आमच्या शेतावर काम करणार्या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्या, दुसर्या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्या नवर्याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.
तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.
कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !
पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.
दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.
हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !
उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.
मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...
निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.
तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.
पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....
ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.
तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.
लाजो, तु सुचवलेलं नाव लेखाचा
लाजो, तु सुचवलेलं नाव लेखाचा उद्देश स्पष्ट करणारं आहे. बदललं.
लाजो, मस्त आहे शिर्षक. एकदम
लाजो, मस्त आहे शिर्षक. एकदम योग्य.
अरे, बदललं पण नाव धन्स मितान
अरे, बदललं पण नाव
धन्स मितान 
धन्स मामी
तशी नाव ठेवण्यात मी पटाईतच आहे 
मितान खुप चांगला लेख आहे. अग
मितान खुप चांगला लेख आहे. अग साफसफाई हा विषय असा आहे की कितीही केली तरी संपत नाही.
तुम्ही एक बघताय का की
तुम्ही एक बघताय का की स्वच्छतेचा हा बाफ संयुक्तामधे नसूनही केवळ बायाच पोस्टी टाकतायत
घरातल्या पुरुषमंडळीना उद्देशुन आई एक वाक्य नेहमी टाकायची - तुम्हाला नेहमी डु**सारखे घाणीतच लोळायला आवडते. हे बहुतेक जगभरच्या पुरूषांना लागु आहे...
रच्याकने, माझी आई घर कायम लख्ख दिसायला पाहिजे या मताची आणि बाकी मंडळी वर लिहिलेय तसे लोळायला आवडणारी, त्यामुळे आईला कायम मनस्ताप व्हायचा...
मुळात कुणाकडे कमोड असेल तर
मुळात कुणाकडे कमोड असेल तर जायचीच इच्छा होत नाही.
पण दोन्ही २ वेळा धुवायला मलाच लागतात. 
गुडघ्यात प्रॉब्लेम असलेले ज्ये ना सोडले तर कमोडचा देशी पद्धतीपेक्षा काय जास्त उपयोग आहे खरं तर? फुकट आम्ही मॉडर्न म्हणून कमोड लावून घ्यायचे आणि ते नीट ठेवता पण येत नाहीत मग त्यात डास वाढतात.
बाकी पोटासाठी योग्य प्रेशर येत नाही आणि बसाउठायची सवय मोडते हे प्रॉब्लेम्स वेगळेच..>> १००१ मोदकं नीधप!!
माझापण सेम प्रॉब!
सध्या २ bhk आहे भाड्याचा.. त्यात इंडियन आणि कमोड दोन्ही आहेत!
टॉ. पेपर्सः १०० मोदकं, आणि पाणीपुरवठा पण नीट हवा... फ्लश वगैरे बिघडलं की अगंगंगं... याईक्स!
बाकी आमच्याकडे स्वच्छता मोहीम असली की देखरेखीला मॅनेजर (नवरोबा) असतात. जातीने सगळ्यात लक्ष घालणार. ऑर्डर्स देणार आणि नीटनेटकं करून घेणार! रोज सगळ्या बरण्या, डबे पुसणं शक्य नाही होत पण दर रविवारी हा साग्रसंगीत प्रोग्रॅम असतो... दोन फडकी... >> सेम पिंच!!
चांगलाय धागा... पण नवर्यापासून लपवून ठेवायला हवा... नाहीतर रविवारही देखरेखीसाठी कमी पडायचा!
मितान खुप चांगला लेख आहे. अग
मितान खुप चांगला लेख आहे. अग साफसफाई हा विषय असा आहे की कितीही केली तरी संपत नाही.>> जागू हो ना!!!
cockroaches चा प्रतिबन्ध साठी
cockroaches चा प्रतिबन्ध साठी काहि उपाय सान्गा
पुणे - मुंबईसारख्या शहरांत दर
पुणे - मुंबईसारख्या शहरांत दर तीन महिन्यांनी हर्बल व केमिकल पेस्ट कंट्रोल करूनच घ्यावा. स्वयंपाकघर, बेडरूम्सना हर्बलच करावा. शक्यतो.
