मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरडी | 28 April, 2011 - 13:23
अशी मुलगी प्रत्येक बापाला मिळो
======================

आवळा | 28 April, 2011 - 14:56
"आंटी तुम भी इधर उप्पर सोने के लिये आओ">>>>>
अशी मुलगी प्रत्येक बापाला मिळो >> :हहपुवा:
==========================================

परदेसाई | 28 April, 2011 - 11:14
दक्स, तु काय केलस ग मग? <<< लहान मुलीचं मन कसं मोडायचं..? मग गेली तिकडे..(दिवा)

आणि तिच्या बाबाला खाली पाठवलं असेल
============================================================

यावरून म्हणताय ना बस्के?

विविध माध्यमांमधून माहिती मुळे आता लहान मुलांचे अनुभव विश्व फार लवकर विस्तारलेले असते व त्या मुळे असेल पण त्यांचा निरागस पणा फार लवकर हरवतो. तरीही काही किस्से आपल्याला हसवून जातात. माझा भाचा एक एक दिवस गंभीर पणे म्हणाला,
"मी तर बॉ कधीच मरणार नाही" म्हटले " का रे? "
"आपण मेलो ना की आपल्याला लाकडांवर ठेवतात अन आग लावून देतात , आपण तर नाही बॉ मरणार कधीच."

झाले असे होते की आधल्यादिवशी शेजारचे एक आजोबा वारले होते ही अग्नी देण्याकरता अन्य कुणी नसल्यामुळे त्या घरातल्या थोड्या मोठ्या मुलाला स्मशानात जावे लागले होते. हा मुलगा भाच्याचा जरा मोठा पण मित्र च. त्याच्या कडून याला सगळा रिपोर्ट मिळाला होता.
दुसरा किस्सा माझ्याच मुलाचा, त्याला मोटारसायकलींचे फार वेड. एकदा त्याला सहजच विचारले
" तू मोठा झाल्यावर कोण होणार?"
"मी ना, धूम सिनेमातल्या सारखा चोर होणार"
"अरे पण चोरांना पोलीस पकडतात अन जेल मधे टाकतात "
"पण माझ्या कडे धूम मधली मोटार सायकल असेल , मग कसे पकडतील? मी एकदम फास्ट चालवेन, धूम मधल्या पेक्षाही फास्ट ! "
चोर होणे ही काही फारशी चांगली गोष्ट नाही हे त्याला पटवून सांगण्याचे माझे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले हे वे सा न ल.

श्रीकांत तसही चोरपोलिस खेळताना सगळ्याच मुलांना [अगदी आमच्या काळात आम्हालाही] नेहमीच चोरच व्हायच असतं, पोलिस् व्हायला कोणीच तयार नसतं.

दक्षे एवढी चर्चा होऊनही तू शेवटी काय केलंस ते सांगितलंच नाहीस ना Proud

माझ्यालेकाला लहानपणी कोण होणार विचारलं की तो "ज्ञानेश्वर " सांगायचा. त्याला तेव्हा भिंत चालवायची होती Uhoh

माझे आत्तेसासुबाईनी एकदा त्याला तू कोण होणार विचारलं तर याचं उत्तर होतं "बुवा" आम्ही चकित Uhoh

मुलगी वय जेम्तेम अडीच. रोज जेऊ घालताना फ़ुल्टू टिपी चालू असतो म्हणून असेच आजीने सन्गितले कि तो यश येऊन तुझा खऊ खाऊन जाईल.. पटकन खा.
तर नातीचे उत्तर,"त्याचा उपास आहे.. तो नाही खाणार"!

यशचे वय : वर्शे चार!
उत्तराचा संदर्भ: आजीचा उपवास!

माझी भाची 'र' ला 'न' म्हणायची,
तिच्या लहान भावाला तेल-मालीश करणार्या बाइंचं नाव 'रंगु' होतं..

त्या सोडुन गेल्या काम लगेच Uhoh

त. टी.- त्यांना सगळे.. रंगु बाइ म्हणायचे..
आणी त्या आल्या की बाळाला झोपेतुन उठवुन हीच्या कडेवर द्यायच्या २ मिनिट.
एक्दा त्या आल्याचं पाहुन ती अंगणात मोठ्याने नाचुन ओरडयला लाग्ली..
"... बाइ" आल्या..
"... बाइ" आल्या

माझ्यालेकाला लहानपणी कोण होणार विचारलं की तो "ज्ञानेश्वर " सांगायचा
अच्छा म्हणून तू सारखी चैतन्य दया कर म्हणत असतेस.

