Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाइनच्या दुकानात पण टॉनिकच
वाइनच्या दुकानात पण टॉनिकच मिळत
समु.. आता वाईन शॉप मध्लं
समू तुझ्या वाईन शॉपच्या
समू तुझ्या वाईन शॉपच्या गंमतीवरून आठवलं....
आमचा एक क्लाएंट आहे..मायकेल परेरा.....त्याचं दारूचं दुकान आहे. फक्त विदेशी मिळते. माझा लेक(खूप लहान होता) बाबांबरोबर या दुकानावरून चालला होता...त्या आमच्या क्लाएंटने(मायकेलने) हाक मारली. बाप लेक दोघे गेले दुकानात. थोड्या गप्पा झाल्या.
घरी आल्यावर लेक मला म्हणतो, '' आई आज मायकेल अंकलच्या दुकानात गेलो होतो. त्यांचं दुकान नुसतं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शांपूच्या बाटल्यानी भरंलय."
कप्पाळ माझं!
समदे काय म्हणता ??? काल लई
समदे काय म्हणता ??? काल लई घाईत आले मा. बो. वर कसाबसा माझा वेपणा टाईपला आणी गेले, आज पान ९४ वरचे सगळ्यांचे वेपणा वाचले लई मजा आली कि
रिमा, अकु लगे रहो.
मानुषी लई भारी किस्सा
शुकरवार नंतर शनवारी पण म्ह्या वेपणा केलेला बर
म्हण्जी ते डिटेलाट अस:
सेल वर संध्याकाळच्या ५:१५ चा अलार्म सेट केला आहे , शनवारी मी बशीतुन ऊतरले नि अलार्म वाजायला लगला तो बंद करण्यासाठी सेल हातात नव्हता म्हणुन सगळी पर्स शोधुन काढली पण सेल सापडेना, (आजु बाजुचे लोक काय ईतक वाजतय अस बघत होते माझ्या कडे), परत पर्स शोधली तरी सेल मीळाला नाही वैतागल्या वर लक्षात आल सेल सन कोटच्या खीश्यात आहे
वर्षु , समे तू तुझ्या एरियात
वर्षु ,
समे तू तुझ्या एरियात फेम्यस असशील ना??????????? >>>> हे हे हे म्ह्या समदी कडच फेमश हाय बर
समु, तुझा आणि बशींचा कायतरी
समु, तुझा आणि बशींचा कायतरी जबरदस्त योग आहे बघ. त्याशिवाय असे ऋणानुबंध जुळून येत नाहीत. कदाचित मागच्या जन्मी तू पीएमटी असणार......
समुचा वेंक्यू बसच्या क्यू प्रमाणे वाढत राहो.
बरं सांगा बरं लोक्स ....
१. समुचा आवडता ऋतु कोणता?
उ. 'बस' अंत
२. समुचं आवडता हिंदी चित्रपट कोणता?
उ. अजि बस शुक्रीया.
३. समु ऑर्केस्ट्रा ऐकायला कधीच का जात नाही?
उ. कारण तिथे conductor असतो.
४. बसमधले लोक्स समुकडे का पहात होते?
उ. क्योंकी वो अ'केली' खा रही थी.
५. समु जेवण कशात जेवते?
उ. 'बशी'त.
६. समुच्या कुत्राचं नाव काय?
उ. बशीर
७. समु कोणाकडे का जात नाही?
उ. कारण दार उघडल्यावर सर्वजण म्हणतात, " ये, 'बस'"
८. समु बाईकवरून ऑफिसला का जात नाही?
उ. क्योंकी वो उसके 'बस' की बात नही है.
९. समुची आवडती राजकीय पार्टी कोणती?
उ. अर्थात, बसपा.
१०. एखाद दिवस बसनी गेली नाही तर समुला कसं वाटतं?
उ. एकदम (P)MT-(P)MT वाटतं.
११. समु किसीको दिल क्यों नही देती?
उ. क्योंकी उसका दिल उसके 'बस' में नही है.
१२. समुनं आत्मचरित्र लिहिलं तर त्याचं नाव काय असेल?
उ. 'समु'पूर्ण बसाख्यान.
समु,
घे गं.....
मामी........... तु अशक्य
मामी........... तु अशक्य आहेस..........
मामी, प्रणिपात....
मामी, प्रणिपात....
धन्स रे भुंग्या. समु दिवे
धन्स रे भुंग्या. समु दिवे घेईल अशी अपेक्षा करते.
लै भरी, मामी....
लै भरी, मामी....
मामी टू विटी
मामी
टू विटी 
पाकीटावर पोस्टल स्टँप ऐवजी
पाकीटावर पोस्टल स्टँप ऐवजी रेव्हेन्यु स्टँप चिटकवले.
