मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी भाची लहानपणापासून फटकळ. (बहीण मात्र अगदीच मुखदुर्बळ ) अरे ला कारे, म्हंटल्याशिवाय ती गप्पच बसणार नाही. अगदी लहान असताना, शाळेतल्या एका कार्यक्रमाला नटून चालली होती.
बसच्या कंडक्टरने विचारलेच, कुठे चाललीस, लग्नाला का ?
तर हि नाक उडवत हो म्हणाली.
कंडक्टरला मजा वाटली, त्याने परत विचारले, कुणाचे लग्न ?
आता हिचा पेशंस संपला, म्हणाली माझेच आहे !
आता त्याला आणखी हसु आले, व त्यावे विचारले, कुणाशी आहे लग्न ?
तर हिने काय उत्तर द्यावे, तू तयार आहेस का ? तूझ्याशी करते !

आता तिचे लग्न झालेय, तरी आम्ही तिला कंडक्टर वरुन चिडवतो.

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट माझी ताई एखाद वर्षांची होती

शेजारच्या आजी तिला खेळवत होत्या "मना (तिच टोपण नाव) ती बssघ हssम्मा"

"आम्ही तिला गाय म्हणतो" स्पष्ट आणि स्वच्छ

प्रिन्सिपॉल - व्हॉट इज युवर नेम?
मुलगा - माय नेम इज शीला, शीला की जवानी..........

हहपुवा.......... अजुनही थांबत नाहीये

माझी मुलगी देवासमोर डोळे बंद करुन बसली होती.तिच्या लेकीने तिच्या कानात विचारले मॉमी आर यू डेड ऑर अलाइव्ह ?से येस ऑर नो.

हो, हे माझ्याबरोबरही झाले होते, एकदाच मी दुपारची डोळे मिटून पडले होते, माझ्या मुलीला तेव्हा मला असे झोपलेले पहायची सवयच नव्हती, त्यामुळे तिने पण मला विचारले होते, 'मम्मा, व्हॉट हॅपन्ड ? आर यू डाईंग ?' Lol त्या परीकथांमध्ये कसे सगळे झोपतात (मरतात) आणि मग कोणीतरी येऊन त्यांना परत उठवते त्यामुळे या मुलांना डेड आणि अलाईव्ह चे नक्की अर्थ माहीत नसतात आणि सुरुवातीला झोपण्याला ते डेड म्हणू शकतात.

माझा स्वतःचा किस्सा/किस्से-: आइ खुप रंगवुन सांगत असते आजुनही.
१. प्रसंग्-शिशुशाळेचा interview
हेडबाईंनी मला विचारले की याला काय म्हणतात? ,त्याला काय म्हणतात? (वस्तु दाखवुन), मी उत्तरेही दिली. मग मी विचारले हेडबाईंना, आता मी तुम्हाला १ प्रश्न विचारते,( बाईंची हवा गुल.) "वांग्याला कन्नड्मधे काय म्हणतात?" बाईंची विकेट..... अस्मादिक-: येत नाही...? मी सांगते, बदनीकाई......(आजुबाजुला कन्नड बोलणारे भरपुर, आणि सोलापुरला कानडी बोलणारे public जास्त. बाईंनी तिकडेच पास केले आसेल.......
२. अक्षर ओळख चालु होती, काना, मात्रा, वेलांटी इ. आई शब्द ओळखायला लावायची. एक दिवस मी काही शब्द लिहिले आणि आईला म्हटले की तु ओळखुन दाखव.
ते असे- (मला टायपताही येत नाही) थोड्क्यात मामा यातल्या प्रत्येक मा ला मात्रा पण, आणि उकार पण. जे उच्चार करणे अशक्य होते......... आणी २ शब्द मराठी भाषेला बहाल केले, १. मैपिच २. ठेडेडिच
आईला म्हटले यांचा अर्थ सांग. आई म्हणाली आसे शब्द नसतात, मी म्हणाले का नसावेत, काना आहे, वेलांटी आहे, मात्रा आहे, अर्थ असलाच पाहिजे......

