मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समु,अक्षरी, भुंगा, ड्रीमगर्ल, Rofl
भुंगा, तुम्हाला तर फार सोप होत त्या सरदारजीच्या तावडीतून सुटून जाणे.:हाहा:

नाय नाय भुंग्या, आता मी शाण्यासारकं वागायचा प्रयत्न कर्तेय. Proud
सरताज समूकडेच सुरक्षित राहुंद्या! समु... नवीन काय??? Happy

कालच मोठेपणाने डिक्लेयर केलं मी शाणी होतेय... तर घरी नवर्‍याचा ओरडा खाल्ला. Sad कपाटाची चावी फिरवून, नेहमीच्या जागी आठवणीने लपवून ठेवली!!! कपाट लॉक न करताच Sad या शाण्या नवर्‍याने आधीच लॉक केलेलं मग चावी कशाला ठेवायची... मी सवयीने फिरवली नी ठेऊन दिली. माझी चूक काय???

शहाणपण देगा देवा (माझ्या नवर्‍याला... चावी न फिरवता तश्शीच ठेवण्याची! मी फिरवेन की... तश्शीपण चाव्या फिरवायला हातखंडा हाय की माझा :फिदी:)

वेंधळेपणा माझा समानार्थी शब्द असावा... पाचवीलाच पुजलाय जणू... विरासतसे मिला है लगता है... काय करणार, आमच्या मातोश्रींची रास बी मीनच!!! Happy

ड्रीमगर्ल,भुंगा,अक्षरी... अशक्य हसवलत.. जोरदार आहेत किस्से .. Rofl Rofl
अज्जून हसू थांबत नाहीये..

आज मी बसच नाव न बघताच ती बस मला जीथे जायचय तीथे जाणारी आहे अस समजुन त्यात चढले Proud विशेष म्हणजे त्या बसच्या बरोबर पुढे थांबलेल्या बस वरच नाव वाचुन ही माझ्या डोसक्यात प्रकाश पडला नाही कि मला जीथे जायचय तीथे हि बस जाते Uhoh मग काय पुढची बस निघुन गेली, २ मीनटांनी मी बसलेली बस निघाली पण मला सगळ कळे पर्यंत आणी मी तीकिट काढे पर्यंत मी बसलेली बस पुढच्या स्टॉप वर आलेली Happy

काल बशीत बसल्यावर गाणी एकायचा मुड झाला म्हणुन सेल काढला, ईयर फोन लावले पण आवाजच येईना म्हणुन व्हॉल्युम वाढवला तरी आवाज येईना मग व्हॉल्युम फुल्ल!!! केला पन काय उपेग न्हाय बघा. बसची घीरघीर तेवढी कानात जात व्हती, शेवटी वैतागुन म्हटल आपन पहिल्या ड्रायव्हर जवळच्या शीटावर आणी बशीची घीरघीर जोरात असल्याने गानी एकु येत नसत्याल (हे अस कधी झाल नव्हत बशीत) रेडीयो बंदच करु म्हनुन रेडीयो बंद करायला सेल ची बटन दाबली तर ध्यानी आल म्ह्या रेडीयो ऑनच नव्हता केला की Proud

रूमपार्टनरची पुण्याची मैत्रीण स्टेट बँकेची एक्झाम द्यायला मुंबईत आलेली. दादर सेंटर आलेलं. ट्रेनचा प्रवास जास्त जमायचा नाही आणि माझा जॉब दादरला! त्यामुळे तिला सुखरूप नेऊन सोडायची जवाबदारी आस्मादिकांवर! मी तिला धीर देतेय. अग्गं माझा रोजचा रस्ता. अज्जिबात गर्दी नस्ते... मै हूँ ना... व्यवस्थित नेईन तुला. वगैरे वगैरे.

मी तिला म्हटलं निवांत जाऊ या फास्ट ट्रेनच आहे. पण उगाच गोंधळ उडायला नको म्हणून अर्धा तास आधी घराबाहेर पडलो.

माझा तर पास होता दादर - मीरारोडचा (राहायचे अंधेरीला, पण होणार्‍या नवर्‍याला दर रविवारी भेटण्यात मजा असते ना... Happy हेआमाम हॉ :))

हा! तर तिला मे कुपन्स दिले पंच करून. आणि तेवढ्यात फास्ट ट्रेन येताना दिसली... नेहमीच्या जिन्याने न जाता जवळच्या जिन्याने प्लॅटफॉर्म गाठला... आणि गाडीत झोकून दिलं... चढता चढता जाणवलं गर्दी अज्जिबातच नैये... विरार-चर्चगेट सक्काळी ९ वाजता खाली??????? हे तर २७-११ ला पण नव्हतं घडलं... पण म्हटलं मरूंदे आपल्याला काय?? तिला म्हटले पण "मस्त ना चढायला मिळालं गर्दी नाहीच्चे..."
ती म्हणाली "फास्ट आहे ना खूप.. आत्ताशी गोरेगाव जातंय कित्ती वेळ लागेल?"

