Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचीच गोष्ट... घरातून
आजचीच गोष्ट...
घरातून निघाले.. कधी नव्हे एवढा ट्राफिक जॅम होता रस्त्यावर.... मी कशीबशी वाट काढत माझ्या नेहमीच्या बसस्टोप पर्यंत जाऊन पोचले... आणि बसस्टोप वर बसले..... थोड्याच वेळात नेहमीची बस येताना दिसली लांबून... मी थोडा कंटाळा केला.. म्हटले तसाही ट्राफिक जॅम आहे...बसला इथ पर्यंत पोहोचायला वेळ लागेल म्हणून... आत्ताच कशाला उठा... म्हणून अजून वाट बघत बसले.. तर ती बरीच अलीकडेच थांबल्यासारखी वाटली...मला वाटले ट्राफिकमुळे असेल.. पण नंतर लोकांना चढताना पहिले...तरी पण मी मनाशी म्हटले ...लोकांना काय सवय असते.. बस स्टोप वर बस पोहोचण्याच्या आआधीच लोक उद्या टाकतात बस मध्ये... किवा चढायला सुरुवात करतात तसे काहीतरी असेल.. म्हणून मी पुन्हा लक्ष नाही दिले.... पण नंतर मला काय वाटले कोणास ठाऊक.... मी तिथपर्यंत धावत जाऊन बस पकडली.. जागासुद्धा मिळाली... सहज म्हणून खिडकीबाहेर लक्ष टाकलं.. तेव्हा कळलं की.... मघापासून मी ज्या बसस्टोप वर बसले होते.. तो माझा नेहमीचा बसस्टोपच नव्हता...

मघापासून मी ज्या बसस्टोप वर
मघापासून मी ज्या बसस्टोप वर बसले होते.. तो माझा नेहमीचा बसस्टोपच नव्हता >>>
पारो
पारो
मुलाच्या मेडीकलची डायरी भरत
मुलाच्या मेडीकलची डायरी भरत होतो तेव्हा त्यात विचारले होते जन्माच्या वेळचे वजन. मी बायकोला विचारले, अगं दर्शनचे जन्माच्या वेळी वय किती होते?
ती एकदम गांगरली. आणि त्यावर कहर म्हणजे मलाच उलट विचारले,
"अरे तु होतास त्यावेळी हॉस्पीटलमध्ये, मग तु पाहिले नाहीस का?"
आशु....... राम बनाये जोडी...
आशु....... राम बनाये जोडी...
समू बर्याच दिवसांनी तुला इथे बागडताना बघून बरं वाटलं...
शनीवारी रात्री ८:३० पर्यंत
शनीवारी रात्री ८:३० पर्यंत क्लास असतो ठाण्यात...
धावत धावत जावून ८:४४ ची ट्रेन पकडली शहापूरला यायला..
१० वाजता तश्या रिक्षा कमीच असतात पण त्या दिवशीतर खुपच कमी होत्या.....
मग बस पकडली......... तिकीट ४ रुपये... मी दहाची नोट दिली..... आणि time pass म्हणून हेडफोन लावून साँग्स ऐकत बसली.......
त्या कंडक्टरने ५ रुपये परत दिले (1 rs बाकी ) आणि काहीतरी म्हणाला ... मी काय नीट नाही ऐकले... मला वाटल त्याने त्याच्याकडे सुट्टे नाहीत म्हणून शेजारच्या काकांना १ रुपया द्यायला सांगितलाय.......
माझ्याकडे नव्हता -- कसाबसा शोधून दिला त्यांना........ मग तो थोड्या वेळाने आला मला १ रु परत करायला ... तर मी म्हणाले मी दिले त्या काकांना (??)
...... (कानात कॉर्ड्स होतेच)
मग खाली उतरल्यावर लक्शात आल की........मला कंडक्टर कडून १ रु घ्यायचा होता तर मीच त्या काकांना दिला तो (२ rs लॉस )

घापासून मी ज्या बसस्टोप वर
घापासून मी ज्या बसस्टोप वर बसले होते.. तो माझा नेहमीचा बसस्टोपच नव्हता...
>> यप्पड
आशु, रश्मि .. मी एकदा
आशु, रश्मि ..

