मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निळ्या, Lol

काल रात्रि सा. बा. विचारत होत्या जेवतान्ना भाताचे काय करायचे. मी आपल्याच नादात म्हणाले - हाफ राईस दाल मारके. सा. बा. - ????

>> गुळवणीबाई...धमाल आहात तुम्ही....
सा.बा. विचारात पडल्या असतील की सुनबाईंना काय झाले.. बरे वाटत नसेल बहुतेक म्हणून... हा हा..

Gulavanibai >> Happy चांगल आहे ओल्ड मंक नाही म्हणालात आपण Happy

निळ्या Rofl

एकदा पावसाळी ट्रेकला खिचडी बनवायचे सर्व सामान घेऊन गेलो आणि मीठ घेऊनच गेलो नाही... Lol

मग काय खिचडी तशीच कधी जॅम तर कधी चटणी बरोबर संपवली.... Happy

अरे काय चाल्लंय काय? सगळ्यांचा वेंक्यू खूपच घसरलेला दिसतोय. काय अँटीवेंक्यू ट्रीटमेंट घेताय की काय? असं बरोबर नाही...या स्पीडने जर वेंक्यू घसरत गेला तर काय होणार या भारतवर्षाचं?
समू..........................................

मी लहान असताना मला खुपच उशिरा सायकल मिळाली ती जुनी होती, शिवाय पंचरही
मी सराट्याने टायर खोलले
सायकलचे ट्युब सुईदोर्‍यानी शिवले

मुक्तेश्वर१११ >> सायकलचे ट्युब सुईदोर्‍यानी शिवले >> लै भारी Happy
सराट्याने >> बोले तो ??

मी लहान असताना मला खुपच उशिरा सायकल मिळाली ती जुनी होती, शिवाय पंचरही
मी सराट्याने टायर खोलले
सायकलचे ट्युब सुईदोर्‍यानी शिवले

>>>>> मुक्तेश्वर, हे वेंधळेपणात मोडत नाही. सराट्याचे आणि सुईदोर्‍याचे सदुपयोग या शिर्षकाखाली नविन बाफ उघडून टाकावा. Happy

माझा आजचा वेंधळेपणा...
बायकोने पोरासाठी जंताचे औषध आणायला सांगितले...
जाताना तिने सांगितले लिहून घेऊन जा...त्यावर मी जास्त हुशारी करून ह्या सोप्पे नाव आहे...अफॉनबी का असेच काहीतरी नाव होते...(आता पण विसरलो. माझीपण धन्य आहे...:) )
असे म्हणून केमिस्टकडे थाटात आल्फेनलिबे मागितले...:)
त्याने इमानेइतबारे ती स्ट्रॉबेरीवाली गोळी हातात ठेवली...
त्यावर मी त्यालाच झापला...
अरे ये क्या दे रहा है, मुझे वो (आली पंचाईत...जंताच्या औषधाला हिंदीत काय म्हणतात)...
गपगुमान घरी आलो आणि औषधाचे नाव कागदावर लिहून गेलो...

आशू Rofl

गेले दोन दिवस रजनी रजनी वाचतोय त्याचा परिणाम झालाय...
मुंबईवरून स्टोरी लीस्ट आली त्यात रणजी राऊंडअप असे लिहीले होते ते मी रजनी राऊंडअप वाचले आणि विचार करत बसलो..
मुंबई स्पोर्टसमध्ये पण आता रजनी घुसला का काय...

अरे ये क्या दे रहा है, मुझे वो (आली पंचाईत...जंताच्या औषधाला हिंदीत काय म्हणतात)... >>> Lol

