लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

अश्विनी के, ठाणे सिव्हिलच्या ART सेंटरलाच जाणार आहोत. बाळ देखरेखीखाली निरोगी जन्मते हे मान्य केले तरी त्याचे आईवडील त्याचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत तरी त्याच्यासोबत असतील ना? स्वतःच्या भावाविषयी हे लिहताना खुप त्रास होतोय पण प्रॅक्टीकली विचार केला तर....

वहिनीच्या पहिल्या नवर्‍यापासुन झालेल्या मुलाला माझ्या आईने अजुनही स्विकारले नाही. जवळच रहात असल्यामुळे तो आईच्या घरी जातो (तेही भावासोबत लग्नानंतर १ वर्षांनंतर) पण थोड्यावेळासाठी वैगरे. आधीच एका लहानग्याची परवड बघते अजुन यापुढे भावाच्या मुलाची मी नाही पाहु शकणार.

निल्सन, हे सगळं पचवणं खरंच खूप कठीण आहे. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. या सगळ्या समस्यांमधून नक्कीच चांगला आणि योग्य मार्ग निघेल. काळजी घ्या.

निल्सन, वेस्ट्र्न ब्लॉट्/पीसीआर या टेस्ट स्वस्तात्/मोफत कुठलेच सरकारी हॉस्पिटल शक्यतो करत नाही.
तुमच्या वहिनीची सी डी फोर टेस्ट ए आर टी सेंटरला फुकटात होईल.
बाळाला त्रास होऊ नये म्हणून औषधे आणि उपचारही मिळतील.
हल्ली सी डी फोर काऊंटवर आधारित पी पी टी सी टी देत असल्याने आईकडून मुलाला होणारा एच आय व्ही ट्रान्समिशनचा धोका बराच कमी आहे.
तुमच्या भावाकरिता जर तुम्ही वेस्टर्न ब्लॉट करू शकत नसाल तर-
१. सरकारी हॉस्पिटलातील व्ही सी टी सी केंद्रात एच आय व्ही टेस्ट करवून घ्या.
२. ३ महिने एक्सपोजर टाळायला सांगा (यू नो व्हॉट आय मीन)
३. ३ महिन्यांनी रिपीट करा.

या उप्पर मूल होऊ द्यावे की नाही, मूल झाल्यावर ते मोठे होईपर्यंत पॅरेंटस राहतील का इत्यादी गोष्टींचा विचार पर्सनली त्या जोडप्याने स्वतः करायला हवा. त्यात तुम्ही जास्त इंटरफेअर करू नये असे वाटते.

अँटीबॉडी पॉझिटिव आल्यावर अमुक व्यक्ती अमुक वर्षेच जगेल असे प्रेडीक्शन कुणीही करू शकत नाही.

३) वहिनीने पोटातील बाळ वाढवावे की नाही? ( याबाबतीत हेल्पलाईनवाल्याने बाळाच्या संरक्षणासाठी ए आर टी सेंटर मधुन गोळ्या दिल्या जातील असे सांगितले आहे पण डॉ. गायकवाड यांच्या म्हणण्याप्रमाणे शक्यता ५०% एवढीच आहे) >> Sad ट्रीटमेंट घेत असताना हल्ली १% इतके कमी मदर-चाईल्ड ट्रान्स्मिशन होते. अशी माहिती का देतात डॉक्टर?? बाळाला जन्माच्या नंतर पहिल्या १२ तासात आणि नंतर ४ महिने ट्रीटमेंट द्यावी लागते. बाळ ६ महिन्याचे झाले की तपासण्या करून ट्रीटमेंट थांबवता ही येते.
ट्रीटमेंट घेतली नाही तर बाळाला ट्रान्स्मिशनची शक्यता ४५-५०% आहे.

