मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी किस्से आहेत एकेक.

माझी एक कलीग स.कु.स.प. ३ इडियट्स पहायला गेली होती.
घरी आल्यावर मुलं म्हणतात, "आजी, आम्हाला माहीती बाळ कसं बाहेर येत". आजी आजोबा आवाक, आई बाबा स्टॅच्यु. मुलगा पुढे म्हणतो, " अगं, व्हॅक्युम क्लीनरने काढतात"
सुटकेचे निश्वास.

माझी भाची पण र ला ल म्हणायची.........तिच्या भावाचे नाव राहुल आहे तर ती त्याला 'ये लाहुल दादा' बोलायची. आणि नवरा आला नवरी आली या गाण्याची तर तिने वाट लावली होती 'लवला आला लवली आली' असे ती गाणे बोलायची.

आता इतक सगळ होण्यासारख आणि माझ्यामाणसानी इतक लाजण्यासारख होत काय

तर तो चित्रपट होता.

दादा कोंडकेचा ह्योच नवरा पाहीजे>>>
पण शिशु वर्गात असणार्या मुलाला हा सिनेमा दाखवावा का? आणि पाहिल्यास त्यातील द्वयर्थी संवाद त्याला कसे कळाले हा एक संशोधनाचा विषय आहे.

ह्हा!!! मस्तैत किस्से एकेक..
माझी चुलत बहीण पाच वर्षाची असतांना आपल्यातच दंग होऊन खेळत होती. पलीकडच्या खोलीत तीन काकू बसून गप्पा मारत होत्या,गप्पांचा विषय अर्थातच 'सासू' हा होता. थोड्या वेळाने आजी बाहेरून आली. तिला पाहताच चुलत बहीण,खेळ टाकून अगदी धावत जाऊन तिला सांगू लागली,'आजी,आजी,आज तुझ्या सुना तुला नावं ठेवत होत्या' ते ऐकून आजी म्हणाली,'हो गं बाई.मला माहितीये सर्व'... दुसर्‍या खोलीत सर्व सुना तोपर्यन्त गारेगार झालेल्या!!!!!

मुग्धानंद
आता त्यानी मला का नेला तर तेव्हा दादा कोंडके इतका खालावला नव्हता. त्यात शाब्दीक विनोद होत.
पण या अनुभवानंतर मात्र मला आली अंगावर ला नेल नसाव

मला कस कळल हा खरच संशोधनाचा विषय आहे मला वाटत मला भेटलास तर कळेलच.

बाकी माझा मित्र त्याच्या दहा वर्षाच्या मुलीला राझ २ बघायला घेऊन आलेला तेव्हा मी भांडलेलो त्याच्याशी.

ती सिआडी पाहून कोणालाही एकदम तुम एक लाश हो.. मै तुम्हारा खुन करूंगी वगैरे म्हणते आणि लाज याची वाटते की आईवडील अजिबात लाज्त नाहीत.

गुगु अहो ती सीआयडी पाहुन हे म्हणते म्हणुन तुम्ही लाज वाटते म्हणतात. मी रामायण व लव कुश दाखवले पोराला तर तो आता घरात सारखे युध्दाचे खेळ करतो. मै तुम्हे मारुंगा म्हणतो, काय करावे? बरे मग कृष्ण दाखवले तर तो होतो कृष्ण व कोणाला तरी कालीया व्हायला सांगतो, नाहीतर कंस.
आता आपण मुलांना मारामारी करायला शिकवत नाही (म्हणुन मी त्याला कार्टुन दाखवायचे टाळते , अगदी कमी प्रमाणात कधितरीच टी. व्ही. लावुन देते, अन्यथा त्याच्या कॅसेट वा काही फिल्मस) हो पण ते लोक हेच कसे पिकअप करतात देव जाणे.
नशिब यातच मानायचे की तो चांगले कॅरॅक्टर स्वतःसाठी घेतोये अजुन तरी. Sad

माझ्या मैत्रिणीची मुलगी शाळेतून घरी आली... आल्यावरचा संवाद हॉल मध्ये सुरू होता. तिथे मैत्रिण, तिचे सासरे, सासू... आणि तनू असे ४ लोक होते..