मी रोज हापिसात एकदातरी हमखास
मी रोज हापिसात एकदातरी हमखास माउस समजुन मोबाईल हलवुन बघते.. आजचा नवीन वेंपणा म्हणजे फक्त त्यात चहाच मग होता.

कामचा आणो माबोचा विपरित परिणाम
आमच्या हापिसाला नवीन
आमच्या हापिसाला नवीन कंस्ट्रक्शन असल्याने अजून मोठा दरवाजा बसवला नव्ह्ता. अनेक दिवस तशीच परिस्थिती होती.
एकदा सकाळी सवयीने वेगात जिने चढून आलो आणि तसंच पुढे वेगात चालत जाऊ लागलो तर काचेच्या दारावर जोरात आदळलो. १५ मिनिटं नाक चोळत बसलो होतो.
काल मोबाईल चार्ज करायचा होता.
काल मोबाईल चार्ज करायचा होता. टेबलावर दोन चार्जर शेजारी शेजारी वायरीत वायरी गुंतून पहुडले होते. त्यांच्या आजूबाजूचे सामान दूर न करताच एक चार्जर मी प्लग पॉईन्ट ला लावून ऑन केला आणि वेंधळेपणाने मोबाईलमध्ये पिन मात्र दुसर्या चार्जरची घातली!!! तर, बराच वेळ आपला मोबाईल चार्ज का होत नाहीए, वीज आहे ना, चार्जर ठीक आहे ना याची खात्री करत होते. मग निष्कर्ष काढला की हा चार्जर बिघडला बहुतेक. दुसर्या चार्जरला प्लग पॉईन्टला लावले आणि त्याचे दुसरे टोक धुंडाळू लागले. तर ते टोक अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये विराजमान होते! झाला ना गोंधळ? फुक्कट माझा वेळ वाया गेला, मोबाईल चार्ज व्हायचा राहिला आणि विजेचाही अपव्यय! काय ते घोर पाप....
अकु,मंदार्,माबोकर,रुपाली नाक
अकु,मंदार्,माबोकर,रुपाली
कि तिच्याव्यतिरिक्त और किसकी हिम्मत है नाक पे ठोसा लगाने की 
नाक ठीकाये ना मंद्या?? नाहीतर बायकोला संशय यायचा
आज हाटेलात रवा इड्ली ऑर्डर
आज हाटेलात रवा इड्ली ऑर्डर करताना चुकून एक इड्ली रवा द्या म्हण्ले. घोर उन्हातून एकदम एसीत घुसल्याने तशीच भंजाळले होते त्यात ताप खोकल्याने डोके बधीर झाले आहे. मग करेक्ट ऑर्डर देऊन बसलेल्या घशाने हसत बसले. वेटर ने लगेच सर्वीस दिली मला लवकर घालवायला बहुतेक.
मामी..................अब बस
मामी..................अब बस भी करो समूख्यान!
खूप हसले.
मामी..................अब बस
मामी..................अब बस भी करो समूख्यान!
खूप हसले. >>>>>>>>>>>>>>>>
मानुषी, अब ये मेरे बस मे ही नही है तो मै क्या करू??
अजून सुचलं :
१३. समु न्याहारीला काय खाते?
उ. 'बशी'त 'शिरा'.
१४. समु ऑफिसात कशी बसते?
उ. 'बस'कण मारून.
मामी.............अगदी सुटलीयस
मामी.............अगदी सुटलीयस हं(म्हणजे मामीची बस जोरात सुटलीये!!!!!!!!!!!!)........नॉट लिसनिंग!
कालचीच गोष्ट.... आमच्या
कालचीच गोष्ट....
आमच्या हेडऑफीसवरून फायनान्स कंट्रोलरने एक एक्सेल स्प्रेडशीट पाठवले होते. २०११ चं बिझिनेस प्रोजेक्शन ! प्रचंड मोठी फाईल होती[जवळपास १० एमबी] त्यात त्याने प्रचंड मेहनत घेवून त्याचे एक्सेलचे सगळे ज्ञान वापरून गेल्या तीन वर्षाचा सेल्स डेटा आणि २०११ चे प्रोजेक्शन असा एकंदर चार वर्षाचा रिपोर्ट तयार करुन पाठवला होता. मला त्यात फक्त २०११ साठी माझे इनपुट द्यायचे होते. त्यासाधी त्याने ते स्प्रेडशीट, त्यातले फॉर्मुले कसे वापरायचे ते थोडी उदाहरणे देवून सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे (मी माझ्या नेहमीच्या सवयीने त्याच्या स्प्रेडशीटवरच) सगळे प्रयोग केले. नंतर त्याचे ऑनलाईन ट्रेनिंग संपल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे (फिशाल, ख्लोज दा शीट विदाऊट सेव्हिंग चेंजेस) बंद केली.
