वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ashok lingayat | 1 November, 2010 - 08:06 नवीन
एका गाडीवर लिहील होत आई तुझा आशिर्वाद पेसे बापाचे श्रेय मात्र आईला हा न्याय कोठला.
अशोक लि॑गायत.

>> बापाचे पैसे आणि आईचा आशिर्वाद दोन्ही हवे ना? ;-).

काल भांडुपला एका रिक्षा पाहीली. तिचा नंबर होता. २१२१.. तर त्याखाली त्या रिक्षावाल्याने लिहीले होते. ek kiss ek kiss.. कुणाचे डोके कुठे अन् कसे चालेल याचा काही नेम नाही. Happy

इथे रिक्षांच्या मागे एकच चित्राचे खूप व्हेरिएशन्स आढळतात. बोट सूर्यास्त पाणी पाखरे दोन तीन नारळाची झाडे. व घर. अगदी अवच्या सवा प्रमाणात काढलेली अस्तात.

हिमाचल प्रदेशात एका ट्रकच्या मागे लिहिले होते.....

धीरे चलाओगे तो बार बार मिलेंगे
तेज चलाओगे तो हरिद्वार मिलेंगे

मागच्या आठवड्यात पाहिलेल्या २ पाट्या:

१.अन्धार झालाय, उजेडाला दिवा पाहिजे
महाराष्ट्राच्या मातेला जिजाऊचा शिवा पाहिजे

हे 'मातेला' नसून 'मातीला' हवं होतं असं उगाच वाटत राहिलं

२.बेटी नही बचाओगे तो बहू कहासे लाओगे

एस टी बसवर लिहिलेले असायचे "तुमच्या गाडीत उस, कापूस, कणस्, माझ्या गाडीत लाख मोलाची माणस्" गावातील वात्रट पोर "गा" वर अनुस्वार द्यायची!

मी मागच्याच आठवड्यात एका ट्रकच्या मागे वाचलं

गांव में खेत, खेत मे गन्ना
गाडी हेमा मालिनी, ड्राइव्हर राजेश खन्ना Biggrin

"तुमच्या गाडीत उस, कापूस, कणस्, माझ्या गाडीत लाख मोलाची माणस्" गावातील वात्रट पोर "गा" वर अनुस्वार द्यायची! >>> Biggrin

परवा २ गाड्या पाहिल्या. एकावर नेहेमीप्रमाणेच "मेरा भारत महान" लिहिलं होतं. आणि खाली ओळ होती "जो करे सो हरि करे". दोन्ही ओळी एकत्र वाचल्या तर आपल्या महान भारत देशाला तंतोतंत लागू पडतात. हरि जगरहाटीच्या कामात गुंतल्याने कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज/२जी घोटाळा वगैरे सगळ्याकडे लक्ष द्यायला त्याला बिचार्‍याला उसंत मिळाली नसावी. नाहीतर सगळं व्यवस्थित झालं असतं. तेव्हढं वर्ल्ड कपच्या आधी हरिने आपली बाकीची कामं उरकून घ्यावीत म्हणजे झालं. Happy

दुसर्‍या गाडीवर "मेरा भारत महान" च्या खाली "Highly Inflammable" असं लिहिलं होतं. ह्या ना त्या कारणाने रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि होळी करणार्‍या देशाला हीसुध्दा ओळ चपखल बसते नाही? Sad

एका गाडीवर एका बाजूला लिहीलेले-
'हेल्मेट है जरूरी ना'

आणि दुसर्‍या बाजूला लिहीलेले-
'समझो इसे मजबूरी'

Lol

भांडुपमध्ये एका मारुती ८०० गाडिच्या मागे लिहीले आहे, "आउस वाट बघता". खुप दिवस हेच वाचत होतो. हल्ली त्या गाडीपुढे एक टवेरा असते तीच्या मागे लिहीले आहे, "बायको वाट बघता"..:)
बहुतेक मालकाला खुप पैसे मिळुन त्याचे लग्न झाले असावे..:D

आज एका ट्रक मागे वाचले..."जलनेवालोंको जलने दो, ५७१० को आगे बढने दो." त्या ट्रकचा नंबर ५७१० होता. Happy

Pages