मी एकदा रविवारी एका हॉस्पिटलमधे गेलो होतो, त्यानंतर ३ चा शो (मोहबते) पाहिला,हॉटेलवर ७ ला आलो तर खिशात पाकीट नाही (कधी नव्हे ते त्यावेळी त्यात रु.२००० होते) ,मग लगेच धावत (बसनी) पुन्हा त्या हॉस्पिटलजवळच्या पानठेल्याजवळ गेलो (कारण तिथे गेलो असताना पाकीट वापरल होत) ,तिथे पडल असेल म्हणुन त्याला विचारलं,तर तो नाही म्हणाला.

मग शेवटी परत येत असताना त्या थियटरजवळुनच बसचा रुट होता,तिथेही सहज बघाव अस क्षणात वाटल आणि पुढच्या थांब्यावर उतरलो,तर ६ चा शो सुटणार होता, सगळे लोक बाहेर पडले,एकाला विनंती करुन लगेच आत शिरलो, मी बसलेल्या रांगेतल्या खुर्चीजवळ पाहिलं .....
तर त्या खुर्चीखाली पाकीट होत आणि त्यात पैसेही होते !!
लकी आहात अनिल.... अंधारात
लकी आहात अनिल.... अंधारात सिनेमा पहाताना पाकीट कशाला काढता राव खिशातुन?
पारीजातक.. खि खि..
काल मी ज्यांच्या कडे गेलेले
काल मी ज्यांच्या कडे गेलेले (अनोळखींकडे) त्यांचा निरोप घेतांना त्यांचा ग्लास (पेला) घेऊन बाहेर पडत होते
विस्तारः काल एका अनोळखीं कडे गेलेले, मला काही माहिती हवी होती , हिंमत करुन मी अनोळखींच्या घराच दार वाजवल, त्यांनी मला हवी असलेली माहिती तर दिलीच पण चांगुलपणाने मला आत घेतल, बसायला सांगीतल, पाणी दिल, चहा विचारला (२ दा). चहाला मी नको म्हटल पण घोट भर पाणी पीऊन मी पाण्याचा ग्लास माझ्या हातातच ठेऊन गप्पा मारत होते. बोलण संपल्या वर मी ऊठले आणी ग्लास हातात घेऊनच निघण्यासाठी मी दारा कडे आगेकुच केली, दारजवल पोहचलेही . त्या बिचार्या ताई हातांचा ग्लास करुन माझ्या मागे आल्या त्या हाताने "ग्लास/पेला" अस खुणावणार तोच दार ऊघडतांना हातातला ग्लास बघुन माझी ट्युब पेटली
त्यांनी ओळख न पाळख तरी मला घरात घेऊन ईतका अतिथी सत्कार दिला आणी मी !!!
परवा मी मोहनथाळ ला मुग वडी
परवा मी मोहनथाळ ला मुग वडी समजत होते
झाल अस एका मंदिरात जाण्याचा योग आला, तीथे जेवणाची सोय होती, जेवणात काय आहे म्हणजे भाजी काय आहे विचारुन मग पैसे भरुन कुपन काढाव म्हणुन मी जेवणाचा मेनु विचारला त्यांनी सांगीतल चवळी, मुग वडी, फुलके, पापड, वरण, भात. मी कुपन घेतल आणी जेवायला गेले. वाढ्या (वाढ्या: वाढणारा) ताटात वड्या घेऊन आला, त्याने विचारल "वाढु?" मी "हाँ, ये मुग वडी हैं ना!" तो म्हणाला "नहीं ये मोहनथाळ है"
तरी तो वाढायला आला तेव्हा माझ्या मनात विचार आलेला "मुग वडी म्हणजे मुगाच्या दाळीच्या वड्यांची पातळ वा कोरडी भाजी" मग हा अश्या वड्या काय घेऊन आला??? मग म्हटल असेल हा मुगाचा नवा प्रकार, मुग वडी म्हणजे मराठीतली 'वडी' असेल 
पारिजातक, किलर, अनिल हे हे हे
पारिजातक, किलर, अनिल हे हे हे
सुनिधी, पाकीट बाहेर नाही
सुनिधी,

पाकीट बाहेर नाही काढलं (कंगवा देखील नाही :डोमा:)पण त्या खुर्च्यांचा परिणाम असेल कदाचित !
काल मी ज्यांच्या कडे गेलेले (अनोळखींकडे) त्यांचा निरोप घेतांना त्यांचा ग्लास (पेला) घेऊन बाहेर पडत होते

