहीलाय स्टार मुव्हीजवर. (बर्याचदा असतो) आवडला होता!
@ आगाऊ ~ एका आगळ्यावेगळ्या
@ आगाऊ ~ एका आगळ्यावेगळ्या विषयावरील पुस्तकाबद्दल तुम्ही इथे लिहिले त्याबद्दल अभिनंदन. विशेष म्हणजे मी (टॉम टिकवेरमुळे) प्रथम चित्रपट पाहिला आणि सादरीकरणापेक्षा कथेतील नाविन्यामुळेच असेल, नंतर कादंबरीकडे वळलो. कादंबरी वाचल्यानंतरच जाणवले की, दिग्दर्शकाने विलक्षण अशा कथेला उचित न्याय दिला आहे. विशेषतः कलाकारांची निवड [एक डस्टिन हॉफमन सोडल्यास कुणीही नावाजलेला कलाकार नाही] आणि तो काळ जिवंतपणे उभा करणे. कलादिग्दर्शकालाही पैकी पैकी गुण द्यावे लागतील.
सस्किंड आणि आपले जीए यांची तुलना फक्त दोघेही "पब्लिक प्रिय" होऊ इच्छित नव्हते एवढ्यावरच होऊ शकेल. [सस्किंड अद्याप हयात आहे आणि कदाचित आता उतरत्या वयात - साठी ओलांडली असल्याने - तो आपला विचार बदलतीलही. जी.ए. मात्र अगदीच 'तुसडे' नव्हते. ते एकांतप्रिय होते असे म्हटले तर न्यायाचे ठरेल. 'लेखक वाचकाला त्याच्या साहित्यातूनच भेटला पाहिजे' या मतावर ते ठाम होते आणि प्रचंड पत्रव्यवहारातून ते अधिकच खुलत गेले असल्याने इतरांशी त्याच माध्यमातून मनमोकळेपणे वागण्याचा त्यांचा तो स्थायिभाव बनला होता. सस्किंडने स्वतःबद्दल कायमपणे (त्याच्याबद्दल जितके वाचले त्यावरून म्हणत आहे) एक प्रकारची पराभूत मनोवृत्ती ठसवली असल्याने आपण जे काही लिहिले आहे ते खुलेपणाने सर्वत्र स्वीकारले जाईल की नाही याबद्दल तो नेहमीच साशंक राहिला. इतकेच नव्हे तर 'परफ्युम...' कादंबरीलाला जर्मनीत न भूतो अशी प्रसिद्धी लाभूनही चक्क २० वर्षे त्याने त्याचे 'राईट्स' चित्रपटासाठी दिले नाही. कारण? परत तीच शंकेखोर मनोवृत्ती, जसे त्याच्या मते कथानक 'चित्रपटासाठी अयोग्य आहे'. पण शेवटी जर्मन दिग्दर्शक टॉम टिकवेरने त्याला पटवलेच. [याच टॉमचा "रन लोला रन" हा चित्रपटही त्यातील कथानकाच्या वेगाने आणि हाताळणीने अफलातून बनला आहे. इथल्या चित्रपटप्रेमी सदस्यांनी तो चुकवू नये असाच आहे.]
दोन्हीमुळे - कादंबरी आणि चित्रपट - सस्किंडचे नाव सर्वतोमुखी झाले असले तरी त्याने 'गर्दीत मिसळणे' टाळले आहेच. आजही दक्षिण फ्रान्सच्या मोन्टोली या छोटेखानी आणि पुस्तकप्रेमी शहरात तो एकांतवासात राहतो [हा चौक म्हणजे पुण्यातील अप्पा बळवंत चौकच आहे. सर्वत्र पुस्तकाची आणि साहित्य निर्माण करणारे आणि साहित्यप्रेमींची त्यावरच चर्चा करण्याची ठिकाणे असलेला. अर्थात खूपच शांत वातावरण असते चहुबाजूने. अप्पा बळवंत चौकासारखा गर्दीचा कोलाहल अजिबात नसलेला. येथील कॅफेटेरियात सायंकाळच्या सुमारास तो समवयस्क मित्रांसमवेत रेंगाळताना दिसतो. हे मित्रही 'लेखक'च असतील असे अजिबात नाही. जी.एं.चे साम्य इथे दिसते. खुद्द जी.ए.ना धारवाडमधील 'रमी क्लब' अत्यंत प्रिय होता. तिथे त्याना एकही मराठी अक्षर न वाचलेला ग्रुप भेटत असल्याने त्या लोकांत ते जास्तच खुलत. असतो स्वभाव एकेकांचा !]