एका वेगळ्या अर्थाने लाजवणारा, माझा भाचा. हो वरच्या भाचीचाच भाऊ.
ती मोठी हा धाकटा. याला लहानपणापासून सगळेच शेअर करायची सवय.
अगदी तान्हा असल्यापासून तो निर्मोही आहे. तो काहिही खात असला, आणि कुणी ते मागितले
तर एका क्षणाचाही विचार न करता तो देत असे.
कधी कधी आम्ही उगाच असे करत असू. त्याला भूक लागलेली असे आणि तो काहीतरी खात असे. पण कुणी मागितले कि सगळे देऊन मोकळा.
मग कधी कधी तो परत घेत नसे. खूप लाज वाटायची त्यावेळी.

आता मोठा झालाय. बिझिनेस संभाळतो (हो यंदा कर्तव्य आहे.) पण अजूनही त्याचा स्वभाव तसाच आहे.

मॉमी आर यू डेड ऑर अलाइव्ह ? Happy

असा किस्सा माझ्या पोराने केला होता...
एकदा ऑफीसातून आलो तेव्हा दारातच मला येऊन म्हणाला..
"बाबा आज्जी मेली..."
माझ्या एकदम पायातले त्राण गळाले...
मी एकदम आत धावलो तर आई छानपैकी फोनवर बोलत होती..
मग पोरग्याला धरलं, म्हणलं कुठून शिकला असलं बोलायला..
तर अगदी निरागसपणे ....
"अरे बाबा, मी आणि आज्जी खेळत होतो ना मी तिला बंदुकीनी ढिश्युम केलं आणि मग ती मेली..."

त्यानंतर आईने सांगितलेला किस्सा...
रोज त्याच्यासाठी खोटं खोटं मरावं लागतं...आणि मी जाडजुड असल्याने एकाच गोळीत मरून चालत नाही...किमान तीन-चार गोळ्या खाव्या लागतात...

>> पण मी आधी बघणार तो बाबा होउ शकतो का ते.. मग मी त्याला नवरा करणार!

>> जाडजुड असल्याने एकाच गोळीत मरून चालत नाही...किमान तीन-चार गोळ्या खाव्या लागतात..

Biggrin
कसला लॉजिकल विचार आहे पण!

तात्या बाबा असली टोपण नावाने लोकाना हाक मारतो त्याने झालेले दोन किस्से.

पहीला अस्मादिकांचाच साधारण सहावीत असतानाचा फार लहान नसलो तरी केली ती कॉमेंट करण्याइतका मोठाही नव्हतो.

एका मावशी कडे सगळे आजोबाना बाबा हाक मारायचे आणि त्या आजोबांच्या मुलाला म्हणजे मावशीच्या मिस्टराना काका म्हणायचे.
मी आईला सगळ्यांच्या देखत म्हणालो " आssई वैभवचे आजोबा बाबा आहेत आणि बाबा काका"
वर खि!!!खि!!! खि!!!

मावशीची विनोद बुद्धी चांगली असल्याने ती पण हसली. पण आईने मात्र सज्जड दम दिला

आता हा दुसरा मित्राच्या सुशांत सानेच्या मुलाच्या शाळेतल्या इंतर्व्हू मधला
शिक्षिका " व्हॉट इज युवर फादर्स नेम?"
पोरग " रवी काळे"

आणि पोराला कळे ना रवी काकाला सगळे फादर म्हणतात यात एव्हढ हसण्यासारख काय

माझी चुलतबहीण मॉलमध्ये वय वर्षे २ मुलाला घेउन गेली. तिथे हा कार्ट वर बसला होता. एव्हड्यात त्यांच्याच सोसायटीत रहाणारे व्रुद्ध ग्रुहस्थ साध्या वेशात आले आणि याचे कौतुक करु लागले.

आता हिच्या मुलाचा आवाज एक्दम मोठ्या माणसासार्खा घोगरा आहे आणि चेहर्यावर काहीही भाव नसतात पण एका शब्दात उतरवण्यात एकदम एक्सपर्ट.

माझ्या चुलत बहिणीला पण कुठुन दुर्बुद्धी झाली देवास ठाउक. तिने याला विचारले
"काय रे छोटु ओळखलेस का काकांना. कोण आहेत ते?"

हा घोगर्या आवाजात " हो भिकारी!"

माझी चुलत बहीण तिकडुन पळुन गेली.

काही मुलांचे "किस्से" वाचून वाटतंय ह्यांचे पालक ह्यांना हेच वळण लावत आहेत का?

