Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शोभा१२३ समु,ड्रीमगर्ल. आगे
शोभा१२३
समु,ड्रीमगर्ल.
आगे बढो. हम तुम्हारे पीछे है!!
>>>>>>>>>>>>> अरे वा, ही शोभा१२३ समु आणि ड्रीमगर्लच्या मागे आहे. म्हणजे त्यांच्यापाठोपाठ आपल्याला हीचेही वेंचेकि वाचायला मिळणार. मला तर खुप आवडतं दुसर्याला हसायला. त्यामुळे.... येऊ द्यात. संकोच करू नका!
मामी मला पण मला पण...
मामी
मला पण मला पण...
मामी......... वर्षाच्या
मामी.........
वर्षाच्या मागून मी पण........ "मामी हास्य क्लब" (किमान २४ मेंबर्स आवश्यक
)
माझ वोट ड्रिमगर्ल ला आहे >>
माझ वोट ड्रिमगर्ल ला आहे >> आणि माझं वोट समुला... कायै समसमा योग की कय ते म्हंतात ते झाला पाहीजे ना...
आशु, वर्षू धन्स! शोभा, शानी बाय ती... हाल्ली वेंपणा कमी करते...
समु... तुस्सी ग्रेट हो... रोशोगुल्ल्लेकी प्ल८ हो... टोमॅटो आम्ले८ हो... हमारी फेवरे८ हो... चालू ठेवा... मी डोकावते अधन मधन..:)
कालचा किस्सा... चेक आणि स्लीप
कालचा किस्सा... चेक आणि स्लीप भरायला शिकण्यासाठी नवर्याने दामटून बसवलेलं... पुरणपोळीच्या उंड्यांची गोष्ट आठवतेय कोणाला? माझं त्या गोष्टीसारख> मला येतं की पालुपद चालू होतं...
त्याने सांगितलेलं लक्ष ठेव चुकत असेल तर सांग... (व्वा, गुरू शिष्याला सांगतोय लक्ष ठेव माझ्यावर म्हणून तेपण माझ्यासारख्या वेंधळ्या!! आता याचा दोष कोणाकडे???) तर त्याने चेकबूक्च्या पहील्या पानावरच्या स्लीपवर डेटच्या जागी चेक नंबर टाकलेला आधी... पुन्हा तसाच टाकला... तर टाकल्यानंतर मी सांगितलं... तर वस्सक्न ओरडला आधी सांगायला काय आलेलं. मी म्हटलं की वर तसंच टाकलेस मग मला वाटलं चालेल..
आता चेक भरायचा होता... त्याने स्वतःच्याच नावावर लिहीला... अर्ध नाव होईपर्यंत मला वाटलं त्याच्याच नावाच कोणी आहे... पूर्ण लिहील्यावर माझीच ट्यूब पेटली... मग सांगितलं तर परत वस्सकन ओरडा! (आता सांगा वेंधळं कोणे मी की तो???)
डिप्लोमाला LR कडे जाण्याचा
डिप्लोमाला LR कडे जाण्याचा मार्ग आणि बॉईज हॉस्टेलकडे जाण्याचा मार्ग सारखाच दिसायचा... फरक एवढाच की LR उजव्या जिन्याने गेलं की आणखी छोट्या जिन्याने यायची आणि बॉईज हॉस्टेल डाव्या जिन्याने... आमचा उजव्या डाव्याचा प्रॉब्लेम
पहीलाच आठवडा होता कॉलेजचा.. मी धावत धावत पळालेले LRमध्ये... मध्येच २ सिनीअर मुलं आडवी आली आणि ओरडली ए उधर किधर जा रही है, उधर नही जानेका...
मला आधी समजलेलं की सिनीअर लोकं फ्रेशर्सना रँगींग करून छळतात.. मी म्हणाले लक्षच नाही द्यायचं. मी नाक उडवलं आणि सरळ ताडताड चालत गेले... शेवटच्या रूमपर्यंत गेले तर तिथून भकाभका धूर बाहेर येत होता.. रूमच्या पलीकडे डोकावले तर LR कडे जाणारा अख्खा जिना गायब!!!

