विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाह्यली पाह्यली... धोनीची ती नजर.... तो आत्मविश्वास.... खल्ल्लास!!!!!
आता काही दिवस रोजचे रोज ही लिंक बघितली जाईल... Happy

आता हे कशाला?

03dhoni1.jpg

धोनीने २००७ ला T20 चा विश्वचषक जिंकल्यावर आपले मानेवर रूळणारे लांब केस कापून कमी केले होते. आता २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर त्याने क्रू कट मारला आहे. यापुढे एखादा विश्वचषक जिंकला तर बहुतेक त्याला आयुष्यभर टक्कल करून घ्यायला लागेल.

आता हे कशाला?>>>>>>> क्रिकेट कसं खेळायचं ह्या बरोबर आता इथेही आपली नाकं घालायलाच पाहिजे का? Proud

कालपर्वापर्यंत नानातर्‍हेची लोकं धोनीवर तोंड्सुख घेत होती, अगदी जस काही त्यांनी या खेळात पीएचडि केलीय, ती टिका त्यांनी का केली ते समजू शकतो, पण त्याचा जाहीर गवगवा करण्यात काय प्रूव्ह करायचे असते देव जाणे. हा एक खेळ आहे आणि तो खेळच राहावा. बस्स.

मास्तुरे, मला वाटतं काल लंकेनी पावर प्ले शेवटच्या पाच ओव्हर मधे दिला ते आपल्यासाठी फायदेकारक ठरले >>

बी आपण तो घेतला. दिला नाही. Happy

मास्तुरे केस काढणे हा त्याने गिरी बालाजीला बोललेला नवस होता. त्याने ते केस रात्री २:३० ते ३ च्या दरम्यान काढले. व ते केस आता बालाजीला पाठवलेत म्हणे. इती टिओआय.

अरे हे काय? मुंबई-पुण्यातल्या कोणत्याच मायबोलिकरांनी इथे आम्हाला जिंकल्यानंतरचा तिथला माहोल काय होता त्याचे इत्यंभुत वर्णन करुन सांगीतले नाही..(फोटोसकट!)

रात्रभर लोकांनी रस्त्या रस्त्यात कशी मजा केली.. खेळाडुंची मिरवणुक कशी झाली वगैरे.. प्लिज कोणीतरी टाका रे सगळा वृत्तांत..

मुकुंद, इथे टीव्हीवर भारतातल्या प्रमुख शहरांमधून करंडक जिंकल्यानंतर झालेला जल्लोष दुसर्‍या दिवशीही दाखवत होते ( आमच्या पुण्याला वगळलं! Angry Happy ) आणि वर्तमानपत्रांमधूनही रकाने भरुन आलेत! लोक रस्त्यांवर उतरून फटाकेबाजी करत होते, भांगडा करत होते, घोषणा देत होते, नाचत होते!

आमच्या परिसरात भारत जिंकायला ५० एक धावा बाकी होत्या, तेह्वापासूनच तुरळक फटाके लावले होते. आणि शेवटचा सिक्सर मारल्यावर तर फटाक्यांच्या लडी फुटल्या, ढोल- ताशे वाजले! गणपतीची आरती झाली! घोषणा झाल्या! लोक वेडे झाले होते! १२ च्या पुढेही अगदी रात्री दीड दोन पर्यंत जल्लोष सुरु होता आमच्याइथे! पुण्यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि तो सारा भाग गर्दीने फुलून गेले होते म्हणे! Happy खूपच धमाल चालली होती!

नंतर काही दुवे टाकते.

पुण्यातले रस्ते फुलून गेले होते ते विविध राज्यातील आलेल्या तरुणाईमुळे . स्थानिक 'वरणभात ' मंडळी एकदा गच्चीत येउन पुन्हा आत जाऊन तोन्डावर पांघरूण घेऊन झोपली. Proud

मी वरणभात खाऊन ,एकदा गच्चीत येउन , आमच्या स.पे.त एकदम शान्तता पाहून तोन्डावर पांघरूण घेऊन; भक्कम भाडे घेऊन ठेवलेल्या परप्रान्तियाना शिव्या देत .. उत्सुकतेने झोपी गेलो... Proud

मला तरी वाटतं रस्त्यावर येऊन जल्लोष करणे खूप चुकीचे आहे. मग पोलिस काही करत नाही असाही ओरडा. सुसंस्कृतपणे देखील आनंद साजरा करता येतो हे आपण विसरतो.

