लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.>>
मी काम करायला तयार आहे रे.. असही शनिवार रविवार मला सुट्टी असते...
बघं मी जर काही कामाला आलो तर..........

सध्याच्या काळात अगदी योग्य विचार. पण HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे. त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.

अतिशय चांगली कल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जनजागृती आपण कितीवेळा ऐकतो. पण खरच सगळ्या गोष्टी अमलात येतातच अस नाही.
पण स्वतःपासुन सुरवात या अनुशंगाने खरच लग्नापुर्वी एच आय व्ही टेस्ट बंधनकारक करावी. कित्येक निष्पाप जीव वाचतिल यामुळे.
पण परत पुढचे प्रश्न आहेतच
१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??

पण हे ही नसे थोडके या उक्तीवरुन ही टेस्ट बंधनकारक करावी हे माझ मत.

अतिशय योग्य विचार. सुशिक्षित तरी योग्य खबरदारी घेतीलच पण कायदा केला तर अशिक्षितांमधे सुद्धा ह्या विषयाबद्दलची जागरूकता येईल.

HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो... आणि त्यानंतर केलेल्या टेस्टचे रिझल्ट्स निगेटिव्ह आले तरच HIV infection झाले नाहिये असं म्हणता येते..
परंतु या बाबतीत ethics चा प्रश्न येतो... रुग्णाच्या परवानगी शिवाय टेस्टचे रिझल्ट्स कोनालाही सांगितले जात नाहित सध्यातरी....

बरोबर आहे परंतु ती गरज निर्माण का होते आहे
याक्डेच लक्ष दिले तर याची गरज उरणार नाही

चांगली संकल्पना आहे... अर्थात शुभांगी म्हणते त्याही शक्यता नाकारता येत नाहीत!!
बरं, शेवटी सगळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतात असं नाही. अशा लोकांसाठी दुसरी तरतूद करता आली तर?

त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.>>> त्याना तो अपमान वाटू नये इतपत त्याची योग्यता बिंबवणे हेच तर आपल्यासारख्यांचे काम आहे.

१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??

>>>> या गोष्टींची खबरदारी घेण्यासाठीच एका विश्वसणीय मध्यस्थाची आवश्यकता आहे. कुणीही स्वतःहून हे करुया म्हणनार नाही पण मध्यस्त असेल तर गोष्टी सोप्या होतील. लग्नाळूंना पुर्वकल्पना दिली जाऊ शकते. लग्न ठरते आहे हे समजताच कामाला सुरूवात होईल. शेजार्‍यांना सांगा, पाहुण्यांना सांगा, कंपनीत सांगा. तुम्ही बोलून पहा लोक हे स्विकारतील फक्त कुणीतरी सांगणारा हवा. समजाऊन देणारा हवा.

हबा,

संपुर्ण पाठींबा या विचाराला. फक्त एकच वाटते की याबाबतीत आधी जनजागृती(विशेषतः ग्रामीण भागात) आणि इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः नि:स्पृह/त्रयस्थ तपासणी केंद्र हे आधी व्हायला हवे. (जर तिथेही काँप्रोमाईझ्ड रीपोर्ट्स मिळणार असतील तर मात्र हे नुसते रद्दीभरणे होईल).

बरं, शेवटी सगळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतात असं नाही. अशा लोकांसाठी दुसरी तरतूद करता आली तर?
>>> त्यावरही विचार करुया. शक्यता मांडा. पण नाव बदलण्यासाठी व इतर बर्‍याच कामासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागतेच.

टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे असे मलाही वाटते पण वर चिमुरीने लिहिलेय ते मीही ब-याच ठिकाणी वाचलेय. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही असे वाटते.
provided there is no HIV incidence in this period हे महत्वाचे आहे पण याची खात्री कोण देणार?

बरोबर आहे परंतु ती गरज निर्माण का होते आहे
>>>> काळ बदलला आहे. आता विवाह बाह्य संबंध, विवाह पूर्व संबंध, लिव्ह इन रिलेशन्शिप्स ह्या गोष्टी निषिद्ध राहिल्या नाहियेत. पुर्वीही होत्या पण समाजाची भीड आणि स्वतःच्या मनाची लाज हा प्रकार जास्त प्रमाणात अस्तित्वात होता. आता समाजाशी काही देणंघेणं नसतंच आणि ही गोष्ट लाजिरवाणी वाटणं कमी झालं आहे, उलट पुरस्कारच होतो आहे. असुरक्षित आणि एकापेक्षा अनेकांशी संबंध येणे हे मुख्य कारण आहे.