आणि सगळे का रे त्या दक्षिणाला विचारताय.
ती खर सांगायला लागली तर तुम्हीच सभ्यतेच्या मर्यादा वगैरे सांगून अश्लिलतेचे आरोप करणार.
दक्षिणा विसरून जा बघू उगाच खर सांगून बसशिल.

खि!!!!!खि!!!!!खि!!!!!खि!!!!!खि!!!!!खि!!!!!

कृपया येथे मुलांबद्दलचे सभ्य किस्से लिहावेत व इतर अनावश्यक प्रतिसाद टाळावेत ही नम्र विनंती.>>>>>>>>>>
१००००००००००००००००००००००००००००००००० % अनुमोदन...............

असे वाटते की आपण अमेरिके तले किस्से वाचतोय......................

परवा एका मैत्रिणीकडे गेलो होतो. आम्ही दोघींनी फ्रुट जूस घेतला आणि दोघींच्या नवर्‍यांनी कोक. मैत्रिणीने तिच्या मुलालाही (वयः२वर्ष) त्याच्या प्लास्टिकच्या पेल्यात जूस दिला.
मैत्रिणीच्या नवर्‍याने लेकाला विचारले: "बेटा, तुम क्या पी रहे हो?"
मुलगा: "बीयर"
आम्ही सगळे अवाक!
त्याचा बाबा (गडबडून): "नही बेटा, ये तो जूस है. बियर कोइ पिता है क्या?" (म्हणायचा उद्देश की बियर नसते प्यायची)
मुलगा: हाँ, मेरे पापा पिते हैं!
बाबा: (आत काय करू?? छाप एक्स्प्रेशन्स!)

ह्या वेळेच्या भारतवारीतला ताजा किस्सा. घरात कसलीशी पूजा होती म्हणून नातेवाईक जमले होते. आमच्या लग्नाचा अल्बम बघणे चालू होते. एका आजींनी गंमतीने माझ्या मुलाला विचारले, "आई-बाबांचे लग्न झाले तेव्हा तू कुठे होतास रे ?" ह्या पठ्ठ्याने क्षणाचाही विलंब न लावता खणखणीत उत्तर दिलं "आईच्या पोटात !" Proud विचारणार्‍या आजीच भयंकर लाजल्या. बाकीचे गडाबडा लोळायचे बाकी राहिले.

नशीब समज अगो, माझा मुलगा आईबाबांच्या लग्नाचे फोटो मीच काढल्येत म्हणून सांगत सुटलावता सगळ्यांना

हे इथे टाकावं का या संभ्रमात होतो.........पण तरीही टाकतोय.

आज सकाळी माझ्या साडेतीन वर्षांच्या पोरीने माझी विकेट काढली त्याची गोष्टः

बबडू: बाबा, मला उसाचा रस हवा.
मी: अगं, अजून दुकान उघडलं नाहीये.
बबडू: मला आत्ता हवा.
मी: अगं, आत्ताशी आठ वाजलेत, दुकान नऊ वाजता उघडतं. तेव्हा आणू हां आपण!
बबडू: बाबा, मला सरबत हवं.
मी: अगं....<आता टाळायचं कसं ह्याचा विचार करत असतानाच मला मधेच तोडत>
बबडू: ते घरीच आहे. दुकानात नको जायला.

मी क्लीन बोल्ड.

माझ्या मैत्रिणीने सांगितलेला किस्सा:

तिच्या बहिणिच्या मुलीला (वय वर्ष १० महिने) पाहुण्यांनी पेपरमधील माकडाचा फोटो दाखवून विचारले की 'ओळख पाहू कोण आहे?"

बाईसाहेब म्हणाल्या, "बाबा" Happy

माझी सात वर्षाची अमेरिकेतली नात दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे आली होती.मी देवघरात पूजा करत असताना जवळ बसली.व प्रत्येक देवाकडे ,फोटोकडे बोट दाखवून हे कोण,हे कोण म्हणून विचारत होती.शेगावच्या गजानन महाराजांकडे बोट दाखवून तिने हे कोण म्हणून विचारले. मी तिला ते एक संत होते म्हणून सांगितले.तिने ते काय करत होते म्हणून विचारले.मी तिला ते लोकांचे चांगले करत होते,आपल्या जवळचे सर्व गरिबांना देऊन टा़कत होते असे सांगितले .त्यावर ती पटकन म्हणाली ओह दॅट्स व्हाय ही इज ..पंगू. गजानन महाराजांची क्षमा मागून.

