मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगु हा किस्सा घडणं स्वाभाविक आहे. पण कधी कधी विनोद घडतात आणि कधी कधी घडवून आणले जातात. घडणं हे बिघडण्यासाठी असेल तर ते नक्कीच नको याचा विचार आपण करावा.

धन्यवाद. शक्य होतं म्हणून टाळता आलं ना. बस.

जाजु, खरंच गं पोरं अगदी लाज आणतात कधी कधी... परवा आम्ही दोघी चौपाटीला गेलो होतो... तेवढ्यात एका मित्राचा फोन आला... मी त्याला सांगत होते की आम्ही चौपाटीला चाललोय... तर ती मला लगेच मारायला लागली.... म्हणे माझ्याबद्दल सांगतेस ना? सांगशील परत? फोनवर ऐकणारा मित्र मला आता सारखा त्यामुळे चिडवतो...

तिच्या यंदाच्या वाढदिवसाला शाळेत चॉकलेट्स द्यायची का या विषयावर चर्चा सुरू होती... मग तिने एक धोरणात्मक निर्णय जाहीर करून टाकला... शाळेतल्या टीचर मला चॉकलेट देत नाहीत, तेव्हा शाळेत चॉकलेट्स द्यायची नाहीत... मग तिने काही फ्रेंड्सची नावं सांगितली आणि म्हणाली, यांना बोलवा... तिचा स्वतंत्र विचार पाहून मी थक्क झाले... Proud

ठमे.. अग स्वतंत्र विचारसरणीच काही विचारु नकोस..! Happy

माझी मामेबहीण माझ्यापेक्षा २० वर्षे लहान आहे. ती ४ वर्षांची होती तेंव्हाची गम्मत.

माझ्या आईने म्हणजे तिच्या आत्तेने तिच्यासाठी थिक वुलचे ऑरेंज्/येल्लो अशा कॉंबिनेशनचा स्वेटर विणला.. क्रोशासारखा साखळी टाका वै. असं काही तरी त्या बिनबाह्यांच्या बंडीचे डिझाईन होतं.

आईने तिला भाऊबीजेच्या दिवशी सगळ्या गोतावळ्यासमोर दिला.. तिला तो आवडला नाही.. हे तिच्या ५ मिनिटे चाललेल्या निरीक्षणातून दिसत होतं.

सायली - इथे थंडी नसते.. मी हा स्वेटर कुठे वापरू? (मला नक्कोय हा)
आत्ते - अग म्हणून तर जाळीचा आणि बिन हाताचा केलाय.
सायली - पण जाळीचा आहे ना? मग तो कशावर घालू?
तिची आई - अग कुठ॑च्याही शर्ट पँटवर जॅकेट्सारखी फॅशन होईल.
(एकुलत्या एका नणंदेला वाईट वाटू नये.. आणि ह्या बाईने अजुन काही बोलू नये..)
सायली - (२ मिनीटे अजुन विचार करून) पण माझ्याकडे एकही मॅचिंग जीन्स/स्कर्ट नाहीये.
तिची आई - मी घेईन ना तुला. (हुश्य)
सायली - पण आत्त्येने दिलय ना जॅकेट? असं अर्धवट गिफ्ट देतात?

माझी आई आणि मामी वेगवेगळ्या कारणासाठी गोर्‍यामोर्‍या.. बाकी आम्ही सगळे Biggrin

छान धागा आहे! किस्से वाचून धमाल हसलो! 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं' अशी म्हण प्रचलीत आहे खरी, पण खरं तर आई-बाबांना नको तिथं नको ते बोलून, नको तेव्हा 'खरं' बोलून अडचणीत आणण्याची एक विलक्षण कला मुलांना प्रदान करुन, देवाने सार्‍याच आई-बाबांची मस्त गोची करुन ठेवली आहे! Uhoh

मझ्या सा.बा. १ दा, माझ्या मुलाला म्हणत होत्या, आता सुट्टी लागेल ना तर त्या आजीकडे जा (माझ्या आईकडे). ती तुझी आजी आहे ना तुझे भरपुर लाड करेल. - मुलगा वय वर्षे - ३ नुकतेच पुर्ण.

तु पण आजी आहेस ना माझी, मग तु कर ना लाड, मला तिकडे जा म्हणुन काय सांगतेस?

नशीबाने, मी समोरच बसलेले व माझी कोणतीही कॉमेन्ट नसतानाही मुलानेच दिवे पाजळले होते.

पुन्हा सा.बा. नी त्याला असे काही म्हटले नाही.

ईथे कदाचित हा किस्सा लिहीला असेल पुर्वी.
परत एकदा टाकतेच. माझा एक भाचा चार वर्षांचा असतानाची गोष्ट. त्यांच्याकडे कोणीतरी शेजारचे आजोबा आले. त्यांनी याला शाळा कोणती? मित्र कोण? हे म्हणुन दाखव ते म्हणुन दाखव, असं बोअर करायला सुरुवात केली. याने त्यांना विचारले 'आता कटायचे काय घेता?' त्यावर ते आलेले आजोबा गोरेमोरे आणि त्याचे आज्जी आजोबा आव्वाक आणि गोरेमोरे वगैरे. आज्जी आजोबाना प्रश्न पडला याला हा शब्द कुठुन समजला?
संध्याकाळी आज्जी मैत्रींणा भेटायला सोसायटीच्या आवारात गेली आणि तिने हा किस्सा सांगितला. त्या मैत्रीणींपैकी एकीने सांगितले, 'अहो तुमचा नातु आमच्याकडे येतो तेव्हा आमची (कॉलेजवयीन) मुले त्याच्या बडबडीला कंटाळुन त्याला विचारतात हा प्रश्न!'