काय जिंकला ना डाव ढोणी ब्रिगेडने तो ही ६ गडी राखून.
रोखलं ना लंकेला २७४ रन्स मधे ..
शेन वॉर्नचं ट्विट खोटं ठरलं.

मला तरी वाटतं रस्त्यावर येऊन जल्लोष करणे खूप चुकीचे आहे. मग पोलिस काही करत नाही असाही ओरडा. सुसंस्कृतपणे देखील आनंद साजरा करता येतो हे आपण विसरतो
>>>
सहमत बी, म्हणून मी 'सुसंस्कृत ' पद्धतीने आनन्द साजरा केला वरीलप्रमाणे....

श्रीलंकेची बॅटींग चालू असताना यर्टेलने जीपीआरेस बंद पाडलं होतं, त्यामुळे इथे येता आलं नाही. आपली बॅटिंग चालू झाल्यावर दोनदा आले तर आधी वीरूची आणि नंतर सचिनची विकेट पडली Proud म्हणून मग नंतर आलेच नाही.

मुंबईतलं वर्णन काय करू महाराजा? रस्ते ओस पडलेले, गल्ल्या सुनसान असलं काही वातावरण नव्हतंच मुळी. बर्‍याच ठिकाणी प्रोजेक्टर लावून मोठ्या स्क्रिनवर एकत्रितपणे मॅचचा आनंद लुटणं चालू होतं. ३० बॉलमधे ३० रन्स हव्यात अश्या परीस्थितीत युवराज बॅटींगला आला तेव्हा शब्दशः सगळे डोळ्यात प्राण आणून बसले होते. त्यात ४ बॉल्स मेडन.... कोणीतरी १० किलोचा लोखंडी गोळा पोटात ढकलतोय अशी सगळ्यांची भावना होती. पुढच्या बॉलला स्कोअरबोर्ड जरा हलल्यावर सगळे जरा हुश्य झाले. मग धोनीकडे स्ट्राईक आल्यावर चौकार तडकावल्यावर आपला विजय निश्चित झाला आणि लगेच ढोल-ताशे बडवत गुलाल उधळत लोकांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली.
धोनीच्या विनिंगशॉटनंतर काय झालं ते मला आता आठवतच नाहिये. Wink खरीखुरी कॅप्टन्स इनिंग!!

पूर्ण ९ मॅचेसमधे सचिनच्या सोबतीने झहिर, युवी, रैना, गौतम गंभीर, सेहवाग, भज्जीने जो खेळ केला त्याला तोड नाही. एकूण एक खेळाडू बोलताना सचिनला श्रेय देत होता. जिंकल्यानंतर आधी धोनी आणि मग युवीने सचिनला मारलेली घट्ट मिठी बरंच काही सांगून गेली. Happy

अविस्मरणीय वर्ल्डकप!!

हनुमान रोड, विलेपार्ले च्या गोकुळ नाक्यावरच्या जल्लोषाचे फोटो आज दिवसभरात लोड करते इथे. संपूर्ण पार्ल्यातून सगळे या एकाच नाक्याकडे आले.... अर्थातच (अर्थातच याचा अर्थ पार्लेकरालाच कळेल Happy )
पार्ल्यात मुलंमुली सगळे रस्त्यावर उतरून ढोल-ताशे, नाचणे चालू होते. एकही अनुचित प्रकार नाही. पण जल्लोष आणि जिंकण्याची झिंग वेगळीच होती.

बा. जो.,
>>मी वरणभात खाऊन ,एकदा गच्चीत येउन , आमच्या स.पे.त एकदम शान्तता पाहून तोन्डावर पांघरूण घेऊन; भक्कम भाडे घेऊन ठेवलेल्या परप्रान्तियाना शिव्या देत .. उत्सुकतेने झोपी गेलो...>>

LOL. (आमच्या) प्रभात रोडवर काय सेलेब्रेशन केले मग?