निल्सन, हे सगळं पचवणं खरंच खूप कठीण आहे. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. या सगळ्या समस्यांमधून नक्कीच चांगला आणि योग्य मार्ग निघेल. काळजी घ्या. >> +१
निल्सन, तुमच्या वहिनीसाठी खूप वाईट वाटतंय. तिची काही चूक नसताना तिला तिच्या आधीच्या नवर्‍याकडून हा आजार मिळाला, आता तो नवर्‍याला आणि बाळाला जाण्याचा धोका. आधीचं मिसकॅरेज, आता हवी असलेली प्रेगनन्सी आणि त्यात अशी बातमी. किती हतबल वाटत असेल. ह्या सगळ्यात तिची काळजी घ्या. तिला अपराधी वाटून देऊ नका. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

Sati, mahitibaddal dhanyad

Udya civil hospital la jatoy baghu kay hotay te. Baki Sangal lakshat theven

वर निल्सन यांनी जे लिहिलेय ते वाचुन एक प्रश्न मनात आला, इथल्या डॉक्टर मंडळींचे मत वाचायला आवडेल.

लग्नानंतर २-३ वर्षात नवरा गेला आणि दोन वर्षांपुर्वी मुलगा ८ वर्षांचा होता म्हणजे ह्या दोन वर्षांपुर्वी स्त्रीला एड्स संसर्गाची शक्यता मावळुन कमीत कमी ५ वर्षे तरी झाली होती आणि आज ७. तिच्या रक्तात जर आज विषाणु सापडत आहेत तर ते इतकी वर्षे डॉर्मंट अवस्थेत तिच्यात होते असा याचा अर्थ होतो. अर्थात एड्स संसर्गाच्या इतर शक्यता मी विचारात घेत नाहीये. ती इतकी वर्षे शारिरिकरित्या सुस्थितीत होती/आहे असे निल्सनने लिहिलेय. जर हे गर्भारपण आले नसते तर कदाचित चेक केलेही नसते, म्हणजेच विषाणु शरीरात आहेत हे कळलेच नसते.

म्हणजे हे विषाणू शरीरात असे राहु शकतात? काही लोक जसे रोगांचे कॅरिअर असतात, त्यांना प्रत्यक्ष त्रास काही होत नाही तसेच एड्सचेही आहे असे म्हणावे काय? अशा केसेस इतरत्र पण आढळलेल्या आहेत काय?

साधना, निल्सन यांनी लिहिलेल्या केसमध्ये त्या स्त्रीने नवरा वारल्यावर काही महिन्यांतच (कदाचित १-२ ) एच आय व्ही टेस्ट केली.
ती निगेटीव्ह होती.
त्यानंतर इतक्या वर्षांनी त्या स्त्रीचे पुन्हा लग्न झाले तेव्हा त्यांनी पुन्हा टेस्ट केली नाही.
उलट आता तिची तब्येत पूर्वीपेक्षा बरी दिसते म्हणजे आजार नसेल असे गृहित धरलेले आहे.

एच आय व्ही रक्तात डॉर्मंट रहाणे म्हणजे एडसची बाह्य लक्षणे न दिसणे, सी डी फोर काऊंट कमी न होणे याचा कालावधी यक्तीगणिक बदलतो.
पण काही स्पेसिफिक इम्युनोडेफिशीयंसि नसेल (जे अतिशय रेअर आहे) तर एच आय वी च्या अँटीबॉडीज रक्तात ३-४ महिन्यात तयार होतातच.

या केसमध्ये इग्नोरन्समुळे आणि अपुर्‍या माहितीअभावी नुकसान झालेले आहे.
निल्सन यांनीही त्या बाईंच्या दुसर्‍या लग्नानंतर दोन महिन्यांनी सल्ला विचारला होता असे दिसते.
(हा धागा मी वाचला नव्हता वाटतं पूर्वी)
त्यांना इथे मिळालेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी केले नाही यातली चूक त्यांनी स्वतःच मान्य केलेली आहे.

साती, पण मग पेशंटच्या टेस्ट रिपोर्टवर निगेटिव्ह रिझल्ट असतानाही एक महिन्याने वगैरे पुन्हा टेस्ट करुन घ्यावी असा सल्ला छापलेला असतो त्याचं काय? ३-४ महिन्यांनीही अ‍ॅन्टीबॉडीज तयार असतील तर एक महिन्यानंतर टेस्ट करुनही रिपोर्ट फसवा येवू शकतो ना?