काही प्रसंग वाचून हसायला यायच्या ऐवजी मुलांचे मोठ्यांना दिलेले उत्तर वाचून थक्क व्हायला होतंय आणि ह्यांच्या पालकांनी असल्या उद्धटपणा बद्दल वेळीच समज नाही दिली तर जन्म भर असल्या मुलां मुळे मान कायम खाली घालावी लागेल असं वाटून गेलं.

अक्षरी अगदी मान्य...पण त्यात एक बाजू अशी की मुलांना त्या वयात काहीच समजत नसतं आपण काय बोलतोय आणि त्याचे परिणाम काय आहेत. ते परिणाम आपल्यासाठी लाजीरवाणे किंवा अपमानास्पद असू शकतात पण त्यांच्यासाठी ते काहीच नाही. त्यामुळे त्यांना उद्धटपणासाठी समज देणे हे अतिशय खडतर काम आहे. कारण आपले चुकले आहे हेच त्यांना कळलेले नसते आणि कळण्याचे ते वयही नसते. फक्त दटावून किंवा समज देऊन अशा गोष्टी आटोक्यात आल्या असत्या तर कितीतरी आईबाप सुखी झाले असते.

फक्त एकच या वागण्याचे कौतुक करून, निरागसपणा म्हणून त्याला प्रोत्साहन देऊ नये या मताचा मी आहे. मी इथे काही किस्से दिलेत किंवा माझ्या मित्र मैत्रिणींनापण त्याचे उद्योग सांगतो पण कटाक्षाने त्याच्या समोर नाही. आपण जे करतोय त्याने आई-बाबांना गंमत वाटलीये याचे परिणामही घातक होऊ शकतात. त्यामुळे त्यावेळी त्याला समजाऊन सांगणे की बाबा रे असे बोलत नाही.

आजच माझी बिल्डिंग मधली मैत्रिण सांगत होती. तिचा ४ वर्षांचा मुलगा कोणाकडे खेळायला गेला असताना मोठ्याने अनाउन्समेन्ट करता झाला : "मला ना दोनदोन फादर्स आहेत." त्याच्या मित्राच्या आईने विचारले असे का म्हणतोस तर त्याने सांगितले की एक हेमंतबाबा आणि दुसरा सचिन तेंडुलकर. कारण काय तर सचिनला कोणीतरी गॉडफादर म्हटले होते. Happy

फक्त एकच या वागण्याचे कौतुक करून, निरागसपणा म्हणून त्याला प्रोत्साहन देऊ नये या मताचा मी आहे.
==
अगदी! जे २-२.५ वर्षाचे चिमुरडे अजून नीट बोलता ही येत नसल्या वयात एखाद्या व्यक्तीला साध्या कपड्यात पाहून भिकारी म्हणतो तेव्हा आपणच आपल्या बोलण्या, वागण्यातून त्याच्यावर तसे संस्कार तर केले नाहित ना, हे अगदी मनापासून विचार करून पहावे.

मुलांना मोकळेपणाने बोलु द्यावे, पण कुणा कडे बोट दाखवून बोलणे, रस्त्यातून जाताना कुणावर हसणे, हे चुक आहे हे जर त्यांना शिकवलं तर ते नक्किच शिकतात असा अनुभव आहे.

.

अक्षरी एकदम बरोबर, पण विषयच मुले कशी लाजवतात हा आहे?
२ वर्षे मुलाला जास्त कळत नाही, त्याला फक्त असे बोलु नये सांगु शकतो.
तो खेळताना गेट जवळ भिकारी, त्रुतीयपंथी आले तर तिथे जाउ नको वगैरे आपण सांगतो त्यावरुनच त्याने कपड्यावरुन माणसे ओळखायचे शिक्षण घेतले. आशुचॅम्प म्हणतो त्याप्रमाणे पेशन्स लागतोच.

अक्षरी बरोबर!

आता माझे एक निरिक्षण म्हणजे कितिक गोष्टी या सरावाने आपल्याला माहीत असतात. पण मुलांना शब्दशः अर्थ आणि मतिथार्थ यातला फ़रक माहीत नसतो. एक उदाहरण म्हणजे माझ्या भाच्याला जेव्हा केव्हा एखादी वस्तू कुइंवा क्रिया दाखवत असे तेव्हा साहजिकच मी त्याला इकडे बघ म्हणत असे. जर मी पीसी वर माऊस कसा वापरायचा हे दखवत असेल तर कुणी मोठा माणूस साहजिकच माऊसकडे आणि स्क्रीन कडे बघेल .
पण अश्या वेळी भाचा 'इकडे बघ म्हटले' की हमखास तोन्डाकडे पाहत असे. नन्तर हळूहळू त्यातला मतिथार्थ लक्षात आल्यावर त्याच्यात सुधारणा झाली.

