मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल 'शिवबा' नाटक पाहिले... शिवाजीचा जन्म झाला आणि पहिला अंक संपला... मग रोहिडेश्वराची शपथ घेतली तिथे दुसरा अंक संपला... .पडदा पडला , लोक बाहेर चालले... आम्ही तसेच वाट पहात बसलो आता पुढचा इतिहास बघायचा म्हणून... तर पडद्यासमोर माणसे येऊन माईक , लाइट वगैरे डिसकनेक्ट करु लागले... मग समजले... नाटकच संपले म्हणून... Happy

हाय लोक्स क्से आहात, सायबर कॅफेत आहे (बशीत नाही :डोमा:) तेव्हा लईटाईम न्हाय बघा माये कडे असो मी बर्‍याच दिवसा पुर्वी केलेले आणी इथे टाकण्या साठी म्हणुन लक्षात ठेवलेले वेपणे:

पाण्याची मोटार सुरु होती, बाथरुम चा नळ सोडला तर ईतर समद्या नळात चांगल पाणी येत होत, म्ह्या मोरीत कापड धुवित व्हतो नळाला पाणी येत न्हाय म्हणुन १०-१५ मी पाण्याची वाट बघत थांबलो, मग ऊठलो खाली गेलो नि आजीले म्हणालो, "मोटार काहे बंद केली वर नळाला पाणी न्हाय" आजी म्हणल "आत्ताच टाकी ओव्हर फ्लो झाली म्हणुन मोटार बंद केली" म्हा बोललो "पण १०-१५ मी पासुन पाणी न्हाय" आजी "एखादा नळ सुरु राहिला असेल वर म्हणुन टाकितल पाणी लवकर संपुन अस झाल असेल" ...
मी परत वर आलो. दुसरे नळांला चांगल पाणी येत व्ह्तो ते बघुन म्ह्या मोरीच्या नळाला बडबड पण केली नि "किचन मधला नळ बंद करा म्हणजे मोरीत पाणी येईल असे मैत्रीणिला बोललो" तेवढेत आजी वर आल्या (नळ चेक कराया), म्हा मोरीत गेलो नळ फिरविला नि धो धो पाणी Uhoh म्हणजी झाल अस की म्ह्या नळ निट सुरु न करताच नळाला पाणी न्हायचा गोंगाट केला Proud ... सगळे हसाया लागले (आजी जीने चढुन वर याव लागल म्हणुन "काय पण ध्यान आहे" अस बघुन गेल्या म्हाया कड)

कपडे धुता धुता ध्यानि आल एक ड्रेस धुवायला घ्यायचा राहिलाच, त्याची लई शोधा शोध केली पण गावेच ना कुठे गेला? ड्रेस कुठ गेला असेल म्हणुन ईचार करायला बसलो तर तो ड्रेस म्ह्या घातलेला होता Proud

कालच केलेला वेंधळेपणा:
मोबाईल वर बोलत होतो. काहीतरी काम करत असल्याने फोन कान आणि खांदा यांच्यामध्ये पकडला होता. बोलणं संपल, पलीकडून फोन ठेवला पण माझा फोन मात्र मी तसाच पकडून बसलो होतो - जवळ जवळ १० मिनिटे !

आत्ताच washroom मधुन जागेवर येवुन बसलो तर मॉनिटरवर स्क्रिन सेव्हर चालु होता. त्यामुळे स्क्रिन active होण्यासाठी माउस ऐवजी त्य्च्या बाजुच्या मोबाईलवरचे बटण दोनवेळा प्रेस केले. वर स्क्रिन सेव्हर गायब का होत नाही म्हणुन विचारत पडलो Happy

मी मायबोली वर अस्ले कि नवरा नेहेमि कटकट करतो.. त्याला सार्ख बजाव्ते.. ए गप म्हणुन..
आज हि तेच केल दुपरी.. सासरे बुवा सन्गायला आले.. पाणि आलय.. मशिन लावुन घे..
मि त्यान्नाच....
सध्या मिच गप्प आहे :ड

हा काही वेंधळेपणा नव्हे.. मायबोलीच्या आड कुणी आलं तर... मग ते सासरे का असेनात... Proud
Light 1