एक केस बघितली होती. त्या माणसाला दर २-३ महिन्यांनी असं गेले ६ महिने लूज मोशन्स होत होते. तो माझ्या टेबलवर हातात रिपोर्ट घेवून आला होता तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता आणि १ महिन्याने पुन्हा टेस्ट करायला सांगितली होत पण त्याने केली नव्हती. त्याचा एक महिना उलटून दोन महिने होत आले होते आणि परत लूज मोशन्स झाल्याने तो घाबराघुबरा होवून आला होता. ६ महिन्यापासून होणारा त्रास आणि दीड महिन्यापुर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट बघून त्याच्या त्रासाचं दुसरं काही कारण असेल असं वाटून गेलं होतं. पण इतका घाबरुन गळपटला असल्याने त्याला धीर देण्यासाठी हा हिशेब घालून "कदाचित तुम्हाला काही झालं नसेलही" असं सांगून टेस्ट करुन घेण्यासाठी ह्यासाठीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वेगळ्या लॅबकडे पाठवलं आणि रिपोर्ट काढून ART कक्षाकडे जायचा सल्ला दिला.

निल्सन, देव करो आणि ह्या दिव्यातून तुमची वहिनी आणि भाऊ सहिसलामत बाहेर पडोत. त्यांची चूक काहीही नसताना फुकटचं टेन्शन झालंय त्यांना.

हम्म, म्हणजे इतकी वर्षे विषाणू राहू शकणार नाहीत तर. म्हणजे मी ज्या इतर शक्यता विचारात घेतल्या नाही लिहिले त्यातली कुठलीतरी शक्यता खरी असण्याची शक्यता आहे.

मी हा प्रश्न खरेतर विचारणार नव्हते कारण याचे उत्तर निलसनला कदाचित आवडणार नाही असे वाटले. तरीही विचारला कारण हा धागा आज दोन वर्षाने परत वाचला जातोय तसाच अजून काही वर्षांनीही वाचला जाईल आणि तेव्हा आजचे प्रतिसाद वाचून गैरसमज होऊ शकेल कि एड्सने मरण पावलेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला, जरी तेव्हा एड्स डिटेक्त झाला नाही तरी तो नंतर आयुष्यात कधीही डिटेकट व्हायचा धोका राहतो.

आताच गुगलून पाहिलं, त्यात एका ठिकाणी वाचले विषाणू असा डॉरमन्त राहू शकतो पण तो स्वतःला रेप्रोड्युस करत राहील, इंम्युन सिस्टिम अँटोबॉडीज develop करत राहील आणि ह्या अँटोबॉडीज एलिसा टेस्ट मध्ये दिसतील.

म्हणजे जर लग्नाआधी हि टेस्ट केली असती तर कदाचित कळले असते.

निलसन, तुम्हाला मनस्ताप दिल्याबद्दल माफ करा हि विनंती.

मी एका एच आयवी कार्यक्रमात एकलेले एका डॉचे भाषण,

त्यात त्याने म्हटलेले की एड्स विषाणू डॉरमंट राहू शकतो. असे रोगी कॅरीअर म्हणून रहातात. त्यांच्याकडे चिन्ह अशी लगेच नाही दिसत. काही स्पेसीफिक टेस्ट करूनच कळते की कॅरीअर प्रोफाईल आहे. आणि त्याच साठी रोग्याच्या साथीदाराने, तीन महिन्याच्या काळात टेस्ट रीपीट करत वर्षभर कराव्या(एकूण ४ वेळा टेस्ट तीन महिन्याच्या गॅपने) आणि मग वर्षातून एकदा असे तीन वर्ष.

--
एका ओळखीत नवरा एचआयवी ने गेला तेव्हा बायकोने लगेच टेस्ट केली. तेव्हा ती टेस्ट निगेटीव आलेली.

मग नवरा जावून तीन वर्षानी, तिला एड्स डिटेक्ट झाला.आणि सात वर्षाने ती गेली. नवरा लफडेबाज होता पण हि स्त्री नक्कीच न्हवती. मुलांना न्हवता झालेला कारण बहुधा नवर्‍याने मुलं झाल्यावर दिवे लावलेले बाहेर जावून.
--------------------------------

त्यामुळे ह्या पाहणीनंतर आम्हीच कन्फ्युज झालेलो. अजून तरी पुन्हा कोणा डॉ प्रत्यक्षात विचारलेले नाही. तेव्हा हि वरची माहिती फक्त एक पाहणीत आलेली म्हणून लिहिलीय.

