विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> अनेक स्टार मंडळी, नेते आणि आजी-माजी खेळाडुंनी सामन्याचा आनंद घेतला पण ८३ च्या विजेत्या संघाचे कप्तान आणि इतर खेळाडु कुठे दिसले नाहीत

त्यापैकी गावसकर व शास्त्री कॉमेन्ट्री करत होते. मोहिंदर अमरनाथ नॅशनल दूरदर्शन चॅनेलवरच्या फोर्थ अंपायर या कार्यक्रमात सामन्यापूर्वी, पहिल्या डावानंतरच्या व सामन्यानंतरच्या चर्चेत सहभागी होता. कपिलदेव बहुतेक आजतक वर होता. श्रीकांत निवडसमितीचा अध्यक्ष असल्याने प्रेक्षकांतच कुठेतरी असणार. वेंगसरकर प्रेक्षकात बसून सामना बघताना अनेकवेळा दिसला. मदनलाल व किरमाणी देखील कोणत्या तरी न्यूज चॅनेलवर होते. बिन्नी, संधू, कीर्ति आझाद, यशपाल शर्मा, संदीप पाटील, सुनील वॉल्सन मात्र कुठेही दिसले नाहीत.

सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!)
पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)
फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)
आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
जय श्रीराम,
जय हिंदुस्तान

युवराज ची 'ती' स्पेशल व्यक्ती कोण? कुणाला समजलं का?

रच्याकने,त्या एनडीटीने त्यावर पण समस पाठवून पैसे कमवण्याचा धंदा सुरु केलाय. Happy

एनडीटीने त्यावर पण समस पाठवून पैसे कमवण्याचा धंदा सुरु केलाय >>सही..................:-) अवघड आहे.
ती पुनम पांडेपण खुष (???) असल आज

मी माझ्या मित्रांबरोबर आणि मायबोलीबरोबर पाहिली मॅच. लय दंगा केला. त्याला जिंकल्यामुळे चार चांद लागले..

मास्तर, खुश आहात ना!! वेडपटासारखं मैदानावर नमाज पढणे, टॉस हरुनसुद्धा पुन्हा टॉस करणे असल्या गोष्टींचा आपल्या टीमवर काही परिणाम झाला नाही. शेवटी सगळ्यांना पुरून उरले आणि जिंकलेच! Happy

धोनी भारी खेळला. शेवटी गरजेच्या वेळी त्याने रन केले हे टेक्निकपेक्षा जास्त महत्वाचे आहे म्हणा. शास्त्री म्हणाला तसं मी सुद्धा 'He has his own technique' हे मान्य करून त्याच्यासाठी लय टाळ्या वाजवल्या.

भन्नाट झाली मॅच लोकहो.
नेट गंडल होतं, जेव्हढे वेळा कनेक्ट करायला गेलो तेव्हढ्यांदा विकेटस् गेल्या. मग एका जागी बसून चरणं सुरु केलं, आणि रन्स बनत गेल्या. ईमाने ईतबारे चरत राहिलो म्हणून तर आपण जिंकलो.

आता पोटाला तडस लागलीये Wink

धोनीची छकडी अफलातून. विजय साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग.

कपिलने खरचं आज हजर असायला हवं होतं . >> तो कसा असणार, BCCI चे वाकडे आहे ना त्याच्याशी CIL मुळे Sad

कोहली काय मस्त बोलला राव .... आता रात्री बसून परत एकदा निवांतपणे नि निर्धास्तपणे परत मॅच बघणार Happy

यप्, गुड स्पोर्टिंग स्पिरिट बाय श्रीलंका !!.. या २ टिम पैकीच एका टिम ने जिंकणे का लायक होते ते दिसलं मैदानावर.. बेस्ट मॅच ऑफ द सिरिज , गुड टिम स्पिरिट्स, फिनालेला शोभेशी लढत !!

आता मॅच परत बघतोय, कुलसेकरा गेला ४८व्या ओवर मध्ये तेव्हा कोणी सेलिब्रेट सुद्धा केलं नाही. २४९ स्कोअर होता, प्रेशर तेव्हापासून आलं होतं!

