मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,

मी सध्या 'द व्हाईट टायगर ' वाचतोय , पुस्तक अप्रतिम आहे , अरविन्द अडिगा च्या लिखाणात प्रत्येकास अन्तर्मुख करण्याची ़क्श्मता आहे. has anybody read it ?

सुयोग.

मी पण वाचते आहे ........... Happy

हो या पुस्तकाचे खूप परिक्षण वाचलेत. सुरेख आहे असे वाटते.

cinderella & bee,

दोघांनाही धन्यवाद.. सि गल असेलही. मला नक्की आठवत नाही.

cinderella - अनुवाद कोणी केलाय? कुठच्या दिवाळी अंकात? त्याचे पुस्तक पण तयार झालेय काय?

'द व्हाईट टायगर' मी आणलेय, २०-३० पाने वाचली, पण कंटाळा आला. चांगले आहे असे इथे वाचलेय. आज परत नेटाने वाचायला प्रयत्न करते.

http://www.maayboli.com/node/4408

कोणी घेतला आहेस का चांदोबा या साईट वरुन.. ट्रांझ्यंक्शन Happy सुरक्षित आहे की नाही हे माहिती करुन घ्यायचे होते ..

ह्म्म्म...

ह्या पुस्त्कातुन काही 'मिळेल' अश्यातला भाग नाही... पण एक्न्दरितच... आपण ज्या उदात्त सन्स़़्क्रुतिच टुमण लावत बसलोय , तशी परिस्थिती नहिये.

सुयोग.

साधना ,

तुझी प्रामणिक पर्तिक्रिया आवडली Happy
मझीही अशीच गत होति सुरुवतिला , पण लिखाण अतिशय मार्मिक आहे.

सुयोग.

कूल, मला पाठव ६० डॉलर्स, मी तुला अगदी सेफली चांदोबा पाठवते Wink

बर्‍याच दिवसानी आले ईथे.
सांगायच झाल तर २ पुस्तक वाचली.
१-आधी ईथे चर्चीलेल 'बाकी शुन्य'
२-देवांच्या राज्यात राजेद्र खेर यांच.(जे आधी लॉजीकली देव कनसेप्ट चा शोध घेत आणि मग हळूच अध्यात्माकडे वळतं.)

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|

बाकी शून्य कसं वाटलं मधुरा?

नमस्कार.
दक्षिणा बाकी शुन्य सुरवात वाचताना मजा आली पण शेवटी दोक्याला शॉट बसला माझ्यातरी.
पण वाचाव असच वाटल पुस्तक.

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|

हो कारण शाळा सारखंच नाव झालं होतं या ही पुस्तकाचं.
शाळा वाचलंयस का?

'सानिया' यांचा 'ओमियागे' हा कथासंग्रह वाचला. आधी मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या तीन(च) कथा आहेत पुस्तकात.
मी सानिया यांचं सलग असं प्रथमच लेखन वाचलं. सुरेख शैली. गौरी देशपांडेंसारखीच प्रवाही, सहज, आणि गहन अर्थ असणारी. कथेमधल्या नायिकेंशी, त्यांच्या विचारांशी सहजपणे रीलेट होत गेले मी. या तिन्ही कथा फार आवडल्या- त्यांच्या मांडणीसाठी आणि भाषेसाठी.

सानिया यांची अजून पुस्तकं वाचावी असं वाटत आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर! Happy

------------------------------------------
Times change. Do people??

पहील्यांदाच हे पान बघितल खूप बर वाटल.
संध्या मी दुर्दम्य वाचतेय.
कोणी सेलझाड वाचलय का?
मस्त पुस्तक आहे.

हाय.
शाळा वाचलय. भावलही होतं जाम. छान आहे.

drusti दुर्दम्य बेडेकरांच ना?

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|

'दुर्दम्य' ही श्री. गंगाधर गाडगीळ यांनी लो. टिळकांच्या आयुष्यावर लिहिलेली कादंबरी आहे.

