मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ने, तुझी बहिण लहान्पणापासुन आशिच "दंगट" ना ग? पण एका अर्थी बरोबर होता कि ग तिने लावलेला आणि काढलेला अर्थ?

माझी बहीण पण लयी डेंजर... बालवाडीत होती..(वर्ष ३-४)
एकदा आई बाबा मि अन ती.. एका ओळखीच्यांकडे गेलो..
थोडा वेळ झाला कि सगळे ऊठलो जायला.. बहीण काही केल्या हलेना..

चल म्हंटले तीला.. तर म्हणाली.. अजुन ह्या काकुंनी शिरा कुठे केला?
(ह्या आधी गेलेलो तेव्हा त्या काकुंनी शिरा केला होता.. भारी अवडला होता तीला..)
आई ला धरणी माता पोटात घेइल तर बरं असच झालं असेल.. :ड
वर्तुन त्यांनी शिरा खाउन च पाठवलं आम्हाला.. कसा ढकलला शिरा पोटात देव जाणे:ड

उन्हाळ्याच्या सुट्टी मधे मावशी आली म्हणुन दुपारी आई-मावशी गप्पा मारत बसल्या.. आम्हा मुलांना मुवी लावुन दीला.. रेखा चा कुठला तरी..

बहीणीला एव्हाना मुवी कळायला लगलेला.. पचवीत होतं ध्यानःड
रेखा ने म्हणायच्या आधीच.. मोठ्याने स्वतःच म्हणाली.. "मै तुम्हारे बच्चे की मॉ ...."
मावशी आवाक.. आणी आम्हा मुलिन्ना कुठे तोंड लपववे कळत नवते..

आई ने जोराचा धपटा दिला तीला.. :ड

माझ्या ...चा (ही व्यक्ती मायबोलीकर आहे) किस्सा... कुणीतरी पाहुणे जेवायला आलेले पण तसे नेहमीचे येणार्‍याजाणार्‍यातले. काहीतरी घरगुती चर्चा चालली होती आंघोळीच्या टॉवेलवरून. याने कुठेतरी जाहीरात वाचली असावी (तेव्हा घरी टिव्ही नव्हता).. सहज म्हणाला.. 'Carefree Towels आणूया'...
जेवणार्‍यांच्या घशात जो घास अडकला. हसावं की नाही काही कळायलाच मार्ग नाही. Happy

आमच्या ओळखीतल्या मुलाचे तारे.... त्याला त्याची आज्जी कंस कसा वसुदेव आणि देवकीच्या मुलांना मारुन टाकत असे वगैरे वगैरे गोष्ट सांगत होती .... तर याने तारे तोडले " त्या मुलांना मारण्यापेक्षा, त्या दोघांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवले असते.. तर एवढी मुलं मारण्याचं पाप लागलं नसत की... " Biggrin Biggrin Biggrin Biggrin
आजीना काय उत्तर द्याव हेच कळेना... त्या दिवशी पासुन त्यानी गोष्टी सांगण्याचा धसकाच घेतला!!! Uhoh Uhoh Uhoh Uhoh

खुपच दिवस कंट्रोल केलं मी. आवडलं तरी प्रतिक्रिया द्यायला आळस करणारी मी, न आवडलेल्या टॉपिक्सना तर पुर्ण दुर्लक्ष करते.

हा विषय खुपच गोड आहे. किती तरी जणांनी दिलेले प्रसंग पण खुप गोड आणि निरागस आहेत, पण ५०% पेक्षा लोकांनी लिहिलेले प्रसंग क्रिएटेड आणि बंडल वाटतात मला. उगाच विनोद निर्माण करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी बनवलेले. कशाला मुलांना बदनाम करता राव, असले चावट संवाद त्यांच्या तोंडचे आहेत हे सांगुन. काही तर नेटवरचे फॉरवर्ड्स आहेत.

आताची मुल जरा जास्तच हुशार आहेत.......

माझा पुतण्या २ १/२ वर्षाचा आहे. सासुबाई त्याची नख काढत होत्या. त्याच्या शेवटच्या नखाला पोलिओच औषध दिल्याची खुणा होती. हा छत्रपती त्यांना सांगतो..... 'आई माझी नखपॉलिश काढु नकोस..."

मनिमाऊ मला नाही वाटत तसं कारण मा.बो.करनक्कीच प्रगल्भ आहेत तेवढे !! शिवाय इथे येऊन शेखी मिरवण्यात कोणाला काय मिळणार आहे? पूर्वाग्रह ठेऊन कोणत्याही गोष्टीकडे पाहू नका नाहितर त्या गोष्टीचा आनंद मिळवण्यापेक्षा तिरकस बुद्धीच वाढीस लागेल Light 1

स्वप्ना, तुझा मुद्दा मला कळला आणि पटतोय पण.