समु,
अजुन कॉलेजमधल्या वस्तु घरी नेण्याची सवय गेली नाही का ?
आज ऑफिसला येताना बुट
आज ऑफिसला येताना बुट घालायच्यावेळी पँट फोल्ड केलेली. ती मघाशी जेवायला जाताना पाहीले. एका पायाचा फोल्ड तसाच होता आणि मी दिवसभर ऑफिस मध्ये तसाच हिंडत होतो...
जेवायला जाताना लक्ष गेले नस्ते तर....
असं मागे एकदा कॉलेजात अस्ताना झालेले. तेव्हा कॉलेजवरुन घरी गेल्यावर लक्षात आलेले..
मल्ली,
मल्ली,

याच्यावरून मला आमच्या
याच्यावरून मला आमच्या ऑफिसमधले एक साहेब आठवले. आमच्या ब्रँचची काही सेक्शन्स चर्चगेटच्या मरिनलाइन्सवाल्या बाजूला असणार्या हापिसात तर उरलेली नरिमन पॉईंटकडच्या हापिसात होती. आणि या साहेबांच्या हाताखाली दोन्हीकडची एकेक डिपार्टमेंट्स होती. एकदा पावसाळ्यात पोस्ट लंच सेशन मध्ये ते आमच्या हापिसातून दुसर्या हापिसात जायचे म्हणून पँट अगदी गुढघ्यापर्यंत दुडून तयार झाले (तरी टॅक्सी फेअर लावायचे बरं) तर तिकडच्या हापिसातून फोन आला की आता न येता उद्या सकाळीच इकडे या. मग काय संध्याकाळपर्यंत तसेच पँट दुमडलेल्या अवस्थेत फिरत होते. त्यादिवशी त्यांना वाटले की आपल्या हापिसातला सगळा स्टाफ नेहमी प्रसन्न आहे!
हेच साहेब चेकसाठी दुसरी सिग्नेटरी असायचे. पण केसपेपर्समध्ये त्यांना अगदी बारीकशी..सहज दुरुस्त होईल अशी त्रुटी मिळाली तरी चेक कॅन्सल करून मोकळे व्हायचे. त्यांच्या राज्यात चेक इश्यु रजिस्टरइतकेच कॅन्सल्ड चेक्स रजिस्टर पण भरायचे!
एकदा मिठाईच्या दुकानात जाऊन
एकदा मिठाईच्या दुकानात जाऊन खूप वेळ घालवला हे घ्यावे का ते घ्यावे का? विचार करकरून २-३ जिन्नस घेतले, पैसे वगैरे भरले आणि सरळ दुकानातून बाहेर...... पुढे बरंच अंतर गेल्यावर लक्षात आलं घेतलेल्या वस्तूंची पिशवी तिकडेच राहिली.
माझ्या नाशिकच्या रेसिडेन्स
माझ्या नाशिकच्या रेसिडेन्स आणि पुण्याच्या रेसिडन्समधले बाथरूमम्धले नळाचा व शॉवरचा कॉमन डावीउजवीकडे फिरवण्याचे नॉब उलटे सुलटे आहेत. म्हणजे नाशिकच्या नॉब डावीकडे फिरवला की बादलीत पाणी अन उजवीकडे फिरवला की शॉवरमधून पाणी. पुण्याचे हे उलटे आहे. माझे नेहमीच नाशिक पुणे जाणे येणे असल्याने या नॉबच्या दिशेचे नेहमीच कन्फ्युजन होते. बर्याचदा आंघोळ झाल्यावरही उलटा नॉब फिरवल्याने शॉवरच्या गार पाण्याने भिजायला होते.
बाथरुम मधे पुणे आणि नाशिक अस
बाथरुम मधे पुणे आणि नाशिक अस लिहुन ठेव रे. हा का ना का.
पण त्यात कुठले डाव्यातून
पण त्यात कुठले डाव्यातून कोणते पाणी येते ते नाही ना लक्शात राहात (पै.)भाई...
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक उपाय आहेत.
१. शॉवर काढून टाका.
२. नळ काढून टाका.
३. दोन्ही काढून, गॅसवर पाणी गरम करून घेत चला.
४. दोनापैकी कोणते तरी एक घर बदलून ज्या घरात दुसर्या घरासारखी व्यवस्था असेल असे घर निवडा.
५. याचा खेळच बनवून टाका. नळ उघडण्याआधी स्वत:शीच बेट लावा की कोणत्या नळातून पाणी येइल.