किचन सिंक, वॉशबेसिन, बाथरूम्स, टॉयलेट्स, पाईपच्या जाळ्या, बाल्कनी इ. ठिकाणी शक्यतो केमिकल पेस्ट कंट्रोल करून घ्यावा. त्या वेळी सूचनांबरहुकूम घरात थांबू नये. नंतर फॅन्स लावून, खिडक्या - दारे उघडून मगच घरात थांबावे. किचनमध्ये, फडताळांत जर केमिकल पेस्ट कंट्रोल केला असेल तर प्रत्येक भांडे वापरण्या अगोदर धुवून घ्यावे. उघडे पदार्थ सरळ टाकून द्यावेत.
नियमित असे करत राहिल्यास घरात झुरळे, किडे इत्यादींचे प्रमाण बरेच कमी होते.
आजकाल पेस्ट कंट्रोलवाल्यांबरोबर वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करता येते. ते सोयीचे पडते.
(No subject)
एक्झॉस्ट फॅनवर खुप चिकट असा
एक्झॉस्ट फॅनवर खुप चिकट असा थर बसतो. तो साफ करायला प्रचंड त्रास होतो. त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा प्लीज.
कपबशा कोमट पाण्यात मीठ घालून
कपबशा कोमट पाण्यात मीठ घालून १५-२० मि. बुडवून ठेवाव्यात आणि मग साध्या स्क्रबरने घासल्या तरी स्वच्छ निघतात.
त्याने टाकलं तर जरा कमी बोलणी बसतात. तरी बाहेर टाकलेल्या कचर्यातून लक्ष ठेवून एखादी त्यातल्यात्यात बरी वस्तू परत घरात आणली जाते. 
दुसरे अडगळ जमवण्याचे आवडते ठिकाण म्हणजे बाल्कनी. ही मागच्या खोल्यांना जोडून असेल तर पसारा साठवायला फुल टु वाव असतो. मोठ्ठाले प्लॅस्टिकचे झाकणतुटके डबे (अगं डबा चांगला आहे झाकण नवीन घेऊ, यासाठी ठेवलेला), जुने झाडु, रुखवतातली निरूपयोगी भांडी/तत्सम सामान, कसली कसली फडकी, शोभेच्या वस्तू, प्लॅस्टिकची फुलं, माठ, रद्दी, जुन्या चपला अरे देवा... डोकंच फिरतं असलं सामान जमवलेलं बघून. मग मी नवर्याला माझ्या गोटात सामील करून एकेक वस्तू फेकून द्यायला लावते
जोक्स अपार्ट, पण या असल्या बिनडोक वस्तू अजिबात साठवू नयेत, कितीही जीव अडकला असला तरी. जी वस्तू आपण आठवणीनी काढून वापरत नाही ती निरूपयोगीच!
नवर्याला त्याचा वापरलेला ओला टॉवेल, मोजे, ऑफिसवरून आल्यावर काढलेले कपडे, पँटचा 'ळ' समोर उभं राहून 'जिथल्या तिथे' ठेवायला सांगणे, (प्रत्येकीची पद्धत वेगळी) पण हे एक काम अतिशय चिडचिड होणारे आहे.
पँटचा 'ळ' >>>>>>>>> मस्त
पँटचा 'ळ' >>>>>>>>> मस्त शब्द आहे.

पँटचा 'ळ' >>>>>>>>>
पँटचा 'ळ' >>>>>>>>>
मितान खूपच चांगला विषय आहे.
मितान खूपच चांगला विषय आहे.
चहाच्या कपाच्या तळाशी पडलेले डाग हे तर सगळीकडे खूप पहायला मिळते. चहा प्यायल्यावर कप तसेच सिंक मध्ये ठेवून द्यायच्या सवयीमुळे असे होते. कप लगेच धुवायचे नसतील तर निदान त्यात पाणी घालून तरी ठेवावेत मग डाग पडत नाहीत.
