नूतन आता आपल्यात नाही

Submitted by नितीनचंद्र on 6 March, 2011 - 03:32

Nutan.jpg

नूतन ही मायबोलीकर आज आपल्यात नाही.

२१ फेब्रुवारीला तिचे निधन झाले.

सुरवातीला झालेल्या कॅन्सर ट्रिटमेंटनंतर तीने हेमलकशाला काही काळ व्यतीत केला
या काळातले अनुभव तीने इथे शब्दबध्द केले होते.

गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/48१०
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762

नूतन आणि मी १९७९ ते १९८२ या कालखंडात कुस्त्रो वाडिया तंत्रनिकेतनात इलेट्रीकल मधली पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरता एकत्र होतो.

मधल्या काळात तीचा माझा संपर्क राहिला नव्हता. दरवर्षी कुस्त्रो वाडियाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जानेवारी महिन्यात होत असते या निमीत्ताने मी सहज म्हणुन शोध मोहिम केली त्यात नूतन मला सापडली.

तिने पाठवलेल्या लिंकमुळे मला मायबोलीचा परिचय झाला.

माझ्या सुरवातीच्या लिखाणाला तिने जोरदार प्रोत्साहन दिले. नंतर ती पुन्हा इमेल किंवा मायबोली या माध्यमापासुन लांब झाली. इमेल लिहल्यानंतर कॅन्सर पुन्हा उदभवला या कारणाने ती त्रस्त झाल्याचे समजले.

या नंतर बातमी आली ती तिच्या निधनाची.

परमेश्वर तीच्या आत्मास चिरकाल शांती देवो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad
नुतनच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी. परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

अरेरे.. अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी हेमलकशातले अनुभव वाचकांपर्यंत जसेच्या तसे पोचवले होते. त्यात कुठेही अभिनिवेश नव्हता पण खोटा कोरडेपणा/अलिप्ततादेखील नव्हती.

फारचं वाईट बातमी. मी नूतनचे लिखाण वाचले नाही. पण तरीही वाईट वाटतेचं. तिचा फोटो पाहून आणखीनचं वाईट वाटले. नूतनला माझी श्रद्धांजली.

Sad
माझीही श्रद्धांजली. नूतनचे लिखाण मीही वाचले नव्हते पण मलाही फोटो पाहुन खुप वाईट वाटले. खुप तरुण वयात लोक गेलेले पाहिले की एकदम घुसमटल्यासारखे वाटायला लागते. Sad

हेमलकशाचे अनुभव लिहिताना त्यात त्यांना असलेल्या आजाराची पुसटशीदेखील सावली पडू दिली नव्हती त्यांनी. एकदम रसरशीत आणि सकारात्मक वृत्तीने लिहिले होते ते त्यांनी.

:अरेरे:, खुप वाईट वाटले.

हेमलकशाचे अनुभव लिहिताना त्यात त्यांना असलेल्या आजाराची पुसटशीदेखील सावली पडू दिली नव्हती त्यांनी.
---- १०० % मान्य, हे अत्यंत महत्वाचे आणि आपल्या सर्वांना शिकण्यासारखे आहे.

Pages