वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एका रिक्षाच्या मागे लिहीले होते,

जिथे शनी तिथे काय कमी.

शनी च्या बाबतीत हे असे काही पहिल्यांदाच वाचले. Happy

बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलय तुला वाघानं! >> रॉबीन एक्दम बेष्ट.

या वाक्यावरून ट्रक ड्रायव्हर बाई असावी असे वाटते. >> अं हं. त्याच्या बायकोने त्याला तसं म्हणलं असेल Happy
आज पाहिलेली वाक्ये.

धक्का लागी बुक्का
जरा ब्रेक लावा

कोल्हापुरात रिक्षाच्या मागे अजुन दोन वाक्यं

१. आबा कावतोय!

२. नाना! (आणि नाना पाटेकरचं चित्र लावलेलं..)

>कोल्हापुर मध्ये रिक्क्षाच्या मागे हमखास पाहीलेला वाक्य... "लेट्स चिंगळी" ....
>अ ओ, आता काय करायचं काहीच्या काही लिहीतात बुवा...काय कळलं न्हाय बगा....
हे नाही दिसलं कधी.... Happy पण काहीही लिहीतील....

एका रिक्क्षाच्या आतमध्ये लिहिलेली २ वाक्य,

हजार खुशीयां कम है, एक गम मिटानेके लिये !
एक गम काफी है, हजार खुशीयां मिटानेके लिये !!!

महेश , किरू LOL पण मला तस नकोय
अस काहीस हवय....
१) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
२) कटकट करु नका, जावा फुढ
३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा
४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल का
वगैरे वगैरे
अस्ल काय तरी सुचवा!

लिंबूटिंबू "अगले मोडपे मौत खडी है, मरनेकी भी क्या जल्दी है" लिहा म्हणजे हॉर्न वाजवून कटकट करणारा गप्प बसेल. माझी गाडी नाहीये अजून नाहीतर मी नक्की ही पाटी लावली असती. Biggrin

झकास स्वप्ना Lol हे वाक्य वाचले तर अ‍ॅक्सिलेटरवरुन पाय झटक्यात उचलला गेलाच पाहिजे!
बर याच धर्तीवर
अगले मोडपे पुलिस खडी है, जेल जानेकी इतनी भी क्या जल्दी है? ...... अस केल तर? जुळवा जुळवा काहीतरी
जमल तर मराठिमधे देखिल

लिंबू, पण आजकाल पोलिसला फारस कोण घाबरत नाय...
जेल बिल मधे टाकायला खुद्द पोलिसच उत्सुक नसतात.

हे जमतय का बघा ---

"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

लिंबु हे लिही बघ जमतंय का ते,
"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका,
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."

काल लोकसत्तामध्ये एक शेर वाचला तो पण अप्रतिम आहे:

मौत कितनी भी शानदार सही
जिंदगी का मगर जवाब नही

हे लिहून बघा. एखादा शायराना अंदाज वाला ड्रायव्हर मागच्या गाडीत असेल तर हॉर्न वाजवणार नाही Happy

माझ्या सुमोच्या मागे मी काय लिहू?

>> "मला अनुल्लेखाची सवय आहे . हॉर्न वाजवला नाही तरी चालेल ." हे कसे वाटते? Proud

Pages