@ गुगु
कुणीही कुठलेही किस्से संपादित करायची गरज नाहीये. प्रत्येकाला हक्क आहे इथे किस्से सांगायचा. आणि आपण सगळे मोठे आहोत आपल्याला समजतं काय लिहायचं काय नाही. तेव्हा कुणाच्या दबावाखाली येऊ नका.

बाकी किस्से धम्मालेत Lol

माझ्या मुलीला "माझिया प्रियाला" सिरिअलचं गाणं फार आवडते आणि मग ओघाने ते अभिजीत शमिकाही. त्यामुळे सहाजिक ती सिरिअल आजीबरोबर बसून पाहिली जाते. एका एपिसोडमध्ये अभि आणि शमिका एकमेकांच्या जवळ येतात, तर मुलगी जोरात ओरडली, "अरे डोळे बंद करा आता ते चावटपण करणार आहेत" Proud Biggrin

हसावं की रडावं काही कळेना. Rofl

माझ्या ओळखीत एका मुलीने ..

'बाळ, तुझं नांव काय?' या प्रश्नाला...
'दगड गोविंद देसाई' असं उत्तर दिलं होतं...
आलेल्या पाहुण्यानी तिच्या आईला योग्य कारणांसाठी योग्य प्रकारे झापलं.. Happy

माझ्या मावशीने एक किस्सा सांगितलेला..
तीच्या समोरच एक ३-४ वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीची आई आणि काहि बायका अश्या रात्री जेवण्यानंतर फेरी मारून गप्पा मारत बसल्या होत्या सोसायटीच्या आवारत. हे छोटी मुलगी झाडाजवळ जाऊन एक पान ओरबाडून घेऊन आली. तीच्या आईने सांगीतलं तीला कि अगं रात्रीच्या वेळी पानं तोडू नयेत, झोपलेली असतात ती. हिने आईला सांगितलं कि अगं हे पान झोपलं नह्तं, हे टि.व्हि. पहात होतं..
:p

काहि बोलण्याऐवजी सगळ्या हसायला लागल्या..

आता कटायचे काय घेता ? - हे सहिये.
माझ्याही मुलाला कोणी रात्री उशीरा घरी बसलेले दिसले तर तो सरळ त्यांच्या समोरच विचारतो, हे कुठे झोपणार म्हणुन. त्याला टेन्शन असते, त्याच्या बेडवर झोपतो असे कोणी ठरवले तर काय? Sad

माझ्या पुतण्याचा किस्सा वय ४
त्याला टिव्ही बघताना हजार प्रश्न विचारायची सवय. त्यामुळे त्यातले सिन बघुन काही वेळेला त्याला बंदुक वाईट लोक वापरतात आणी पोलिसमामांकडे सुध्दा असते, सिगरेट चांगली नसते, ड्रिंक्स म्हणजे घाणेरड सरबत आहे अशी माहिती सांगावी लागते. त्याला ही गोष्ट चांगली नाही मग लोक की ती का करतात असा प्रश्न असतो पण काहीतरी सांगुन वेळ मारुन नेतो आम्ही.
असच एकदा लक्ष्मी रोडवर सगळ्यांबरोबर चालत चालला होता आणी एक माणुस साईडला बसुन सिगरेट ओढत होता. पुतण्याने आईचा हात सोडुन पळत जाऊन त्या माणसाला म्हणले ' ओ हे घाणेरड असत ना तुम्हाला तुमच्या आईने सांगितल नाहीये का? तुम्ही आईच काही एकत नाही का?
माझ्या जावेला काय बोलाव सुचेना तो माणुस भांडतो की काय वाटल. पण त्याच माणसाला (धरणीमाते )म्हणाव वाटल की काय कोणास ठाऊक सिगरेट विझवुन खाली मान घालुन निघुन गेला.

धागा मुल लाजवतात तेव्हा असा आहे ना त्यामुळे मला वाटल की पुतण्याने त्या माणसाला खरच लाज आणली आहे. तर तो किस्सा इथे लिहावा मुलांच्या बोलण्याने फक्त पालकांना लाज वाटली पाहीजे अस नाही ना?(उलट ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटला की माझा पुतण्या आणी मुलगी काही वाईट शिकत नाहीयेत..)

माझ्या जावेला काय बोलाव सुचेना तो माणुस भांडतो की काय वाटल. पण त्याच माणसाला (धरणीमाते )म्हणाव वाटल की काय कोणास ठाऊक सिगरेट विझवुन खाली मान घालुन निघुन गेला.>>> उत्तम.

पण १ नक्की, कोण अशा प्रसंगी कसे रिअ‍ॅक्ट होईल माहीत नसते. मला पण माझ्या लेकाने लोकल ट्रेन मधे, हा कचरा कोणी टाकला? या बाईने का? त्या ताईने का? तिकडची बाई संत्र्याची साले ट्रेन्च्या बाहेर का टाकते? ड्स्ट बीन मधे का नाही? असे प्रश्ण विचारायला सुरुवात केली की त्याचे लक्ष वळवावे लागते.

आपण मुलांना चांगल्या सवयी लावतो, पण काही लोक चांगले सांगीतले तरी इतरांना का नाही सांगत मलाच का? असे उलटुन विचारतात. अशा लोकांपुढे मुले पटकन काही बोलली तर भांडणाला कारण नको म्हणुन मुलांचे लक्ष वळवाते लागते. पण कधी रुखरुख लागते, मुले खरच चांगलेच सांगत आहेत. त्यांना गप्प करणे म्हणजे आपलेच शिकवणे खोटे ठरवल्यासारखे होते.

पण अनु३, नक्की कौतुक करा मुलाचे यासाठी.

Pages