Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोरीला घेऊन सर्कस पाहण्यास
पोरीला घेऊन सर्कस पाहण्यास गेलो होतो. तिथे त्या सर्कशीतल्या पोरींचा झोक्यांच्या कसरतीच खेळ चालू होता.....
त्या ऊंचावर इकडून - तिकडे झेपावणार्या पोरी बघून माझी पोरगी हसत पट्कन बोलली..
:ई.. पप्पा.. तिची चड्डी दिसतेय...."
मी आणि बायकोने डायरेक्ट खाली माना घातल्या....
आमच्याकडे तर संचय आहे अश्या
आमच्याकडे तर संचय आहे अश्या किस्स्यांचा
१) लहान लेक पाहुण्यांसमोर - आई माझी बाहुली कुठेय?
मी - अग असेल कपाटात किंवा तुझ्या खेळण्यात
लेक - नाहिये तिथ मी पाहिली
मी चिडुन - तूच खेळतेस ना मग तुलाच माहिती पाहिजे कुठेय ती
लेक - पाहुणे येणार म्हणुन तूच कोंबुन ठेवतेस ना पसारा मग तुलाच माहिती पाहिजे कुठाय ती
२)घरी कधीही चहा कॉफी न घेणारी मुल बाहेर गेल्यावर हट्ट करतात. आपण सांगाव घेत नाहित आणि त्यांनी सांगाव आम्हाला कधी देत नाहीत.
३) जरा कुठे बाहेर पडल की लेकिच्या डिमांडस सुरु होतात. चॉकलेट्स, गोळ्या, लेज, कुरकुरे, बिस्कीट काहिनाकाही तरी हवेच असते.
एकदा मी चिडुन तिला म्हणाले की तुमच्या या हट्टापायी मी दरिद्री झालेय. आता माझ्याकडे पैसे नाहीत. संध्याकाळी आज्जीला लेक सांगतेय्,"आज्जी, आता तूच मला खाऊ घेऊन देत जा. आमची आई भिकारी आहे तिच्याकडे पैसे नाहीत."
४)सोसायटीत कचरा गोळा करणारा माणुस थोडा काळासावळा आणि टकलू आहे. एकदा कात्रज सर्पोद्यानात जाताना असाच एक माणुस सामोरा गेला. लेक कडेवर होती, त्याला पाहुन जोरात ओरडली,"ओ कचरेवाले काका"
पाहुणे येणार म्हणुन तूच
पाहुणे येणार म्हणुन तूच कोंबुन ठेवतेस ना पसारा मग तुलाच माहिती पाहिजे कुठाय ती >>>>
माझ्या मुलिला ( वय वर्षे
माझ्या मुलिला ( वय वर्षे जेमतेम अडीच)रस्त्यावरच्या होर्डिन्गस पासून टीव्हीवरच्या जाहिरातिपर्यन्त सगळ्यामध्ये दिदी,काकी वगैरेन्चे पोट दिसते. रस्त्याने जाताना कुण्या बाईचा पदर जरा बाजूला झालाअसेल आणि पोट दिसले की ही ओरडून सांगते . अजून तिचे उच्चार जनमानसाला कळण्याजोगे नाहीत म्हणून बरं आहे!
तिची वाईट्ट खोड म्हणजे जरा बर्या मुली दिसल्या की सरसकट 'दिदी' म्हणते! माझी पंचाईत!
पण मलाच का हे सांगतेस, यावर
पण मलाच का हे सांगतेस, यावर माझ्या आईचे उत्तर असायचे, तू शहाणा ना, ती ऐकशील म्हणून तूला सांगते,
मला वाटते, हि पॉलिसी चांगली आहे.
इथे बहुतेक किस्से काय दाखवताहेत, तर मूलांना असत्य, दांभिकपणा, अन्याय यांची मुळातच चिड असते.
आणि ते चांगलेच आहे की.
जरा बर्या मुली दिसल्या की
जरा बर्या मुली दिसल्या की सरसकट 'दिदी' म्हणते! >> गिरी मी अनुभव घेतलाय
समुद्रमध्ये सई, आरती सर्वांना सोडून ती मलाच 'दिदी' म्हणत होती..
सगळे किस्से म्हणजे
सगळे किस्से म्हणजे
गटग म्हणजे काय?