६. हा नशिबाचा खेळ समजून जेथून येइल त्या पाण्याने आंघोळ करा. ही अध्यात्माकडे जाण्याची पहिली पायरी ठरू शकते हे लक्षात घ्या.
एक आणखी उपाय आहे :
७. दोन्ही ठिकाणचे नळ एकाच पद्धतीचे करून घ्या. म्हणजे डावा नळ - उजवा शॉवर असे.
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक उपाय आहेत.............
हहहहह्हाहह.............हसून हसून पुरेवाट लागली
अजून १ उपाय राहिलाच की
अजून १ उपाय राहिलाच की रॉबिनहुड..
हॉट आणि कोल्ड अशी नावें लिहिलेले नळ मिळतात मार्केट मध्ये ते आणून बसवा... आणि खर तर नॉबची काहीच गरज नसते.. त्याचा वापर टाळा... म्हणजे झालं...
पारीजातक, गडबड गार-गरम मध्ये
पारीजातक, गडबड गार-गरम मध्ये नसून नळ-शॉवरात आहे.
काल जिममधे गेले होते, ७
काल जिममधे गेले होते, ७ मिनिटं चालून झाल्यावर स्पीड वाढवून स्लो रन चालू केलं. मग काही क्षण डोळे मिटून जsssरा मान हलवली.....
.
.
.
.
.
.
.
.
.
धप्प्पकिनी पडले ट्रेडमिलवरून म्हणून डोळे उघडले! झालं असं, की रनिंग सेट झालं असं वाटून मी २-३ सेकंदांसाठी डोळे मिटले, हात ट्रेडमिलच्या बारवरून काढले होते, आणि मान फक्त जरा वळवत होते, तर बेल्टवरून मागच्या मागे कधी आले कळलंच नाही, आणि दोन्ही ढोपरं धाडकन जमिनीवर आपटली आणि मला समजलं की मी पडले आहे.
"डोळे कशाला मिटलेस? एवढं रोजच्या सवयीचं मशिन, अशी कशी धडपडलीस! आणि मागे एखादं अवजड इक्विपमेंट असतं आणि लागलं असतं तर? एखादं डंबेल किंवा वेट असतं आणि आपटायला झालं असतं तर..." काळजीने नवर्याने केलेली सरबत्ती!!
गेल्याच आठवड्यात रात्री बाहेरून घरी येताना बर्फाच्या लादीवरून पाय घसरला आणि अशीच काही लक्षात यायच्या आत पडले आणि उजव्या गुडघ्याला लागलं होतं. काल पुन्हा तिथेच लागलं, शिवाय डावा गुडघाही तेवढ्याच जोरात दुखावला.
आंघोळ करताना असे वाटलं की
आंघोळ करताना असे वाटलं की सगळ्या आजबाजूच्या गोष्टी एकदम clear दिसतायत..... बाटल्यांवरची सगळी नावं-बिवं वाचता येताहेत.. असे कसे काय? मग लक्षात आलं चश्मा काढलाच नाहीये.
चश्म्याशी related तर असंख्य वेंधळेपणे आहेत.
रॉबिनहुड, नॉबच्या मागे
रॉबिनहुड, नॉबच्या मागे भिंतिवर बाणाचा स्टिकर लावा नळ आणि शॉवर म्हणुन
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक
रॉबिनहुड, यावर एकच नाही अनेक उपाय आहेत. >>अंघोळच करु नका हा जालीम उपाय आहे बघा
अंघोळच करु नका हा जालीम उपाय
अंघोळच करु नका हा जालीम उपाय आहे बघा
मी ही तेच म्हणतो, न रहे बांस न बजे बासुरी !
बोटीवर कामाला असल्याने बरेचदा
बोटीवर कामाला असल्याने बरेचदा आम्ही जागतिक प्रमाणवेळा बदलत असतो. म्हणजे बोटीवरची घड्याळे १ तास मागे तर कधी पुढे सरकवत असतो. काल असेच आम्ही १ तास मागे गेलो. (इस्राइल वरून माल्टा) मी हातावरच्या घड्याला वरची वेळ बदलली पण मोबाईल अलार्म साठी वेळ बदलायला विसरलो.... आणि कामावर जायला १ तास आधीच उठून तयारी करून पोचलो...
मग वेंधळेपणा लक्ष्यात आला.. लगेच ह्या धाग्यावर आलो आणि जाहीर कबुली...
Pages