मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे किस्से एकदम सोलिड आहेत. आज पहिल्यांदाच हा बाफ वाचला. माझ्या मुलीचा किस्सा

तेंव्हा ती दोन वर्षांची होती. कलत्या वयात होती. तिला एकदा कुठले तरी immunization चे injection द्यायचे होते. त्या करीता तिची बरीच मानसिक तयारी करून डोक्टर कड़े गेलो. त्यांनी छान injection दिले. हिने भोकाड पसरले. तिचे बाबा तिला उचलून समजावत होते. मी आतील खोलीतून डॉक्टर बरोबर बाहेर आले. त्यांच्याशी इतर काही तरी बोलत होते. मैत्रेयि आली आणि डॉक्टर च्या हातावर जोर्रात मारून पलुन गेली बाहेर. माझा नवरा तिच्या मागे धावला. मी मात्र कान कोंडी होवून सॉरी म्हणत राहिले.

आजुन एक
माझे वडिल काही वर्ष सातार ला होते. सातारा १० वर्षं पूर्वी फारसे developed न्हवते. तिकडे उडप्याची होटल तर अजिबात न्हवती. माझी मुलगी दोन वर्षाची असेल. तिला पुण्याला डोसा खायची चटक लागली होती. असेच एकदा आम्ही सतारला फिरायला गेलो होतो. संध्याकाळी एका मंदिरातून परतत होतो. माझी मुलगी आजोबांचा हात धरून चालली होती. ती पटकन वलून लाडे लाडे म्हणते कशी, " आज आनंदा आजोबा आपल्याला होटल मध्ये नेणार आहेत !!! डोसा देनारेत !!". बाबा बिचारे बावरुन गेले. तिच्या इच्छे साठी त्यांनी गाडी karhad कड़े वलावली. मला मात्र कस नुस झाल.

@मोहन कि मीरा : सातार ला रजताद्री नावाचे १ होटल आहे.. जिकडे माझा लहान - पणा पासून डोसा मिळतो..
(दिवे घेणे)

हो ते मला पण माहीत आहे. राजताद्री हे होटल lodging म्हणून चांगले होते. मी लहान पणा पासून तिथे रहायला जात असे. पण ते पुणा std चे नसल्या कारणाने आधीच आमच्या लिस्ट मधून बाद झाले होते. तसे अजुनही अनेक होटल्स आहेत उदा. राधिका वै. पण तिथे दिवसाच्या कुठल्याही प्रहरात डोसा मिळत नाही.

तसेही सातारा ह्या शहराशी आमची नाळ जुललीच न्हवती. त्यामुले तिथे कुठे फारसे होटल मध्ये जाणे व्हायचेच नाही. आई बाबा नाईलाजाने स्वतः चा कारखाना तिकडे हलवला असल्याने रहात असत. जन्म मुंबई मध्ये काढल्या मुले त्यांना फारच फरक जाणवत असे. आर्थात हे मत पूर्णतः वैयक्तिक आहे. इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही. मी आमच्यात घडलेला किस्सा फ़क्त सांगितला. इथे मुलांच्या बाल लीलां मुले येणारे बाके प्रसंग महत्वाचे आहेत.

सोलापूरच्या मामाच्या मुलाचा किस्सा. तो सतत टिव्ही पहायचा. त्याचं एक आवडतं वाक्य होतं --
''मनिलाओं के लिए.. *** रखने का सुरक्षित स्का''
कळलं का ?‍
ही त्याच्या भाषेतील मालाडीची जाहिरात... पाहुण्‍यांना म्हणुन दाखवायचा.
** मधले शब्द मलाही माहित नाहीत.

माझा मुलगा, वय अडिच वर्षे, बाबांची पूजा मन लावून बघत होता, आणि बरोबरीने बडबड चालू. " आईपण कधी कधी पूजा करते, पण ती कपडे घालून करते" Happy

गणपती आले तेव्हा जागा करण्यासाठी देवघरातले नेहमीचे काही फोटो काढून ठेवले होते. ह्याचा प्रश्न, " ते आजोबा (गजानन महाराज) कुठे गेले?"

अर्थात, हे काही लाजवण्यासारखे प्रसंग नाहियेत, फक्त लहान मुलासंदर्भात आहेत म्हणून इथे टाकलेत.