गटग म्हणजे काय?
get together = GTG = ग ट ग
get together = GTG = ग ट ग
काक्आ मि आनि कार्त कदि नवे ते
काक्आ मि आनि कार्त कदि नवे ते रिसेप्स्अन्ला गेलो तिते काक्या इकदे तिक्दे तोंद मारत फिर्त होता तेव्हा कार्त काक्याकदे बगुन मनालं..
"बाबा पोस्त ओपिस उग्दं आहे पत्र ताकु "आनि तिश्यु पेपर होता त्याच्या हाआतात तेवा.
काक्याने तोंद वाक्दं करत माझ्य्कदे पाहिल्ं तवा मनाले बाप जैसा बेता अनि कय.
मला लाज वातलि आनि तोपर्त काक्याने चेन आनि लाज पन आव्र्लि.
सगळेच किस्से धमाल आहेत... हा
सगळेच किस्से धमाल आहेत... हा माझ्या पोरीचा..
लाडकी नणंद खुप दिवसानी भेटायला आली म्हणुन माझ्या बायकोने तिला एक साडी घेतली... त्या दोघींच्या साडी, पुण्यातील दुकाने आणी किंमती याच्यावर चर्च्या चालु होत्या.. बायको उगाचच भाव खायला बोलली की ही साडी सुद्धा कासट मधुन अमुकअमुक रुपयाला घेतली.. खास तुमच्यासाठी वगैरे... तेव्हढ्यात लेकीने मध्येच तोंड घालुन सांगीतले की ..नाही गं आत्या ही साडी आईला वास्तुशांतीला आलेली आहे तीने वापरली नाही म्हणुन तुला देती आहे...
मित्राचा भाचा, शाळेच्या
मित्राचा भाचा, शाळेच्या अॅडमिशनच्या वेळचा ईंटरव्ह्यू
पांडर्या शूभ्र दाढीचे फादर बघून अजिबात बिचकला वगैरे नव्हता.
फादरचा पहिलाच प्रश्न
"हौ ओल्ड आर यू ?"
आणि पहिल्याच चेंडूवर फ्रंटफूटवर येउन खणखणीत षटकार
"आय अॅम नॉट ओल्ड"
फादर पॅव्हेलियनमध्ये.
एकदा मित्र मित्र हॉटेलात
एकदा मित्र मित्र हॉटेलात जेवायला गेलो होतो .
तिथे शेजारच्या टेबलावर नवराबायको आणि दोन मुलं बसली होती.
धाकटं व्रात्य होतं जरा. मग अर्थातच जेवण सोडुन टिवल्याबावल्या करत बसला होता. प्लास्टिकच्या खुर्चीच्या 'हातावर' पाय ठेवुन झोपल्यासारखा बसला होता.
(मला काय गरज होती? उगाचच, ) मी त्याच्याकडे डोळे मोठे करुन बघितलं.
त्यानेही डोळे मोठे केले.
मी त्याला हाताने 'मार देऊ?' असं दाखवलं.
त्याने बसल्या बसल्याच मला त्याचा पाय दाखवला. 'लात देऊ?'
*आईबापाचं लक्ष नव्हतं अर्थातच...
ॠयामा, सेम पिंच. ट्रेन मधून
ॠयामा, सेम पिंच.
ट्रेन मधून बाहेरगावी जात असताना, एका लहान मुलीला जीभ काढून दाखवली.
तीने सरळ पंचनामाच केला.
"काय वेडा माणूस आहे, लहान मुलांसारखी जीभ काढून दाखवतोय."
बादवे मुलगी लहानच होती हो.
हा किस्सा माझी लेक २ १/२
हा किस्सा माझी लेक २ १/२ वर्षाची असतानाचा. एका रविवारी सकाळी नवीन पडदे लावण्याचं काम बायकोने माझ्या गळ्यात टाकलं होतं. लेकीचं बाजुला बसून निरीक्षण चालु होतं, ईतक्यात सासूबाईंचं आगमन झालं,
लेक : बाबा, आजी आलीय.
मी : थांब, हा पडदा लावतो आणि आलोच.
एवढ्यात लेक गेलीच आजीबरोबर गप्पा मारायला.
साबा : बाबा बाजारात गेलेत का ग?
लेक : नाही, आहेत घरात, पडदा लावतायत. थांब मी आलेच त्यांला बोलावून.
साबा : राहू देत काम करतायत तर.
लेक : आजी, त्यांना खरं तर काम करायचं नसतं पण आईच कामाला लावते त्यांना सारखी.
साबांच्या चेहर्यावर विजयी हास्य,लेकीने बरं कामाला लावलय जावयाला म्हणून.