बरं त्यावर एक उपायः डाग पडलेल्या कपात लिंबाचा रस टाकून १ तास तरी ठेवावे. नंतर स्क्रबर नी साबणाने धुवावे मस्त स्वच्छ होतात.
आम्ही माहितिपत्रके किन्वा
आम्ही माहितिपत्रके किन्वा जाहिराति इत्यादी अन्वॉटेड गोष्टी ज्या भरमसाठ इकडून तिकडुन येतच रहातात त्या मेल बॉक्स्च्या ड्ब्ब्याशेजारच्या ड्स्ट्बीन मध्ये टाकून देतो.
वाचायचे कष्ट घ्याच कशाला? --------------श्रेडर वापरायचे कष्ट नकोत.
लहान्पणी घरातले लोक आणी सर्व भावंडे नेहमी गेटाचे दार बंद ठेवत्,उगाच आजू बाजूच्या गावठी कुत्र्यानी घाण करून ठेवली तर?(जोक्स अपार्ट गावठी कुत्रे गल्लोगल्ली हिण्डत असतात बघितल्या क्षणी ओळखतात.) बाकी गावठी कुत्रे स्व;त्च्या विश्ठेची स्व्तःच विल्हेवाट लावतात.
--------------------------------------------------------------आपल्या अंगणाला गेट असेल तर पुन्हा कु च्या विश्ठेची कशाला चिन्ता करा?सफाई ची गरज काय?
माझ्या या घरात सगळा पसारा पसारा आहे,पण आवडतो बाबा आम्हाला ,माझे एकच तत्व आहे डोळ्याला ,मनाला खुपेल असे काही मुळात घरात एंटरच नाही करू द्यायचे ,मग कुठ्ल्याही जस्टिफिकेशनचि म्हणजे शि बाबा काय ही घाण झाली,किंवा मि बै इत्की स्व्छ्हताप्रिय आणी माझे घर बघा किति घाण असला केशजडित कंगावा/कांगावा नाहीच होत!
--------------------------------------------------------------------------------पसारा नेहमिचाच्,घाण नसावी!
कुणाकडे गेलो तर त्यानी दाखवलेल्या आदराचे प्रेमाचे आदरातिथ्याचेच कोउतुक करतो,त्यांच्या घरातल पसारा "न्याहाळत" नाही.
------------------------------------------------------------------------------------उगाचच चर्फड्/राग्/निन्दा नालस्तिने दुसर्यांच्या घरावर कशाला नावे ठेवायचे.त्यापेक्शा आपले घर अधिक कसे सुंदर कसे याचे सुख मानले तरि उत्तम!
खरंच कळत नाहीये काय म्हणायचं
खरंच कळत नाहीये काय म्हणायचं आहे!
शेवटचे तिन पॅरा जरा ललित
शेवटचे तिन पॅरा जरा ललित झालेत थांब तिकडेच टाकते.
चालेल
चालेल
काय म्हणायचंय कळलं नाही.
काय म्हणायचंय कळलं नाही.
आता जर कळाले नाही म्ह्णालिस
आता जर कळाले नाही म्ह्णालिस ना सायो,अंजली तर हि पण पोस्ट डीलीटायला लागेल बहुतेक.
आमच्या घरात खूप जिव्हाळ्याचा
आमच्या घरात खूप जिव्हाळ्याचा आणि भांडणाचा विषय पण!! मला खूप चकाचक ठेवायची सवय नाही म्हणून
घर हे मुळात आनंदाने राहण्यासाठी आहे फक्त स्वच्छतेसाठी राबायची जागा नव्हे हे तारतम्य पाळणे महत्वाचे>>> हे खूप पटले पण हे पटून उपयोग नसतो..
ज्यांना असं शोकेस सारखं घर आवडत त्यांना जराही इकडे तिकडे चालत नाही .हे त्यांना हि कळत असतं पण हात लाग्ग्गेच फडकं, झाडू घेवून तयार.. !!!
असो पण उपयुक्त टिप्स.. फ्रीज साफ करायचे मनावर घेईल जरा.. इथे फ्रीज चा वास घालवायला फ्रीज मध्ये बेकिंग सोडा चा डबा उघडून ठेवतात.. त्याने वास शोषून घेतल्या जातो..