गोरेगाव... माझ्या पायाखालचा फूटबोर्ड सरकला...! स्ट्रीप डान्सरसारखी बारला लोंबकळून डोकावले... बटाट्या डोळ्ञांसमोरून स्टेशन्स झप्पाझप्प सरकत होते... मालाड, कांदिवली.. च्यायला उल्टी दिशा पकडली. जिना उल्टा पकडला ना... लेफ्ट राईटचा झोल... एरवी खाता हात तोंडाकडे नेऊन बघते.. (नाय दुसरा आपूआप कळतो एक कळला की Happy ) आज धावण्याच्या नादात हात बघितलाच नाही नायतर भलताच गोंधळ घालून बसले असते...

हिला बोल्लेच नाही, नाहीतर कल्ला करायची... बोरीवलीला उतरल्यावर तिला म्हटलं "चल आपण उल्टीकडे आलोय आत्ता बरोबर ट्रेन पकडूया..." हिने प्लॅटफॉर्मवरच कल्ला केला.. "आत्त्ताSSS टिसी पकडेल ना...." आजूबाजूच्या नजरा धावपळीच्या वेळात वेळ काढून आमच्या कडे वळल्या... मी म्ह्टलं "बाई ओरडू नको पळ... ट्रेन मध्ये चढल्यावर कोण चेक नाय करत." ती तय्य्यारच नव्हती. फर्स्ट क्लासचं तिकीट काढते वर हटून बसलेली. "आग्गं बाई इथलं पब्ल्लीक, पास संपलेला विसरून टिसीलाच टफ नी तुच्छ कटाक्ष कसं देऊन जातं" याचं प्रवचन द्यायची अनावर इच्छा टाळली आणि माझ्या स्वभावाला न झेपणारी समयसूचकता केली. तिच्या हाताला धरून धावताना आठवलं अर्रे हिला कूपन दिलंय त्यावर स्टार्ट स्टेशन आहे. दादर वा बोरीवली सेमच कॉस्ट लागते. हुश्श!!!

मी धावण्याचा स्पीड मंदावला. राणी सारखी चालायला लागले. ती मात्र जमत नसतानाही धावायचा निष्फळ प्रयत्न करतेय... (मुंबईची धावपळ बिचारीला कशी झेपणार!!!) बरोब्बर ट्रेन पकडली... दोनदा बोर्ड बघीतला. आतल्या ४ चौघींना विचारून खात्री करून घेतली... शेवटी हुश्श पोचलो बाई एकदाचं दादरला!

नंतर पुन्हा आलेली मुंबईला तेव्हा म्हणाली, "पत्ता सांग माझी मीच शोधेन तू कशाला त्रास करून घेतेस!!!" (मनात म्हणत असेल माझ्या नी स्वतःच्या दोन दोन प्रवासांचा!!! :अओ:)

<<मग काय पुढची बस निघुन गेली, २ मीनटांनी मी बसलेली बस निघाली>>
समु डायवरला सांगाचं : उस बस का पीछा करो Lol

ड्रिमगर्ल ड्रिमगर्ल
वेंधळेपणाची क्वीन , ड्रिमगर्ल Happy

ड्रीमगर्ल आणि समु मध्ये जोरदार मुकाबला....
कोण पटकावणार वेंकु चषक????
बाफवर लक्ष ठेवा....
ज्यांना वाटत असेल ड्रीमगर्ल अधिक वेंधळी आहे त्यांनी एसेमेस करा DRM अथवा SMU आणि पाठवा ७६७६ या नंबरवर...
भाग्यवान विजेत्यांना या दोघींबरोबर बशीने किंवा लोकलने प्रवास करण्याची संधी...त्वरा करा Happy

आशु सही:)

आशु, ड्रिमगर्लला जाऊ देत खीताब माझ्या कडे होता बरेच दिवस Happy
@ भरत "उस बस का पीछा करो" सांगे पर्यंत ती बस तीच्या वाटेने वळाली होती Happy

आजचा किस्सा, ऑफीसात आले, माझ क्युबिकल खाली आहे आणी हजेरी मस्टर्ड वरच्या मजल्यावर; अ‍ॅडमीन डिपार्टमेंट ला आहे. रोज आल की वर जाऊन सही करुन यावी लागते त्या प्रमाणे वर गेले पण अ‍ॅडमीन बंद होत (बरेचदा मी सगळ्यांच्या आधी टाईमावर पोहचलेले असते) खाली आले.