पूनम स्थलांतर, आवर्तन, प्रतिती आणि खिडक्या ही सुद्धा वाच सानियाची. आवडतील तुला. पहिली दोन तर नक्कीच.

मी नुकतंच मिलिंद बोकिलांच 'एकम' वाचलं. पुस्तक गंभीर आहे आणि छान आहे. एकाकीपणा, एकटेपणा आणि त्यातून 'मी कोण' च्या उमगलेल्या अर्थापर्यंत झालेला एका लेखिकेचा प्रवास, एकाकीपणामुळे लागलेल्या दारुच्या व्यसनातून तिचा झालेला शेवट,तिची स्वतःकडे, जिवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी, तिची स्वतःची अशी खास फिलॉसॉफी हे सर्व गौरी देशपांडेंची आठवण करुन देतं. आय मे बी रॉन्ग. पण मला वाटलं वाचताना तसं. थोडं एकसुरी होतं शेवटाकडे पण आकार लहान आहे पुस्तकाचा त्यामुळे ते जाणवतानाच संपतही पुस्तक. मिलिंद बोकिलची भाषा नेहमीच खूप सरळ आणि साधी असते. अनलंकृत. पण त्यामुळेच पकड घेते.

शांता गोखलेंचं 'त्या वर्षी' घेतलय वाचायला. ते मला आवडणार आहे हे नक्कीच.

ह्या शनिवार-रविवारात 'Into the wild' वाचलं.. सिनेमा बघितला होता.. पुस्तक पण जबरदस्त आहे. स्टीव्ह मॅकँडल्स नावाच्या २३-२४ वर्षाच्या तरुणाची सत्यकथा.. नुकताच विद्यापीठातून चांगल्या ग्रेडने ग्रॅज्युएट झालेला हा मुलगा, आपली सर्व बचत दान करुन, ओळखपत्रे, नातेसंबंध संपवून भटके आयुष्य जगायला बाहेर पडतो. मेक्सिको ते अलास्का असा उभा-आडवा प्रवास, लिफ्ट मागत, अधे-मधे काम करत करतो.. वाटेत त्याला भेटलेली लोकं, त्या लोकांवर अलेक्झांडर सुपरट्रँपचा (स्टीव्हने घेतलेले नाव) पडलेला प्रभाव, स्टीव्हचा हा प्रवास, अशी भटकी जीवनशैली स्वीकारण्यामागची कारणे अश्या अनेक विषयांना हात घालत जॉन क्रॉकरने हे पुस्तक लिहिले आहे. जमेल तेव्हडे तटस्थ राहण्याचा क्रॉकरचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे (क्रॉकर स्वतः आजच्या काळातल्या उत्कृष्ट अल्पाइन तसेच हिमालयन गिर्यारोहकांपैकी एक आहे. तसेच आउटसायडर वगैरे मासिकांसाठी लेखन करत स्वतः थोड्याफार प्रमाणात असे भटके आयुष्य जगला आहे. त्याला स्टीव्हबद्दल बायस असणे स्वाभाविकच आहे. क्रॉकरची into thin air आणि eiger dreams ही दोन पुस्तके देखील वाचनीय आहेत).

--
वरती ट्युलिपने लिहिलेल्या बोकिलांच्या एकम ह्या पुस्तकाबद्दल वाचून coetzee च्या Elizabeth Costello आणि slow man ह्या दोन पुस्तकांची आठवण आली. elizabeth एका लेखिकेच्या (एकांड्या) प्रवासाबद्दल आहे तर slow man एका म्हातार्‍या अपंग फोटोग्राफरच्या एकटेपणावर आहे (आणि स्लो मॅन मधे मधूनच एलिझाबेथ पण डोकावते)

मी Interpreter of Maladies वाचायला घेतलं. याआधी घरी आणून परत केलं होत वेळेअभावी. आता घेतलं आणि पहिली शोभाची कथा खूप आवडते आहे. तुमच्या पैकी सर्वांनीच वाचून केंव्हाच संपवलं असेल. नेमसेक मला इतकं आवडलं नाही. मला अरुंधती रॉयचे गॉड ऑफ स्मॉल थिंग घ्यायचे होते पण त्याची एकही प्रत शिल्लक नव्हती. ऍटलस श्रग पण नव्हतं शिल्लक. मग काय घ्यावं तर हे एक आणलं.