पण मग पेशंटच्या टेस्ट रिपोर्टवर निगेटिव्ह रिझल्ट असतानाही एक महिन्याने वगैरे पुन्हा टेस्ट करुन घ्यावी असा सल्ला छापलेला असतो त्याचं काय? >>>> अश्विनी, हेच मी काल वहिनीच्या आईला विचारले की तुम्हाला रिपीट टेस्ट करायला सांगितली नाही का त्यावर त्या नाही म्हणाल्या.

इथे माझी चुक झालीच आहे जे मी लग्नाआधी टेस्ट करण्याची किंवा लग्नानंतर दोन महिन्यांनी जेव्हा इथे प्रश्न विचारलेला तेव्हाही कोणते ठाम पाऊल उचलले नव्हते. पण आता पश्चाताप करुन घेत रहाण्यात काही अर्थ नाहीये कारण ती वेळ निघुन गेली आहे परंतु तुम्हा सर्वांच्या सल्ल्यानुसार या पुढे मी त्या दोघांचे उपचार कराण्यास व काळजी घेण्याचा प्रयन्त करीन.

दिनेशदा, सध्या ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाते गरज लागल्यास जामोप्यांची मदत घेईन.

साधनाताई, मनस्ताप नाही ओ, उलट हाच प्रश्न मलाही पडला होताच. अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या आता समोर येत आहेत. भावाने हा प्रेमविवाह केला आहे त्यावेळेस सगळे त्याच्या विरोधात होते त्यामुळे त्याने आणि वहिनेने बर्‍याच गोष्टी खोट्या सांगितल्या आणि लग्नासाठी सगळ्यांना तयार केले. तिचा नवरा एड्सने गेला म्हणुन सगळे शाशंक होते पण एकानेही परत टेस्ट करावी म्हणुन पुढाकार घेतला नाही. साती यांच्या म्हणण्याप्रमाणे या केसमध्ये इग्नोरन्समुळे आणि अपुर्‍या माहितीअभावी नुकसान झालेले आहे.

असो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल धन्यवाद.

निल्सन काळजी घ्या.
मलाही तोच प्रश्न पडला होता की टेस्ट निगेटिव्ह होती तर नंतर पॉझिटिव्ह कशी झाली.
साधना व डॉ.सातींच्या डिस्कशनमुळे क्लियर झाले.

अश्विनी, मला ऑफिसमध्ये अर्जंट काम आले म्हणुन मी नाही जाउ शकली पण भाऊवहिनी सिव्हीलमध्ये आहेत. त्यांना तिथे वहिनीचा १० वर्ष जुना रेकॉर्ड आणायला सांगत आहेत. हरवला सांगितले तरी शोधा आणि आणा असा उर्मट जवाब देत आहेत. कोणीही काही ऐकुन घेत नाही आता कुठुन आणणार तो रेकॉर्ड.

ओह! मी आज तिकडे नाहिये म्हणून. नाहितर मी स्वतः गेले असते त्यांच्या बरोबर ART मध्ये आणि बोलले असते. थोडं आधी हे कळलं असतं तर आज तिथे हेल्प डेस्कला आमच्या संस्थेचे volunteers असतात त्यांच्याकडे जायला सांगितलं असतं. साडेबारापर्यंतच आम्ही असतो तिथे.

रेकॉर्ड नसेल तर नविन टेस्ट करुन घ्या आणि नव्याने ह्या केसकडे पाहा म्हणावं. तिच्या पहिल्या नवर्‍याचा रेकॉर्ड हवा आहे का त्यांना? तसं असेल तर सरळ नाहिये म्हणून सांगा आणि आता जो पेशंट आहे त्याच्याकडे पहा म्हणावं.