परदेसाई Happy

मी इंजिनियरींगला असतानाचा एक किस्सा. मला परिक्षा आली की जाम टेन्शन यायचं. मग माझे so called superstitions डोकं वर काढायचे त्यापैकी एक म्हणजे डोक्याला भरपूर खोबरेल तेल लावले तरच आपल्या डोक्यात वाचलेले शिरणार आणि तश्याच डोक्याने पेपर लिहिला तरच आपण पास होणार ह एक समज !!
नेहमी प्रमाणे रात्री तेल लावण्यासाठी पॅराशूतची बाटली घेतली आणि सवयी प्रमाणे तेल हातावर न घेता डायरेक्ट डोक्यावर उलटी धरली.वास का असा येतोय म्हणून पाहिले तर काय आमच्या पूज्य पिताश्रींनी त्यांच्या बाइकमधिल इंजिन ऑइल त्यात भरले होते आणि चेतावणी म्हणून मला सांगून ठेवले होते (मुलीचे पाय पाळण्यातच ओळखले असणार त्यांनी) पण कसले काय ? आता केस धुतले तर पेपर चांगला जाणार नाही या टेन्शनने मी त्यावरून दुसरे तेल लावून पेपरला गेले ....माझा एक मित्र म्हणाला सुद्धा तेलाचे भाव कमी झालेत वाटतं? मी म्हटले नाही इंजिनीयर होणार म्हणून आत्तापासूनच इंजिन ऑइलची सवय करतेय.......

रच्याकने अ. मा. माझी आहे तीच मेकॅनिकल इंजिनियरची डिग्री परत करण्याच्या विचारात आहे मी कारण मी वाट चुकलेली इंजिनियर आहे ओ..!! हाही आयुष्यातला वें.पणाच म्हणावा लागेल मोठा

आता केस धुतले तर पेपर चांगला जाणार नाही या टेन्शनने मी त्यावरून दुसरे तेल लावून पेपरला गेले >> ईईईईई. हाडाच्या इंजिनिअर हो तुम्ही. Happy

स्वाती पापी पेपर का और पास होने का सवाल था यार ....त्यामुळे प्रेमात आणि युद्धात (हो परिक्षा माझ्यासाठी युद्धच म्हणावे लागेल्)सगलं माफ असतं

स्वप्ना Lol

मी डिप्लोमाची २ वर्ष आणि डिग्रीची ३ वर्ष प्रत्येक पेपरला एकच ड्रेस वापरला होता. अगदी प्रॅक्टी-व्हायवा ला पण Proud

सही म्ह्णजे माझ्यासारखं कुणीतरी आहे वर्षा तसे तुझे वेट लॉसचे प्रयोग वाचल्यावरच वाटलेलं आहे आपल्यासारखं कुणीतरी

मी डिप्लोमाची २ वर्ष आणि डिग्रीची ३ वर्ष प्रत्येक पेपरला एकच ड्रेस वापरला होता. अगदी प्रॅक्टी-व्हायवा ला पण>> माझी एक बहिण पण अस करायची.

स्वप्ना, मी दहावी - बारावीत एकच शर्ट पँट घालून पेपर दिलेत बोर्डाचे.....
आणि ईंजिनिअरिंगला प्रत्येक सेमला पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी "पार्वती थिएटर्"मध्ये (वसई, कॉलेजच्याजवळचे थिएटर) जाऊन जो असेल तो पिक्चर बघायचो मी आणि माझा एक मित्र. नियम कधी मोडला नाही.
तो मित्र युनिव्हर्सिटी टॉपर आहे आमचा आणि मी ईंजिनिअर झालो यात समाधानी... Proud

मी डिप्लोमाची २ वर्ष आणि डिग्रीची ३ वर्ष प्रत्येक पेपरला एकच ड्रेस वापरला होता. अगदी प्रॅक्टी-व्हायवा ला पण >> हा काही वेंधळेपणा नाही. परिक्षेच्या दिवसात अभ्यासाव्यतिरिक्त पेपेर चांगला जाण्यासाठी करायच्या गोष्टींची तर माझ्या कडे मोठी यादी होती.

परिक्षेच्या दिवसात अभ्यासाव्यतिरिक्त पेपेर चांगला जाण्यासाठी करायच्या गोष्टींची तर माझ्या कडे मोठी यादी होती >> द्या द्या इथे.. आमची करमनुक होइल Proud

तशी यादी करायला आमच्याकडे सध्ध्या लेक तयार आहे Lol

स्वप्ना Proud

तो मित्र युनिव्हर्सिटी टॉपर आहे आमचा आणि मी ईंजिनिअर झालो यात समाधानी...
भुंग्या,
मित्राने थियटर मध्ये त्या ३ तासात देखिल तुला चुकवुन अभ्यास केला कि काय ?
शेवटी तुला ते चित्रपट पाहुनच त्या काळात हुशारी थोडी वाढली असणार ..!
Lol

आता हा कुणाचा वेंधळेपणा म्हणावा Uhoh

मागच्या महिण्यात भाउ-आई बरोबर गावाला जाण्याचा योग आला. सगळे मला घ्यायला माझ्या घराजवळ आले. मी गाडित बसल्या बसल्या माझी ४ वर्षाची भाची म्हणाली "आत्त्या तु खुप छान दिसतेस"