@ नीधप ~ किळसवाणे वाटले तरी 'पुस्तक हातून सोडवत नाही' हे फार छान लिहिले आहे तुम्ही. किंबहुना त्या पुस्तकाचे (आणि चित्रपटाचेही) त्यामुळेच यश जास्त अधोरेखीत होते. ज्या अर्थी नवरसात 'बीभत्स' रसाला स्थान दिले आहे, त्या अर्थी त्याची सौंदर्याची एक आगळीच अनुभूती असणार हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. 'रौद्र' आहे म्हणून 'शांत' रसाला महत्व आहे. केवळ शुद्ध शांत रस जीवनात राहिला तर जीवनही साचलेले एक डबकेच होईल. रौद्र आणि बीभत्स हे प्रवाही रस मानले जातात, ते जीवन खळखळते ठेवण्यास कारणीभूत आहेत.
'परफ्यूम' कादंबरी आणि चित्रपटाच्या यशाचे गमकही आपल्या त्याच प्रवृत्त्तीत असावे.
मी मायबोलीची सभासद तशी
मी मायबोलीची सभासद तशी केव्हाचीच होते, पण स्वत:हून आपले मत (कष्ट करून) लिहिणे, हा पिंड नसल्याने प्रतिक्रिया देण्याऐवजी माझा मायबोलीच्या 'वाचना'वरच जास्त भर होता. तसं पहायला गेलं तर इथे कितीही वाचा, कमीच वाटतं/पडतं. पण आज कधी नव्हे तो एक खजिना हातात लागला : 'मी वाचलेले पुस्तक' चा धागा मिळाला आणि मी एका बैठकीत सगळी पानं वाचून काढली. मी वाचलेल्या किंवा मला आवडलेल्या पुस्तकांशी संबंधीत चर्चा वाचूनही "मssssssssस्त" वाटले. इथे उल्लेखलेली बहुतांश पुस्तके मी वाचली आहेत, अर्थात बरीच नव्याने कळालीही. त्याबद्दल या धाग्यावर प्रतिक्रिया देणारया प्रत्येकाची मी मनापासून आभारी आहे. विशेषत: @चिनुक्स: ला सांगावेसे वाटते: (जरी मी यथा-तथाच वाचन केले असेल तरी) तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेशी मी अक्षरश: १००% सहमत आहे. आजपर्यंत माझ्या पुस्तकांच्या आवडीशी इतकी मिळती-जुळती आवड कुणाचीच नव्हती - अगदी मीना प्रभु यांच्याविषयी तुम्ही केलेल्या विधानांसकट, किंवा अगदी २०१० मधली अनिल अवचट यांच्या निमित्ताने झालेल्या चर्चेतील उत्तरांसकट.
असो.
@जुईली: 'एक होता कार्वर' किंवा वीणा गवाणकर यांची कुठलीही पुस्तके अनुवादित नसतात. त्या फ़क्त खूप अनोळखी किंवा परदेशातील व्यक्तिंची चरित्रे लिहितात त्यामुळे कदाचित असा गैरसमज झाला असावा.
@साधना: 'व्हाईट टायगर' पाच मिनिटांत फेकुन दिले. >> पूर्ण अनुमोदन. माझा बुकर पुरस्कारावरचा विश्वास उडाला.
@राखी: देनिसच्या गोष्टी रसिक साहित्य मधे मिळतं.
शेवटचे पान वाचून संपवले तेव्हा मला जाणवले की मी नुसती वाचकाची भूमिका घेणे निव्वळ स्वार्थीपणा आहे. तेव्हा जमेल तेव्हा मी नक्की प्रतिक्रिया देत राहीन. आता त्याची भरपाई म्हणून मी आतापर्यंत वाचलेल्या/वाचायच्या पुस्तकांची यादी बनवलेली आहे, तीची लिंक इथे देते आहे. अर्थात ही यादी पूर्ण नाही आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
गेल्या वर्षी आलेल्या
गेल्या वर्षी आलेल्या "महाराष्ट्र देशा" मधल्या सुंदर एरिअल फोटोग्राफ्स मुळे उद्धव ठाकरेंच्या वारी बद्दलच्या फोटोबुक बद्दल खुप उत्सुकता आणि अपेक्षा होत्या. बर्यापैकी निराशा हाती आली. कदाचीत वारकर्यांच्या भाव भावना टिपायला एरिअल फोटोग्राफी योग्य माध्यम नसेल.