अरे मराठी लोक 'सकाळ' वाचत
अरे मराठी लोक 'सकाळ' वाचत नाहीत का? त्या २-३ आठवड्यांपुर्वी आलेल्या बातमीचा उल्लेख असेल असं वाटलं होतं या धाग्यावर. तर बातमी अशी होती की -
नामांकित शाळेच्या अॅडमिशनच्या वेळचा ईंटरव्ह्यू -
प्रिन्सिपॉल - व्हॉट इज युवर नेम?
मुलगा - माय नेम इज शीला, शीला की जवानी..........
आजुबाजुचे सगळे गारद. आई-वडिल गाशा गुंडाळुन मुलाला काखोटीला मारुन डायरेक्ट घरी.
'सकाळ' वरून आठवलं, एक विनोद
'सकाळ' वरून आठवलं, एक विनोद वाचलेला, 'हल्लीची मुलं' वगैरे नावाचा.
एक सहा-सात वर्षांचा मुलगा धापा टाकत घरात येतो, व टेलिफोन डायरीत पटपट काहीतरी खरडायला लागतो.
हे पाहून त्याचे वडील विचारतात,
"काय रे, खेळायला गेलेलास ना, अन् इतक्यात आलास?
आणि काय लिहतोयेस त्या डायरीत?"
मुलगा म्हणतो, "काही नाही, खालच्या मजल्यावरच्या कोकाटे आजोबांना अटॅक आलाय, त्यांना घ्यायला अँब्युलन्स आलीये, त्यावरचा इमरजंसी नंबर लिहतोय, इमरजेंसीत आपल्यालाही उपयोगी पडेल!"
भाचीचा प्लेस्कूल शाळेसाठी
भाचीचा प्लेस्कूल शाळेसाठी इंटरव्ह्यू होता. आजकाल त्याला इंटरव्ह्यू म्हणत नाहीत, अनौपचारिक मुलाखत म्हणतात. भाचीला सर्व गोष्टी स्वतः निवडायला आवडतात : घालायचा फ्रॉक, चपला/ बूट, माळ, केसाची क्लिप वगैरे. तर बाईसाहेब उत्साहात तयार झाल्या. मुलाखतीच्या वेळीही खूप उत्साहात होत्या.
प्रिन्सिपॉल बाईंनी मुलाखतीत सर्वप्रथम तिला काही जुजबी तुझं नाव काय वगैरे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे अगदी खणखणीत, जोशात दिली गेली. मग प्रिन्सि तिच्या आईवडिलांना प्रश्न विचारू लागल्या. भाचीला काय वाटले कोणास ठाऊक, ती त्यांच्या संभाषणाला मध्येच तोडत म्हणाली, ''हे बघा माझे बूट, नवीन आहेत!!'' प्रिन्सि बाईंनी ''होऽका, छान छान,'' वगैरे केले. दोन तीनदा असे झाल्यावर भाचीला कंटाळा आला आणि ती चक्क प्रिन्सि बाईंच्या हाताला जाऊन लोंबकळली, ''तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? माझ्याशी पण बोलाऽऽ ना!!!'' तिचा आग्रह इतका लाडिक होता की बाई विरघळल्या, पण तोवर भाचीचे आईवडील मात्र आपल्या लेकीच्या वक्तव्यावर बाईंची काय प्रतिक्रिया होते ह्या कल्पनेने धास्तावले होते.
इथे पालकांनी आपल्या मुलांना
इथे पालकांनी आपल्या मुलांना आणलेली लाज असेही टाकू शकतो का...
झाले असे, परवा मी पोराला शाळेतून आणायला घाईघाईत गेलो. तिथे गेल्यानंतर त्याच्या बाई माझ्याकडे बघून हसल्या, मीही आपले तोंडदेखले स्माईल केले. नंतर त्याचा डबा, दप्तर गोळा करेपर्यंत आणखी दोघी ताया बघून हसतायत असे वाटले. हा काय प्रकार आहे हे समजेपर्यंत चिरंजीव पुढे ठाकले..
"अरे बाबा, तु शर्ट उलटा का घातलायस?"...खणखणीत आवाजात...
आणि चेहर्यावर असा का आपला बाबा बावळट असे भाव...
बघतो तर खरंच मी चक्क उलटा शर्ट घालून गेलो होतो.