.

(जर तिथेही काँप्रोमाईझ्ड रीपोर्ट्स मिळणार असतील तर मात्र हे नुसते रद्दीभरणे होईल).
>>> तिथे आपण उभा राहू शकतो. वेळ आणि कामाची इच्छा असणारे बरेच अनुभवी लोक असतात.

मला मदत करायला आवडेल..>>> धन्यवाद भाविका.

असा थोडासा वेळ (जो मिळेल तो) देऊ शकणार्‍या लोकांनी कृपया काम करण्यास तयार आहे असे सुचवावे. मी पुढच्या काही गोष्टी तुमच्या विपूत टाकेन.

HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो..लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही
HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे>>>>>>>>>>>

ही दोन परस्पर विरोधी विधानं आहेत. जर तो रिपोर्ट कमी वेळासाठी वॅलिड असेल तर ३-६ महिन्याच्या आधीचा रिपोर्ट घेण्याइतपत वेळ असतो का? काही लग्न अगदी झट मंगनी पट ब्याह तत्त्वावर होतात.. काही काही लग्न नवरामुलगा अगदी एका आठवड्यासाठी भारतात येणार आहे तेवढ्यात लग्न उरकून घेऊ अशी असतात.. मग हे कसं जमायचं? अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?

हो टेस्ट दोनदा करावी लागेल. (विंडो पिरियड लक्षात घेऊन.) आणि दुसर्‍या टेस्ट नंतर ती व्यक्ती कायम नजरेखाली ठेवावी लागेल.>>> पहिल्या टेस्टनंतरपासुनच ती व्यक्ती (दोन्ही व्यक्ती, मुलगा आणि मुलगी) नजरेखाली ठेवावे लागतील

ते सर्टीफिकेटही कितपत विश्वासार्ह आहे, ते बघावे लागेल.>>> सध्यातरी HIV test चे reports काहीही फेरफार न करता मिळत आहेत... पण जर हे बंधनकारक केलं गेलं तर मात्र त्यात फेरफार होवु लागतील

हो टेस्ट दोनदा करावी लागेल. (विंडो पिरियड लक्षात घेऊन.) आणि दुसर्‍या टेस्ट नंतर ती व्यक्ती कायम नजरेखाली ठेवावी लागेल.
ते सर्टीफिकेटही कितपत विश्वासार्ह आहे, ते बघावे लागेल.>>>

दिनेशदा, प्रश्न लग्नावेळी फसविल्या जाणार्‍या मुलिंचा व मुलांचा आहे. माझी वैशाली शिंदे नावाची एक मैत्रीणही तिची फसवणूक झाल्यानंतर झिजलेला देह घेऊन महाराष्ट्रभर याविषयीची व्याख्याने देत फिरते आहे. तिचा सासरा शिक्षक होता सासूसी शिक्षिका होती मुलाचा आजार माहिती होता पण त्याच्या सुखाचा विचार करून त्यानी तिला फसवल. हे तरी टळेल.

तश्या शंका बर्‍याच असतात हो पण शेकडो चुकिच्या रिपोर्ट मधे एखादा बरोबर दिला जाईलच की त्यातही आपल्या कामाचं समाधान मिळेल. तुमच्या मतांचं स्वागत आहे पण मला कामाच्या आधी अडचणींची चर्चा........

पण जर हे बंधनकारक केलं गेलं तर मात्र त्यात फेरफार होवु लागतील

कायद्याने केले तर होणारच. आणि असा कायदा करायला पुढचे शतक उजाडेल.

तसे न करता लग्न ठरवतानाच आमची मुला/मुलीची आम्ही hiv टेस्ट करुन तुम्हाला रिपोर्ट दाखवणार, तुम्हीही तुमच्या मुला/मुलीची करुन आम्हाला रिपोर्ट द्या अशी भुमिका घेणे आवश्यक आहे.

