मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला, कोणाला तरी माझं म्हणंण पटलं ना, मग झालं तर. Happy

स्वप्ना, मला ही वाचनाचा आनंद घ्यायला नक्कीच आवडतो, पण म्हणुन nonsense, लिहिण्याला कसं चांगलं म्हणणार. मी पुर्ण पुर्ण दिवस माबो वर घालवते ते चांगलं वाचण्याचा आनंद मिळवण्यासाठी.

आणि तुम्ही चांगलं विनोदी लेखन किंवा फॅन्टसीज लिहा, आम्ही अ‍ॅप्रिशिएट करु, पण इथला धागाच जर वास्तवातल्या घटना/प्रसंगाबद्द्ल असेल, तर का बरं फॉरवर्ड जोक्स वाचुन त्याचं खोटं खोटं कौतुक करायचं. मला एवढंच म्हणायचं आहे कि मी मुद्दाम तिरकसपणा करत नाहीए तर फक्त स्पष्ट मत देते आहे. नाही पटलं तर नाही. उगाचच गोड गोड प्रतिक्रिया कशा बरं द्यायच्या?

मी जोरात ओरडले "मी काय चुकुन केलं काय मुद्दाम झालं ना"

हे तुम्ही चुकुन उलटे टाइप केले का खरेच उलट बोललात?
Happy

"मी काय चुकुन केलं काय मुद्दाम झालं ना" ....:G

निलीमा तिनं सांगितलं ना की, "मला 'चुकुन' आणि 'मुद्दाम' यातला फरकच नाही समजायचा..."

"मी काय चुकुन केलं काय मुद्दाम झालं ना" ....

निलीमा तिनं सांगितलं ना की, "मला 'चुकुन' आणि 'मुद्दाम' यातला फरकच नाही समजायचा..."

>> अरे मिस झले ते वाक्य. आजकाल नजर बिघडतेय माझी.

अकु
पत्राचा किस्सा सही आहे. मी पत्रलेखन शिकले तेव्हा असे सर्व पत्रात टाकायला आवडायचे.
ता.क. तर विशेष आणि सा. न. वि. वि शीरसाष्टांग नमस्कार वगैरे सर्व वापरुन पहायचे.

माझी भाची... वय वर्ष ५ .. नाव श्रेया..
एकदा शेजारच्या आजी सोबत... औ.बाद वरुन अकोल्याला येत होती... तिला खुप बोअर होत होतं प्रवासात म्हणुन त्या आजींनी तिला एक गोष्ट सांगितली... त्यात त्या आजी म्हणाल्या म्हतारे झाले की बाई, माणुस देवाकडे जातात. असे सांगत होत्या... तर ही लगेच म्हणते तु तर म्हातारी झाली. तु का नाही देवा कडे गेली.... त्यांना हसावं की रडाव हेच समजत नव्हते...

२) ह्याच भाची चा किस्सा... माझे भाऊ वहिनी गावाला चालले होते... बस मध्ये माझी एक दुरची बहिण भेटली. माझ्या भावाने ओळख करुन दिली श्रेयाला म्हणाला ही तुझी आत्या आहे बरं.... माझ्या बहिणीच्या नवर्‍याचे केस पुर्ण पांढरे झालेले आहेत ... वय कमी.आहे तर ही तिला म्हणाली ए आत्या तु ह्या आजोबांसोबत कुठे चालली.? माझ्या भावाला इतके लाजिरवाणे झाले... तो म्हणाला अग ते मामा आहेत....!!!! Lol

आमच्या शेजारच्या एका दादाचे सुपुत्र वय असेल ३-४ वर्ष.. नाव विशु..... आम्ही त्याची एनर्जी "लेवल" (आणी "गुटगुटीतपणा") बघुन त्याला सुपरबॉय म्हणतो...

साहेब रोज जेवण झाल्यावर वडलांना घेवुन बाहेर पडतात फिरायला.... एकदा असाच मला दिसला फिरताना... त्याला सहज म्हणुन विचारले "झाले का जेवेण"... तर म्हणतो कसा "झाल पण पप्पांनी पोट भरुन नाई खाउ दिल"

दादाच तोंड अस उतरल होत.... तो म्हणाला कसा चिडुन "मला विकुन खा आता"

तिथेच फिरताना गौमातेने "प्रसाद" दिलेला दिसला...

विशुला दादा म्हणतो "अरे तिकडे जाउ नको तिकडे घाण आहे"

ह्यावर विशु "तिकडे कशाला केली मग"

दादा त्याला तिथेच सोडुन घरात निघुन गेला.... फ्रस्ट्रेशन बिचार्‍याच.... बायकोवरच गेलय म्हणतो पोरग

माझ्या भावाची मुलगी(वय वर्ष ४) एकदा जवळच्या काकू कडे वाहिनी बरोबर गेली होती, तिचा स्लीव्हलेस ड्रेस बघून काकू तिला म्हणाल्या टेलरला कापड कमी पडलं काय ? ही खूप चिडली त्यानी कपाळावर लावलेली लहान टीकली बघितली आणी म्हणाली टिकली कमी पडली काय.

ईस्टरच्या सुटीत माझ्याकडे माझा मित्र, त्याची बायको अन त्यांचा ७ वर्षाचा मुलगा असे तीनजण २ दिवसांसाठी आले होते. जातांना त्याने माझ्या मुलांना पैसे देऊ केले, म्हणाला 'अरे येतांना खुप घाई होती, पोरांसाठी काही घ्यायला वेळच मिळाला नाही'. माझी मुलगी नको नको म्हणत होती आणि त्यांच्या मुलाला आपले पप्पा पैसे का देतायेत ते कळत नव्हते. तो सारखं विचारत होता, 'पप्पा का देतोय पैसे आपण?' मित्रानेपण त्याला पटेल असे उत्तर दिले नाही, मग शेवटी तो मोठ्याने म्हणाला "हा! कळलं. आपण यांच्याकडे जेवलो अन त्यांचा कॉट वापरला म्हणुन... हो ना?"
बिचार्‍या मित्राचे तोंड पाहाण्यासारखे झाले होते...

मागच्या वीकेन्डला ट्रेन ने पूण्याला येत होते. कंपार्टमेंट मध्ये एक कपल आणि त्यांची छोटी ३ वर्षांची मुलगी होती. झोपायला थोडा उशिर होता तर आम्ही असंच बसलो होतो, तेव्हढ्या वेळात माझी त्या छोटिशी दोस्ती झाली. झोपायची वेळ झाली, मी लोअर बर्थवर, बायको मधल्या आणि नवरा सर्वात वरच्या... पोरगी पप्पाजवळ झोपायला हट्ट करत होती... मग वर चढली, मी असंच रग वगैरे अंथरत होते बर्थवर... तर पोरिने माझा हात पकडला आणि म्हणाली, "आंटी तुम भी इधर उप्पर सोने के लिये आओ".... Proud तिचा बाप गोरामोरा झाला, बिचारा लपू पण शकला नाही.

दक्स, तु काय केलस ग मग? <<< Proud लहान मुलीचं मन कसं मोडायचं..? मग गेली तिकडे..

आणि तिच्या बाबाला खाली पाठवलं असेल Proud Light 1

बापाला क्षणभर कदाचित असेही वाटले असेल की मुलीला म्हणावे तुमने मेरे मुंह की बात छीन ली बेटे! येथे दिवा घ्यावात! आणि तसेही हे बापाच्या मानसिकतेबद्दल आहे.

किस्सा भारीच!

Pages