मला तरी वाटतं रस्त्यावर येऊन जल्लोष करणे खूप चुकीचे आहे. मग पोलिस काही करत नाही असाही ओरडा. सुसंस्कृतपणे देखील आनंद साजरा करता येतो हे आपण विसरतो.

<<< बस क्या बी , काय अळणी फिक्या गोष्टी करता राव वर्ल्ड कप जिंकल्यावर !!!!!!!!!
गेलय २८ वर्षात आलेला कुठलाही सण, उत्सव, दिवाळी इतकी आनंदाची नव्हती !
सेलिब्रेशन कित्ती मोठ्ठं आणि घरी बसून रहायचं.. नो वे.. रस्त्यावर मिरवणुक, ढोल-ताशे-फटाके..सगळं हवच हवच Happy
पाहिजे तर दिवाळीत नका वाजवु फटाके, गणापती उत्सवात नका करु रोषणाई, नका वाजवु ढोल डान्सही करु नका गणतीत.. पण वर्ल्ड कप जिंकल्यावर हे सगळं न करणे ...नो चान्स.. हे सगळं हवच.. हे न करणे म्हणजे एवढय मोठ्या व्हिक्टरीचा अपमान !!!

सचिन सेहवाग लौकर आउट झाले म्हणून गंभीर गंभीर होऊन खेळला,धोनी जबाबदारीने खेळला,आणी युवीने त्याला योग्य साथ दिली.म्हणून वर्ल्ड्कप आपला झाला.सर्व खेळाडूंचे आणी भारतीयांचे अभिनंदन्.शाहिद आफ्रिदी पाकिस्तानात पोचल्यावर आपल्या विरूद्ध गळा काढ्तोय्.दारूण पराभव पचवायला जड जातेय.हिंदीत एक म्हण आहे खिसियानी बिल्ली खंबा नोचे.

हे न करणे म्हणजे एवढय मोठ्या व्हिक्टरीचा अपमान !!!>>>

खरंय डिजे, इकडे रात्री दिड-दोन वाजेपर्यंत जल्लोष चालू होता. रात्री ११ वाजेपर्यंतची मर्यादा वगैरेचा विसर पडलेला होता सर्वांना... आणि अर्थातच, इतक्या गोंगाटाबद्दल, आवाजाबद्दल मला नाही वाटत कोणाची तक्रार निदान त्या रात्री तरी असेल. Happy

बाजो, नक्की सपेमध्येच होतात ना? Proud

समई, यूट्यूबवर एक क्लीप आहे, त्यात तुम्ही म्हणताय त्याच्या विरुद्ध शाहिदने बोललेले आहे. नंतर घरुन टाकेन इथे ती क्लीप किंवा कोणाकडे असली तर टाका. त्या क्लीप्मध्ये त्याने म्हटले आहे की जेह्वा पाकिस्तानात इतर सर्व गोष्टी - जसे रितीरिवाज, गाणी, सिनेमा, खाणे भारतीय चालते, तर मग क्रिकेटबाबतच आपण भारतीयांबरोबर इतकी वैरभावना कशाला बाळगतो? त्याला खतपाणी का घालतो?

एग्झॅक्ट्ली भरत.. मिरवणुक -ढोल-ताशे-नृत्त्य आपली संस्कृति च आहे !
मी आणि आम्ही सगळे इथले मित्र मैत्रीणी भारताला सर्वात जास्तं परवा मिस केलं. खास भारतीय संस्कृति ची जिंकल्यावरची मिरवणूक, ढोल-ताशे वातावरण नाही अनुभवता आलं म्हणून !

शाहिदची दुसरी टेप बघाल तर तिथे तो भारतीय क्रिकेट टिम कशी त्यांना सामावून घेत नाही, त्यांना जवळचे समजत नाही अशी तक्रार करतोय. इथे एक, तिथे एक. वगैरे बोलतोय. तेव्हा ख. खो. दे. जा.

बरे, हा विषय नाही ह्या बाफचा.

Pages