तनू - मम्मा आज अमुक अमुक शाळेला आली नाही..
मैत्रिण - का गं?
तनू - तिचे आजोबा ढगात गेले..
मैत्रिण - बरं!
तनू (अजोबांकडे वळून) - तुम्ही कधी जाणार ढगात?
मैत्रिण - ???????? Sad

नंतर सासर्‍याने सुन आणि मुलगा दोघांवर जाळ काढला... आम्ही ढगात जायची भाषा पोरांसमोर करत असाल म्हणून मुलं असं बोलतात.. Sad इ.

गोव्याला माझ्या शेजारी मनन नावाचा गोड मुलगा होता. रोज संध्याकाळी त्याला मी फिरवून आणत असे. एकदा काहितरी काम होते, म्हणून मी त्याला बाहेर नेले नाही. दुसर्‍या दिवशी पण असेच झाले.

थोड्या वेळाने माझ्या दारावर धडका, आणि रडण्याचा आवाज. दारात हा उभा. त्यांचे दार बंद.

या पठ्ठ्याने मला काय सांगावे, माझ्या आईने मला घराबाहेर काढले. (वय वर्षे सव्वा दोन) मी त्याला जवळ घेतला. गप्प केला. जरा फिरवून आणला.
घरी जातोस विचारले तर परत रडायला सुरवात. मग परत माझ्या घरी आणला, भरवले.
बरीच रात्र झाली, तरी त्याची आई काही न्यायला आली नाही. मी गेलो तर त्यांच्या दाराला कुलुप.
बरं याला काही चिंता नव्हती. माझ्याकडे रहायला तयार.

शेवटी त्यांच्याकडची सगळी माणसे घरी आल्यावर (त्यांचे दुकान होते.) मी त्याला घेऊन त्यांच्या घरी गेलो. तो बाबाकडे जाऊन बसला.
विषय कसा काढायचा ते मला कळेना. शेवटी त्याच्या आईला विचारलेच. (त्यावेळी तिचे सासूसासरे पण होते. ) इतकी काय मस्ती केली याने कि घराबाहेर काढले. तर ती खो खो हसायला लागली.

म्हणाली, मी घरी आलोय ते त्याला बरोबर कळायचे. अंकलच्या घरी जायचेय म्हणून तिच्या मागे लागला. ती म्हणाली, अंकलला काम असेल म्हणून तूला न्यायला आला नसेल.
तर याने रडायला सुरवात केली, तर ती लटक्या रागाने म्हणाली, जा अंकलकडेच जा रहायला. तर तो आला माझ्याकडे.
ती एकदा येऊन गेली, तर माझे दार बंद म्हणून परत गेली. मग माझ्याकडेच आहे, काळजी नाही म्हणून खाली दुकानात जाऊन आली. त्याच वेळी मी तिकडे गेलो, तर त्यांचे घर बंद होते.

म्हणजे त्याने आम्हाला सगळ्यांना चांगलेच बनवले होते.
दुसर्‍या दिवशी मला ती सांगत होती, तिची सासु तिला टोचून बोलत होती, कि खरेच त्याला बाहेर काढशील वगैरे.

हा किस्सा माझ्या बायकोचा . तिला बघायला गेलेलो असताना सासरेबुवांनी सांगितलेला.
सांगलीच्या दादू काका भिडे शिशु मंदिर मधे त्या वेळीही (साधारण २० वर्षापूर्वी) लहान गटात घेण्यासाठी मुलाखती असायच्या .
हिला बरेच प्रश्न विचारले . सगळ्या प्रश्नांची छान उत्तरे दिली . तुला खायला काय आवडते असे विचारल्यावर हिचे उत्तर "मटण "
तेव्हा त्या लोकांची काय अवस्था झाली ती त्यानाच माहित पण आपण जाम खूष !!! Happy

मला लहानपणी चॉकलेट्स वगैरे मागितल्यावर आई सांगायची की, जास्त गोड खाल्लं की दात खराब होतील, पोटात जंत होतील, त्यामुळे पोट फुगेल वगैरे वगैरे. एकदा बाजारात गेलो असताना मला एक गर्भवती स्त्री दिसली तेव्हा मी तिच्यासमोरच आईला विचारले की, 'आई या काकूच्या पोटात जंत झाले आहेत का?'