आता काय करू सांगा...पटापट त्याला बखोटीला मारून घरी आलो..:)
> पालकांनी आपल्या मुलांना
> पालकांनी आपल्या मुलांना आणलेली लाज

>> "आय अॅम नॉट
>> "आय अॅम नॉट ओल्ड">>
यावरून आठवलं.....मी शाळेत असताना आमच्या शेजारी एक आजी, त्यांची तरूण मुलगी आणि तिचा २-३ वर्षांचा मुलगा रहात होते. आजींचा जावई परदेशी असल्याने मुलगी आईबरोबर रहात होती. मुलगी दिवसभर मैत्रीणींबरओबर भटकत असे आणि मुलाची - घराची जबाबदारी आजींवरच होती. मुलाने (ज्याचे नाव जोनाथन होते, पण आम्ही त्याला जाँटी म्हणायचो) आईला कधीच किचनमध्ये काम करताना पाहिले नव्ह्ते. एकदा जाँटी त्याच्या आईबरोबर आमच्या घरी आला होता. मला आईने स्वयंपाकघरात काहीतरी करायला सांगितले होते. जाँटीने मला बाहेरूनच विचारले....'अमिता, व्हॉट आर यू डूईंग?' मी म्हट्ले, 'कुकींग'. या वर हे महाशय आईसमोरच ओरडून मला म्हणाले की. ''व्हाय आर यू कु़कींग? ओन्ली ओल्ड पीपल कूक. माय मम्मा नेव्हर कुक्स." त्याच्या आईच्या चेहर्याकडे पाहून असे वाटले की, तिने नक्कीच मनात 'धरणीमाते' म्हटले असेल.
मी ओल्ड नसून मला किचनमध्ये काम करावे लागते, यामुळे त्याला माझी दया येत असे. रात्रीच्या जेवणानंतर स्वच्छ केलेली भांडी मांडून ठेवायचे काम माझे होते. तर जाँटी रोज भांडी लावून ठेवायच्या वेळी येवून मला मदत करत असे.
सगळ्यांचेच किस्से जबरी आहेत !
सगळ्यांचेच किस्से जबरी आहेत ! :हाहा:, खूपच मजा येतेय रोज नवे किस्से वाचायला.
खरंतर बाफचं नाव 'मुलं लाजवतात तेव्हा' असं असलं तरी आपणच मुलांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे लक्षात येतंय ना ?
मी सुरु केलेल्या पहील्याच बाफला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचेच धन्यवाद !
अजून पर्यंत तरी फक्त
अजून पर्यंत तरी फक्त वाचतेय..
आणि काल अचानक chicken soup for the parent's soul मिळालं...अप्रतिम!!! खास!
येथील अनुभव आणि पुस्तकातील अनुभव रिलेट करताना जाणवलं की मुलं संवेदनाशील, समंजस आणि स्मार्ट असतात...
सगळ्यांचे अनुभव मस्त! लिहीत राहा अनुभव, मी वाचतेय
माझ्या मित्रांने सांगितलेला
माझ्या मित्रांने सांगितलेला एक किस्सा.
मित्राच्या मुलाचे स्कुल अॅडमिशन चे ईन्टरव्यु होते, प्रिंसिपॉल ने मुलाला विचारलं, व्हेर डु यु लिव.
मुलगा : आय लिव इन आयफेल टॉवर
(आयफेल टॉवर हे नेरुळ मध्ये एक बिल्डिंग चे नाव आहे :फिदी:)
"ओ कचरेवाले काका" आज्जी, आता
"ओ कचरेवाले काका"
आज्जी, आता तूच मला खाऊ घेऊन देत जा. आमची आई भिकारी आहे तिच्याकडे पैसे नाहीत.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>शुभांगी कुलकर्णी
प्रिन्सिपॉल - व्हॉट इज युवर नेम?
मुलगा - माय नेम इज शीला, शीला की जवानी..........>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>मनिमाऊ
सुबब किस्से
@गिरीराज , आमच्याकडेही तिच
@गिरीराज , आमच्याकडेही तिच परिस्थिती आहे, कामवाल्या, पोळीवाल्या आल्या की मुलगी दाखवणार - पोट दिसतयं आणि हसणार
एकदा तर भर रस्त्यात तिच्या बाबाला एका बाईकडे बोट करून - तिचं पोट दिसतयं म्हणाली
, मी आणि नवरा तिथून तात्काळ काढता पाय घेतला........