मला नाव लिहायची नाहीत आणि कुठल्याही विवादात अडकायचं नाही. तु जरी सुरुवाती पासुन वाचलंस तर तुलाही पटेल कि कितीतरी किस्से मुलांच्या संदर्भात खरेही वाटत नाहीत. काही तु सुद्धा फॉरवर्ड मेल्स मधे वाचले असतील, मग उगाच काय?

आणि आता तुला पटवायचंच म्हणुन एकच उदाहरण देते - देवकी-वासुदेव हे काय लहान मुलांना सुचणारं लॉजिक आहे का? काही पण.

मला वाटते की 'त्या' मुलाचे साधारण वय नमुद केले तर त्या घटनेचा जास्त आनंद घेता येईल. मुलगा शब्द बाल्-किशोर्-तरुणवयीन सर्वांना असल्याने, छोटा मुलगा की नवरा मुलगा (तरुण मुलगा) हा गोंधळ टाळता येईल. हा किस्सा कधी (काळ) आणि कुठे झाला यावरुनपण किस्याच्या शक्यतेचा अंदाज येतो.

धागा अगदी बोल्ड ईटॅलिक मध्ये जबरदस्त आहे.........

मला स्वतःचे असे पर्सनल मुलबाळ नसल्याने मला "उधारीचे" किंवा माझ्या आई-बाबांच्या "बाळोबा"चे किस्से टाकावे लागतील.... येइल थोडा वेळ मिळाला की......

बाकी जाईजुई ताई..... तुमच्या मुलीला साष्टांग नमस्कार पोचता करा.....

पूर्वाग्रह ठेऊन कोणत्याही गोष्टीकडे पाहू नका नाहितर त्या गोष्टीचा आनंद मिळवण्यापेक्षा तिरकस बुद्धीच वाढीस लागेल
>>>>>>>>>>>>>अगदी अगदी स्वप्ना! सहमत!

माझ्या लहानपणीची गोष्ट. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुले दुपारी दंगा करायचो. त्याचवेळी आजोबांची झोपायची वेळ असायची. आम्ही खेळायला लागलो की त्यांची झोपमोड होउन ते आम्हाला ओरडायला लागायचे आणि आमचा खेळ बंद पडायचा. यावर काय उपाय करावा या विचारात मी होते. बराच विचार करुन मी त्यांना एक निनावी पत्र लिहायला घेतले. त्या पत्रात मी ' मुले ही देवाघरची फुले' असतात वगैरे सुभाषिते वापरुन मुले खेळत असताना त्यांना कसे ओरडू नये याबद्दल बरेच तत्वज्ञान लिहीले. माझ्या आजोबांना आम्ही 'मोठे आजोबा' असे म्हणत असू. पत्राच्या सुरवाती ला मी ' प्रिय मोठे आजोबा यांस' असे लिहीणार होते पण चुकुन ' प्रिय माठे आजोबा' असे लिहीले.:-) पत्र मी त्यांच्या कोटाच्या खिशात ठेउन दिले. संध्याकाळी त्यांना ते पत्र सापड्ले. बराच आरडाओरडा करुन त्यांनी ते पत्र आई कडे दिले. अक्षरा वरुन हा उद्दोग कोणी केला आहे हे त्यांनी ओळखले होतेच.'माठे' हा शब्द शुध्द्लेखनाच्या चुकी मुळे झाला आहे यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्ह्ते .मग काय मार बसला ते सोडाच वरती मोठया माणसांचा आदर ,मान कसा ठेवावा यावर चे तत्वज्ञान खूप दिवस ऐकायला लागले...........

माठे आजोबा >> Happy

शुध्द्लेखनाच्या चुकी मुळे झाला आहे यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्ह्ते .मग काय मार बसला>> चुक नसताना ही अशाप्रकारे मार बसल्यास, मुलांना तो मनातुन खुप लागतो.

Happy मी जवळ जवळ दर आठवड्यात पोहे करते. लेक मुद्दाम विचारले तरी कधीच खात नाही. परवा नणंदे कडे गेले तर लगेच म्हणे, आत्याच्या हातचे पोहे खायचे आहेत. मम्मी कधी देतच नाही. आत्याने लगेच माझ्याकडे एक तु.क. टाकला.

मी लहान असताना माझी आत्याबरोबर छान गट्टी होती, तीच अभ्यास घ्यायची, नवीन काही शिकवायची, आणि आमची भांडणं पण खुप व्हायची... तिने माझ काही ऐकलं नाही कि मी भांडायचे, मारायचे तिला मग ती मुद्दाम कळ काढायची माझी.... त्या वयात मला 'चुकुन' आणि 'मुद्दाम' यातला फरकच नाही समजायचा...