चूक लक्षात आल्यावर झ्प्पकन मागे वळले आणि परत जायला निघाले तो तगड्या सांडांसारख्या मोस्ट सिनिअर्सचा घोळका हातात सिगारेट्स घेऊन.. बापरे!!!!!!! पुढे आले तर ती दोन मुलं उभी होतीच... पुन्हा ओरडली... बोला था ना नै जानेका? क्यु गयी थी?? मी कानाकडे, तोंडाकडे इल्ले अशा अर्थाचा हात हलवत बाबाबूबू केलं नी पळाले. पुढंचं अख्खं लेक्चर LRमधेच लपून बसलेले!
बा बा बू बू
बा बा बू बू
तुमने कभी जाणून बुजून वेंप
तुमने कभी जाणून बुजून वेंप किया है?? मैने किया है

हे सांगताना एवढं एंबॅरेस होतंय पन त्यावेळी हा वेंप. तजाणून बुजून केला नसता तर जास्त एंबॅरेस झाले असते...

पुण्याला जोग क्लासेस ला होते वेकेशन साठी... भर उन्हाळ्याचे दिवस! पुण्यातला उन्हाळा माहीत असेलच सर्वांना... दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी रिचवलं तर जोराची लागायची... टॉयलेट शोधूनही सापडलं नव्हतं मग काय तसंच कंट्रोल करावं लागायचं... बर्याच शोधाशोधीनंतर एक दिवसे जेंट्स सापडलं पण लेडीज..??? माहीत नाही.
क्लासमधल्या मुलींनाही माहीत नव्हतं!
स्टाफमध्ये सगळे जेंटस त्यांना काय विचारणार!!
एक दिवस की करे कंट्रोलही नही होंदा परिस्थिती झाली.. मग उठले नी गेले जेंट्स मधे...घुटमळले...तशीच इकडे तिकडे... कोणी नव्हतं, सगळे लेक्चरमधे होते... आणि आतून सेपरेट कडी पण होती. मग जास्त विचार न करता सरळ घुसले... इकडे लेक्चर सुटलं आणि बाहेर सगळे वाट बघताहेत आतून कधी येणार... आता येणार कशी बाहेर!!! दहा मिनिटं तशीच काढली.. मग हिम्मत केली नी धीर धरून कडी खोलली... आतून राणीसारखी बाहेर आले... बाहेरच्या उभ्या असलेल्या २ मुलांनी परत बोर्ड बघितला च्यायला चुकीच्या ठिकाणी आलोत काय??? त्यांना रिअॅक्ट करायला वेळ न देता मीच त्यांच्या कडे रागीट नी तुच्छ कटाक्ष टाकला... हे इथे काय करताहेत म्हणून! ती पोरं बिचारली बावरून परत गेली... चुकून लेडीज टॉयलेट कडे आलोत नी मार खायला लागेल म्हणून!!
त्यानंतर पाणी बंद नी लिमलेटच्या गोळ्या आणायला सुरू केलं... पण ते लेडिज टॉयलेट काय शेवटपर्यंत सापडलं नाहीच
फोनवर बोलताना yesterday नी
फोनवर बोलताना yesterday नी tomorrow चा नेहमी नेहमीच जोरदार गोंधळ उडतो... I will send you mail yesterday वगैरे वाक्य तोंडातून घरंगळायला लागली की क्लायंट बिचारा समजून जातो की वर्क लोड जास्त आहे बिचारीचं! कल आज और कल सग्ळं मिक्स होतंय!!! कित्ती बाई गुणाचे क्लायंट ते... (अलाबला करणारी बाहुली)
चालू ठेवा... मी डोकावते अधन
चालू ठेवा... मी डोकावते अधन मधन..
>>>>>
ड्रीमगर्ल..... आता डोकावली नाहीस तर डोके धरून पुन्हा पुन्हा आणू तुला इथे........
आणि वरच्या पोष्टींना काय फक्त "डोकावणं" म्हणतात..... की हा पण वेंपणाच......
समू आणि ड्रीमू........ कसली
समू आणि ड्रीमू........
कसली जोडी आहे राव........... ह्यांचे किस्से थांबतच नाहीत........
आज निघायला उशीर झालेला...