भावाने टेस्ट करत नाहित सांगितले म्हणुन मी हॉस्पिटलला गेले. भाऊ,वहिनी आणि तिचा मुलगा तिघेही तेथे थांबले होते. भावाने सांगितले ART मधुन सविता यांनी (नाव बदललेले आहे) त्यांना एकतर वहिनीचे आधी केलेली टेस्ट जी निगेटीव्ह होती, तिच्या नवर्‍याचे आधीचे रेकॉर्ड किंवा तिच्या मुलाच्या जन्मावेळचे रेकॉर्ड ज्यात त्या दोघांची HIV टेस्टचे पण पेपर असतील ते घेऊन या तरच पुढील प्रोसेस करु. वहिनीची तेव्हा डिलेव्हरी कळवा सरकारी इस्पितळात झाली होती.

तिथुन मी आणि वहिनी कळवा हॉस्पिटलला गेलो त्यांनी सांगितले की एव्हढे जुने रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही तरिही शोधायचे असतील तर डिस्चार्ज कार्ड घेऊन या. मग आम्ही तिथल्या ARTसेंटरला गेलो व त्यांना सगळी परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही इथे उपचार करु शकतो पण तुम्हाला जवळ हक्काची सोय असताना एव्हढ्या लांब येण्याची गरज नाही. एवढा जुना रेकॉर्ड सापडणे कठीण तर आहेच परंतु त्याची एवढीही निकड नाही. तसेच त्यांनी सिव्हीलमधल्या ARTसेंटरमध्ये काम करणार्‍या जाणकार नीतामॅडमचे नाव सुचविले.(नाव बदललेले आहे)

तिथुन पुन्हा आम्ही सिव्हिलला येऊन सवितामॅडमकडॅ गेलो. तिला मी सांगितले की ते रेकॉर्ड सापडत नाहीत तुम्ही नविन पेशंट म्हणुन बघा त्यावर ती मला आम्ही रिलेटीव्हशी बोलत नाही तुम्ही मध्ये बोलु नका वै. जोरजोरात बोलु लागली. मी तिला नीतामॅडमशी बोलते असे बोलल्यावर ती अजुनच फटकारुन बोलु लागली. मीपण थोडंस भांडण करुन तिथुन निघाले आणि तिची लेखी कंम्लेंट केली.

नंतर जाऊन नीतामॅडमना भेटले त्यांनी शांतपणे सगळे ऐकुन घेऊन थोडीफार माहिती देऊन आम्हाला सविताकडे घेऊन गेल्या. तिथे गेल्यावर सविताने अतिशय उद्धटपणे आम्ही रिलेटीव्हसमोर बोलत नाही असे सांगुन मला केबिनबाहेर काढले. वहिनी आधीच खुप घाबरली असल्यामुळे मी नकार दिला तर नीतामॅडमने मला दोन मिनिटांनी बोलवते असे सांगुन बाहेर थांबायला सांगितले.

सुरवातीला सविताचा वहिनीशी जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता पण थोड्यावेळाने शांत झाला. १५ ते २० मि. मी बाहेर थांबले होते त्यावेळेस मी ठरविलेले की इथे उपचार नाही झाला तरी चालेल पण या सविताचा निकाल लावुनच जाणार. नंतर मला आत बोलविले तेव्हा आतील वातावरण वेगळंच होते, सविताबाई एकदम शेळी होऊन माझ्याशी बोलु लागल्या. शेवटी तर आम्हाला सोडायला बाहेर येऊन आमच्याशी अजुन १० मि. गप्पा मारल्या.

नीतामॅडमने सर्व प्रोसेस सांगितल्या, आजचा दिवस दिला आहे गर्भातल्या बाळाच्या भविष्याचा विचार करण्यासाठी. आधीच १० आठवडे झाले आहेत त्यामुळे नंतर MTP करणे कठीण होईल. असेही सिव्हिलला आता अ‍ॅबोर्शन करणे शक्य नाही त्यांनी आम्हाला जर अ‍ॅबोर्शन करायचेच असेल तर दोन दिवसात जे.जे. ला जाण्यास सुचविले आहे. हा निर्णय भाऊ-वहिनी मिळुन घेतीलच. जर गर्भ ठेवणार असतील तर उद्या त्या दोघांची टेस्ट करुन उपचार सुरु करणार आहेत आणि जर MTP केले तर त्यानंतर या दोघांची टेस्ट करुन उपचार सुरु करणार आहेत. शिवाय तिच्या मुलाचीही टेस्ट करणार आहेत.