पी. सी ऑन केला, ५-१० मी. परत वर गेले अ‍ॅडमीन बंदच परत खाली आले, बसले. मनात आल "आज असा दम लागल्या सारखा का होतोय, थोड सफोगेट पण होतय "आणी परत पी. सी. डोक घातल ज२-३ मी लक्षात आल मी तोंडाला पुणेरी स्टाईल मध्ये बांधलेला स्कार्फ (स्ट्रोल) काढलाच नव्हता आणी तशीच वर खाली करत होते आणी बसले होते Proud बर झाल कोणी आलेल नव्हत Happy

आशुचँप, सह्हीये. Biggrin Biggrin

हे हे हे ... समु तुझं हे असं भुताळी रूप बघून आलेले लोक्स ही मागच्यामागे सुंबाल्या करत असतील. आणि तुला वाटत राहिलं की आपण फारच लवकर आलोय.

समु आणि द्रिमगर्ल ...... अशक्य आहात रे बाबांनो........

देव तुमच्या रिस्पेक्टीव्ह नवर्‍यांना (समुच्या होणार्‍या / होईल त्या Proud ) अंगी बळ देवो..... सहनशीलता देवो..... Rofl

ड्रीमगर्ल, (काय योगायोग आहे. पी. सी वर पण 'ड्रीमगर्ल' गाणंच चालु आहे. )समू, तुम्हाला साष्टांग नमस्कार. हसून हसून पोटात दुखायला लागलं.
भरत Rofl
मामी Rofl
आशु Rofl

आज सकाळचा कळस, मी हॉस्टेल मधुन निघाले मला गेट मधुन बाहेर जाऊन डावी कडे जायच होत, माझ्या पुढे हॉस्टेल मधली एक मुलगी गेट मधुन निघाली ती ऊजवी कडे गेली, मी तीच्या मागे मागे तीच्या बद्दल विचार करत ऊजवी कडे Proud ७-८ पावल पुढे गेल्यावर लक्षात आल आपल्याला जायचय त्या दिशेला ही दुकाणं नाहीत मग परत मागे आले Proud (परत माघारी येतांना एकटीत हसत होते)

आमच्या हॉस्टेलचा आणी पुढे असलेल्या एका घराचा बाहेरचा लुक जरा सारखा आहे, बरेचदा त्या घराला हॉस्टेल समजुन मी पुढे जाते (हॉस्टेलच्या बिल्डींग शेजारुन) मग परत मागे येते Happy एकदा हॉस्टेल मधली एक मेट माझ्या बरोबर होती ती पहातच राहीली मी पुढे निघुन गेले ते, मग तीने आवाज दिल्यावर माझी ट्युब पेटली Proud

अरे हो काल ईथल्या पोस्ट वाचतांना dreamgirl च्या पोस्ट मधला रूमपार्टनरची शब्द मला रुनी पॉटर असा दिसला आणी माझ्या डोसक्यात एकदम विचार सरु, ड्रिमगर्ल कडे रुनी पॉटर ची मैत्रीण !!!! मग निट बघीतल/वाचल.

अनिल - एसेमेस करण्याची मुदत देऊन उपयोग काय...
वेंधळ्या लोकांचा बाफ आहे....
एसेमेस करतील, नाय करतील, दिलेल्या नंबरवरच करतील, मुदतीतच करतील कशाकशाचा म्हणून भरवसा नाही...

छे हा बाफ office hours मधे बॅन केला पाहीजे. साला दिसला की वाचायचा मोह टाळता येत नाही. आणि हसायचा तर नाहीच. बरे जास्त मर्‍हाठी पब्लिक नाहीये इथे. नाहीतर बॉसने मायबोली ची marketing executive म्हणुन मला आधी हाकलली असती. अर्थात मग मी १ हास्य क्लब काढुन हा बाफ तेथे वाचुन दाखवेन. (with copyright permissions)

सापडल एकदाच, काल चित्रपट धाग्या वर दिनेशदांच हे वाक्य "माझ्या नेहमीच्या सिडींच्या दुकानात मला आग्रह झाला म्हणून मी नॉक आउट ची सिडी घेतली." वाचतांना मी सिडींच्या शब्द सिंडीं च्याअसा वाचला आणी विचार करत होते हे सिंडींच दुकाण मा. बो. वर कुणाला माहित असेल Proud

समु तुझं हे असं भुताळी रूप बघून >>> खर सांगु, काल पासुन मला पण हे आठवुन आठवुन जाम हसु येतेय Happy

वर्षू ताइ मी बॅक आलेय पण वे.पणा जरा जास्तच होतोय म्हणुन ठरवलय निट वागायच Wink (ड्रिमगर्ल सारख शान्या-वाणी)

माझ वोट ड्रिमगर्ल ला आहे Happy

समू........ पुन्हा रतीब सुरू.......

ड्रीमगर्लने तुझ्या आसनाला चांगलेच हादरवलय........ इतक्या जोशमध्ये येऊन वेंपणा सुरू केलायस ते....

Pages