माझी धाकटी बहीण माँटेसरीत
माझी धाकटी बहीण माँटेसरीत असतानाची ही गोष्ट. तेव्हा बालकमंदिराच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या युनिफॉर्मवर आपले नाव पत्ता इत्यादीचा बिल्ला लावायची पध्दत अस्तित्वात नव्हती.
एकदा तिची शाळा सुटल्यावर तिला घरी नेण्यासाठी शाळेत पोहोचायला आईला झाला उशीर. पंधरा-वीस मिनिटे झाल्यावर शाळेतल्या एक ताई होत्या त्यांना वाटले, छोटीशी पोर किती वेळ उन्हात आईची वाट बघणार? आमचे घर शाळेच्या जवळच होते हे त्यांना माहित होते, टिळक रोडच्या नक्की कोणत्या भागात घर आहे हेही ठाऊक होते, फक्त इमारत कोणती ते माहित नव्हते.
त्यांना वाटले, माझी बहीण आपल्या घराची इमारत सहज ओळखू शकेल. एरवी ती त्यांच्याशी चुरूचुरू बोलत असायची. त्या ताईंनी रिक्षात माझ्या बहिणीला बसवले आणि विचारले, ''काय गं पत्ता तुझ्या घराचा?''
एरवी घराचा पत्ता घडाघडा पाठ म्हणून दाखवणार्या माझ्या बहिणीचे तंत्र त्या दिवशी बिनसले होते.
तिने त्यांना उत्तर दिले, ''दगडावर दगड आहे, तिथं माझं घर आहे!!!''
शाळेच्या त्या ताई अवाक् !!
तरी ''बरं, बरं,'' करत त्या दहा मिनिटे टिळक रोडच्या आम्ही राहत असलेल्या भागात रिक्षातून बहिणीला घेऊन हिंडत होत्या. प्रत्येक इमारतीपाशी जाऊन कोठे दगड दिसतोय का हे बघायच्या. माझ्या बहिणीला विचारायच्या, ''इथं आहे का तुझं घर?'' त्यावर तिचा नकार.
तिला पुन्हा पत्ता विचारला, त्यावर तिचं उत्तर ठरलेलं...
''दगडावर दगड आहे, तिथं माझं घर आहे!!!''
शेवटी दहा मिनिटांनी त्यांचा धीर संपला. तिथून तीन-चार चौक पलीकडे त्यांचं घर होतं. शाळेच्या ताई माझ्या बहिणीला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांच्या घरच्या डायरीत त्यांनी आमचा टेलिफोन नंबर काही काळापूर्वी लिहून घेतला होता, त्यावरून माझ्या आईला फोन करून तसे कळवले. मग आई बहिणीला त्यांच्याकडे आणायला गेली. घरापाशी आल्यावर आईने बहिणीला विचारले, ''आपल्या घराजवळ दगडावर दगड कुठं दिसला तुला?''
बहिणीने मूकपणे घरासमोरच्या वीजेच्या खांबाकडे बोट दाखवले. तिथे खरोखरीच पायाशी एक छोटासा दगड आणि त्यावर लगोरीसारखा रचून ठेवलेला दुसरा बारकुस्सा दगड होता.
आईने कपाळावर हात मारून घेतला बस्स!
सगळे किस्से म्हणजे किस्सेच
सगळे किस्से म्हणजे किस्सेच आहेत!
प्राजक्ता,
माझी लहान लेक (दीड वर्षे) सध्या जरा कुणाचे पोट उघडे दिसले की बेबी (बेंबी) बेबी करते आणि हसते. परवा पाळणाघरात मुलाला सोडायला आलेल्या आईकडे बघुन म्हणत होती. तिला वाटले की ही बेबी (बाळ) म्हणतेय.
माझा २.५ वर्षाचा मुलगा पण जरा
माझा २.५ वर्षाचा मुलगा पण जरा कुणाचे पोट उघडे दिसले कि लगेच बोलतोच "बेंबी" ...फक्त हळुच बोलतो..कारण आमचे डोळे लगेच वटारले जातात..
मुलगी दाखवणार - पोट दिसतयं
मुलगी दाखवणार - पोट दिसतयं आणि हसणार>>>>>>मला वाटतं की आपण आपल्या मुलींना व्यवस्थित्पणे रहाण्याची शिकवण देतांना त्यांच्याच मनात याविषयी बिम्बवत असतो. त्यामुळे त्यांच्या समजुतीपेक्षा विरुद्ध गोष्टी दिसल्या की आपल्यालाच शिकवण मिळते
Pages