आज निघायला उशीर झालेला... चटणी फ्रीजरमध्ये टाकलेली... घाईघाईत वाटीच गॅसवर ठेवली... वाटी काळी पडतेय लक्षात आल्यावर दुसर्या भांडयात पाणी ठेऊन त्यात वाटी ठेवण्यासाठी गरम वाटी उचलली... हातानेच!!
बोटं भाजलेत मस्त! डाव्या हाताने टाईपता येत नाहीये पटापट... तेव्हा २ दिवस विश्रांती! 
वा वा ! माझ्या अनुपस्थितीत ८३
वा वा ! माझ्या अनुपस्थितीत ८३ वेंपणे झालेले आहेत. हे बघून अगदी भरून आलं. चला म्हणजे मंडळी अगदी योग्य ट्रॅकवर आहेत तर!
डेस्कटॉपच्या शेजारी नोटबुक
डेस्कटॉपच्या शेजारी नोटबुक ठेऊन काहीतरी पहात होते. डेटॉ. चा माऊस हलवतेय आणि नोटबुकचा कर्सर पहातेय. आणि विचार करतेय...का बरं नोटबुकचा कर्सर हालत नाहीये!
२ दिवसात वेंपचा उच्चांक
२ दिवसात वेंपचा उच्चांक गाठलाय...
नवरा टेन्स आहे "या बायकोचं काय करायचं" असा! टाकते सवडीने किस्से!
हाफीसात प्रचंड वाढलेला वर्क लोड कारणीभूत असेल नाहीतर मी काय अगदीच हे नाय हॉ तशी!
ड्रीमगर्ल, नवर्याला समुचे
ड्रीमगर्ल, नवर्याला समुचे किस्से ऐकव ना, मग स्वत:कडचं पॅकेज बरंच बरं असल्याचा साक्षात्कार त्याला आपोआपच होईल. हाकानाका.
मामी नामी उपाय........
मामी
नामी उपाय........
आज माझ्या लेकाला घेऊन
आज माझ्या लेकाला घेऊन त्याच्या शाळेत गेले होते परत येताना बाटा चे स्टोर दिसले त्यावर किहिले होते " रिटेल आउट्लेट" मी ते चुकून टॉयलेट वाचले आणि वर तोंड करून नव-याल म्हटले काय बाई बाटावर दिवस आले आधी चपला विकल्या आता शौचालये काढताहेत..नवरोबाने नीट वाचल्या वर सरळ गाडी डोळे तपासायला डॉ कडे वळवली...
अरारारा ....... बाटांचे बारा
अरारारा ....... बाटांचे बारा वाजवले की तु!
असे आम्ही आमच्या ल्हाणपणी काश्मिरला गेलो असताना, दाल सरोवरातल्या हाऊसबोटींवर 'To let' च्या पाटया वाचून इथे बरीच आणि छान देखणी टॉयलेट्स आहेत असा निष्कर्ष काढला होता.... तवा विंग्रजी आताच्या पेक्षा कच्चं होतं ना म्हून!!!!
स्वप्ना.. बाटाचं टॉयलेट!!
स्वप्ना.. बाटाचं टॉयलेट!!
बहुतेक मी आधी इथे हा किस्सा
बहुतेक मी आधी इथे हा किस्सा लिहिला होता.
आम्ही घरचे सगळे २६ सिटर बस करुन सहलीला गेलो होतो. दुपारी एके ठिकाणी जेवण करुन पुढे निघालो. सगळे शांत बसले होते थोडे काही पेंगुळले पण होते..
तितक्यात माझ्या शेजारी बसलेला माझा छोटा चुलत भाउ जोरत ओरडला
"दादा, दादा, नारी विक्री केंद्र"
सगळे खडबडुन उठले बाहेर पाहु लागले
तर ते नीरा विक्री केंद्र होतं
स्वप्ना, मामी आज मी पण आत्ता
स्वप्ना, मामी
आज मी पण आत्ता इथ येण्यापुर्वी Toilet Polite वाचल
काय पण योगा योग सगळ्यांचे Toilet चे वेपणे येत आहेत, तस आज सकाळी मी "मुली पेईंग गेस्टला", मुरली पेईंग गेस्ट अस वाचल 
२-४ दिवसां पुर्वी रुम-मेट गणीताचा अभ्यास करत होती तीने मध्येच जोरात विचारल, "टु मायनस वन ईज एकवल टु???" (2 -1=?) मी पण जोरात आन लई कॉनफीडन्स मधी "मायनस वन" (-1)
मग समद्यांनी दात काढले 
मला पण डोळे चेक करायला हवेत
मला पण डोळे चेक करायला हवेत आजकाल भलत्याला भलतच वाचतो असतो की म्ह्या
हो ड्रीमू (:डोमा:) बरोबर आहे, आजकाल माझा पण वर्कलोड लई वाढलाय त्यामुळेच हे अस वे वे होत!!