माझ्या बाबांचा वेंधळेपणा. काल रात्री १०:३० ला ते निद्रादेवीची प्रतीक्षा करीत पहुडले होते. फोन वाजला. त्यांनी उठून घेतला. मग प्रत्येक वाक्यानंतर 'जोरात बोल , ऐकू येत नाहीए' असे करीत कसेबसे संभाषण केले, शुभेच्छांचे आदानप्रदान केले. आपल्याला ऐकू येत नाही म्हणजे समोरच्याला पण ऐकायला येत नसणार या विचाराने स्वतःही चांगलेच ओरडून बोलत होते. त्यांचे बोलून झाल्यावर माझ्या हाती फोन दिला. फोनवर माझा चुलतभाऊ. मला अगदी नीट ऐकू आले, त्याचे बोलणे . पण आवाज बराच दमल्यासारखा.
मी फोन ठेवल्यावर बाबांना म्हटले , मला तर नीट ऐकू आले आणि त्याला(चुलतभावाला) पण. तर त्यांनी सांगितले की फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ नयेत म्हणून कानात कापसाचे बोळे घालून ठेवले होते, ते काढायला हवे होते . (एवढे करून आवाज येतातच, जरा कमी येत असतील) ! फोनचा रिंगर मात्र मोठ्ठा करून ठेवायला लावतात.
आता मला कळले भावाचा आवाज दमल्यासारखा का ते! एवढा डबल अत्याचार (घसा व कानावर) सहन करूनही त्याने मला एका अक्षराने विचारले नाही , की काकांना कमी ऐकू येतय का!

भरत! Happy
कालचा माझ्या आईचा वेंधळेपणा.... काल पहाटेपासून तिला दिवाळी शुभेच्छांचे फोन येत होते. ती त्याच नादात होती. तेवढ्यात दर्यापुरच्या चुलतबहिणीचा फोन आला. बहिणीने सुरुवात केली, ''काकू ऽऽ,'' माझ्या आईला वाटले, पुण्यात राहणार्‍या दुसर्‍या पुतणीच्या सासूबाईच बोलत आहेत! कारण त्याही माझ्या आईला काकूच म्हणतात त्यांच्या सुनेप्रमाणे! आणि सध्या ह्या दोघी म्हणजे माझी आई व बहिणीच्या सासूबाई एक अभ्यासक्रम बरोबर पूर्ण करत आहेत. दर दोन दिवसांआड त्यांचे अभ्यासाच्या चर्चांचे फोन चालू असतात. तर माझ्या आईचा असा समज झाल्याने ती बिनधास्त त्यांच्या अभ्यासाच्या गप्पा मारत बसली. ''अहो, तुम्ही ते अमुक पुस्तक चाळलेत का....त्यात त्या तमक्या प्रश्नाचे उत्तर फार छान दिले आहे, मला काल वाचायला वेळच नाही झाला हो, तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला....वगैरे वगैरे....'' दर्यापुरची चुलतबहिण बराच वेळ माझ्या आईची बडबड शांतपणे ऐकून घेत होती. मग मात्र तिला रहावले नाही. ''काकू ऽ, अगं मी तुझी पुतणी बोलते आहे दर्यापुरहून.... ठीक आहेस ना???'' माझ्या आईला मग अचानक साक्षात्कार झाला!!! Light 1 झालं...मग तेवढं निमित्त दिवसभर खुसुखुसू हसायला पुरेसं पडलं! Happy

हा माझा कालचा वेंधळेपणा :
जेवताना पाहिजे म्हणून लिंबू चिरुन आणि पिळून घेतल. नंतर आवरेन म्हणून पाट आणि लिंबाची सालं तशीच ठेवली. आवरताना भराभर पाट, सुरी डिशवॉशर मध्ये टाकल आणि लिंबाची सालं टाकायला म्हणून पाहिल तर अर्धच लिंबू दिसत होत. मला कळलच नाही की दुसरा अर्धा भाग कुठे गेला. मग विचार केला, जाउदेत, मिळेल नंतर.
एका तासाने नवर्याने डिशवॉशर उघडला आणि अतिशय चकित आवाजात विचारल की डिशवॉशर मध्ये अर्ध लिंबू का आहे?
मी आपल इकडे हसत सुटले...
लिंबू आता डिशवॉशर मध्ये कस गेल कोणास ठाउक?

