लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

एच आय व्ही विषाणू तापमानानुसार ४० दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात. कुणाचेही रक्त मिसळलेले अन्न खावू नये, अगदी एच आय व्ही निगेटीव्ह व्यक्तीचेही.
समजा गेलेच पोटात अन्न तर काय? जर खाणार्‍या व्यक्तीला तोंडात, पोटात अल्सर असेल किंवा इतर कुठली जखम असेल तर ट्रान्स्मिशन होवू शकते. काही आया गाजर इ स्वतः आधी चावून मग बाळाला चावायला देतात. अशावेळी आई पॉझिटीव्ह असेल तर बाळात प्रतिकारशक्ती कमी असल्याने, दात येताना कधी कुठे तोंडात जखमा असल्याने ट्रान्स्मिशन घडू शकते. प्रौढ व्यक्तीत अजून तरी अशा रिपोर्टेड केसेस नाहीत.

https://www.aids.gov/hiv-aids-basics/hiv-aids-101/how-you-get-hiv-aids/
बरीच माहिती सोप्या भाषेत ह्या लिंक मध्ये आहे.

आता मी अजुनच कन्फ्युज झाले आहे.

मी काल हेल्पलाईनवर फोन करुन विचारले असता त्यांच्या म्हणण्यानुसार हे विषाणु शरीराबाहेर, मोकळ्या पृष्ठभागावर १ मिनीटापेक्षा जास्त जगु शकत नाहीत. गुगलवर सर्च केल्यावर याचा कालावधी ३० सेकंद ते ३ मिनिटे एव्हढा सांगितला.
बोट वैगरे कापुन रक्त मिसळलेले कच्चे अथवा शिजविलेल्या अन्नातुन हा विषाणु पसरत नाही असेही सांगितले.

एच आय व्ही विषाणू तापमानानुसार ४० दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात >>>> हे जर रक्त साठविलेले असेल तर त्याबाबतीत शक्य आहे किंवा एकच सुई वापरल्यास.

आज डॉक्टर भेटले नाहीत पण काउंसलरला विचारले असता त्यांनीही हेच उत्तर दिले. इथल्या डॉक्टरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

सीमंतिनी, दुसरा पॅरेग्राफ पटतोय. अशा परिस्थितीत आपण जागरुक असतोच पण डोक्यावर टांगती तलवार लटकत राहु नये यासाठी हा सगळा खटाटोप.

मी काहीच वेळाने इथेच सगळं डिटेलमध्ये लिहिते. >> साती वाट बघतेय सकाळपासुन.
निल्सन तुम्ही अज्जिबात घाबरू नका. >>>>> ओह धन्यवाद! या वाक्यामुळे घाई नाही करत पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहा आणि नक्की लिहा.

छान बातमी निल्सन! खूप बरे वाटले वाचून. तुमच्या वहिनीचीही ट्रिटमेंट व्यवस्थित होइल. शुभेच्छा आणि प्रार्थना!

घाबरू नका निल्सन. प्रौढात अन्न पदार्थातून ट्रान्स्मिशनच्या केसेस अजून तरी आढळलेल्या नाहीत. पण टेक्निकली विषाणू किती दिवस जिवंत राहू शकतो याचे उत्तर मी लिहीले आहे. (रेफरंस लिंक दिली आहे).

निल्सन,
एच आय वी कसा पसरतो हे साधारण माहितच असेल.
तर अश्या प्रकारच्या पसरण्यातील रिस्क किती असते हा दाखवणारा
हा चार्ट पहा.

त्यात निग्लीजीबल म्हणून जी रिस्कची यादी दिली आहे त्यात लिहिलेल्या मार्गांनी एच आय व्ही पसरणं टेक्निकली शक्य आहे.
पण तसे पसरलेले अद्यापी आढळून आले नाही.

मी एम डीच्या तीन वर्षांत एस्पेशियली एच आय व्ही पॉझिटीव्ह लोकांत काम केलंय.
त्यातल्या कित्येक पेशंट स्त्रिया खास काही स्वयंपाक करून डबे भरून आणायच्या दर आठवड्याला माझ्यासाठी .
कधीही खाताना माझ्या मनात शंका आली नाही कारण अश्याप्रकारे एच आय व्ही पसरणार नाही याची पूर्ण खात्रीच होती.

सो घाबरू नका.
वरच्या यादीत जी रिस्क दिलीय ती रिस्कही जर एव्ह आय व्ही ची औषधे चालू असतील तर अगदी कमी होऊन जाते.

शक्यतो सगळी खबरदारी घ्या.
(वर सिमंतीनी यांनी लिहीलंय तसं दातांनी तोडलेले अन्न दुसर्‍याने न खाणे वगैरे)
पण वहिनीने भाजी केली तेव्हा बोट तर काप नसेल ना, अन्नात रक्त तर मिसळले नसेल ना असे विचार मनात येऊ देऊ नका.

साती, सिमंतीनी आणि निल्सन यांना धीर देणारे सगळे _/\_.
आणि निल्सन तुमच्या धैर्याबद्दल _/\_
खुप छान वाटलं इथे सगळे वाचून.

@ साती , खूप गरजेची माहिती दिलीत आपण

निल्सन, आपणास खूप बळ मिळो, असेच आपल्या भावा आणि वहिनी बरोबर सदैव रहा.