यातून एक लक्षात येते की आपण जे काही मुलांआ सा.गतो ते नेमके त्यांच्यापर्यन्त पोचते की नाही ए पाहीले पाहीजे. नवीन भाषा शिकतांआ त्यातले अन्डरटोन्स आपल्यालाही कळत नसतात त्यावेळीही या गमती होऊ शकतात.

अजून एक बाब म्हणजे त्या त्या वयात मुलॉचे वेगवेगळे प्रकार सुरू असतात. अगदी सुरवातीला तोन्डातले बोट मग रडारडी,पुढे खोटे रडणे नन्तर हात उगारणे.
पण हळू हळू या गोष्टी तेही विसरत जातात.
मोठं होण्याच्या टप्प्यातले ईक टप्पे ईतकाच त्यांचा अर्थ होतो. मात्र या बाबी खूप काळानेही जात नसतिल तर त्यावर विचार करायला हवा!

आशुचँप आणि अक्षरीच बोलण बरोबर आहे.

आता अशाच एका व्रात्य मुलाचा म्हणजे माझाच किस्सा.
माझे आजोबा हा किस्सा रंगवून सांगायचे आणि आईला आजही सांगताना लाज वाटते.

गोष्ट ८० सालातली मी नुकताच मोठ्या शिशुत मराठीत ज्याला सिनीअर केजी म्हणतात त्यात गेलेलो.

पुण्यात मी आई मामा आजी आजोबा असे मराठी चित्रपट पहायला गेलेलो.

मी स्वतःत मशगुल खो खो हसत होतो. आईने दटावल तोंडावर हात धरला पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. तिने हात टेकले.

आजुबाजुची लोक आश्चर्यमिश्रीत कौतुकाने बघत होती.

शेवटी एकाने न राहवून विचारल "आम्ही मगाच पासून पहातोय हा योग्य जागी हसतोय. हे याला कळतय"
" हो ना आम्ही पण पहातोय..." एको आला.

आजोबानी हसून परतवल. मध्यंतरात बरीच लोक माझ्याकडे बोट दाखवून गेली.

पुढे लोक प्रत्येक विनोदाला माझ्याकडे पहात होती

आता इतक सगळ होण्यासारख आणि माझ्यामाणसानी इतक लाजण्यासारख होत काय

तर तो चित्रपट होता.

दादा कोंडकेचा ह्योच नवरा पाहीजे

माझि आत्ये बहिण (आता वय १९) आमच्याकडे शिकायला होति, जवळच्या अंगणवाडित जायचि तिथल्या बाइंच आडंनाव नाड्गोडा, तिला एकदा घरि विचारल तुझ्या बाइंच नाव कायं? बयेन उत्तर दिल नागड्याउघड्या बाइ.

अमि

माफ करा पण किस्सा अमुकच असा असला पाहीजे अस नाही ना!!!

आणि लहान वयात मला पांचटपणा येत होता अस तुझ म्हणण असेल तर ती कॉम्प्लिमेंटच आहे माझ्यासाठी.

बाकि घडल हे अस आहे ...

आशुचँप अक्षरी
जे बोलण चालल होत त्यावरून एक किस्सा आठवला.

माझी मामे बहीण 'र' ला 'ड' म्हणायची. झाल माझ्यासारख्या पांचटांच्या हाती कोलीतच. मी तिला भरवा म्हणायला सांगायचो.
पुढे तिलाही कळल की आपण काहीतरी विषेश बोलतोय.

मग आजीने एकदा तिच्याच समोर आम्हाला झापल. इथेच थांबली नाही तर बहीणीला अस काही ट्रेन केल की दोन आठवड्यात ती 'र' ला 'र' म्हणायला लागली.

माझ्या एका जवळच्या आत्याच्या लहानपणीचा प्रसंग आत्या पहिली दुसरीत असेल आणि तीचा भाऊ तिच्यापेक्षा २-३ वर्षाने मोठा. हिने त्याला विचारले "ए दादा rabbit म्हणजे काय रे,
दादा फारच हुशार तो म्हणाला "ए मूर्ख एवडं पण माहित नाही अग rabbit म्हणजे उंदीर "

Pages