दिवाळीत बदाम टाकले मिक्सरमधे बारिक करायला. बटन गोल फिरवले. मिक्सर काही चालु झाला नाही Uhoh
मग वरचे बटन बंद असल्याचा साक्षातकार झाला Angry मिक्सरच्या झाकणापसुन बटन जवळ म्हणुन त्याच हाताने बटन चालु केले. पण अख्खे बदाम टाकलेले असल्यामुळे फोर्सने झाकन उडाले. मग घाइत ते उचलुन कसेबसे चालु मिक्सरवर ठेवायला गेले... या गोंधळात अनामिका मिक्सरमधे. आता शहानपनाने वरचे बटन बंद केले. सगळीकडे बदाम विखुरली होते. रक्ताळलेले बोट घेउन बेसीन गाठले. घरातच २ डॉ असल्यामुळे लगेच हळद पट्टी लावली. थोडी चक्कर आल्यासारखे वाटले. मग पेन्किलर घेउन एका जागी शांत बसले. बिचारे घरातले जेवता जेवता उठावे लागले Sad

दिवाळिमुळे दोन्ही कामवाल्या लाँग लिव्हवर होत्या.. उजवा हात असल्यामुले कामाला सुट्टी. आता सांगा याला वेंधळेपणा म्हणावा की काम टाळण्यासाठी केलेला इब्लीसपणा Uhoh Lol

सगळ्यात गंमत म्हणजे एव्हडे होउनही २ दिवसात जखम पुर्ण बरी.... मग काम करावेच लागले Angry Proud

वर्षा........असं होतं कधीकधी! पण जखम बरी झाली हे वाचून बरं वाटलं. काळजी घे गं बायो!

एकदा मी आलू पराठ्याचं सारण फ्रिजमधे ठेवलं. रात्री आम्हाला पार्टी होती. साबा साबूंसाठी त्यांना विचारून मुगडाळीची खिचडी, कढी, पापड असं सगळं करून ठेवलं. खिचडीचं पॅन ओट्याखालच्या सिंगल शेगडीवर ठेवलं.....साबांना सांगून! साबांनी जेवताना गरम करावं या विचारानं. त्या मिक्सर, मा.वे. ओटीजी काहीच वापरत नसत. अगदी सालकाढणं सुद्धा ...काकडीची सालं विळीवर काढत.
असो...रात्री साबांनी साबूंना जेवायला वाढलं. दुसर्‍या दिवशी सकाळी चहा पिताना साबू मला म्हणाले, " अगं तुझ्या खिचडीत बटाटे जरा जास्तच झाले होते."
मी अवाक..."बटाटे? मी नव्हते घातले खिचडीत...कधीच नाही घालत."
साबू.." चांगली झाली होती खिचडी...पण बटाटे का इतके घातलेस? मी डायबेटिक आहे माहिती आहे ना तुला? तरी मी नेहेमी प्रमाणे सायीचं दही दूध घालून कालवून खाल्ली."
मी भराभरा फ्रिज उघडला....आलू पराठ्याचं सारण गायब. आणि ओट्याखालच्या सिंगल शेगडीवर खिचडीचं पॅन तसंच.
बिचार्‍या साबूंनी आलू पराठ्याचं सारण सायीचं दही दूध घालून कालवून खाल्लं होतं. ते साबांना कधीच काहीच म्हणत नसत.
आता हा वेंधळेपणा कुणाचा.....पण माझ्या मनाला ते खूप लागलं.

वर्षा_म,
याला वेंधळेपणाच म्हणता येईल ...
आमच्या घरवालीने देखील मिक्सर नीट फिरत नव्हता, म्हणुन हातानी जोरात फिरवुन बघायली गेली,ते ही बटन बंद न करता ,ते फिरु लागल आणि बोट सापडलं ,७-८ दिवसांनी बरं झालं...
मानुषी,
वो ..सांबा,
अब तुम्हारा क्या होगा ...अब तुम भी मेरी खिचडी खा !!
Lol

मानुषी.. बापरे काय भयानक लागलं असेल गं नुस्तं सारण .. तुझे साबु भलतेच पेशंट दिस्तायेत..

Proud

तुझे साबु भलतेच पेशंट दिस्तायेत.. >> भलतेच पेशंट नाही.. ते डायबेटीजचे पेशंट आहेत वर्षु Proud

Pages