विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याजळ शब्दच नाहीत माझा आनंद व्यक्त करायला.... मी नेहमी म्हणत होतो की मे द बेस्ट टिम विन! आणि या वर्ल्ड कपमधे आपण खरच बेस्ट टिम होतो.. आजही आपण जबरी बॅटींग करुन व बेस्ट टिमसारखे खेळुन जिंकलो.इट वॉज फिटींग फिनिश दॅट टीम इंडिया वन धिस वर्ल्ड कप!.

हॅट्स ऑफ गंभिर...हॅट्स ऑफ धोनी...आणी हॅट्स ऑफ मॅन ऑफ द टुर्नामेंट युवराज! अफकोर्स...हॅट्स ऑफ सचिन तेंडुलकर... ४९० धावा या वर्ल्ड कपमधे....!

आणि सगळ्यात शेवटी... हॅट्स ऑफ टु मायबोलिवरच्या सगळ्या पॉझिटिव्ह थिंकर्स व ऑप्टिमिस्ट क्रिकेट्प्रेमिंना..पन्ना,वैद्यबुवा,अंजली,शैलजा,भाउ नमसकर,केदार आणी बाकी सगळे... इट वॉज अ प्लेजर वॉचिंग धिस वर्ल्ड कप विथ यु ऑल मायबोलिकर....:)

अरे तो लंकेश्वर कुठे गेला... वेल प्लेड बट हार्ड लक लंकेश्वर... शेवटी आमच्या वानरसेनेने तुझ्या लंकेचे दहन केलेच... अरे कोणीतरी त्याने मगाशी दिलेले लाडु शिल्लक ठेवले असतील तर त्याला एक लाडु द्या रे...:)

यार! शेवटची सिक्स काय ओढली धोनीनी!!!!!!!!!! त्याचे डोळे पाहिले का? शेवटपर्यंत पॉज होता, बॉल बाऊंडरीच्या बाहेर एरियली जाऊ पर्यंत!!!!!

<<< आय नो................ आउट ऑफ धिस वर्ल्ड !!!
व्हॉट अ कम बॅक धोनी अ‍ॅन्ड मिड्ल ऑर्डर !!!
टॉस हरला.. हु केअर्स ??.. ओप्निंग पेअर गड्बडली..हु केअर्स ??.. वर्ल्ड कप फिर भी हमारा है !!
खरच हवेत.......... दॅट्स टिम इंडिया !!!

हूssssssssssssss हूssssssssssssssssss
कधी उतरायची आता ही नशा ??? उडावंसं वाटतंय.......
मस्त ! जबरी मॅच !

सांघिक भावनेने व क्षेत्ररक्षणात सर्वस्व पणाला लावून कामगिरी केल्याचं फळ मिळालं ! ग्रेट !!

spectator.JPG

>>यार! शेवटची सिक्स काय ओढली धोनीनी!!!!!!!!!! त्याचे डोळे पाहिले का? शेवटपर्यंत पॉज होता, बॉल बाऊंडरीच्या बाहेर एरियली जाऊ पर्यंत!!!!!

अगद्दी !!!

>>यार! शेवटची सिक्स काय ओढली धोनीनी!!!!!!!!!! त्याचे डोळे पाहिले का? शेवटपर्यंत पॉज होता, बॉल बाऊंडरीच्या बाहेर एरियली जाऊ पर्यंत!!!!!
अगदी अगदी......फिदा त्या सिक्सवर ! जबरी...

भाऊ वल्डकप सुरू होण्याआधी मी आणि विक्रम म्हणालो होतो फक्त भारत जिंकणार. Happy

विक्रम अभिनंदन सच्याचे १०० झाले काय न झाले काय पुढे होतीलच.

एक खुमासदार चित्र टाका अजुन. Happy

चिमण भारत जिंकला. Happy

लंकेश्वर राम लक्ष्मण सोडा तुम्हाला तर भरत आणि शत्रूघ्नच पुरले की. Proud

टीम भारत अगदी चँपियन सारखाच खेळला ऑसीज च्या मॅच पासून..
कॅप्टन कुल धोणी, मॅन ऑफ द सीरीज युवी आणि बाकी सर्व खेळाडुंचे अभिनंदन!!!