झट मंगनी वाल्यांचे काय करणार ???? Happy

अश्यांसाठी काही उपाय आहे का?>>> अश्या वेळेस false negative ची शक्यता जास्त असते (म्हणजे HIV infected असतानाही टेस्ट निगेटिव्ह येने).. १/२ तासात HIV psitive/negative कळु शकेल अश्याही टेस्ट आहेत, पण या confirmatory tests नसतात..

टेस्ट positive येते म्हणजे hiv infection नंतर ज्या antibody शरीरात तयार होतात त्या डिटेक्ट केल्या जातात.. या antibody तयार व्हायलाच ३-६ महिने लागतात.. म्हणुनच window period महत्वाचा असतो..

अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?
>>> पुढच्या वर्षी लग्न करायचे आहे हे तर माहिती असतेच ना. त्या दरम्यान ठराविक कालावधीत तपासणी करा.

आणि हे जरी शक्य नसलं आणि बर्‍याच अडचणी असल्या तरी त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?

सासरा शिक्षक होता सासूसी शिक्षिका होती मुलाचा आजार माहिती होता पण त्याच्या सुखाचा विचार करून त्यानी तिला फसवल
काय नालायक लोक आहेत, ज्याने आधीच त्याला हवे ते केलेय त्याच्या सुखासाठी दुस-या जीवाला दु:खात लोटणारे हे लोक, कलंक आहेत .......

अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात ह. बा.,

शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये परंतु खरी गरज ग्रामीण भारतात(सुरुवात महाराष्ट्रापासून करायला हरकत नाही) आहे जिथे ह्या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारची उदासिनता भरलेली आहे.

मुळात काही काही ठिकाणी अजून मुलीचे लग्न १८ व्या आणि मुलाचे लग्न २१ व्या वर्षी करण्याचा कायदा(?) अंमलात आणला जात नाहीये, तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही....

ह्यावर विचार करता आला तर पाहूया!!

धन्यवाद!!

माझी वैशाली शिंदे नावाची एक मैत्रीणही तिची फसवणूक झाल्यानंतर झिजलेला देह घेऊन महाराष्ट्रभर याविषयीची व्याख्याने देत फिरते आहे. तिचा सासरा शिक्षक होता सासूसी शिक्षिका होती मुलाचा आजार माहिती होता पण त्याच्या सुखाचा विचार करून त्यानी तिला फसवल. >>> Sad Angry असल्या आईबापांना थोबडवलं पाहिजे बेंड बाहेर आल्यानंतर. बिचार्‍या दुसर्‍या जीवाला उध्वस्त करण्याचा यांना काय अधिकार? मध्यंतरी लिलावतीमध्ये एका नातेवाईकाला बघायला गेले होते. तिथे एक ब्रेनमधे इन्फेक्शन झालेला दुसरा पेशंट सिरियस होता. त्याची बायको दिवस रात्र त्याच्या सेवेत होती. मुलांची १०वी वगैरेची महत्वाची परिक्षा चालू होती. त्या माणसाने बायकोशी नियमित प्रतारणा केलेली होती आणि त्याला HIV जडला होता. इम्युनिटी कमी असल्याने मेनेंजायटीस, टीबी वगैरेही झाला होता. तीच प्रतारणा केली गेलेली बायको नक्की कुठल्या मनस्थितीत त्याची सेवा करत होती कुणास ठाऊक?

असा कायदा करायला पुढचे शतक उजाडेल.>>> येत्या विस वर्षाच्या आत हे होईल. ही भविष्यवाणी नव्हे लोकांचे बदलते विचार आणि एकुण जीवनमान बघता अगदी विश्वासाने असे म्हणता येईल. हा माझा विश्वास आहे.

तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही.... >>> येस विजयदा. अवघड नाही. आपल्यासारख्या अनुभवी मेंदूचा वापरच पुरेसा आहे. सगळ्याच मायबापाना वाटतय की पोरीचं/पोराच कल्याण व्हावं पण तोंड उघडायचं कुणी हा सवाल आहे त्याचा जवाब देणारे माबोकर त्याना भेटले की झालं... यकदम सोप्प आहे....

Pages