माझ्या बहिणीच्या मुलाचा किस्सा...
पहिलीत आहे, बहिणीला नुकतच दुसरं बाळ झाल्यामुळे त्या गडबडीत त्याची १५-२० दिवस शाळा (इंग्लिश मिडियम) बुडाली होती. तर राजे बर्‍याच दिवसांनी शाळेत गेले, नेहमी प्रमाणे भावोजी त्याला शाळा सुटल्यावर आणायला गेले. तर हा कोणाला तरी शोधण्याच्या आविर्भावात बाहेर आला, भावोजीनी विचारले कोणाला शोधतोयस तर म्हणे 'फ्रेंडला'. मग २-३ मिनीटांनी एका मुलीच्या दिशेने धावत सुटला, भावोजी पण त्याच्या मागे. तर हा तिच्या जवळ गेला नी म्हणाला 'काय ग, आहेस कुठे तु?? मी तुला कधीपासुन शोधतोय...' तिची आई बरोबर होती. भावोजी मोट्या खुशीत (खर तर थोड्या गर्वानेच म्हणजे माझा मुलगा किती मनमिळावु, लाघवी वगैरे आहे म्हणुन या थाटात) तिच्या आईला म्हणाले हा खुप दिवसांनी शाळेत आला ना म्हणुन चौकशी करतोय. मग झालं वाटत त्यांच बोलुन हा आला वङलांकडे, मग तिची आई पटापट तिला घेऊन जरा पुढे घेऊन गेली. तर हे महाशय मागुन मोठ्याने ओरडले, 'ए, still I love u हां....' आजुबाजुचे ही बघु लागेले होते, भावोजींनी कपाळावर हात मारला नी चार पावल मागेच राहीले. बहुतेक त्याला वाटल मी १५ दिवस शाळेत आलो नाही म्हणजे तोपर्यंत कोणी दुसर हिला बोलुन गेल असेल तर????

'ए, still I love u हां....>>>>> याला म्हणतात डंके की चोट पे Proud

आईपण कधी कधी पूजा करते, पण ती कपडे घालून करते
हा हा हा. एकदम मस्त! अगदी भाबडेपणानं बोलला तो!

मैत्रिणीचा नवरा मैत्रिणीला म्हणाला की हा (मित्र) गाढव अजून कसा नाही आला?
माझ्या मैत्रिणीची मुलगी वडीलांच्या मित्राकडे पाहून, " बाबा गाढव आला."
तो मित्र अगदीच लंगोटीयार होता म्हणून निभावले नाहीतर.......

माझ्या सासूबाईंकडून ऐकलेली गोष्ट..नवरा आणि दीर लहान असतानाची....
एकदा घरी सासर्‍यांनी त्यांच्या मित्राला जेवायला बोलावले होते.ह्या मित्राचे खाणे 'अतिप्रचंड' प्रमाणात होते. घरी सासर्‍यांनी सा.बां. ना सांगीतले की उद्या आपल्याकडे 'बैल' जेवायला येणार आहे.:अओ: दुसर्‍या दिवशी मुले घरी वाट बघत बसली की खरच आपल्या घरी आता कोण आणि कधी बैल आणणार म्हणून....
थोड्या वेळाने मित्र घरी आला. नंतर सगळे जेवायाला बसले. शेवटी धीर संपून नवर्‍याने विचारले....बाबा, तुम्ही तर सांगीतले होते की बैल जेवायला येणार आहे म्हणून..हा तर माणूसच आलाय की....:अओ:

सगळेच किस्से एकाहून एक आहेत. काही काही तर Rofl
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचा किस्सा - वय ३-४ असेल फार तर. ही स्वारी मनापासून गोडखाउ. एकदा श्राध्दाचे भटजी जेवत होते तिच्याकडे. अजुन काही मंडळी होती. त्यापैकी कोणीतरी याला मोठेपणी काय होणार हे विचारल. हा पठ्ठ्या म्हणतो, "भटजी" आता इथेच थांबावे की पण विचारणार्याने विचारलच का रे. तर हा म्हणाला की "मग खूप लाडू खायला मिळतील." माझी मैत्रिण बिचारी..... Uhoh

माझी मुलगी जर्मनीमधे वाढलेली आणि तिने कधीच कधी आफ्रिकन बघितले नव्हते. अमेरिकेत शाळेत गेली तेव्हा तिच्या वर्गात एक मुलगी आफ्रिकन वर्णाची होती. दोन तीन दिवसानी ती मला म्हणते, 'त्या क्ष मुलीला कसं कळत नाही , तोंडाला काळी पावडर लावून येते..'.. नशीब शाळेत बोलली नाही Happy
(तेव्हा ती तीन वर्षाची होती)..