त्यापेक्षा काही वर्षांपुर्वी आलेले "वारी- एक आनंदयात्रा" हे संदेश भंडारे यांचे पुस्तक लिखाण आणि फोटोग्राफ्स या बाबतीत उजवे वाटते.
मंगला नारळीकरांचं 'पाहिलेले
मंगला नारळीकरांचं 'पाहिलेले देश, भेटलेली माणसं' वाचलं. पुस्तकाचं नाव पाहिलेले देश : तिथले वृक्ष आणि संग्रहालये असं हवं :). पाकिस्तान, कंबोडिया सोडले तर माणसांचे उल्लेख खूपच कमी.
तरी पण एका वेगळ्या नजरेने केलेले पर्यटन आवडले.
आजच डॉ. कौमुदी गोडबोले यांचे
आजच डॉ. कौमुदी गोडबोले यांचे 'जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख' हे पुस्तक वाचलं. माझ्यासारख्या Absolute Non-medicine background च्या व्यक्तीलाही सहज कळेल, अशा शब्दांत लिहीलेलं, अतिशय माहितीपूर्ण, तरीही छोटेसे पुस्तक आहे.
या पुस्तकाविषयी सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक परंपरेने कळत-नकळत तयार झालेल्या चुकीच्या कल्पनांना दूर सारून, आपल्या मनात नवीन प्रश्न तयार करते, आणि पुस्तक संपता संपता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतात.
शेवटची २ प्रकरणं तर 'सोने पे सुहागा'! कारण तोपर्यंत मिळालेल्या माहितीचे प्रमाण जास्त आणि त्याचे आपल्या जीवनातले स्थान याचा फारसा संबंध नसतो (अर्थात तसे रुग्ण माझ्या माहितीत जवळ्पास नसल्यानेही असेल), पण या शेवटच्या प्रकरणांमधे लेखिका जेनेटिक्सचं माणसाच्या जीवनातील स्थान नकळत पटवून देते. (त्या फार उत्तम समुपदेशक असाव्यात, असं माझं मत झालं आहे.) त्यानिमित्ताने माझीच याविषयी माझ्याच मनात तयार होत असलेल्या, किंवा जवळ-जवळ तयार झालेल्या मतांची तावून-सुलाखून उजळणी होवून डोक्यात फिट्ट बसलेली 'पक्की' मते तयार झाली, असं वाटलं.
जमल्यास नक्की वाचा.
पुस्तकः जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख
लेखिका: डॉ. कौमुदी गोडबोले
प्रकाशनः राजहंस प्रकाशन, पुणे.
किंमतः १२० रुपये
धन्यवाद dhaaraa. पाटील- बरे
धन्यवाद dhaaraa.
पाटील- बरे झाले सांगीतले.
भरत-
आगावा, अरे ते पुस्तक माझ्या
आगावा, अरे ते पुस्तक माझ्या वाचण्यात आले नाही कधी. पण Perfume - The Story Of Murderer
हा जबरदस्त आवडता सिनेमा आहे माझा ! खरोखर त्या मुलाचं परफ्युमबद्दलचं वेड जबरदस्त खिळवून ठेवतं रे. तो सिनेमा पाहताना.
मिलिंद बोकीलांचं बहुचर्चित
मिलिंद बोकीलांचं बहुचर्चित 'झेन गार्डन' वाचते आहे. सशक्त, ठाशीव कथा. एकेक कथा गिरवून गिरवून ठळक आणि रेखीव केल्यासारखी. त्यातली 'आरंभ' ही कथा वाचताना बोकीलांच्या कल्पनाशक्ती, खोलवर विचार करुन तपशीलात कोणत्याही प्रकारचे लूज एंड्स न ठेवण्याच्या जागरुकतेपुढे अक्षरशः थक्क होऊन जातो. आणि शेवटची 'झेन गार्डन' म्हणजे संपूर्ण कथा आजवरचं कित्येकदा स्पर्शून गेलेलं अव्यक्त निवेदन आहे.
संदीप वासलेकरांचे 'एका दिशेचा
संदीप वासलेकरांचे 'एका दिशेचा शोध' (राजहंस) वाचले आहे का कुणी? परीक्षणांवरुन अतीशय वाचनीय वाटते आहे.
http://www.indiapossible.in/ वरुन कळले. ती साईट पण चांगली आहे.