बाकी, आज गंभीर, धोनी ह्यांच्या इनींग्स बघितल्या तेव्हा एक दोन गोष्टी जाणवल्या. फॉर्म असो नसो, हे नवीन पबलीक खुप डेअरिंगबाज आहेत असं प्रकर्षानी जाणवलं. गंभीर आला तेव्हा आधी सेहवाग गेलेला होता आणि नंतर तेंडल्याही गेला. येवढं सगळं होऊन सुद्दा नंतर स्पिनर आले तेव्हा गंभीर पुढे येऊन खेळायला आजिबात कचरला नाही. तेच धोनीचं सुद्धा, किती वेळा पुढे आला धोनी! मागच्या वेळी पुढे येऊनच स्टंपींग करुन घेतलं होतं त्यानी आणि गंभीरनी सुद्धा. मग आता परत तेच करणं योग्य आहे का?
I think this is key! आपल्याला मैदानाबाहेर बसून भिती वाटणं सहाजिक आहे पण आपणच काय मैदानावर उभ्या असलेल्या त्या खेळाडूला पण भिती असतेच किंवा असायची असं मी म्हणेन. पुढे काय होईल, आपण कसं जिंकणार हे सगळं डोक्यात दाटून आलं की माणूस आपोआप जपून खेळायला लागतो. एक्स्ट्रा जपून खेळलं म्हणजे स्वतःची नैसर्गिक खेळी करता येत नाही, मग डॉट बॉल्स आणि मग पुढे विकेट हे क्रमप्राप्तच म्हणावं लागेल. त्यापेक्षा समोर येतोय चेंडू नीट खेळत आपला नैसर्गिक खेळी खेळत रहाणेच उत्तम आहे. युवीनी पण तेच केलं, मैदानावर आला, थोडा शॉर्ट बॉल मिळाला, खण्ण्कन पुल केला. आताच आलोय, जरा बघू दे, जरा बसू दे, चहा घेऊ दे, काही काही नाही!!!!!! Just pure business.
तेंडल्याच्या भाषणात त्यानी कोचींग क्रू मध्ये होणी तरी हान म्हणून माणसाचा उल्लेख केला मेंटल ट्रेनिंग, प्रेपरेशन मध्ये खूप मोलाचा वाटा असल्याबद्द्ल. ते ऐकूनही छान वाटलं. आपल्या कागदावर एकदम छप्परतोड असलेल्या टीमला ह्या मानसिक कोचींगचीच गरज जास्त होती असं वाटत राहायचं.

>>१९८३ चा उपांत्य व अंतिम फेरीचा संपूर्ण सामना दूरदर्शनवर बघितला होता. ते दोन्ही सामने अजूनही संपूर्ण आठवतात. उपांत्य सामन्यात संदीप पाटिलने व कपिलने केलेली धुलाई (कपिलने विलिसला एका षटकात ४ चौकार मारले होते) <<
मास्तुरे, एक करेक्शन... कपिलने नाहि; संदिप पाटिलने विलिसला एका षटकात ४ चौकार मारले होते. आजचा धोनीचा खणखणीत विजयी षटकार जसा सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या स्मरणांत कायम राहील तसेच संदिपने विलिसला उभ्या-उभ्या, (एफर्टलेस) मारलेले ते फटके ज्यांनी पाहिले त्यांच्या कायम लक्षात राहतील.

भारतीय संघाचं आणि सगळ्या चाहत्यांचं हार्दीक अभिनंदन! ऑस्ट्रेलिया (उप्-उपांत्य), पाकिस्तान (उपांत्य) आणि आज श्रीलंका यांच्याविरुद्ध भारतीय संघ जगज्जेत्यांसारखा खेळला. आज वानखेडेवरचा माहोल आणि धोनी ११ चा आत्मविश्वास एव्हढा दांडगा होता कि आज त्यांनी क्लाईव्ह लॉइडच्या १९७५-७९ च्या बलाढ्य संघालासुद्धा धुळ चारली असती...