बैल Rofl

शेवटी धीर संपून नवर्‍याने विचारले....बाबा, तुम्ही तर सांगीतले होते की बैल जेवायला येणार आहे म्हणून..हा तर माणूसच आलाय की....

>> माय गॉड बिच्चारे सासरे.

अजून एक किस्सा नवर्‍याच्या लहानपणीचा.. नवर्‍याने आणि दीराने एकदा ठरवले की घरी रेनकोट तयार करायचा. त्यासाठी त्यांनी घरातले सगळे मेण, मेणबत्त्या, दिवाळीतल्या पणत्यांतले मेण गोळा करून एका पातेल्यात घातले. ह्यांची आईडिया अशी की हे सगळे मेण वितळवायचे आणि त्याच्यात शर्ट बुड्वायचा. शर्ट बाहेर काढ्ल्यावर त्यावरचे मेण वाळेल आणि त्याच्यावर मेणाचे कोटिंग बसेल.आणि मग रेनकोट तयार होईल Happy त्याप्रमाणे ह्या दोघांनी ते पातेले गॅसवर तापवायला ठेवले. थोडा वेळ झाला आणि शर्ट बुड्वायच्या आधीच दोघांना बाहेर गाडीचा आवाज आला. माझ्या सासूबाई त्यांच्या अपेक्षेपेक्शा लवकरच घरी आल्या होत्या. त्यामुळे हे दोघे गोंधळले. अचानक हे सगळे कुठे लपवावे त्यांना कळेना. दीराने चातुर्य दाखवून चिमट्याने पातेले उचलले आणि सगळे मिश्रण बेसीन मधे ओतले..त्याबरोबर त्या मिश्रणातून अचानक जाळ निघाला. दीर बेसीन मधे बघत होता.त्याचे डोक्यावरचे थोडे केस जळाले.:अओ: बेसीनचा रगडा झालेलाच होता..आणि वरती हे केसांबद्द्ल आता आईला काय स्पष्टीकरण द्यावे हा नवीन प्रश्ण तयार झाला..:-)
नंतर ची स्टोरी काय ते सगळ्यांना परिचीत असेलच....:-)

ही अस्मादीकांची कथा! ७-८ वर्षांची असेन मी. आई-बाबा, मी आणि बहीण दिल्लीला गाडीने चाललेलो. समोरच्या berth वर एक सरदार कुटुंब होते. मुंबईहून दिल्लीला चाललेले ते पण. त्यांची मुलगी साधारण माझ्याच वयाची. त्यामुळे आमची गट्टी जमली. दोघी एकदम वरच्या berth वर चढून गप्पा मारत बसलो. अर्थात माझं अफाट हिंदी तिला कितपत कळत होतं देव जाणे! गप्पांच्या ओघात मी तिला सरदारजीचे जोक्स सांगायला सुरुवात केली. १-२ सांगितले नी खाली आईच्या अचानक लक्षात आलं, माझं काय चाल्लय ते! मग काय आईने माझी एकाएकी खाली बोलावून हळू आवाजात चांगलीच खरड्पट्टी काढली.

ह्या माझ्या भाच्याच्या कथा! त्याच्या कथांची तर मोठी कादंबरीच तयार होईल. साहेब, वय वर्षे - ३.५ - ४ असताना घरगुती नर्सरीत त्याला घातलेलं. तिथे तो न गेलेलेच दिवस जास्त भरतील. रोज शाळेत जायला रडायचा. त्या संचालिका बाई आपल्या त्याला रोज घेऊन बसलेल्या असायच्या. पुढे jr KG करीता त्याला बालमोहन शाळेत admission घेतली. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. शाळा सुरु व्हायला अवकाश होता. एकदा शिवाजी पार्कला मी, बहीण नी हे नक्षत्र फेरी मारत होतो. तर त्या संचालिका बाई भेटल्या. बहीण त्यांच्याशी ५ एक मिनिटं गप्पा मारत होती. हे युवराज त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे राहिलेले. त्या एकदम भाच्याला म्हणाल्या, काय रे, येणार ना शाळेत परत. तर एवढा वेळ पाठ फिरवून उभे राहिलेले युवराज एकदम त्यांच्याकडे बघून थाटात म्हणाले - "आता तुमच्या शाळेत येणारच नाही मी. तुम्हाला महित नाही का? मला बालमोहन ला admission मिळाली. मी आता बालमोहन ला जाणार!"
पुढे ५वी-६वी ह्याचा अभ्यास घ्यायला एक बाई घरी यायच्या. त्या आल्या की हा घरी cycle चालवत रहायचा. बहीण घरी नसायची. फक्त कामवाल्या बाई, याची मोठी बहीण नी या शिकवायला येणार्‍या बाई. ह्याला कोणाचा धाक नाही. शिकवणीच्या बाईंनी एकदा त्याला विचारले - अमुक्-तमुक कविता म्हणून दाखव. ह्याने त्यांनाच विचारले "तुम्हाला येते?" त्या बिचार्‍या म्हणाल्या - "हो येते". तर ह्या पठ्ठ्याने त्यांना सांगितले - "मग तुम्हीच म्हणा ना मग!"

