न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईमाणूस / माणूस ... या या. नक्की या..

/चहा, विड्याची पान अबे च्या गळ्यात.. Happy
तसही तो आणणार होताच म्हणा..

बर एकूण डोकी किती सुमारे ३० धरायची का मग? गुळाच्या पोळ्या ऑर्डर करायच्या असतील ना Happy
अन बाकी कोण काय आणतंय ? सध्या पोळ्या कोण आणतेय? करा लवकर अपडेट!!

साध्या पोळ्या राजभोगकडून आणता येतील ना ? त्याचं पण काँट्री करुयात.

मी आले तर दोन नाही तर शुन्य.

आलू बंजारा आणि फालुदा.

आमची एकच प्लेट. दडपे पोहे, बटाटे पोहे व तेल तिखट मसाला पोहे देशात आहेत. >> Lol केप्या साबुदाणा खिचडीला घेउन ये ना.. Happy Light 1

मला त्यादिवशी इथे एका हळदीकुंकवाचे निमंत्रण आहे तिकडे जायचे आहे, त्यामुळे येऊ शकत नाही. दिलगीर आहे.
जीटीजीला शुभेच्छा!

माझ्याकडे राउंडट्रिप तिकिटाइतके फ्रीक्वेंट फ्लायर माइल्स नाहीत. म्हणून येणं रद्दं केलंय. मज्जा करा.

बुवांबरोबर चिवडा आणि लोणचं पाठवणार होते, पण त्यांची भेट झाली नाही. (का ते त्यांना विचारा. चांगला किस्सा आहे. :P)

किति कमी पडताहेत माइल्स. जरा अलीकडे उतरावयाला सांग. आम्ही पिक अप करु. Happy
चिवडा लोणच फेडेक्स कर. पत्ता पाठवु का?

भाई, Lol अलिकडे म्हणजे अगदी तालाहासीलाच उतरावं लागेल. तिकडून कोण करणार पिक अप? Proud

लोणच्यात तेल घातलंय. त्यामुळे ते पाठव नाही. चिवडा पाठवू शकते.

सायो, तुम्ही ओरलँडोला कधी येता? तेव्हा एवेएठि करू.

अग भाई येतो म्हणतायत तर त्यांना नाउमेद का करतेस? Wink
ऑरलँडो कधी माहित नाही. हा समर तर बुक झाला ऑलरेडी.

अरे अरे किती ही गळती. Sad

सिंडीने सुरुवात केली व तिचे सुध्दा अजुन तळ्यात मळ्यात आहे. सिंडी नाही आली तर आरती पण नाही येणार.

हळदीकुंकु अ‍ॅड करा >>>
माईल्स पण. Proud

सिंडी नाही आली तर आरती पण नाही येणार >>> ते 'आरती नाही आली तर सिंडी नाही येणार' असं आहे Proud माझ्याकडे कुणी सरप्राइज पाहुणे पण नाहीत Sad

Pages