किवा लिंबू दोन फोडी करून ठेवायच्या त्याने पण वास जातो.. बकिंग सोडा काही हि साफ करायला वापरता येतो..स्वच्छ निघता १०-१५ दिवसातून एकदा करते मी..
मुंग्या मारायला आणी सिंक
मुंग्या मारायला आणी सिंक धुवायला विन्डेक्स भारी वर्क करते.आरसे आणी किचनचे ओटे पण थोड्याशा फुस्फुस्ने बर्या दिसतात.
हं, नोरा, आता जास्त व्यवस्थित
हं, नोरा, आता जास्त व्यवस्थित लिहिलं गेल्याने 'पोचलं'.
आम्ही माहितिपत्रके किन्वा
आम्ही माहितिपत्रके किन्वा जाहिराति इत्यादी अन्वॉटेड गोष्टी ज्या भरमसाठ इकडून तिकडुन येतच रहातात त्या मेल बॉक्स्च्या ड्ब्ब्याशेजारच्या ड्स्ट्बीन मध्ये टाकून देतो.<<< हार्ड्वेअर स्टॉअर मधे स्टिकर मिळते "NO JUNK MAIL PLEASE" ते लावुन टाक म्हणजे जंक कुणी टाकणारच नाही (होपफुल्ली)
पसारा नेहमिचाच्,घाण नसावी<< अनुमोदन
स्पेशली ज्याम्च्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या घरात थोडा पसारा होतोच.. पण तो पसारा सुद्धा मधुन मधुन आवरायला पाहिजे... नाहीतर नंतर घरात घाणच होइल 
कुणाकडे गेलो तर त्यानी दाखवलेल्या आदराचे प्रेमाचे आदरातिथ्याचेच कोउतुक करतो,त्यांच्या घरातल पसारा "न्याहाळत" नाही <<< नक्कीच
पन जर तुम्हाला कुणी किंवा तुम्ही कुणाला घरी बोलावल असेल तर निदान घर थोडतरी नीटनेटक ठेवावं ही माफक अपेक्षा अस्ते
दुसर्यांच्या घरावर कशाला नावे ठेवायचे.त्यापेक्शा आपले घर अधिक कसे सुंदर कसे याचे सुख मानले तरि उत्तम!<< मला वाटतं मितानचा हा लेख लिहीण्यामागे हाच उद्देश असावा की "आपलं" घर कस सुंदर ठेवता येइल आणि त्यासाठी कल्पना, युक्त्या, आयडियाज, अनुभव इथे लिहीले जावेत
शेवटी म्हत्वाचे काय तर "घर असावे घरा सारखे, नको नुसता पसारा". घरातल्याच माणसांनी आपलं घर समजुन योग्य वेळी वस्तु जाग्यावर ठेवल्या तर घर नीटनेटक ठेवण नक्कीच कठिण नाही
घर अगदी चकचकीत स्वच्छ असेल तर त्याला हॉटेलच म्हणावे लागेल
एकझोस्ट फॅनच्या साठी थोडेसे
एकझोस्ट फॅनच्या साठी थोडेसे ब्लीच टाकले तर? म्हन्जे फक्त ब्लीच टाकून तसेच सोडून द्यायचे थोडावेळ/बराच वेळ ,पाणी न घालता, ब्रशने न घासता. आपले आपण ब्लीचमध्ये विरघळेल तो चिकटा.
आमच्या इथे जाळ्या असतात त्यामुळे,जाळी बदलली कि झाली,एक्झोस्ट फॅनचा चिकटा इकडे नाही त्यामुळे हा उपाय वर्क होतो की नाही काही कळत नाही.