माझी बहीण लहानपणापासून दिव्य अवतार होता... तिचं डोकं तेव्हापासून out of box विचार करायचं... बालवाडीत असताना मुळाक्षरं गिरवून कंटाळलेल्या मॅडमनी नवीन शोध लावले... चाँ, टाँ, वाँ अशा चायनीज अक्षरांचे.. माझं माहेरचं आडनाव वडके.. तर या बयेनं भिंतीवर मस्तपैकी स्वतःचं संपूर्ण नाव लिहीलं आडनाव लिहीलं वडकेचाँ Happy

एकदा परीक्षेमध्ये त्यांना आलं होतं "फक्त नावे लिहा" खाली होतं अंडी देणारे... आणि पुढे दोन रिकाम्या जागा.. ही लिहून आली बेकरी वाले!

तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार कोण असं विचारल्यावर पटकन म्हणायची आमच्या बाई!

तेव्हा संध्याकाळी कार्टून अवर लागायचा.. बातम्यांची वेळ झाली की आजोबा रिमोट घेऊन बातम्या बघायचे... हिला राग आला, कार्टून बंद केल्यामुळे.. थोडी कुर्कुर करून बघीतली... नंतर वैतागून म्हणाली, मला माहीतेय तुम्ही बातम्या नाही बघताहात, त्या बातम्या देणार्या बाईला बघताय.

लहानपणापासून कित्येक वर्ष ती आजोबांशीच लग्न करणार या निर्णयावर ठाम होती..

आमच्या कोळणीला सांगायची आमच्या देवाला नर चिंबोर्‍या चालत नाहीत... सगळ्या माद्याच दे...

चिकन आणायला गेल्यावर आमची कोंबडी दुसर्‍याला दिली जाईल चुकून म्हणून अगदी पाणी पाजण्यापासूनचे सोपस्कार बघायची... चिकनची पिशवी हातात पडेपर्यंत हिचा जीवात जीव नसायचा..

एकदा मी तिला विचारलं बिच्चारी कोंबडी, तिला मारताना तुला वाईट नाही वाटत? तर म्हणाली, वाटतं ना.. म्हणून तर मी तिला माझ्या पोटात मोक्ष देते Uhoh कुठनं शिकून यायची देव जाणे!

एकदा आम्ही रात्रीचे साईबाबांच्या देवळात चाललेलो दोघी. समोरून काका आले. काका पक्के नास्तिक! ते ओरडले, काय गं रात्रीच्या कशाला बाहेर फिरताय, देव घरात असतो ना, घरात नमस्कार करायचा... एवढ्या रात्री बाहेर कशाला फिरायचं?
मी माझ्या स्वभावानुसार रडकुंडीला येऊन गप्प बसले.. ही त्यांनाच विचारतेय? आम्ही देवळात चाललोय, काय हो तुम्ही काय करताय एवढ्या रात्रीचे इथे? काकूला माहीतेय का इथे रात्रीपात्रीचे दुसर्‍याकडे फिरताय ते! काकांचा चेहरा फोटो काढण्यासारखा!!!

अजून बरेच आहेत सांगेन आठवले की! Happy

बापरे,,ड्रीमगर्ल.. जोर्दार हाय बहीणीचे किस्से Biggrin

आई सेकंडरीत शिकत असताना त्याच शाळेत प्रायमरीत शिकत असलेला तिचा लहान भाऊ मधल्या सुटीत धावत धावत तिच्याकडे आला आणी आनंदाने जोरजोरात ओरडून सांगायला लागला कि त्याचे एक म्हातारे मास्तर अचानक गेल्यामुळे शाळेला अर्धी सुट्टी देण्यात आलीये, आणी पुढे म्हणाला कि त्याच्या वर्गाला शिकवणारे अजून एक म्हातारे गुरुजी आहेत म्हणून.. हे म्हणायला आणी ते म्हातारे गुरुजी समोरून यायला एकच गाठ पडली.. ते आईकडे डोळे वटारून पाहू लागले.. आईची मधल्यामधे भलतीच पंचाईत झाली..