सुमा करंदीकर यांचे `रास'
सुमा करंदीकर यांचे `रास' वाचले.
आधी रैना यांनी लिहिल्याप्रमाणे "रास. नितळ आणि प्रामाणिक. रोखठोक. सहचरातील प्रातिभशक्तीची यथायोग्य जाणीव, स्वीकार आणि आदरही. पण व्यक्तित्व नाही झाकोळत सुमाताईंचे" हे तर आहेच.
पुस्तकाचे स्वरूप एखाद्या आजीनी आपल्या आठवणी सांगाव्यात तसे वाटले. आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांची माहिती काढून ती जाणीवपूर्वक नोंदवलेली आहे.
वाचताना मला सतत लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेची आठवण होत राहिली. (आता ते काढून पुन्हा वाचणं आलं).
गृहिणीच्या श्रमांचा मोबदला म्हणून नवर्याच्या नोकरीतून येणार्या पगाराचा काही हिस्सा तिला हक्काने मिळायला हवा, असं मत मांडताना नवर्यानेही गृहकृत्यांत वाटा उचलावा, असं त्या सुचवत नाहीत. त्यांना स्वत:ला अशा मदतीचा तापच झाल्याचा परिणाम.
`उपास धरणे सोपे असते, पण सोडणे फार कठीण असते' याचे कारण सुमाताईंनी सांगितलेय; त्यामुळे माझी आई "आता एवढी वर्षे करते आहे, तर आताच कशाला सोडू उपास" असे का म्हणते ते कळले.
एकंदरित समाधानाचा सूर सुखावून जातो.
अस्चिग दिलेली साईट उघडत
अस्चिग

दिलेली साईट उघडत नाहीये
मी कुणास्तव कुणीतरी (यशोदा
मी कुणास्तव कुणीतरी (यशोदा पाडगावकर) आणि त्यानंतर रास असे लागोपाठ वाचले.
पहिले वाचताना का वाचतोय हे आपण असे सतत वाटत राहिले आणि दुसरे वाचताना संपूच नये असेही.
रास खुपच रोखठोक आहे - हे असे घडले. कुठेही सहानुभुती मिळ्वायचा प्रयत्न नाही. मी किती सोसले असा आव तर अज्जिबातच नाही. काहीवेळा असेही वाटले की थोडे अजुन विस्तारून लिहिले असते तर? किती गोष्टी कळल्या असत्या अजुन. आवडलेच एकदम पुस्तक ते.
सध्या मी सुनीता देशपांडे
सध्या मी सुनीता देशपांडे यांचे "सोयरे सकळ" हे पुस्तक वाचतेय. फार सुंदर पुस्तक आहे.
मिनोती, 'कुणास्तव कुणीतरी'
मिनोती, 'कुणास्तव कुणीतरी' बद्दल पूर्ण अनुमोदन. 'नाच गं घुमा' नंतर प्रसिध्द नवर्याच्या तक्रारी करण्यासाठी पुस्तकं लिहीतात की काय असं वाटलं. 'आहे मनोहर तरी' मधे प्रामाणिकपणा, स्वतंत्र व्यक्तिमत्व जाणवतं. तसं बाकी पुस्तकांबाबत नाही म्हणता येणार.
श्रीकांत इंगळहळीकरांचे
श्रीकांत इंगळहळीकरांचे 'आसमंत' हे पुस्तक आजच घेऊन आले आणि एकदा वाचायल सुरुवात केल्यावर पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववलं नाही. निसर्गनिरीक्षणांवर आधारित लेखांचा संग्रह ह्या पुस्तकात आहे - सोबतीला झाडांचे, फुलापानांचे, पक्ष्यांचे सुरेख फोटो आणि चित्रं आहेत. अतिशय आत्मियतेने इंगळहळीकरांनी निसर्गाबद्दल लिहिले आहे. करोला पब्लिकेशन्स, आणि किंमत २२० रुपये. वर्थ इट.
सुनिताबाईंचे "आहे मनोहर परी "
सुनिताबाईंचे "आहे मनोहर परी " छानच अहे. मनाला भिडणारे आहे
कुणी अल्मोस्ट सिंगल हे
कुणी अल्मोस्ट सिंगल हे अनुवादित पुस्तक वाचलंय का?
Pages