एक दिवस मी आणि आत्या दुकानात गेलो होतो (तेव्हा गावी रहात होतो आम्ही आणि गावी दुकानं पण खुप लांब असायची मग महिन्याचं सगळ सामान एकदमच आणायचं, मी आपली 'कॉफी-बाईट' च्या आशेने जायचे.)
सगळ सामान घेतलं आणि ती एक एक मला ठेवायला देत होती पिशवीत त्यात अंडी पण होती आत्याने ती बाजुला ठेवली आणि पैसे द्यायला गेली.. मी माझा शहाणपणा वापरुन ती अंडी सगळ्या सामानाच्या पिशवीत टाकली....
आत्या पण ती अंडी विसरली आणि आम्ही दोघी 'कॉफी-बाईट' खात घरी पोचलो.. सामानाची पिशवी घरी दिली आणि बाहेर अंगणात आलो... थोड्यावेळाने आजी आली आत्याला ओरड्त 'एव्हढी मोठी झालीस तरी काडीची अक्कल नाहीयाय तुला'... आत्याला वाटलं अंडी विसरलो म्हणुन आजी ओरडतेय, पण सगळ कळ्ल्यावर (त्यातली दोन-तीन अंडी फुटलेली) आत्याने मोर्चा माझ्याकडे वळवला, खुप ओरड्ली, आणि मारायला आल्यावर मी जोरात ओरडले "मी काय चुकुन केलं काय मुद्दाम झालं ना"

झ्झ्झालं आत्याने त्या दिवशी हाताला लागली ती काठी उचलली आणि ती मागे मी पुढे अशी वरात निघाली..... चांगलच बद्डुन काढलं त्या दिवशी, पण दुसर्‍या दिवशी आठवणीने 'कॉफी-बाईट' आणलं...
आत्याला सगळे हसत होते कारण ती टीचर होती ना माझी..अजुनही आम्ही तश्याच आहोत बेस्ट फ्रेंड्स...

आमच्या शाळेत पत्रलेखन कसे करायचे, मायने कसे लिहायचे इत्यादी प्रकार शिक्षिकांनी घोकून/ सराव करून घेतले होते. चौथी स्कॉलरशिपच्या अभ्यासामुळे नवनीत आणि इतर निबंध पुस्तकांमधील मायन्यांचाही सराव झालेला.

माझे पत्रलेखन कौशल्य पाहून माझ्या आज्जीने एक दिवस मोठ्या प्रेमळ आग्रहाने तिच्या मावसबहिणीस पत्र लिहिण्यासाठी सांगितले. आज्जी सांगणार व मी लिहिणार. आज्जीचा हात थरथरायचा म्हणून मी तिची लेखनिक. आई म्हणत होती, आधी एखाद्या साध्या कागदावर पत्र लिही आणि मग ते पोस्टकार्डावर कॉपी कर. पण अस्मादिकांना स्वतःवर फाजील विश्वासच जास्त! मग काय.... ऐटीत पोस्टकार्डाच्या वरच्या बाजूला ''श्री'' लिहून तारीख,स्थळ, क्षेम इत्यादी लिहिले. आजीने सांगितले, हं, लिही, 'प्रिय श्रीमती शांताबाई यांस,' (ही आजीची पध्दत). मला माहित होते की शांताबाईंचे पती बर्‍याच वर्षांपूर्वी निवर्तले होते. मग काय!!! स्वतःची अक्कल नको तिथे पाजळली आणि लिहिले, 'प्रिय गंगाभागीरथी शांताबाई यांस,'.... वगैरे वगैरे.

पत्रलेखन पूर्ण झाल्यावर आजीने ते पोस्टकार्ड वाचायला मागितले. मीही ऐटीत ते तिच्या हातात दिले. मनोमन स्वतःच्या अक्कलहुशारीबद्दल स्वतःची पाठ थोपटली. तोवर आजी कडाडली होती, ''कार्टेऽऽ, शाळेत हे शिकवलंन होय गं तुला?'' मला कळेचना, की मी नक्की काय गुन्हा केला? मातृदैवताने तोवर अस्मादिकांचा कान पकडलाच होता.... ''खोड आधी तो मायना....'' आजी रागावून म्हणाली. मला तर माझी काय चूक झाली हेच कळाले नव्हते.
ज्या पुस्तकी ज्ञानावरून मी गंगाभागीरथी लिहिले ती पध्दत बर्‍याच वर्षांपूर्वी मागे पडली होती, आणि आता असा मायना लिहिला जात नाही, त्या मायन्यात स्त्रीचे वैधव्य अधोरेखित केले आहे आणि त्यामुळे आता असा मायना कोणी वापरत नाही ह्याबद्दल मला काहीच माहित नव्हते. मी आपली सरधोपटपणे पाठ केलेल्या अनेक प्रकारच्या मायन्यांपैकी एक वेगळा मायना कसा हुशारीने वापरला याच तारेत होते. नंतर चूक कळल्यावर मात्र जाम खजील झाले. शेवटी खाडाखोड करूनही ते चांगले न दिसल्यामुळे आजीने मला दुसरे वेगळे पत्र पोस्टकार्डावर लिहायला लावले.

मनीमाऊ
मी एकदम संमत आहे.

'यदा कदाचिच' नाटकातला हा वसुदेव देवकी चा विनोद फेमस आहे.
हां आता पोराने नाटकातले संवाद वापरले आसले तर गोष्ट वेगळी कारण ते मी केलेल आहे.

Pages