मी एम डीच्या तीन वर्षांत एस्पेशियली एच आय व्ही पॉझिटीव्ह लोकांत काम केलंय.
त्यातल्या कित्येक पेशंट स्त्रिया खास काही स्वयंपाक करून डबे भरून आणायच्या दर आठवड्याला माझ्यासाठी .
कधीही खाताना माझ्या मनात शंका आली नाही कारण अश्याप्रकारे एच आय व्ही पसरणार नाही याची पूर्ण खात्रीच होती.

बापरे साती...HIV असा पसरत नाही हे माहीत असते. (अनेक वेळा आपण बाहेर धाब्यावर वगैरे जेवतो तेव्हा ते कोणी बनवलंय, ती व्यक्ती निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हे कुठे माहीत असते) पण एच आय व्ही पॉझिटिव्ह महिलांसोबत सतत काम करताना मनात किंतु येऊ न देणं..स्पर्श झाला किंवा जेवण बनवून आणलं तर ते सहजपणे स्वीकारणं..हे करणं खरंच हॅट्स ऑफ टू यू.

सनव,
यात विशेष काही नाही.
माझा थिसीसचा विषयच 'ए आर टी औषधांचा शरीरातील फॅटवर होणारा परिणाम' हा होता.
त्यामुळे दररोज पेशंट मिळवायला ए आर टी ओपिडीत बसून पेशंटसच्या फॅटची मोजमापे घ्यावी लागायची.
एकाच पेशंटची एका वर्षात तीनदा घ्यावी लागायची.

दरवेळी तेच पेशंटस बघून बघून एकप्रकारची अनौपचारिकता येत असे.

सरकारी हास्पिटलात डॉक्टर काही पैसे वगैरे घेत नाहीत.
म्हणून लोक प्रेम व्यक्त करायला खाऊ/फुलं असे घेऊन येतात.
Happy

डॉक, एचआयव्ही पेशंटच्या शरीरावर चरबी टिकत नाही हे खरं आहे का?
माझ्या बालमैत्रीणीला दुसर्‍याच्या चुकीमुळे हा त्रास भोगावा लागत असल्याने एक प्रकारची चिंतायुक्त उत्सुकता आहे.

साती, सिमंतीनी आणि निल्सन यांना धीर देणारे सगळे _/\_.
आणि निल्सन तुमच्या धैर्याबद्दल _/\_
खुप छान वाटलं इथे सगळे वाचून.>>>>> +१.

साती, विंडोज पिरीयड बद्दल पण एकदा सविस्तर लिहिणार का ? एकदा एक्स्पोझ झाल्यावर पहिली टेस्ट निगेटीव्ह आली तर किती वर्षांनी ती परत(परत) करायला हवी ? काय लक्षणे दिसू लागल्यावर करायला हवी ?

नमस्कार,

या आधी इथे माझ्या भावा-वहिनीबद्दल चर्चा झालीच आहे तिथुन कंटिन्यु....
काउंन्सलींग नंतर गर्भ ठेवण्याचा निर्णय भाऊ आणि वहिनीने घेतला आणि त्यानुसार तिच्यावर उपचार सुरु झाले. आणि आज वहिनीने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत Happy
'त्या' कठीण प्रसंगी तुम्हा माबोकरांची मला साथ होती, तुमच्या सदिच्छांनी मला मानसिक आधार मिळाला त्यामुळेच हि आनंदाची बातमी सगळ्यात आधी तुम्हालाच सांगावीशी वाटली Happy
बाळावर उपचार सुरु झालेत, दिड महिन्यांनी पहिली टेस्ट होईल व त्यानंतर १८ महिन्यापर्यंत वेगवेगळ्या टेस्ट होणार व त्यावर बाळाचे भवितव्य समजेल. आता पुन्हा थोडा हावरेपणा करत तुमची मदत मागते की यावेळेस बाळाची टेस्ट निगेटिव्ह यावी यासाठी त्याला खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या.

अभिनंदन निल्सन!
इतके सगळे तुम्ही पॉझिटिव्ह मनाने पार पाडले आहे, पुढेही सर्व व्यवस्थितच होईल.
शुभेच्छा.

छान.

बाळाला नेविरापिन सायरप सुरु करा. सहा आठवडे.. मग सेप्ट्रान सायरप ... ते दीड वर्षे तरी चालेल.. बेबीचे वजन वाढेल तसे डोस वाढवावे लागतात.

दर पंधरा दिवसानी पेडियाट्रिशियनला / ए आर टी सेंटरला दाखवणे.
आता सहा आठवडे सहा महिने एक व दीड वर्षानी एच आय व्ही टेस्ट होइल.

फीडिंग एकच करणे ... आईचे दूध किंवा वरचे . मिक्स फीड अज्ज्जिइबात नाही... तुम्ही कोणता ऑप्शन घेतलाय ?

सगळे वॅक्सिन द्या.

अभिनंदन निल्सन! बाळाला आशिर्वाद आणि शुभेच्छा! . डॉकचे सल्ले अगदी काटेकोरपणे पाळा. सगळे व्यवस्थित होवो ही देवाकडे प्रार्थना.

अभिनंदन निल्सन! बाळाला खूप खूप शुभेच्छा !

जामोप्या (अनिलचेम्बुर) ह्यान्च्या सल्ल्याप्रमाणे डौक्टराशी बोला.

बाळाला आशीर्वाद आणि शुभेच्छा!
बाकी सर्वच डॉक्तरांच्या सल्ल्याप्रमाणे करणे.

Pages