अहो मुलच ती माजी मुलगी सासर्याजवळ जाते झोपायला सांगते पप्पा मम्मा तुमच्यामुळे मला अडचण होते मला तर बै मेल्याहुन मेल्या सार्ख होते
पन किस्से काही खुप चावट नसते टाक्ले तर चालले अस्ते चालु दे पैलेच पान वाचले सेव करुन नतर वाचते तेवदीच बचत नेटची

आजचा ताजा ताजा किस्सा - माझी मुलगी (३ वर्षे) बेबी सिटींगच्या मुलांच ऐकून 'जावा' 'खावा' असे शब्द अधुन मधुन वापरते आणि मी तिला अस बोलू नये 'जा' 'खा' अस म्हणावं हे शिकवत असते.
आज सकाळी आम्ही दोघी निघालो तेव्हा खालच्या मजल्या वरचे एक आजोबा भेटले. त्यानी तिला विचारल, कुठे जातेस? हिने सांगितल, आई मला सोडुन देईल आणि ऑफीसला जाईल. आजोबा म्हणाले 'जावा जावा, संध्याकाळी लवकर या.'
पुढच्या क्षणी "आई आजोबा जावा जावा म्हणताहेत................:अओ:
तसच तिला उचलुन काढता पाय घेतला.

बेफिकीर, ती अजूनही खोक्याबाहेरचीच उत्तरे देते... Wink पण त्या त्या वयाला साजेशी!
म्हणजे बालवाडीत शाळेतल्या बाईंचे नाव सांगायची वर्गातील सर्वात हुशार म्हणून आता पेपरसेटर चं सांगत असेल Lol

(मला माहीत नाही कारण फारसं बोलणं होत नाही वरचे वर! :))

माझ्या मैत्रिणीकडे मुलीला घेऊन गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तिने आपली एक छोटी पर्स रॅन्डम गोष्टींनी भरून घेतली होती. मी म्हटले असेल पुस्तक बिस्तक वाचायला घेतलेले. मैत्रिणीकडे गेल्यागेल्या पर्स मधून एक एक गोष्टी बाहेर आल्या. काही कोरे कागद, पेन्सिल. त्या वस्तु वापरून माझ्या मैत्रिणीकरता एक मांजराचं चित्र काढून दिलं. ती भारी खुश झाली. मग पर्समधून निघालं एक कोस्टर. ते दाखवून मैत्रिणीला म्हणाली की, मावशी तु मला चहा देशिलच ना, मग माझा कप ठेवायला मी घरून कोस्टर आणलय. मैत्रिण वेडी व्हायचीच फक्त बाकी होती.

माझ्या बहिणीचा ती ४थीत असतानाचा किस्सा. त्यावेळी ती भगवद्गीता शिकायला जात असे.एकदा माझे आई बाबा कुणीतरी वारलं म्हणून त्यांच्याकडे भेटायला गेले बरोबर हिलाही घेऊन गेले(विनाशकाले विपरीत बुद्धी)
आई बाबा सांत्वन करत होते . त्या बाई त्यांचे यजमान कसे गेले ते सांगत रडत होत्या. हा प्रसंग पाहून माझ्या बहिणीला काही गप्प बसवेना ती म्हणाली, "अहो आजी इतका शोक कशाला करताय? आलेलं प्रत्येक माणूस कधी ना कधी जाणारच. जीवन मृत्यु हे गड्ड्यावरच्या (सोलापूरात जत्रा भरते त्याला गड्डा म्हणतात) चक्रासारखे असते (मेरी गो राऊंड ) सुरुवात कुठे आणि शेवट कुठे हे कुणालाच ठाऊक नसते" माझ्या आईबाबांना इतकं लाजल्यासारखं झालं...आईने पुढे ती १०वी पास होईपर्यंत गीता शिकण्यास पाठविले नाही.

दुसरा किस्सा माझ्या भाचीचा..माझी वहिनी , तिची आई सगळे एकत्र बसून वहिनीच्या आजीबद्दल बोलत होते..आजी किती प्रेमळ होती आज हे ऐश्वर्य पहायला हवी होती इ.इ.हे सगळं ऐकून माझी भाची तिच्या आजीला म्हणजे माझ्या वहिनीच्या आईला म्हणाली तू आणि आई आईच्या आजीला खूप मिस करता ना डोन्ट वरी तू पण गेल्यावर मीही तूला खूप मिस करेन...
माझी वहिनी यातच समाधानी होती की हा प्रसंग तिच्या आईच्या बाबतीत घडला माझ्या काकूच्या (तिच्या सासूच्या) बाबतीत नाही घडला ....

माझ्या दोन्ही मुली १० वर्षापासून अमेरिकेत आहेत. मोठ्या मुलीच्या मुलाला रामायण ,महाभारताच्या सी.डि दाखवल्या. तेंव्हा दशरथ राजाच्या तीन राण्या पाहून तो म्हणाला की isn't it illegal to have three wives?

Pages