जय हो!

धोनी ११ चा आत्मविश्वास एव्हढा दांडगा होता कि आज त्यांनी क्लाईव्ह लॉइडच्या १९७५-७९ च्या बलाढ्य संघालासुद्धा धुळ चारली असती... >>.

बरोबर राज. म्हणूनच २७० त्यांच्यासाठी विनिंग स्कोअर नाही असे मला वाटले. संघाकारा बरोबर बोलला एनिथिंग लोअर देन ३५० विथ इंडिया, नॉट गुड! Happy

बुवा नॅचरल गेम बद्दल बरोबर बोललास. आताशा आपण शेल मध्ये जात नाही. Happy

आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे २५-३० धावा निश्चितच वांचल्या व शेवटी मारलेल्या षटकाराचं ग्लॅमर नसलं तरीही सामना जिंकण्यात त्या न दिलेल्या धावांचं मोल अधिक होतं. [ नाहीतर ३००+ चं दडपण आलंच असतं]. क्षेत्ररक्षणाचं महत्व अधोरेखित झालं हाही कालच्या विजयाचा दूरगामी लाभ आहेच. कालच्या क्षेत्ररक्षणामुळे अधिकच अभिमान वाटला आपल्या संघाचा !
भारताला विश्वविजेतेपद मिळाल्याने दोनदा नाचायचं भाग्य माझ्याही नशीबी होतं ! १९८३ ला जिंकण्याचं स्वप्नातही नसून आपण जिंकलो [ अर्थात गुणवत्तेवरच], तो आनंद वेगळा; व आपण चँपियनच आहोत व म्हणून जिंकणारच या निर्धाराने जिंकणं याचा आनंद आगळा. मला वाटतं यावेळचं अपेक्षांच्या दडपणाखाली खेळून जिंकणं अधिक कौतुकास्पद आहे. पण त्यावेळचं आमचं नाचणं मात्र अधिक आनंददायी होतं कारण ... वय !!! Wink

<< भाऊ, lol... तुम्ही काढलय हे? >> ध्वनीजी, मी वय झालं म्हटलं, तरी रनर घेऊन नाही बॅटींग करत मी ! Wink

जिंकलो बॉ!!!!!!!!
साला नेहमी नेहमी त्या ८३ च्या वर्ल्डकपचं टुमणं ऐकत आलो..
आला आमच्याही पिढीत वर्ल्डकप आला........................................ साला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Happy

(बाकी कालची मॅच पाहून क्रिकेटवर काही बोलायचं नाही यापुढे असंच ठरवलंय)

साला नेहमी नेहमी त्या ८३ च्या वर्ल्डकपचं टुमणं ऐकत आलो..
आला आमच्याही पिढीत वर्ल्डकप आला........................................ <<, अगदी अगदी.
खरंच वाटायचे की आपल्याला कधी अनुभवायला मिळणार तो आनंद, किती वेळा त्या ८३ च्या वल्ड कप च्या कथा ऐकायच्या.

काल सेहवाग व तेंडुलकर आऊट झालेले असताना गंभीर व कोहलीने मस्त पार्टनरशिप केली. नशिबाने धोनी महाराजांना सूर गवसला म्हणून, नाहीतर आपली परिस्थिती गंभीर झाली असती.

संगकारा खरंच छान बोलला. मला त्यांच्या चेहर्‍याकडे बघून वाईट वाटत होतं पण. शेवटी जेव्हा रवी शास्त्रीने धोनीला त्याच्या फॉर्मबद्दल छेडलं तेव्हा त्याने चतुरपणे प्रश्नाला बगल देऊन आपलीच लाल करून घेतली मात्र.

एकंदरीत फायनलला साजेशी मॅच झाली.

अरे काय मॅच बघायला मिळाली सिंगापुरात इथे.. जवळपास चारशे पाचशे लोकांसोबात बसून मॅच पाहिली. सोबत श्रीलंकन आणि भारतीय पण होते. मी छायाचित्र टाकतो माझ्या रंगीबेरंगी.

सर्वांचे अभिनंदन!

Pages