परवा, कोजगिरीला, मुलाला ओवाळले, (ज्येष्ठापत्य निरांजनम), तबक तसेच टेबलावर राहिलेले. सकाळी इस्त्रीवाला भैय्या आला, म्हणुन मी कपडे गोळा करायला बाल्कनी मधे गेले, आत आले तर इस्त्रीवाला घरात लाजुन उभा, म्हण्तो भाभी, सिद्धु (आमचे चि.) बुला रहा है, कोइ प्लेट और चावल ढुंड रहा है, मी मुलाला हाक मारली, तर म्हणतो, की आई, ताट कुठे आहे, आणि भात (तांदुळ), इस्त्रीवाल्या काकांना "आचाच" (असं असं च बोबडे बोल.) कलायच आहे. (इस्त्रीवाल्या काकांना औक्षण करायचे आहे). मी हसुन कटविले इस्त्रीवाल्या काकांना.

एक माझाच किस्सा आहे.

मी तेंव्हा ४ वर्षांची असेन. आम्ही तेंव्हा एकत्र कुटुम्बात रहात होतो. मी आणि माझ्या दोन चुलत बहिणी एकाच वयाच्या आहोत. आम्ही एकदा भातुकली खेळत होतो. त्यात चित्रा आई झालेली आणि आम्ही दोघी तिच्या मुली. खेलता खेलता तिचे खरे बाबा म्हणजे माझे काका आले. काका आल्या बरोबर चित्रा उठली आणि लाडाने त्यांच्या मांडित जावून बसली. मी पटकन उदगारले, " ए आई !! बाबांच्या मांडित काय बसते." सगळे हसून हसून बेजार झाले. पण मी आणि माझ्या बहिणी काय जोक झाला ते कलन्याच्या वयात न्हावतो. मोठे हसतात म्हणून आम्ही पण हसत सुटलो.
हां किस्सा रेकॉर्डेड आहे. कारण माझ्या काकांना तेंव्हा असे अचानक voice रेकॉर्डिंग करायची फार सवय होती. त्या मुले आम्ही बहिणी कधी जमलो तर ह्या casset ची नक्की उजलानी होते.काकांच्या ह्या सवयी मुले फार सुन्दर रेकोर्दिंग्स आमच्या कड़े आहेत. बर ती surprised असल्याने त्या गोष्टींची काही और मजा आहे. अनेक सामूहिक कर्येक्रमान्च्या तयारी ची आमच्या कड़े अशी क्लिप्पिंग्स आहेत, उदा; माझ्या ताई च्या लग्नाला मेहँदी लावताना च्या आमच्या सगळ्या मजेचे सुन्दर रेकॉर्डिंग आहे.

माझ्या नंदेची मुलगी वय वर्ष ४-५ ,तिचे न माझ्या सासुचे आजीबात पटत नाही तर ती,माझ्या सासर्याना म्हणते कशी "आप्पा आपल्याला दुसरी आजी आणा " त्यावर माझे सासरे "असु देना ही आजी गोरी आहे ना"[मजेने]

त्यावर ती उतरली " कोळश्या सारखी आसलि तरी चालेल पण तिने माझे एकले पाहीजे "
.........................माझी नंदेची हालत कुठे जाउ न कशी जाउ अशी झाली

पोरं हा शब्द पुत्र , पुत्री यावरुन आल असावा, तन्जावर कडील मराठी भाषेत अजूनहि पोर आणि पोरी हेच शब्द वापरतात. त्याना मुलगा आणि मुलगी हा शब्द माहीत नाही.

माझी मुलगी. वय ४. एकदम माझ्या एका मित्राल म्हणाली "माझ्या हि पोटात बाळ आहे." आम्ही दुसरे मुल होणार आहे बाकी कोणाला सान्गितले नव्ह्ते. त्यामुळे आम्हाला काय बोलावे ते लगेचच सुचली नाही. पण मित्रकडून खरडपट्टी निघाली.

Pages