आमच्या घरात मी आवराआवरीच्या
आमच्या घरात मी आवराआवरीच्या बाबतीत अल्प्संख्यांक आहे. वारंवार सान्गुनही फार फरक पडत नाही नवरा आणि मुलीत्..मी केलेल्या काही सोयी
दोघान्च्याहि कपाटात एक कप्पा दिला आहे त्यांचे न आवरलेले कपडे ठेवायला. जेव्हा बाहेरून आल्या आल्या कपडे जागेवर ठेवायचे नसतात ना तेव्हा त्या कप्यात ते कोम्बायला सवलत देते. नंतर मात्र २ दिवसात ते आवरुन टाकायचे . ह्याने होते काय कि घरी आल्या आल्या झोपायची सोय होते ...बाहेर पसारा दिसत नाहि. फक्त एक कप्पा नीट नस्तो पण बाकि कपाट नीट रहाते. आणी मग आपोआप तो आवरला जातो. माझ्या शाळेतल्या मुलीसाठि हि युक्ति उपयोगी ठरली. आता कप्पा निट नसेल तर तिच अपसेट होते.
आमच्याकडे २ टाँयलेट्स आहेत्...मी रोज आन्घोळीला..आलटून पालटून दोन्हिमधे जाते...पहिल्या ५ मि मधे बाथरुम साफसफाइ. मग आन्घोळ. इतरन्कडुन अपेक्शा केली तर होणार्या त्रासापेक्शा हे बरे पड्ते.
दर पन्धरा दिवसांनी मी डोक्याला मेंदी लावते. तेव्हा माझ्या हातात १ तास असतो. त्या वेळात्...कपाटे साबणाने पुसणे. आरसे साफ करणे. मेन दार साबणाने पुसणे...इत्यादि कामे करते... साबणाचे पाणि भरलेली बादली रेडी असेल तर ही कामे फटाफट होतात.
मी नोकरी करते (१२ तासाची) त्यामुळे अश्या पद्धतीने कामे केली तर जास्त ताण न पड्ता स्वच्छ्तेची आवड जपता येते.
सन्ध्याकाळी मी १ तास टी व्ही बघते...प्रत्येक ब्रेक मधे मी एक काम करते. बसल्याबसल्या करायचे असेल तर एका ठिकाणी बसून किंवा मग हिंड्त फिरत...माझी खुप कामे ह्या वेळेत होतात. ..उदा...उद्याची तयारी, उद्याचा ड्रेस बाहेर काढुन ठेवणे. डबे काढुन ठेवणे. कपडे आवरणे. डायरी लिहिणे.
स्वैपाकघरात मी एक फळा लावला आहे. बाजारातुन आणायच्या वस्तु, महत्वाची करायची कामे (कोड भाषेत)आणि कामवाल्या मावशींचे हिशोब असतात त्यावर. मी उधार दिले किन्वा मीच कोणाचे बारीक सारीक पैसे द्यायचे राहिले असतील तर विसरत नाही.
दारावर मी एक चार्ट लावला आहे. maintenance cha...
inverter, two wheeler battery recharge, car battery recharge, oil change next date, gas rubber tube change date, पेस्ट control next date इत्यादि..maintenance साठी सोयीचे पडते.
तसेच आमच्या कामवाल्या बाइला थोडे जास्त पैसे देवून मी सणासुदीच्या आधी साफसफाईसाठी बोलावते. त्याने बरीच मेहनत वाचते.
लाजो: धन्यवाद्.पटेश.
लाजो: धन्यवाद्.पटेश.
रोज एक काहीतरी वस्तू किंवा
रोज एक काहीतरी वस्तू किंवा घरातला भाग प्रत्येकाने पुसायचा असं ठरवलं तरी साफसफाईचा एकदम ताण येत नाही. उदा. निदान एकातरी खिडकिच्या काचा ओल्या कापडाने पुसणे, आलटुन पालटून टिव्ही, वॉशींग मशिन इ. वस्तू रोज पुसणे, इ.
यामुळे ताण येत नाही. एक वस्तू पुसायला फार फार तर ५ मिनिटे लागतात. रविवारि पंखे, फ्रीज, किचन ट्रॉली वगैरे वेळखाऊ साफसफाया करता येतात.
सुमेधा, अमि - गुड आयडियाज
सुमेधा, अमि - गुड आयडियाज
नोरा
Pages