टण्या मलापण इन टु द वाइल्ड खूप आवडले होते वाचले तेव्हा. एगर ड्रीम्स अजुन वाचले नाहीये मी, पण लिस्ट वर आहे ते माझ्या. इन टु थिन एअर परत एकदा वाचायचा विचार करतेय.

हो बरोबर चिनोक्स.

मराठीत भाषांतर केलेलं नॉट विदाऊट माय डॉटर वाचलं.. मस्त पुस्तक आहे.. मला आवडलं.. शेवटपर्यंत एकदम खिळवून ठेवतं... फक्त शेवटचा मुख्य प्रवास जरा उरकलाय असं वाटलं..
अनुवाद पण एकदम व्यवस्थित आहे.. अगदी शब्दश: नाहिये.. त्यामुळे त्यातली मजा गेली नाहिये..
ह्या पुस्तकावर पिक्चर आला आहे असं विकीत समजलं.. बघायला पाहिजे...
पण इराण बद्दल चं वर्णन जरा एकांगी आणि एकाच चष्म्यातून बघितल्यासारखं वाटलं.. खरच तिथे एव्हडी घाण, अन्याय, अत्याचार वगैरे आहे की ते वर्णन जरा biased आहे हा प्रश्ण पडला..
अर्थात इराण खरच कसा आहे काय माहित..
(मीना प्रभूंचं गाथा इराणी वाचायला पाहिजे.. Wink )
पण नॉट विदाऊट माय डॉटर मात्र must read !!

इराण बद्दल समजुन घ्यायचे असेल तर एक महत्वाचे पुस्तक (ललित अंगातून.. राजकिय/परराष्ट्र धोरण विषयांवर अनेक पुस्तके आहेत) म्हणजे 'Among the believers'.. नुकत्याच झालेल्या खोमेनीच्या क्रांतीनंतर नायपॉलने इराण दौरा केला.. खास नायपॉली शैलीत लिहिलेले पुस्तक आहे हे.. खरं तर ह्या भागाचा इतिहास जर खरेच जाणुन घ्यायचा असेल तर 'सेवन पिलर्स ऑफ विस्डम'.. हे सुद्धा थोडे ललित शैलीतले पुस्तक.. फक्त इतिहासावरची अनेक पुस्तकं फार कोरडी होतात सुरुवातीला वाचताना..

मी सध्या व्यंकटेश माडगूळकरांचा 'ओझं' हा कथासंग्रह वाचतेय. यात माडगूळकरांनी दलित जीवन त्यातील दारिद्र्य आणि दु:ख, संताप आणि अगतिकता उत्तमपणे रेखाटली आहे. वाचताना मन हेलावलं नाही तरच नवल.

Jean Sasson चं princess वाचल. मन सुन्न करणार पुस्तक आहे. तिची बाकीची पण पुस्तक वाचायचेत.

व्यासपर्व आणि युगांत ह्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत?

____________________

आम्हा घरि धन शब्दांचीच रत्ने............

व्यासपर्व : दुर्गा भागवत

युगांत : इरावती कर्वे

The Kite Runner हा सिनेमा पहा असे बरेच जणानी सांगितले तरी पुस्तक वाचल्याशिवाय तो पहायचाच नाही असे ठरवुन पुस्तक वाचले. प्रचंड खिळवुन ठेवले पुस्तकाने. आता सिनेमा पहावा असे अजिबात वाटत नाही.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सुधा मुर्तीनी लिहिलेले डॉलर बहु वाचले. अगदी टिपिकल मेंटॅलिटीने लिहिलेले पुस्तक आहे. नाविन्य असे काही नाही. शेवट अगदी ऍब्रप्ट आहे आणि.

या सगळ्यावर उपाय म्हणुन सध्या सुभाष अवचटांचे स्टुडिओ वाचतेय.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

Pages