शिवाय तिच्या मुलाचीही टेस्ट करणार आहेत.>>> मी हे मगाशी म्हणणारच होते.

असो. ते दोघं काय निर्णय घेतील तो घेतील. अजून काही तिथे प्रॉब्लेम वाटल्यास तिथल्या एक मोठ्या नर्स..कदाचित मेट्रनही असतील... माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत. कळवलंत तर त्यांच्याशीही काही अडचण आल्यास लक्ष देण्यासाठी बोलून ठेवेन.

काहितरी होवून दोघांच्या टेस्ट्स चांगल्या येवोत Happy

हे सगळे मी इथे लिहतेय कारण मला इथे नेहमीच आधार वाटत आला आहे. या आधीही साती यांनी माझ्या भाचीसाठी मानसतज्ञ सुचविले होते त्याचीही मला खुप मदत झाली. बाकी छोट्यामोठ्या खुप सार्‍या गोष्टी इथे शिकायला मिळतातच.

तरीही कोणालाही आक्षेप असल्यास व मी हमदर्दी(मराठी शब्द?) गोळा करतेय असे वाटत असेल तर वरची पोस्ट काढुन टाकेन.

Nilson, जो काय निर्णय असेल तो असेल पण उपचार होणारेत दोघांवर हे वाचून बरे वाटले. भावाला आणि वहिनीला धीर द्या. ते दोघेही अचानक उद्भवलेल्या या संकटाने घाबरले असतील. तुम्ही सोबत आहात हा विश्वास त्यांना पुढे घेऊन जाईल.

निल्सन, तुम्हाला इथे लिहून फायदा होतो/ झाला आहे हे जास्त महत्त्वाचं. बाकी कोणाला काही वाटत असेल ते वाटो, तसा वाकडा विचार करण्याची त्यांची मर्जी.
काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. सवितामॅडमची शेळी होऊन चांगली सुरूवात झालेली आहेच. पुढचंही सगळं नीट पार पडेल.

मंजूडी +१
निल्सन, तुमच्या भावाच्या कुटुंबाला शुभेच्छा! योग्य उपचार मिळून सर्व काही ठीक होवो. तुम्ही भावावहिनीच्या पाठी उभ्या आहात, लढत आहात हे फार मोलाचे. तुम्हाला यश लाभो हीच प्रार्थना.

निल्सन, तुमच्या भावाच्या कुटुंबाला शुभेच्छा! योग्य उपचार मिळून सर्व काही ठीक होवो. तुम्ही भावावहिनीच्या पाठी उभ्या आहात, लढत आहात हे फार मोलाचे. तुम्हाला यश लाभो हीच प्रार्थना! >> माझ्याही शुभेच्छा!

मन शांत ठेवा, सर्व काही ठीक होईल.

{२. ३ महिने एक्सपोजर टाळायला सांगा (यू नो व्हॉट आय मीन) }

नो आय डोन्ट नो व्हॉट यू मीन. कॅन यू एक्स्प्लेन प्लीज.

नील्सन यांना शुभेच्छा. व ऑल द बेस्ट. घाब्रू नका हो. सगळं चांगलं होईल.

इतर गोष्टीत एचआयवी टेस्ट पॉझिटीव्ह येणे, व फुल ब्लोन एड्स होणे यांत फरक आहे असे माझ्याकडे दारू प्यायला येणार्‍या गिर्‍हाईकांकडून समजले, जोप्र्यंत एड्स होत नै तोप्र्यंत प्राब्लेम नस्तो म्हणे.

दुस्रं, हा धागा दोन हजार दहाला चालू केला. आज सोळा चालूये. इतक्यात एड्सला तितकं घाबरू नये अशी कण्डीशनेय
आसं पण आईक्लंय.

निल्सन, आत्ताच हे वाचले. तुम्हाला आणी तुमच्या कुटुम्बीयाना शुभेच्छा. काळजी करु नका. मन आशावादी व खम्बीर असु दे, देव पाठिशी असतोच.

Pages