या मॅचमधे शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहिली, हे छान झाले. आणि काही काळ तरी पारडे, श्रीलंकेच्या बाजूचे वाटत होते. त्यांचे खेळाडु पण फार सभ्यतेने वागले, त्यांचेही कौतूक झालेच पाहिजे.

(१९८१ चा थरार अनुभवलेले किंवा ते दिवस आठवणारे थोडेच असतील, आपल्यात. त्यावेळी गिरगावात खेळाडूंचे ड्रेस करुन, लहान मुलांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. अर्थात आजच्यासारखे ग्लॅमर नव्हते.)

सर्व क्रिकेटप्रेमींचे अभिनंदन ! चक दे इंडिया

अनेक स्टार मंडळी, नेते आणि आजी-माजी खेळाडुंनी सामन्याचा आनंद घेतला पण ८३ च्या विजेत्या संघाचे कप्तान आणि इतर खेळाडु कुठे दिसले नाहीत.

भाउ , व्यंगचित्र मस्त !

श्रीलंकन खेळाडुंचे खरच कौतुक. त्यांचा कप्तान पण पुरस्कार समारंभात चांगला बोलला !

भाऊ वल्डकप सुरू होण्याआधी मी आणि विक्रम म्हणालो होतो फक्त भारत जिंकणार.>>>>>> मलाही विसरु नकोस शास्त्री! Happy अवघड जाईल असं म्हंटलं असेल पण जिंकणार नाही किंवा हरेल असं एकदाही नाही म्हंटलं.

ह्या वेळेसची टुर्नामेंटच वेगळी होती, नो डेस्टाईन्ड विनर्स!!!! (अर्थात तसे केव्हा असतं म्हणा)

आपल्या बॉलर्सनी येवढी जीव तोडून बोलून करणं, तरीही शेवटी त्यांनी मारुन २७५ करणे, नंतर इतक्या महत्वाच्या मॅच मध्ये सेहवाग पहिल्याच ओवर ला आऊट होणे, नंतर तेंडल्या इतका भारी खेळतोय असं वाटत असताना अचानक आऊट होणे मग गंभीर आणि धोनीनी नाव परत स्थिरावणे, मग युवी आणि मग.... रेस्ट इज ऑल हिस्ट्री....

थोडक्यात, फायनल अगदी शोभेल अशी, इतकी चुरशीची मॅच होणं आणि ती भारतानी जिंकणे...... काय बॉ आजचा दिवस!!!!!! त्याला तोड नाही. धोनीची सिक्स आयुष्यभर लक्षात राहिल!!

मस्त सामना झाला. शेवटी आपण जिंकलोच. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली तेव्हा ते जिंकण्याची ७५ टक्के शक्यता आहे असे मला वाटले होते. त्यानंतर तेंडल्या गेल्यावर तर श्रीलंकेने सामना ९५ टक्के जिंकलेलाच आहे असे वाटून मी दु:खी मनाने पुढचा सामना न पाहण्याचा विचार करत होतो.

पण गंभीर व कोहलीने व्यवस्थित भक्कम पाया रचला. नंतर गंभीरने धोनीबरोबर वास्तू उभी केली आणि शेवटी धोनीने युवराजबरोबर कळस चढविला.

गंभीर-कोहलीने रचला पाया,
धोनी-युवराज झालासे कळस!

भारतीय संघाचे व सर्व भारतीयांचे अभिनंदन!