यानंतर पुन्हा माझे इनपुट्स एंटर करण्यासाठी मेलमधुन तीच फाईल ओपन केली. यावेळेस इमानदारीत लॅपटॉपवर स्टोर केली आणि मग उघडली...
च्यामारी, मघाशी २०११ चं प्रोजेक्शन ८००,००० युरो दाखवत होतं, आता फक्त ८४,००० युरो कसं काय दाखवतय? मला पक्कं आठवत होतं मी फाईल सेव्ह न करता क्लोज केली होती. मग हे चेंजेस कसे काय झाले. पुन्हा त्याला अजुन एकदा ती फाईल पाठवायला सांगायचीही लाज वाटायला लागली. कारण मघाशीच गेरार्डने सर्टिफिकेट दिलं होतं... Fishal, you are a very good student ! दोन तास त्यात घालवल्यानंतर लाज सोडली आणि मुळ फाईल परत मागवून घेतली. आणि हवे ते चेंजेस करुन पाठवून दिली....
नंतर घोळ लक्षात आला...
इथेही पुन्हा सवयच नडली. घरी कायम लाईटची समस्या असल्याने चार ओळी टाईप केल्या की ALT + F + S ची सवय लागलेली. त्यानुसार आपोआपच माझ्याही नकळत केलेले चेंजेस सेव्ह होत गेले होते.
मामी, अमा साष्टांग नमस्कार
मामी, अमा साष्टांग नमस्कार
असं होतं बरं फिशाल. ग्रह
असं होतं बरं फिशाल. ग्रह वैट्ट असले कि असं होतं.
मला एक एक्स्टेन्शन कॉर्ड हवी होती घरात. जंगी शोधली पण सापडेना. मग मावशींना विचारले शोधून ठेवा म्हणून. संध्याकाळी त्या म्हणे अहो इथेच आहे कि. पाहिले तर समोर मोडेम व रूटर लावून नीट ठेवलेली.
नेट म्हणजे घराचा जीव कि प्राण. समोर असलेली कॉर्ड आठ दिवस शोधली.
समोर असलेली कॉर्ड आठ दिवस
समोर असलेली कॉर्ड आठ दिवस शोधली.>>>>
हे म्हणजे कपाळावरचा चष्मा घरभर शोधणार्या गुंड्याभाऊ सारखं झालं.
माझ्या बाबतीत तर हे नेहमी होतं. मी कुणाशीतरी मोबाईवर बोलत असतो, मध्येच आठवण आली की डाव्या हाताने कंबरेला लावलेलं मोबाईलचं पाऊच चाचपतो, ते रिकामं लागलं की क्षणभर कावरा-बावरा होतो, ज्याच्याशी बोलत असतो त्याला क्षणभर थांबायला सांगून उभा असेन तर खिसे आणि ऑफीसमध्ये डेस्कवर असेन तर ड्रॉवर तपासायला लागतो.
विश्ल्या फोनचं म्हंटलं तर
विश्ल्या फोनचं म्हंटलं तर मोबाईल कानाला लावुन चक्क १५-२० मि घरभर शोधलं. वर बोलणाराल्याच दम देण कि थोडं थांब बे, मोबाईल शोधुदे... लॅंड लाईन वरुन मिसकॉल तरी द्यावा म्हणुन रिसिव्हर कानाला लावला तेव्हा कळ्ळं की मोबाईलवरच बोलतोय.
सर्वे एका माळेचे मणी. आपण
सर्वे एका माळेचे मणी. आपण डोंगरावरच बरे असतो नाय का?
माबो वरचे मोबा किस्से लै
माबो वरचे मोबा किस्से लै फेमस!!!!

<<<<आपण डोंगरावरच बरे असतो
<<<<आपण डोंगरावरच बरे असतो नाय का?>>>>>>
म्हणुनच मी कायम झाडाच्या फांदीवर बसलेला असतो. आपल्या लेवलचं काही दिसलं की पटदिशी झडप टाकतो आणि पुन्हा फांदीवर चढून बसतो....
अश्विने,विशाल,मल्ली.. नुस्तं
अश्विने,विशाल,मल्ली.. नुस्तं
:हहगलो;

आजपर्यन्त फक्त कपाळावरचा चश्मा शोधणारे माहित होते... कानाला लावलेला मोबाईल शोधणारे म्हंजे..
__/\__
__/\__
Pages