भाचीबाई (वय वर्षे चार) नवरात्रातले पहिले पाच दिवस आजोळी गेल्या होत्या. आजी-आजोबांपाशी मजेत राहिली होती एकटीच. आई-बाबाची जराही आठवण नाही. आजी-आजोबांची मोठी परस-बाग आहे, बरीच झाडे आहेत, शेजारी-पाजारी, त्यांच्याकडे येणारे लोक... सर्वांनाच भाचीचं कौतुक आहे भरपूर. त्यामुळे तिचा वेळ मजेत जातो तिथे. याही खेपेस शेवटी आईबाबांनीच न राहवून फोन केला तिला, ती कशी आहे विचारायला. रोज तिला कोठे कोठे नवरात्रीची आमंत्रणे असल्यामुळे जाम बिझी होत्या भाचीबाई. शिवाय फोनवर म्हणते कशी : ''आजीकडे मला खूप आराम करायला मिळतोय छान!!!!''

तिच्या आईने लेकीचे उद्गार ऐकल्यावर कपाळाला हात लावला, जसे काही तिला रोज घरी कामाला जुंपतात अशा स्टाईलमध्ये बोलत होती!! Lol

आधीच्या दोन टिंबांत र्‍हायमिंग वर्ड दडलाय. समईंना तो ईथे लिहिणं प्रशस्त वाटलं नाही. जे सहाजिक आहे.

परवा संध्याकाळी बायको पोरांना घेऊन बाहेर फिरायला निघाली होती. इमारतीच्या खालीच एक ओळखीची बाई भेटली आणि गप्पा मारू लागली. बराच वेळ झाला तसं माझ्या मुलाने (वय फक्त सव्वा वर्ष) तिच्याकडे रागाने एक-दोनदा पाहिलं. आणि मग तिच्याकडे बघून सरळ "बाssssय!" केलं. एकाच वेळी अवघडल्यासारखं व्हावं असं आणि त्याच वेळी अभिमान वाटावा असं बोलला Wink

अलीकडेच घडलेली गोष्ट. माझा नातु एखाद्या गोष्टीला ''हो'' म्हणताना तोंडानं हो हो म्हणायचा पण मान आडवी ''नाही'' ला म्हणतो तशी हलवायचा. म्हणून मी त्याला म्हणाले, ''हो'' म्हणताना मान,डोकं उभं हलवायचं. तू असं काय करतोस?
तर पटकन म्हणाला,''अगं, ती माझी स्टाईल आहे!!''
आजी गारेगार!!

एरवी नंगू शब्द लिहिताना मला काही वाटले नसते,पण गजानन महाराजांच्या बद्दल असे लिहिणे मला योग्य वाटले नाही.

माझी बहीण नाशिकला ऑफीस क्वॉर्टरला रहात असतांनाची गोष्ट. तीची मुलगी अपुर्वा तेव्हा २-३ च वर्षाची. बहिणीचे घर दुसर्‍या मजल्यावर ..मागच्या गॅलरीत उभे राहुन मागे गुलमोहराच्या झाडाखाली ऊन खात बसलेल्या 'आजीं'शी अपुर्वाचा असा संवाद चालायचा. (त्या ब्ल्यु किंवा ग्रीन अशी नौवारी साडी आलटुन पालटुन घालायच्या.)

अपुर्वा: ब्ल्यु ब्ल्यु आज्जी, तुम्ही काय करता?
आजी: काही नाही बाई, बसल्येय ऊन खात!
अपुर्वा: तुमचं घर कुठे आहे?
आजी: ते काय ते, समोरच!
अपुर्वा: तुमचे बाबा कुठे गेलेत
आजी फक्त 'वर' बोट दाखवायच्या.

अपुर्वाची आई, बळजबरीने तिला आत घेत असे.

परिणाम असा झाला की रोज रोज तेच प्रश्न ऐकुन आज्जी वैतागुन झाडाच्या मागे (लपुन)बसुन ऊन खाऊ लागल्या. Sad

(असाच प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम वरच्या काकुंशी चालायचा. मग त्यात्...तुमचं बाळ कुठे आहे? तुम्ही कुठली पावडर लावता बाळाला... पासुन तर तुम्ही कुठली टुथपेस्ट वापरता वै. वै. सगळे प्रश्न असायचे. )

Pages