आजच्या सामन्यात पठाणच्या ऐवजी गंभीरच हवा होता असे मला वाटत होते. गंभीरने जबरदस्त खेळी करून आपली निवड सार्थ केली. खेळपट्टी इतकी पाटा होती की आज पठाणने सुध्दा चंगळ केली असती. लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस नुसार आज सेहवाग व साहेब अपयशी ठरतील व महिला जयवर्देना भरपूर धावा करेल असे वाटले होते. तेही खरे ठरले. दुर्दैवाने साहेब व सेहवाग आज अपयशी ठरले. पण भारताला अंतिम फेरीत आणण्यास त्यांची आधीच्या सामन्यांतली कामगिरी उपयुक्त ठरली. महिला जयवर्देनाचे झुंझार शतक वाया गेले. तसेच मुरलीधरन शेवटच्या सामन्यात अपयशी ठरला याचे वाईट वाटले.

धोनी, कोहली व गंभीरने खेळपट्टीचे पाटा स्वरूप ओळखून अजिबात चुका न करता टिकून राहण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच २ बाद ३१ वरून सुध्दा आप़ण विजयी झालो.

चिमणच्या पोपटाचे भविष्य साफ चुकले.

अनेक स्टार मंडळी, नेते आणि आजी-माजी खेळाडुंनी सामन्याचा आनंद घेतला पण ८३ च्या विजेत्या संघाचे कप्तान आणि इतर खेळाडु कुठे दिसले नाहीत

<< सेम पिंच.. फेबु वर अगदी हेच लिहिलं :)..

महागुरुची ही फेबु वरची पंच लाइन प्लिज या बीबी च्या टॉप ला येउ दे:
अनहोनी को होनी करदे होनी को अनहोनी
एक जगाह जब जमा हो तीनो
रजनी-गजनी और धोनी !!!

या बाफवर आधी चर्चा झालेली कि गंभीरला बसवुन पठाणला आत घ्यावा, तो निर्णय नाही घेतला तेच बरे झाले Happy

तसंच श्रीसंतला का घेतल तेही कळल नाही (गावसकर्ने म्हणल्याप्रमाणे त्याच्याकडे फायनलचे लक आहे, ते सोडुन)

युवीने स्पेशल पर्सन कोण ते सांगितले का? इंटरव्ह्यु मध्ये तरी गुरु आणि आई-वडिलच म्हणाला

>>> १९८१ चा थरार अनुभवलेले किंवा ते दिवस आठवणारे थोडेच असतील, आपल्यात.

१९८३ चा उपांत्य व अंतिम फेरीचा संपूर्ण सामना दूरदर्शनवर बघितला होता. ते दोन्ही सामने अजूनही संपूर्ण आठवतात. उपांत्य सामन्यात संदीप पाटिलने व कपिलने केलेली धुलाई (कपिलने विलिसला एका षटकात ४ चौकार मारले होते), यशपाल शर्माने विलीसला स्क्वेअरलेगवरून मारलेला षटकार, अंतिम सामन्यात श्रीकांतने गुडघ्यावर बसून मारलेला स्क्वेअरड्राईव्ह, बलविंदर सिंग संधूने ग्रीनीजची उडवलेली दांडी इ. गोष्टी अजून आठवतात. त्यावेळचे सामने ६० षटकांचे असत. खेळाडू पांढरे कपडे घालून खेळत. पॉवरप्ले, फ्री हिट, वाईडचे कडक नियम, ३० यार्ड वर्तुळाच्या आत क्षेत्ररक्षक ठेवायचे नियम असे काहिही त्यावेळी नव्हते.

त्यावेळी सुध्दा अंतिम सामना रात्री १० च्या सुमारास संपल्यानंतर सर्वजण रस्त्यावर आले होते. टिळक रस्त्यावरून एका हत्तीवर कपिलदेवची तस्बीर ठेवून मिरवणूक काढली होती. एका अमृततुल्यवाल्याने ३-४ किलो साखर वाटायला मोफत दिली होती. मिरवणूकीत साखर सुध्दा वाटत होते.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या इतिहासात १० सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यात दुसरी फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. १९९६ मध्ये श्रीलंकेने ऑसीजच्या २४१ धावांचा व १९९९ मध्ये ऑसीजने पाकड्यांच्या १३२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आजचा अंतिम सामना मात्र पाठलाग करून जिंकलेला सर्वोत्कृष्ट सामना आहे.

Pages