मी अगदी खुष Proud

लगेच आईने सांगितले "काल पासुन ती सगळ्यांना असेच म्हणतेय" Lol

मी त्यावेळी साधारण ६ वीत असेन (१९८७), दिवाळीत केलेल्या किल्यासमोर (किल्यासाठी नदीकाठावरुन लाल माती, वाळु आणण्यात मजा यायची) पाण्याच्या कारंज्यासाठी सायकलच्या ट्यूबचा व्हॉल्व मला पाहिजे होता,मग मी मामाच्या सायकलच्या दोन्ही चाकाची त्यासाठी हवा सोडली, मग आजोबांनी झाप-झाप झापलं, मला त्यांच्याकडुन पहिल्यांदाच एक तडाका (पाठीवर) दिला, अशी थाप मी गेल्या ६ वर्षात प्रथमच खाल्ली होती, पण ते मला मनाला खुप लागलं, कारण मी लहानपणापासुन आजोळलाच शाळा शिकायला होतो, मग मी काय केलं जेवण नाही घेतलं आणि घरातच दुपारी १२ च्या दरम्यान रागाच्या भरात एका मोठ्या लाकडी पेटार्‍याच्या भींतीजवळच्या आडोशाला लपुन बसलो,ते हललोच नाही.
१-२ तासांनी सगळ्यांची शोधाशोध,धावाधाव सुरु झाली, २-४ जणांनी भितीने सगळा नदी काठ शोधुन काढला, माझ्या वयाची आंघोळीला आलेले, पोहणारे मुलं तपासली, नदीजवळचे मोठे ओढे पाहिले, कुणी गावातल्या सगळ्या मंदीरात शोधल,लायब्ररीत पाहिलं,संपुर्ण घर,जनावराचा गोठा पाहिला,मित्रांच्या घरी पाहीलं.. शेवटी आजोबांनी एका गड्याला माझ्या गावी (१५ किमी) बघायला पाठवलं, तो गडी देखिल संध्या.६ वाजता परत आला, शेवटी परक्याचं पोरं..शेजारी बोलु लागले .
आता आजी रडायला लागली, आजोबांना पस्च्चाताप झालेला दिसला, शेवटी घरात १०-१२ गल्लीतले लोक गोळा झाले होते, मी हे सगळं गेले ५-६ तास शांतपणे ऐकत होतो (कि आनंद घेत होतो माहीत नाही), मग शेवटी आमच्या शेजारच्या एका काका सहज घरात नीट पाहिलय का म्हणुन बघत बघत पेटार्‍याजवळ आले ..
आणि एकदाचा त्यांनी सुस्कारा सोडला आणि माझी मान पकडली .....
गेले ६-७ तासापासुन चाललेला शोध संपला, मला हॉलमधे बसवण्यात आलं, माझी मात्र सगळे लोक घरातुन जाऊ पर्यंत एकदाही मान वर करुन पाहायची हिम्मत झाली नाही,
दुखावलो गेलो होतो आजोबांनी मला मारलच कसं म्हणुन ..
तसं आजोबांनी सहज चापटी मारली असणार पण मला किती लागलं होतं त्यांना लक्षात आलं नसेल कदाचित कारण त्यांना पण असा अनुभव नव्हता
त्यां काकांना मी आणि मला ते अजुनही चांगलेच ओळखतात.
हा वेंधळेपणाच ना ?

अनिल हा प्रसंग तुम्ही वेंधळेपणाऐवजी लहानपणीचे उद्योग मध्ये लिहायला हवा होता Happy हा ही एक वेंधळेपणाच ना!!

परवाची गोष्ट ...
मी आणि माझा मित्र आम्ही जवळ जवळ अर्धा तास एक गाणे आठवण्याचा प्रयत्न करत होतो ...
काही केल्या गाणे आठवेना ... मग हिंडून फिरून आम्ही माझ्या घरी पोचलो ...
मित्राने मला घरात सोडले ... बाहेर गेला ... गाडीला किक मारताना एकदम त्याला गाणे आठवले ...
त्याने ते मला ओरडून सांगितले ...
आता असे करताना आधी संदर्भ द्यावा ना ... पण नाही ! हा वेडा सरळ ओरडला ...
"स्वप्निल .... मै हुं तेरे प्यार मे पागल .... जानेजा !! "
आसपास चे लोक आणि आई बाबा माझ्याकडे विचित्र पाहायला लागले होते ...

Uhoh

निळ्या Happy

Rofl

Pages