मी ड्रीमगर्ल ला कैलास जीवन लावा अशी पोस्ट टाकलेली कुठे गेली?
सगळी गिफ्ट कार्ड शोधुन
सगळी गिफ्ट कार्ड शोधुन त्यांचा बॅलन्स शोधायचा मोठा उद्योग काढला.
शॉपिंग करता करता "Bath and Body Works" दिसल म्हणून आत बॅलन्स चेक करायला गेले. काउंटर वरच्या मुलिला कार्ड दिल आणि सांगितल की बॅलन्स चेक करायचाय. तिने काय काय टायपायला सुरुवात केली काँप्युटर वर पण तिला काही जमेना. मग दुसर्या विक्रेतिला सांगितल, तिलाही जमेना. मी इकडे विचार करत होते की काही ट्रेनिंग देतात की नाही?
मग त्यांनी सुपरवायझर बाईला बोलावल. तिने कार्ड हातात घेतल आणि बघुन म्हणाली "This gift card is for 'Bed Bath and Beyond'. You will have to go to that store to check balance. This is 'Bath and Body Works'".
मी कसबस सॉरी म्हणुन पटकन दुकानातुन बाहेर पडुन लांब गेले चालत.
या दोन दुकांनाचा नेहमी गोंधळ होतो माझा.
ड्रीमु और समु चा है वेंक्यु
ड्रीमु और समु चा है वेंक्यु अजीब..


त्यांचे किस्से वाचायला मिळताहेत
हे आमचे नशीब..
अशक्य हायेत दोघी पोरी
स्वप्ना,मामी,मराठी कुडी
आमच्या ऑफिसातले सीसीटीव्ही मी
आमच्या ऑफिसातले सीसीटीव्ही मी लागलो कामाला तेव्हापासुन बंदच होते. त्यामुळे आम्ही अगदी बिंधास्त असायचो. काही दिवसांपुर्वी नाईट प्रोजेक्ट साठी थांबलेलो. काम संपल दोन वाजे दरम्यान. म्हणल करुयात सकाळ पर्यंत रिल्याक्स... काढला शर्ट आणी पहुडलो सोफ्यावर. सकाळी सातला उठुन स्वारी घरी दाखल झाली. आराम करुन बारा वाजता परत ऑफीसात हजर. मागो माग एच आर आली आमच्या लॅब मध्ये आणी अनांउस केल - सीसीटीव्ही चालु झालेत सांगण्यास उशीर झाल्या बद्द्ल क्षमस्व...
बहुदा तिला आणी मलाच माहीतीये काय झालय ते.....
चिमणराव ... भारी वेप ... पण
चिमणराव ...

भारी वेप ...
पण एकटेच होता ना ? मग कसली काळजी त्या सीसीटीव्हीची !
बहुदा तिला आणी मलाच माहीतीये
बहुदा तिला आणी मलाच माहीतीये काय झालय ते.....
>>>
अरे चिमण, काय केलसा रे असं.......... अरारारारारारा...........
अरे याला जाणूनबुजून केलेला वेंप म्हणायचं का?????
"हसीन गलती"

चिमण्या ... आपण भाडे भरलेली
चिमण्या ... आपण भाडे भरलेली एक हक्काची जागा आहे ना .. मग रूमवर जाऊन झोपावे.
तिने त्या रेकॉर्ड्सचा वापर करून तुला blackmail केले तर ?
अरे मी अस काही केल नाही
अरे मी अस काही केल नाही राजांनो
पण आपल्या एच आर ला आपले "विनासदरा" रुप दाखविणे हे ही नसे थोडके
Pages